Submitted by DJ.. on 14 June, 2019 - 02:54
झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. Mrs.मुख्यमंत्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही.
ही मालिका २४ जुन पासुन प्राईम टाईम स्लॉट मधे संध्याकाळी ७ ते ७.३० वाजता झी मराठी वर प्रसारीत होईल त्यासाठीच हा धागा..!
mrs mukhyamantri
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही सिरीयल जाम स्लो आहे. मी
ही सिरीयल जाम स्लो आहे. मी मागे नेटवर सलग काही भाग बघितले. नंतर gap घेऊन काल एक भाग बघितला तर तेच तेच दळण सुरु. नायिकेला अजूनही पत्ताच नाहीये कि तो माजी मु मं चा मुलगा आहे आणि ते कळू नये म्हणून त्याची धावपळ सुरु आहे. आता अजून आठ दिवसांनी एखादा भाग बघेन
नायिकेला अजूनही पत्ताच नाहीये
नायिकेला अजूनही पत्ताच नाहीये कि तो माजी मु मं चा मुलगा आहे आणि ते कळू नये म्हणून त्याची धावपळ सुरु आहे. >>>> अरे देवा , किती
घिसीपीटी कल्पना आहे .. आअतापर्यन्त किती ठिकाणी हीच गोष्ट वापरली आहे .
अनु आणि सिद्धु , जानी आणि श्री ...
आता सुमीला कळलय सगळं तरीी का
.
टायटल साँग मात्र भन्नाट आहे..
टायटल साँग मात्र भन्नाट आहे..
पत्रिका चांगली आहे म्हणुन
पत्रिका चांगली आहे म्हणुन एवढी बावळट मुलगी पसंत करायची.
कुणी कलाकार पण चांगले वाटत
कुणी कलाकार पण चांगले वाटत नाहियेत..
रखमा लाजत मात्र भारी होती.
रखमा लाजत मात्र भारी होती.
रखमा म्हणजे ती नागीण झाली
रखमा म्हणजे ती नागीण झाली होती तीच का.
हो. तीच ती. र ख मा
हो. तीच ती. र ख मा
मी एक दोन एपिसोड पाहिले. बरी
मी एक दोन एपिसोड पाहिले. बरी वाटली मालिका . विशेषतः त्या नायकाच काम आवडलं
तेजस बर्वे छान करतो काम.
तेजस बर्वे छान करतो काम. त्याच्या तो बारीक अंगकाठीचा 'साहेब-साहेब' म्हणणारा काळा नोकर मजेशीर वाटतो. बाकी नाही आवडलं काही मालिकेतले. अर्थात tp आहे.
ओरिजिनल लोकेशन मुळे अपिलिंग
ओरिजिनल लोकेशन मुळे अपिलिंग वाटते ही मालिका. टायटल साँग तर भन्नाट आहे. मी कधीकधी पहातो.
लग्नाचा २ तासांचा एपिसोड
लग्नाचा २ तासांचा एपिसोड पाहिला. गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ना समर्पित होता. छान दागिने होते सर्वांचेच. त्या सासूबाईने तर कॉलर वाटावी एवढा जडावू घातलेला अगदीच मान अडकवली होती तिची. सुमीचे दागिने, साड्या छानच.
नव्या नवरीने गृहप्रवेशावेळी
नव्या नवरीने गृहप्रवेशावेळी जिरवणार वैगेरे उखाणा घेतला.
झालं का लग्न. आता एखादा
झालं का लग्न. आता एखादा एपिसोड बघायला हवा. गणपतीबाप्पा विसर्जन बघितलेला. त्यानंतर नाही. मधेच पंधरा दिवसांनी एखादा बघते, काम सर्वजण छान करतात, नॅचरल वाटतात.
गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ना
गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ना समर्पित होता. छान दागिने होते सर्वांचेच.>> नव्हे पु.ना.गाडगीळ सातारा शाखा होती ती
मला ही मालिका आजिबात आवडत
मला ही मालिका आजिबात आवडत नाहीये अताशा! सुमी तर आधीपासूनच आवडत नव्हती आणि तो तिचा पायलट पण आता कै च्या कै वाटतो.
सुमी फारच आगाऊ आहे. अतीच!
सुमी फारच आगाऊ आहे. अतीच!
अगाऊ आहे.. पण त्या भुमिकेत
अगाऊ आहे.. पण त्या भुमिकेत चपखल बसते. ही भुमिका तिच्याशिवाय दुसरं कोण करु शकलं नसतं.
हे पात्रच आवडत नाही मला मुळात
हे पात्रच आवडत नाही मला मुळात.
एक मुख्यमंत्री ज्याचं पान त्याच्या बायको शिवाय हलणार नाही? मग पुढे स्वतःचे निर्णयही (राजकारणातले) तो तिलाच विचारून घेणार का?
आणि ते मिरवणार-जिरवणार शब्द ऐकून ऐकून तिडिक गेली आहे डोक्यात. स्वतः खर्च करण्याची तयारी नाही. पण लग्न थाटामाटातच झाले पाहिजे. म्हणजे खर्च करायचा मुलाकडच्यांनी. हेच जर उलटे असते, तर मुलीकडचे श्रीमंत आहेत म्हणूनच मुलाने मुलीला जाळ्यात ओढलं आणि आता लग्नापासूनच लुटण्याची सुरवात झाली वगैरे असा झाला असता दृष्टीकोन.
लग्नात मिरवायचे म्हणून हट्ट धरणारी कार पाठवल्यावरही केवळ सासरच्यांची जिरवायची म्हणून सायकलीवर येते मंडपात. कोणती पद्धत आहे ही? हेच उलटे असते ( गरीब घरचा मुलगा आणि श्रीमंत घरची मुलगी) तर मुलाला मवाली, रोड रोमियो वगैरे म्हणलं गेलं असतं सायकल वरून असा मुर्खासारखा लग्नाच्या दिवशी पोषाखाच्या विसंगत गॉगल घालून आला असता तर.
तिच्या वडिलांना लग्नात
तिच्या वडिलांना लग्नात स्वयंपाक करायला लावून त्यांचा अपमान करतात म्हणून ती तसा उखाणा घेते, तशीही ती खूप आगाऊ आहे. सासूबाईंची मान अगदीच आखडली होती, सासरे प्रत्यक्षात साताऱ्याचे तहसीलदार आहेत, च ह ये द्या मध्ये आले होते सगळे. सुमीचे बाबा सगळ्यात जास्त गोड आहेत आणि सेटवरही लोक त्यांनाच भेटायला येतात. सुमी नेहमी वैतागलेलीच असते आणि ओरडून बोलते, पायलटसारखा चम्याच तिचे नखरे झेलू शकतो. कशात काही नाही आणि सारखं आपलं ही सुमी अशी आणि ही सुमी तशी, वाघाच्या तोंडी दिलीच पाहिजे तिला एकदा.
मी मधुरा अनुमोदन. चम्या :लोल.
मी मधुरा, चंपा जोरदार अनुमोदन.
चम्या :लोल.
चंपा...
चंपा...
हो ना......जादाचा भोचक आगाऊ पणा! मी न म्हणता, सुमी म्हणते दरवेळी!
अति आगाउ ला अनुमोदन.
अति आगाउ ला अनुमोदन.
असं जिरवणार वैगेर उखाणा घेणार्या नवरीची वरात काढतील प्रत्यक्षात लोक.
स्वतः खर्च करण्याची तयारी नाही. पण लग्न थाटामाटातच झाले पाहिजे. >>>>अगदी अगदी.
मी न म्हणता, सुमी म्हणते दरवेळी>>>>>डोक्यात जातं ते.
मला तर एक कळत नाही सुमी सारखं
मला तर एक कळत नाही सुमी सारखं डोक्यात जाणार पात्र का लिहिले असेल लेखकाने?
इतका मोठा व्यवसाय चालवणारी स्त्री (मुख्यमंत्र्याची आई) जिने स्वतःच्या बुळचट नवऱ्याला मुख्यमंत्री बनवलं. (किती दिवसांचा का असेना, पण त्याच्या सारख्या माणसाला त्या पदापर्यंत पोचवण्याचे काम तिनेच केले.) तिला मुलाला मुख्यमंत्री बनवण्याकरता सुमी सारख्या फाटक्या तोंडाच्या मुलीची काय गरज आहे?
खरी खंबीर कोणी असेल तर ती समीरची आईच आहे आणि सुमीचा मूर्खपणा झेलायलाही आता ती च आहे.
समीर सारख्या अर्धवट डोक्याच्या आणि स्वतः निर्णयही घ्यायला असमर्थ असणाऱ्या मुलाला ही बिचारी झेलते आहे.
काय बोलावे यावर??
सुमी-पायलट चं ते काही असलं
सुमी-पायलट चं ते काही असलं तरी त्या म्हातारचळ लागलेल्या अग्गंबाई पेक्षा वरचा टी.आर.पी. मिळतोय मिसेस मुख्यमंत्रीला..!
मी_मधुरा, एवढं सगळं झालं का,
मी_मधुरा, एवढं सगळं झालं का, बघितला नाही पूर्ण भाग. तसे विसंगत गॉगल घालतात आजकाल आणि स्कूटर वर किंवा बैलगाडी मध्ये फोटो काढतात. आमच्या कडे एक ग्लॉसी कागदाचं लग्नावरचं इंग्लिश पुस्तक येतं, त्यात असतात अशा मोठ्या लग्नांच्या गोष्टी. तिला मोठं लग्न करायचं असतं म्हणजे सगळे विधी करायचे असतात. गावाकडे अशा लग्नाला फार खर्च येत नाही, दारातच मांडव घालतात, आचारी वगैरे स्वस्त असतात. सासरचे लोक गपचूप लग्न करायचं म्हणत असतात जे तिला नको असतं.
ती डोक्यात जाते एवढं नक्की.
सुमी-पायलट चं ते काही असलं
सुमी-पायलट चं ते काही असलं तरी त्या म्हातारचळ लागलेल्या अग्गंबाई पेक्षा वरचा टी.आर.पी. मिळतोय मिसेस मुख्यमंत्रीला..! >>>>>> त्याने काय फरक पडतो?
बुळचटपणा आणि मूर्खपणा हे म्हातारचळापेक्षा उत्तम असे काही म्हणायचे आहे का?
गावाकडे अशा लग्नाला फार खर्च
गावाकडे अशा लग्नाला फार खर्च येत नाही, दारातच मांडव घालतात, आचारी वगैरे स्वस्त असतात. सासरचे लोक गपचूप लग्न करायचं म्हणत असतात जे तिला नको असतं.>>>>>>>>>>> तसं जाणवलं नाही पण. अख्ख गावजेवण घालायचं म्हणजे खर्च वाढणार नाही का?
आणि बाकीच्या तयारीत तरी कुठे सहभाग होता तिचा?
जर मांडव दारातच घालतात, तर तो मुलीच्या दारात घालतात की मुलाच्या? माझ्या माहिती प्रमाणे मुलीच्या. मग तसं तरी कुठे झालं? सगळा खर्च (लग्नाचा) मुलाच्या घरच्यांनी केला आहे असे दृश्य आत्ता तरी दिसते आहे.
मी न म्हणता, सुमी म्हणते
मी न म्हणता, सुमी म्हणते दरवेळी>>> सध्या फॅशन आहे ही, कलर्सच्या स्वामिनी मध्ये तर लहानगी रमा सुद्धा, अशीच बोलते, रमाला हे आवडले नाही, रमा असे करणार नाही वगैरे वगैरे, अजुन एका शिरेलीत पण हिरोईन स्वत:ला नावाने बोलत असल्याचे आठवतेय
Pages