Mrs. मुख्यमंत्री - mrs mukhyamantri

Submitted by DJ.. on 14 June, 2019 - 02:54

झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. Mrs.मुख्यमंत्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही.

ही मालिका २४ जुन पासुन प्राईम टाईम स्लॉट मधे संध्याकाळी ७ ते ७.३० वाजता झी मराठी वर प्रसारीत होईल त्यासाठीच हा धागा..! Bw

mrs mukhyamantri

mrs cm.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असं बोलणं म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर नायिकेचं नाव ठसवण्याची कला आहे.. आता हेच बघा.. आपण कितीवेळा सुमी ला सुमीच म्हणत आहोत Proud

कलर्सच्या स्वामिनी मध्ये तर लहानगी रमा सुद्धा, अशीच बोलते,>> दोन्ही सिरियलस मधे कपडेपट वगळता कुठलाच फरक नाहिये . तेच सासु सुन भांडण कुरघोड्या

लग्नानांतरही सुमी तश्शीच दिसते वागते.>> गुळचट वरण-भाताबरोबर लसणाची झणझणीत चटणी दिली तर अंतरबाह्य चटणीचाच स्वाद रहाणार ना..?? Wink

है.. आम्ही मिरवणार... सम्द्यांची जिरवणार.. Biggrin

गुळचट वरण-भाताबरोबर लसणाची झणझणीत चटणी>>>>>>>> उपमा पटली नाही.
एक गरीब कष्टकरी घरातली सामान्य मुलगी (खरंतर आगाऊ विथ नो डिसन्सी) श्रीमंतीने आणि पदानेही मोठ्या घरी लग्न होऊन जाते तर थोडीशी डीसन्सी यावी अशी माफक अपेक्षा.
पण नाही. म्या सुमी हाय. मला जे पाहिजे तेच मी करणार. कानात मोठे रींग आनी त्यात झुंबर अडकवणार. सासरची डिग्नीटी डिसेन्सी श्रीमंतीची लक्षणं ह्याच्याशी मला काय देणंघेणं नाही. वाघाच्या जबडयात हात घालुन पैसे काढौन घेईल ही सुमी.

सर्वोत्कृष्ट चिलखत सासु असा पुरस्कार सुमीच्या सासुला मिळेल. कारण मुलाच्या लग्नात तिने चिलखत वाटावे असा नेकलेस घातला होता. Biggrin

Pages