Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनय कौशल्य आणि निरागस
अभिनय कौशल्य आणि निरागस सौंदर्य>>>>>> बघा जगाला तिची किती कदर आहे आणि इथे मात्र एकही दिवस असा जात नाही की तिचे वाभाडे निघत नाहीत.
बाबा दातार यांनी तर छापवून आणले नसेल?
इतका चांगला चान्स होता अभिनय
इतका चांगला चान्स होता अभिनय दाखवायचा पण माती खाल्ली. चेहेऱ्यावर दिलेले डोळे, कान, भुवया, दात आणि ओठ हे जरा वर खाली हलवायचे असतात म्हणजे थोडेतरी भाव दिसतील... पण नाही काहीच नाही....मक्ख चेहरा. झी मराठी च्या आतापर्यंतच्या इतिहासातील हि सर्वात 'मठ्ठ नाईक' निघाली.
केड्याची पण सहनशक्ती संपलेली दिसतेय म्हणून मालिका आटपत आहेत वाटत.
हि मालिका संपल्यावर 'हि आपली सर्व (प्रतिसाद लिहिणारी) मंडळी परत कोठे भेटतील? किल्ली कृपया धागा संपायच्या आधी लिंक द्या.
आणि सिरीयलच्या सुरूवातीला
आणि सिरीयलच्या सुरूवातीला जयदीप चिडखोर आणि बिनडोक दाखवला आहे. तो ईशाच्या लग्नानंतर एकदम हआहैको मधल्या मोहनीश बहल सारखा (फक्त धाकटा) कुटुंबवत्सल वगैरे होतो. त्याबद्दलही काही खुलासा आला का>>>>>>>>>>> ते फक्त सुरवातीला असतं नंतर विसरून जायचं. तो बिपीन पण आधी असाच शामळू बाबांना विचारून सांगतो असा दाखवला होता आता तो पण किती बदलला?
हम आपके है कौन मधे मोहनीश जसा
हम आपके है कौन मधे मोहनीश जसा पिक्चरभर एक मायाळू चेहरा करून फिरत असतो तसा होता लग्नानंतर तो जयदीप. अजूनही तसाच दिसतोय.
आता हे लोक अजूनही सुधारलेले नाहीत की मर्फीज लॉ प्रमाणे मी बघितला आणि तो एपिसोड पुन्हा सुपर स्लो-मो मधे टाकलाय माहीत नाही. आख्खी पाच मिनीटे तो जयदीपला कसा तीन डीप चा चहा लागतो त्याबद्दल बोलण्यात, ते एक एक करून तीन डीप करण्यात आणि पहिल्या डीप ला जयदीपचे, दुसर्या डीपला झेंडे, आणि तिसर्याला मायराचे हास्य अशा क्रमाने सीन उलगडत गेला. तीन डीप कसे करतात हे प्रेक्षकांना अजिबात समजणार नसल्याने फ्रेम मधे ते सेण्टर करून एखाद्या शेफ ने कॉम्प्लिकेटेड गोष्ट दाखवावी तशी ती टीबॅग बुचकळताना दाखवली. नशीब जयदीप ला १०- १२ डीप्स चा चहा लागत नाही. नाहीतर पूर्ण एपिसोड घालवला असता. आणि तीन पेक्षा कमी किंवा जास्त डिप्स केलेल्या चवीतील फरक कळणार्या जयदीप ला चहात झोपेच्या गोळ्या टाकलेल्या कळत नाहीत.
एकेक सवाई शेरलॉक होम्स भरलेत सरंजामे अॅण्ड को मधे. कंपनीच्या हेडच्या चहात झोपेचे का कसलेतरी औषध टाकायचे आहे. कसे टाकावे? नेहमी चहा सर्व्ह करणार्याकडून कसलेही ठोस कारण न देता ट्रे हातात घ्यावा. ऑफिस मधल्या जनरल हॉलवे मधे तो ट्रे ठेवावा. एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे बघावे आणि मग सावकाशपणे हातातून एक कुपी काढून ती चेहर्यासमोर धरून एक एक थेम्ब का गोळी काय ते त्यात टाकावे, मंत्र म्हंटल्यासारखे स्वतःशी बडबडत. मग बॉस ला स्वतः तो ट्रे नेउन द्यावा. तुम्ही का चहा आणला आज विचारले तर पुन्हा कसलेही ठोस कारण देउ नये. नंतर कोणालाही तुमचा संशय येणार नाही.
तिकडे जयदीप च्या केबिन मधे मायक्रोफोन लावायचा आहे. जयदीप केबिन मधे नसताना लावावा का? नो चान्स. जयदीप केबिन मधे असताना जावे. तो तर गाढ झोपलाय. आता बेस्ट वेळ आहे ना मायक्रो फोन लावायची? नो चान्स. त्यापेक्षा जयदीप ला जागे करायचे. मग ईशामॅम त्याला बोलण्यात गुंगवणार आणी तिकडे सुपरस्पाय परांजपे जयदीप बसलाय त्या कोनातून धडधडीत समोर असलेल्या टेबल खाली मायक्रोफोन चिकटवणार!
मग ईशामॅम त्याला बोलण्यात
मग ईशामॅम त्याला बोलण्यात गुंगवणार आणी >>>> आणि बोलणं तरी कसल?? "तुम्हाला काही मदत हवी असेल तर परांजपे आहेत ना " . गधडे असं बोलून जयडूच लक्श परांजप्याकडे नाही का जाणार ???
जयदीप ने अभिनय मस्त केला। पण
जयदीप ने अभिनय मस्त केला। पण ई बाळ इतका कसा मठ चेहरा ठेवते । इतकी बोरिंग आहे सिरीयल पाहवत नाही। सोनिया चांगली आहे । कालचा एपिसोड खूप बोरिंग होता। मा ना ब मध्ये खेड्या ला पाहायला कि राग येतो।
K.D.
K.D.
आपले K D पाठक कुठे आणि हा
आपले K D पाठक कुठे आणि हा खेड्या कुठे ..
अहो चुकुन क.द. type jhala
अहो चुकुन क.द. type jhala
ईआईबाबान्नी कधी भुलभुलैय्या
ईआईबाबान्नी कधी भुलभुलैय्या बघितला नव्हता का?
तो ईशाच्या लग्नानंतर एकदम हआहैको मधल्या मोहनीश बहल सारखा (फक्त धाकटा) कुटुंबवत्सल वगैरे होतो. >>>>>>>>> मोहनीश बहल हआहैको मध्ये थोरला भाऊ असतो ना, धाकटा कसा?
बाकी सर्व बाबतीत मोहनीश
बाकी सर्व बाबतीत मोहनीश सारखाच, फक्त इथे धाकटा - हे जयदीप बद्दल
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/tula-pahate-re-marathi-serial-t...
मालिका संपणार? मग पिसं कशाची
मालिका संपणार? मग पिसं कशाची काढायची?
एवढं भारी मटेरियल मिळालं नसतं ..
सुबोधने आधीच रामराम केलं का
सुबोधने आधीच रामराम केलं का सिरेलला?
कालचा इशा झेंडे ला चहा आणून
कालचा इशा झेंडे ला चहा आणून देते तो सीन इशा ने बरा केला जरा .. पण झेंडे ने जास्त चांगला केला.. गडबडून गेल्याचा कन्फयुजड झाल्याचा , बघतोय ते खरंच कि भास आहे असा हावभाव ..एक्दम छान !
मला एक कळलं नाही कि ती झेंडे ना विचारते कि सकाळचा चहा जयदीप ला देताना किती गोळ्या घातल्या वगैरे .. पण सिक्वेन्स प्रमाणे मला थोडा गोंधळ वाटला..
चहा पिऊन जयदीप लगेच त्या फसवणाऱ्या माणसाकडे गेला का ?कि संध्याकाळी गेला ? आणि ते प्रकरण मिटवून परत हे दोघे ऑफिस मध्ये आले .. आणि नंतर त्याच दिवशी इशा ने चहा दिला का झेंडे ना ? कारण हे २ भागात दाखवलं .. आणि मी हल्ली पळवत पळवत बघते ५ मिनिटात .. म्हणून लिंक नाही लागली
सुभोद बावेने बहुतेक तुपारे
सुभोद बावेने बहुतेक तुपारे सोडली आहे.. त्यामुळेच इतक्या लवकर गाशा गुंडाळावा लागत असावा. मला तर राजनंदिनीची स्टोरी चांगली वर्षभर चालणार असं वाटत होतं.. कदाचीत स्वराज्यरक्षक संभाजी, राखेचा-२, मानबा आणि तुजीरं पेक्षा टीआरपी घसरलेला दिसतोय.. म्हणुन बंद करावी लागत असावी. बाकी टीम कडुन आलेल्या पालीची मगर करायची नाही अशा प्रतिक्रिया ही सारवासारव असावी असे वाटते.
हो त्या सीनमधे टाईमलाईनचा घोळ
हो त्या सीनमधे टाईमलाईनचा घोळ होता नक्किच. नक्की एका दिवशी हे सगळे सीन्स झाले असतील तर फसवाफसवी होऊन, ते उघडकीला येऊन, घरी जेवायला येऊन परत ईबाळ ऑफिसला का गेलं असेल ?
सुभा सिरीयल गुंडाळायला तरी
सुभा सिरीयल गुंडाळायला तरी येणार आहे का परत? बरेच दिवस झाले तो गायब होवून..
येईल की
येईल की
मरायला परत येईल
मरायला परत येईल
सुभा येईल,कारण काही
सुभा येईल,कारण काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टावर फोटो टाकला होता ,तुपारे सेटवर खूप दिवसांनी,असा.
सुभा ये आणि गुंडाळ लवकर..
सुभा ये आणि गुंडाळ लवकर.. पुढे ढकलत ढकलत पण एपिसोड बघवत नाही..
बाळ आपण लै हुशार असल्याची अॅक्टिंग करतय ते ना शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटकात मोठ्या व्यक्तीचा रोल शाळकरी मुलं कशी मान उंच करून करतात तसं काहीतरी वाटतयं..
आसाची गिल्ट कशी काढायची त्याचं लाॅजिक तर नोबेलपात्र आहे.. अंअअ मध्ये कसा दणका सेम जागी सेम जोरात बसायला हवा असतो तस परत सेम सिचुएशन असेल तरच गिल्ट जाइल असं केड्याचं अगाध लाॅजिक.. ते बाळाच्या तोंडून एैकून धन्य झाले!
आसा सध्या काही गिल्टी आहेत
आसा सध्या काही गिल्टी आहेत असं वाटत नाहीये. मुळात रानं अशी गच्चीवरून पडून गेली हे सगळ्यांनी कसं काय अॅक्सेप्ट केलं हे मुळात कोडं आहे.
मुळात रानं अशी गच्चीवरून पडून
मुळात रानं अशी गच्चीवरून पडून गेली हे सगळ्यांनी कसं काय अॅक्सेप्ट केलं >>>>
त्यात काय, जोराचा वारा असेल तर कुंडीही पडते गच्चीच्या कठड्यावरून, तशी ती पडली.
नवीन आणली ना विसने... 'नगा'ला "नग".... बात खतम
अंअअ मध्ये कसा दणका सेम जागी सेम जोरात बसायला हवा असतो >>>> अंअअ म्हणजे काय ?
बाळ आपण लै हुशार असल्याची अॅक्टिंग करतय.... >>>>>>
काल एक भाग बघितला. हसून हसून जीव गुदमरला.
नॉट डन म्हणताना एका कमांडिंग गेस्चरमध्ये १-२दा पेन आपटणे आणि आजच्या बटवड्यासाठी काढलेल्या पत्रांवर एक एक करून पोस्टाचा शिक्का मारल्यासारखे ५-५ सेकंदांनी पेन आपटणे ---- यात काही फरक असतो की नाही?
नॉट डन ***** नॉट डन म्हणताना प्रेक्षकांनी काय आपटावे असा प्रश्न पडलाय (** च्या जागी हवे ते नाव घाला)
..... मायाळू चेहरा करून फिरत असतो तसा होता लग्नानंतर तो जयदीप. अजूनही तसाच दिसतोय. >>>>
माफ्रेवने त्याला दुपारी मायाळूची भाजी - पोळी आणि रात्री कैरीची कढी-भात + मायाळूची भजी दिली तेव्हापासून तो तसा झाला.
केड्या आणि पार्टी किती वाजता चहा घेतात माहितीये का कुणाला? मी नेईन म्हणते थर्मासमधून.
अंअअ म्हणजे काय ? >>> अंदाज
अंअअ म्हणजे काय ? >>> अंदाज अपना अपना
मी नेहमीच इथल्या
मी नेहमीच इथल्या प्रतिक्रियांचा आनंद लुटत असते ...पण आपल्या सारख्या धुरंधर पिसं काढणाऱ्यां कडून एक गोष्ट कशी काय बरी लक्षात आली नाही.
सोनया विक्रांत ला मिळालेली आहे की काय असा मला दाट संशय येतोय...
तिचे वागणे ... इ आई वडिलांना गोंधळात टाकणे ... आणि आता तर काय जन्म वर्ष बदलत आहे ....
कूछ तो गडबड है ........
@urenamashi......अहो ,काय
@urenamashi......अहो ,काय डोक्यात कीडा टाकलात इथे(हसणारी बाहुली)
आधीच त्या केड्याने डोक्याचा पार भुगा केला आहे.
पण तुमची शंका सत्य नसावे कारण ती जयडुच्या विरोधात जाणार नाही.
केड्या,हे वाचेल बर का.....हाहा
अरे पण बर्थ सर्टीफिकेट वरची
अरे पण बर्थ सर्टीफिकेट वरची तारीख बदलून काय होणार? तसंही सगळ्यांना माहितच आहे की रान आणि इबाळ कोणत्या साली जन्मल्यात ते
Are the writers not one but
Are the writers not one bit serious? Changing birthdate and committing murdsr are major fraud and crime. So casual.
मला एक समजत नाही की त्या
मला एक समजत नाही की त्या इशाला किंवा तिचे जे कोणी समर्थक असतील त्यांना लाज कशी वाटत नाही? किती भयाण अभिनय आहे तिचा. मद्दड चेह-यानं प्राईम टायमात एक वर्षभर रोज वावरायचं धाडस कसं काय करु शकली ती? बरं तेही समोर सुबोध आणि इतर बरेच उत्तम कलाकार असताना? दगडालाही एव्हाना थोडाफार अभिनय जमला असता. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण ती "ईsssssशीssss"
नव्या सिरीअल्स घेऊ लागेल त्याचं काय?
Pages