Submitted by DJ.. on 14 June, 2019 - 02:54
झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. Mrs.मुख्यमंत्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही.
ही मालिका २४ जुन पासुन प्राईम टाईम स्लॉट मधे संध्याकाळी ७ ते ७.३० वाजता झी मराठी वर प्रसारीत होईल त्यासाठीच हा धागा..!
mrs mukhyamantri
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही लोकं मराठी बायांना एवढं
हो ना डोकं सुन्न. ही लोकं मराठी बायांना एवढं माठ का दाखवतात?
हिमयुगात जगतात का हे झी मराठी
हिमयुगात जगतात का हे झी मराठी वाले??
महाराष्ट्रातल्या कुठल्या मुख्यमंत्र्यांची बायको अशी होती ?
करंट मिसेस मुख्यमंत्र्यांकडे तरी पाहायचं...
आता असल्या सिरियल्सपेक्षा पौराणिक मालिका परवडल्या..
:चिडचिड:
आणि तो मुख्यमंत्री तरी किती
आणि तो मुख्यमंत्री तरी किती पोरसवदा दाखविलाय! ही त्याची मोठी बहिण वाटते. गुरव- राधिकाची आठवण आली!
काय कास्टींग, काय थीम, काय सीन्स!! आनंदी आनंद दिसतो आहे एकूणात!
आणि बिहार मधे किंवा तिकडे झारखंडात असतील म्हणा अशा मिसेस सीएम!
आमच्या संपन्न, समृद्ध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बायका सुद्धा सुविद्य, गुणी आहेत!
Mrs. गुंठामंत्री असं असतं तर
Mrs. गुंठामंत्री असं असतं तर एक वेळ पटलं असतं....
आमच्या संपन्न, समृद्ध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बायका सुद्धा सुविद्य, गुणी आहेत! >> +१००००००००
विरासत मध्ये जसं अनपेक्षित लग्न करावं लागतं तशी काही गत असेल... तरी कैच्याकैच दाखवलंय...
लाज आणतात हे झी वाले
तो मुख्यमंत्री तरी किती
तो मुख्यमंत्री तरी किती पोरसवदा दाखविलाय! >> अगदी अगदी!!
{{{ आणि तो मुख्यमंत्री तरी
{{{ आणि तो मुख्यमंत्री तरी किती पोरसवदा दाखविलाय }}}
https://www.loksatta.com/maharashtra-news/yuvasena-aditya-thackeray-cm-p...
दिप्ती भागवत >>>>
दिप्ती भागवत >>>>
हे मी दिप्ती भगत वाचलं आणि उडालोच
गाडीवर कोणी सांडगे वाळत घालेल
गाडीवर कोणी सांडगे वाळत घालेल का ? ते पण मुख्यमंत्र्यांची बायको
अरे काय डोक्यावर पडले का हे सिरीयल, चॅनल वाले ?
एकसे एक दळभद्री कल्पना आणतात
झी मराठी पेक्षा अजूनही सह्याद्री चा दर्जा चांगलाये म्हणायचा
अशानं आपल्या अमृता ताई मात्र
अशानं आपल्या अमृता ताई मात्र खवळून शीरेलीवर बंदी आणतील बहुतेक. अब्रूनुकसानीचा दावाही करायला हरकत नाही.
आणि तो मुख्यमंत्री तरी किती
आणि तो मुख्यमंत्री तरी किती पोरसवदा दाखविलाय! >>>>>>>>> तो मुलगा तिचा नवरा होता?
हे मी दिप्ती भगत वाचलं आणि उडालोच >>>>>>>> कोण ही दिप्ती भगत , अज्ञा?
गाडीवर कोणी सांडगे वाळत घालेल का ? ते पण मुख्यमंत्र्यांची बायको >>>>>>>> मेबी मुख्यमन्त्री अश्या कामासाठी जात असेल जे तिला पटत नसेल, म्हणून तिने जाऊ नये म्हणून गाडीवर वाळत घातले असेल सांडगे? का, मुख्यमन्त्र्याकडे दुसरी गाडी नाहीये का? काहीही!
सध्या अॅम्बॅसिडर वापरात
सध्या अॅम्बॅसिडर वापरात असते का?
@ अज्ञातवासी >>> मी फक्त
@ अज्ञातवासी >>> मी फक्त कविताच करते रे.मला मालिकेत काम करायला अजिबात इंटरेस्ट नाही.
@ सुलू>> मीच ती दिप्ती भगत आणि इथे मन्या ऽ
navin promo pahila ka tyat cm
नवीन प्रोमो पहिला का? त्यात तो मुख्यमंत्री मीटिंग मध्ये असतो आणि ही बया पडद्याआडून शुक शुक करते, तो लक्ष नाही देत तर ही आत घुसून म्हणते, कि घरी कोणी गडीमाणूस नाही तर दळण आणून द्या.
मुख्यमंत्री असला म्हणुन काय
मुख्यमंत्री असला म्हणुन काय झालं..? दळण आणुन दिलं म्हणुन बिघडलं का..??
मुख्यमंत्री असला म्हणुन काय झालं..? ऑटो, बस, लोकल ट्रेन ने गेला म्हणुन बिघडलं का..??
मुख्यमंत्री असला म्हणुन काय झालं..? स्वतःचा संसार बाजुला ठेवायचा का..??
प्रोमो दाखवुन प्रेक्षक रिझर्व करण्याचा झीचा फंडा अफलातुन आहे..!!
मुख्यमंत्री असला म्हणुन काय
मुख्यमंत्री असला म्हणुन काय झालं..? दळण आणुन दिलं म्हणुन बिघडलं का..?? Wink
मुख्यमंत्री असला म्हणुन काय झालं..? ऑटो, बस, लोकल ट्रेन ने गेला म्हणुन बिघडलं का..?? Wink
मुख्यमंत्री असला म्हणुन काय झालं..? स्वतःचा संसार बाजुला ठेवायचा का..??>>>
करू देत की मुख्यमंत्र्याला ही सगळी कामं.. जाऊ देत पब्लिक ट्रान्सपोर्टने..
त्यावर आक्षेप नाहींच्चे मुळात...
मुख्यमंत्र्यांच्या बायकोचं चित्र उभं केलंय त्याला आक्षेप आहे.
आणि एकुणातच झी वाले बायकांना निर्बुद्ध, कुठे कसं वागायचं याचं भान नसलेल्या दाखवतात त्याला आहे
मुख्यमंत्र्याची बायको हेअर
मुख्यमंत्र्याची बायको हेअर स्ट्रेटनिंग केलेली, ओपरेशन करुन हनुवटी कोरुन घेतलेली, उभार ठीक-ठाक करुन घेतलेली, मॅनिक्युअर, पॅडीक्युअर केलेली, मेकप थापलेली, वेस्टर्नाईज कल्चर पाळणारी, सरकारी कार्यक्रमात धोकादायकपणे सेल्फी घेणारी, नवर्याच्या पदाचा वापर करुन इच्छा-आकांक्षा पुर्ण करणारी अशी जरा मॉड दाखवायला हवी होती झी ने..!! निर्बुद्धच आहेत म्हणा ते.. कोणत्या काळात वावरतात कोण जाणे..
काय तो नवरा नि काय त्याची
काय तो नवरा नि काय त्याची बायको, म्हणे मुख्यमंत्री.... युजलेस...
हे असे प्रोमो दाखवुन त्यांना काय वाटतं की प्रेक्षक हसतील, अरे माकडीच्यांनो, हे असं काहितरी दाखवुन तुम्ही तुमचंच हसं करुन घेताय येवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हांला.
असे प्रोमो दाखवुन त्यांना काय
असे प्रोमो दाखवुन त्यांना काय वाटतं की प्रेक्षक हसतील, अरे माकडीच्यांनो, हे असं काहितरी दाखवुन तुम्ही तुमचंच हसं करुन घेताय येवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हांला. Angry>>>>>
स्वरा +१११
डिजे, मुख्यमंत्र्यांनी कामे करायला काहीच हरकत नाही. पण ही निर्बुद्ध सुरई , नवरा मिटींग मध्ये असतांना चार- चौघात बडबडते ते असह्य होते. कॉमन सेन्स, मॅनर्स, एटिकेट्स नावाच्या प्रकारांशी झी मराठीचे कायमचे वाकडे आहे.
कॉमन सेन्स, मॅनर्स, एटिकेट्स
कॉमन सेन्स, मॅनर्स, एटिकेट्स नावाच्या प्रकारांशी झी मराठीचे कायमचे वाकडे आहे. >> कदाचित तोच झी चा यु.एस.पी. आहे
प्रोमो पाहिला. सिरिय्ल्स
प्रोमो पाहिला. सिरिय्ल्स हल्ली कुठल्याच पाहात नाही; पण मुख्यमंत्री आणि बायको दोघेही आवडले मला
कि घरी कोणी गडीमाणूस नाही तर
कि घरी कोणी गडीमाणूस नाही तर दळण आणून द्या. >>>>>>>>> का? नवरा मिटिन्गमध्ये आहे ना मग स्वतः आणायच ना दळण? मिसेस मुख्यमन्त्री म्हशी हाकलू शकते, तर मग दळण का नाही?
मीच ती दिप्ती भगत आणि इथे मन्या ऽ >>>>>> ओ, अस आहे का. मला वाटल कोणी कॉन्ट्रोवर्शियल एक्ट्रेस असेल.
मुख्यमंत्र्याची बायको हेअर स्ट्रेटनिंग केलेली, ओपरेशन करुन हनुवटी कोरुन घेतलेली, उभार ठीक-ठाक करुन घेतलेली, मॅनिक्युअर, पॅडीक्युअर केलेली, मेकप थापलेली, वेस्टर्नाईज कल्चर पाळणारी, सरकारी कार्यक्रमात धोकादायकपणे सेल्फी घेणारी, नवर्याच्या पदाचा वापर करुन इच्छा-आकांक्षा पुर्ण करणारी अशी जरा मॉड दाखवायला हवी होती झी ने..!! >>>>>>>> सर्जरी करुन सौन्दर्य वाढवणे, नको तिथे सेल्फी घेणे हे सोडल्यास मला ही मॉड मुख्यमन्त्री आवडते. आजपर्यन्त कुठल्याही मुख्यमन्त्र्याच्या बायकोला अस बघितल नव्हत मी. शिवाय ती गायिकासुद्दा आहे.
या सगळ्या प्रोमोंची पंच लाईन
या सगळ्या प्रोमोंची पंच लाईन आहे मी मिरवते सगळ्यांची जिरवते . पण कुठल्याही प्रोमोमध्ये मिरवताना दिसली नाही उलट स्व्तःच्या वागण्याने नवरयाला embarrass करत आहे
मिसेस् मुख्यमंत्री: मराठी
मिसेस् मुख्यमंत्री: मराठी मालिका आणि बुद्धीचा व वास्तवाचा संबंध नसल्याचा आणखी एक पुरावा!
June 21, 2019 Vaidehi Joshi 1845 Views 0 Comments Chief Minister, New Series, Zee Marathi
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सध्या झी मराठीवर मिसेस मुख्यमंत्री ह्या नव्या मालिकेच्या जाहिराती म्हणजेच टीझर्स सारखे दाखवत आहेत. ते काही सेकंदांचे व्हिडीओ बघून मनात विचार येतो की हे सिरीयल लेखक आहेत की सिरीयल किलर्स आहेत?
कारण हे प्रोमो पाहिल्यावर कुठल्याही सामान्य लॉजिकल विचार करू शकणाऱ्या माणसाचं बीपी कमीजास्त न झाल्यास नवल!
मिसेस मुख्यमंत्री गावाकडची आहे, चला मान्य आहे की मिसेस मुख्यमंत्र्यांना म्हशी कश्या हाकलाव्या ह्याची चांगलीच माहिती आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यात ढिम्मपणे उभ्या असलेल्या म्हशींमुळे अडतो.
मुख्यमंत्र्यांचे सहकारी, सुरक्षारक्षक वगैरे म्हशींपुढे हतबलपणे उभे राहून आता काय करायचे असा विचार करत असतानाच खमक्या असलेल्या मिसेस मुख्यमंत्री गाडीतून उतरतात आणि अगदी ठसक्यात म्हशींना हाकलवून लावतात आणि स्टाईलने डोक्यावर पदर घेऊन परत आपल्या गाडीत जाऊन बसतात.
गावाकडच्या लोकांना प्राण्यांना कसे हाताळायचे ह्याचे चांगले ज्ञान असते कारण ते निसर्गाच्या सानिध्यातच राहतात. म्हणून त्यांचे हे कसब वेळेला उपयोगी पडते.
ठीक आहे. इथपर्यंत आमचं काहीच म्हणणं नाही. हे बघून प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेली.
असं वाटलं की चला! मिसेस मुख्यमंत्री गावाकडच्या आहेत तर खेडोपाड्यात लोकांना काय काय सहन करावे लागते, कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे मिसेस मुख्यमंत्री त्यांच्या पतींना सांगून सर्वसामान्यांचे प्रश्न कसे चुटकीसरशी सोडवतात हेच बहुतेक ह्या मालिकेत दाखवणार असतील.
पण ह्या मालिकेचा दुसरा प्रोमो बघितला आणि सपशेल निराशाच झाली.
दुसऱ्या प्रोमोमध्ये अगदी तरुण दिसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीहून अर्जंट आणि अत्यंत महत्वाचा फोन येतो आणि ते आपल्या सहकाऱ्यांसह पटापट सूत्रं हलवून तातडीने कामासाठी बाहेर जायला निघतात.
आणि दारातून अंगणात आल्यावर बघतात तर काय ,मिसेस मुख्यमंत्री सरकारी लाल दिव्याच्या गाडीवर छानपैकी प्लॅस्टिक टाकून त्यावर मस्तपैकी सांडगे घालत आहेत.
आणि सांडग्यांचं मिश्रण असलेलं भांडं हातात घेऊन मुख्यमंत्र्यांचे सारथी/ड्रायव्हर हताशपणे मुख्यमंत्र्यांकडे बघत आहेत.
ह्यावर कडी म्हणून मिसेस मुख्यमंत्री म्हणतात की, “माझे सांडगे झाल्याशिवाय गाड्या मिळायच्या नाहीत. आता नंतर घेऊन जा!” ह्यावर मुख्यमंत्री आपल्या घरच्या लक्ष्मीकडे /अन्नपूर्णेकडे हताशपणे बघत बसतात.
आणि मिसेस मुख्यमंत्री म्हणतात ,”मी मिरवते! सगळ्यांची जिरवते!”
ह्या मालिकेचा तिसरा प्रोमो बघून तर चक्करच यायची बाकी राहिली होती.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक सुरु असते. मुख्यमंत्री त्यांच्या कचेरीत त्यांच्या खुर्चीत बसून मंत्र्यांशी “सिंचन प्रकल्प का रखडलाय, निधी कमी पडतोय का” वगैरे महत्वाची चर्चा करत असताना पडद्यामागून मिसेस मुख्यमंत्री आपल्या नवऱ्याला शुक शुक करत आवाज देत असतात.
पण मुख्यमंत्री दुर्लक्ष करत आहेत आणि अजिबात दाद देत नाहीत म्हटल्यावर त्या सरळ कचेरीत डोक्यावर पदर बिदर घेऊन ठसक्यात एंट्री करतात आणि बिनधास्तपणे नवऱ्याला ऑर्डर सोडतात,
“घरात कुणी गडीमाणसं नाहीत. तेवढं दळण आणून द्या!” मुख्यमंत्री परत निशब्द! आणि मिसेस मुख्यमंत्री आपला ठरलेला डायलॉग मारतात ,”मी मिरवते, सगळ्यांची जिरवते!”
आता ह्या सगळ्या प्रोमोमधून माणूस काय अंदाज लावतो? खरं तर ह्या मालिकेवर इतका विचार करून वेळ वाया घालवावा असे प्रोमो बघून अजिबातच वाटत नाही. पण कुठेतरी ग्रॉसली चुकत नाहीये का?
मुख्यमंत्र्यांची पत्नी इतकी बिनडोक असते का की जी सरकारी गाड्यांवर सांडगे घालते, आणि मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या कामासाठी गाडी हवी असताना सांडगे झाल्यावरच गाड्या मिळतील असे सांगते?
मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या पदावर आपला पती असो नसो. पण कुठलीच बाई इतकी मूर्ख नक्कीच नसते.
इतके वेडगळ आणि अशक्य प्रकार दाखवायला चॅनेलला लाज कशी वाटत नाही? कोणती बाई नवऱ्याला भर मिटिंग मध्ये जाऊन दळण आणायला सांगते?
बायकांचे हे असे चित्रण करून सिरीयलचे लेखक नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? हे थांबायला नको का?
बायका मग ती मिसेस मुख्यमंत्री का असेना, त्या मूर्खच असतात. त्यांना कामाबद्दल काही कळत नाही, त्या आपल्या घर आणि घरातली कामं ह्यातच अडकून पडलेल्या असतात, त्यांना कामाचे गांभीर्य नसते. असे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय का?
ह्यात जर प्रेक्षकांना काही चूक वाटत नसेल आणि असे करणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री जर प्रेक्षक स्त्री पुरुषांना क्युट वाटत असतील तर देव आपले भले करो. अरे जग कुठे चाललंय आणि मराठी चॅनेल्स प्रेक्षकांना कुठे नेत आहेत?
आज जिथे जग गेम ऑफ थ्रोन्स, सॅक्रेड गेम्स, मिर्झापूर, नार्कोज, बिग बँग थियरी बघतंय तिथे मराठी चॅनेल्सवर हा वेडगळपणा सुरु आहे.
ज्यात नायिका ३०० कोटींची मालकीण असून सुद्धा मूर्खपणा करते आणि लोक बिचारी भोळी बाई म्हणून तिची सिरीयल भक्तिभावाने रोज बघतात.
एका सिरीयलमध्ये नवरा अगदी बैल असला तरी त्याला सुधारण्यापेक्षा रडत बसून नायिका सगळं सहन करते. दुसऱ्या एका सिरीयलमध्ये सासरचे, माहेरचे, प्रियकराच्या आईचे विचित्र वागणे नायिका अगदी शांतपणे सहन करते. आपण ह्यातून कधी बाहेर पडणार आहोत की नाही?
या अश्या वर्षानुवर्षे चाललेल्या पाणी घालून वाढवलेल्या मालिका बघून असा संशय येतो, नव्हे माझी तर खात्रीच पटत चालली आहे की आपल्याकडे क्रिएटिव्हिटीचा अगदी गंभीर दुष्काळ निर्माण झाला आहे.
आणि क्रिएटिव्ह फ्रिडम म्हणजे किती घ्यावे? त्याला काही मर्यादा आहे की नाही?
ह्यांच्या मालिका, काहीच अर्थ न उरलेली ,भरकटलेली ती कथानके बघितली तर RIP लॉजिक असेच म्हणावे लागते.
आता ह्या नव्या मालिकेचेच बघा ना. आपल्या भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी उमेदवार कमीत कमी २५ वर्ष पूर्ण झालेला असावा लागतो.
तसेच साधारणपणे त्या व्यक्तीला राजकारणाचा काहीतरी अनुभव असल्याशिवाय पक्ष त्या व्यक्तीला उमेदवारी देत नाही. इथे तर मुख्यमंत्री अगदीच तरुण म्हणजे एकवीस -बावीस वर्षांचे वाटतात.
चला कितीही संतूरबॉय म्हटले तरी ते पंचविशीच्या पुढचे वाटत नाहीयेत.
मालिका बनवताना कमीत कमी आपले नागरिकशास्त्र तरी विसरू नये. आपण जे कास्टिंग करतोय ते अभिनेते आपल्या पात्रासाठी शोभून दिसतील का हा तर विचार अजिबातच केलेला दिसत नाहीये.
मुख्यमंत्री किमान पंचवीस वर्षांचा असावा, आणि इतक्या वर्षांचा ट्रेंड बघता राजकारण आणि काहीतरी ठोस काम केल्याशिवाय पक्ष तुमचा मुख्यमंत्र्याच्या पदासाठी विचार करत नाहीत म्हणजे मुख्यमंत्री किमान अठ्ठावीस ते तीस वर्षांचे तरी असतातच.
मग त्यासाठी अगदीच वीस-बावीस वर्षांचा दिसणारा अभिनेता, मग तो कितीही उत्तम अभिनय का करत असेना, त्याला घेऊन चालेल का?
तेच लाल दिव्याच्या गाडीबाबतीत झालंय. आता सरकारी गाड्यांना लाल दिवे नसतात. ते लाल दिवे काढून सामान्य माणसाच्या भाषेत “जमाना झाला”. तरी मालिकेत लाल दिव्याची गाडी दिसतेय.
बरं आधीच्या काळातील मालीका असेल असा विचार केला तरी मुख्यमंत्री मोबाईलफोनवर बोलत आहेत म्हणजे मालिका सध्याच्या काळातलीच आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो.
मग हे सगळे बघता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मालिका बनवताना लेखकाने, निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने नागरिकशास्त्र, कायदे ह्यांचा अजिबातच अभ्यास केलेला नाही असेच दिसतेय.
प्रेक्षकांना किती गृहीत धरावं ह्याला काही मर्यादा आहेत की नाही? की प्रेक्षक निमूट तुम्ही दाखवताय ते बघतात म्हणजे तुम्ही वाटेल ते दाखवाल?
ह्या मालिकांतून बायकांची प्रतिमा अतिशय विचित्र पद्धतीने दाखवतात. ह्याबद्दल कुणालाच कसा आक्षेप नाही ह्याचे आश्चर्य वाटते. लोक म्हणतात, तुम्हाला बघायचे नाही तर रिमोटचा उपयोग करा आणि चॅनेल बदला. पण मुद्दा तो नाहीच्चे!
मुद्दा हा आहे की क्रिएटिव्ह फ्रिडमच्या नावाखाली जे वाटेल ते दाखवले जाते त्याचे काय करायचे? लोक म्हणतात चॅनेलवाले दाखवतात म्हणून आम्ही बघतो आणि चॅनेलवाले म्हणतात लोक बघतात म्हणून आम्ही दाखवतो. हे दुष्टचक्र भेदायला हवंय.
आज वेब सिरीजच्या मंचावर अनेक विविध विषय हाताळले जात असताना त्यापेक्षा मोठा मंच असलेल्या ह्या लहान पडद्यावर त्यातल्या त्यात आपल्या मराठी मंचावर चांगल्या विषयांची आणि सादरीकरणाची वानवा का झालीये?
ह्या वेडगळ आणि ईललॉजिकल कथानक आणि सादरीकरणावर कुणाचेच नियंत्रण का नाही?
वर्षानुवर्षे त्यातच अडकलेल्या प्रेक्षकवर्गाला चांगले काही दाखवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे.
पण टीआरपीच्या नावाखाली वाटेल ते दाखवणे सुरु आहे. ह्या सगळ्यांना ओरडून एकच सांगावे वाटते… “दर्जा राखा रे.. दर्जा राखा..”
वरील माहिती, इन मराठी डॉट कॉमवर आहे. मी फक्त कॉपी पेस्ट केलयं. (लिंक देता येत नाहीये म्हणुन.)
अगदी चपखल लिहिलंय. धन्यवाद
अगदी चपखल लिहिलंय. धन्यवाद स्वरा. @1
छान लेख.
छान लेख.
आणि सांडग्यांचं मिश्रण असलेलं भांडं हातात घेऊन मुख्यमंत्र्यांचे सारथी/ड्रायव्हर हताशपणे मुख्यमंत्र्यांकडे बघत आहेत.
ह्यावर कडी म्हणून मिसेस मुख्यमंत्री म्हणतात की, “माझे सांडगे झाल्याशिवाय गाड्या मिळायच्या नाहीत. आता नंतर घेऊन जा!” ह्यावर मुख्यमंत्री आपल्या घरच्या लक्ष्मीकडे /अन्नपूर्णेकडे हताशपणे बघत बसतात. >>>>>>> ओ अस होत का? मग बरोबर आहे. मी तो प्रोमो पुर्ण बघितला नव्हता.
दुसऱ्या एका सिरीयलमध्ये सासरचे, माहेरचे, प्रियकराच्या आईचे विचित्र वागणे नायिका अगदी शांतपणे सहन करते. आपण ह्यातून कधी बाहेर पडणार आहोत की नाही? >>>>>>>>> हि झीमची कुठली सिरियल?
संतूरबॉय >>>>>>>>
प्रोमोवरुन मालिकेत काय आहे
प्रोमोवरुन मालिकेत काय आहे याचा अंदाज बांधणे घाईचे ठरेल... बघुया आज पहिल्या भागात काय होते ते
फक्त ती बया राधिका आणि ईश्या
फक्त ती बया राधिका आणि ईश्या सारखी नसावी.एवढीच काय ती झीम चरणी प्रार्थना!
:फालतु सिरेली बघुन वैतागलेली बाहुली:
दिसता प्रोमो काढतो धागा...
दिसता प्रोमो काढतो धागा...
नाव त्याचे मज सांगा..
काढूनी फुस्के धागे..
बोले मैं सबसे आगे..
करतो तेच ते पीजे.
नाम सार्थ करी Dj
कालच तीनही प्रोमो पाहिले, खरच
कालच तीनही प्रोमो पाहिले, खरच लाज आणतात झीवाले, मी एकटा पाहत होतो तरी मला कसतरीच झालं, ज्यांनी नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत हे असलं काहीतरी पाहिलं त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. देव त्यांना या कठीण परिस्थितून बाहेर पडण्याचे मानसिक बळ देवो ही प्रार्थना.
बोकलत मुद्द्यांच काय बोललात
बोकलत मुद्द्यांच काय बोललात ओ तुम्ही!
खरंच झीम वाले लाज काढतात एका मराठी स्त्रीला दाखवताना.
याचा ते विचार करतात कि नाही देव जाणे.
Pages