Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या प्रोमोमधली शेंडीवाली
त्या प्रोमोमधली शेंडीवाली मिसेस मुख्यमंत्री बघून राधिकाच्या आठवण आली ती सुद्धा अशीच शेंडी खांदयावर घेऊन गुर्मीत उभी असायची मानबाच्या प्रोमोत.
कुणीच नाही इथे.... ? शांत
कुणीच नाही इथे.... ? शांत सारे... नि:शःब्द झाले का ई श्या च्या विरह कल्पनेने? येईल दुसरीकडे आपण वाट बघू.
विस बहुतेक एअरपोर्टवरच अरेस्ट करवून घेईल आणि पुण्याचे विमान पकडून उड्या मारत घरी जाईल सुटलो बाबा एकदाचा म्हणत. पुन्हा चुकूनही फॅमिली मेंबरने फॅमिली मेंबरसाठी बनवलेल्या फॅमिली ड्रामात रोल घ्यायचा नाही हे पक्के ठरवून.....
शेंडी ..... बाईच्या शेंडीला शेपटा म्हणतात.
कारवी जी सो सॉरी ... पटकन
कारवी जी सो सॉरी ... पटकन शब्द नाही आठवला कारण तेवढा शेपटा माझ्या पण केसांचा नाही राहिला.
एनीवे एडिटिंग टाइम संपला.
त्या प्रोमोमधली शेंडीवाली
त्या प्रोमोमधली शेंडीवाली मिसेस मुख्यमंत्री बघून राधिकाच्या आठवण आली ती सुद्धा अशीच शेंडी खांदयावर घेऊन गुर्मीत उभी असायची मानबाच्या प्रोमोत. >>>>>>>>> चित्रावरुन ती शिल्पा शिन्दे वाटते.
शांत सारे... नि:शःब्द झाले का ई श्या च्या विरह कल्पनेने? >>>>>>>>>> नाही हो. विसच्या विरहाने शांत झालेत सगळे.
ईशा आता मायराला आपल्या बाजूने करणार तर.
बादवे, चहयेद्यामध्ये आज तुपारेची टिम येणार आहे. विक्रान्त पायजामेच खर रुप दिसेल त्यात.
कारण तेवढा शेपटा माझ्या पण केसांचा नाही राहिला. >>>>>>>>
(No subject)
मला वाटतं दोघींच्या दोन परी
मला वाटतं दोघींच्या दोन परी आहेत थंडपणात! सायली चे डोळे अगदीच निर्जीव वाटतात तर हिचा आवाज व देहबोली अगदीच मेंगळट !
सायली अनुनासिक आणि गर्विष्टपणे बोलते तर ही आवाजात चढ उतार न ठेवता निर्लेप पणे संवाद नुसती खरखरीत 'सांगते'!
सायली अधिक सुंदर आहे. दोघीही फार स्लो आहेत व रिफ्लेक्सेस अजिबात नाहीत!>>>>>>>> ++++१११११११
चहयेद्यामध्ये आज तुपारेची टिम येणार आहे>>>>> परत? आता काही जोक्सही शिल्लक राहिले नाही मारायला या टीमवर.
चहयेद्यामध्ये आज तुपारेची टिम
चहयेद्यामध्ये आज तुपारेची टिम येणार आहे>> एरवी बोलताना पत्र्याची खरखर आणि हसताना चेटकीण हास्य, हॉरिबल आहे गायत्रीच हसण.
गायत्रीचे कालचे हसू खरंच
गायत्रीचे कालचे हसू खरंच हॉरिबल ऐकू येत होते, सगळ्यात अगदी कळून येत होते. माझी छोटी (तीच ती 'मम्मी मी' वाली मला रात्री घाबरवणारी) म्हणते मम्मी हिला काय झालं? अशी का हसतेय ? हिच्या कपड्यात कोणीतरी उंदीर सोडले आहे का ?
ईशाचं हसणं अगदी विव्हळल्या
ईशाचं हसणं अगदी विव्हळल्या सारखं भेसूर वाटत होतं...एडीट पण नाही करत टेलिकास्ट करण्यापूर्वी! काही काही पंचेस छान होते.....
एकूण कार्यक्रम छान होता पण ईशाच्या हॉरिबल हसण्याने गालबोट लागले!
कारवी जी सो सॉरी ... पटकन
कारवी जी सो सॉरी ... पटकन शब्द नाही आठवला कारण तेवढा शेपटा माझ्या पण केसांचा नाही राहिला. >>>>
माझाही नाही. सहज लिहीले होते, चूक काढण्यासाठी नाही. + एक विनंती -- नाव नुसते चालेल. ताई माई अक्का आत्या मावशी आजी पणजी काहीही चालेल. नावापुढे दी आणि जी सोडून काहीही चालेल.
ईशाचं हसणं ........एडीट पण नाही करत टेलिकास्ट करण्यापूर्वी! >>>> असतात हो लोकांना गैरसमज. ते हसणं बहुतेक USP / लुभावणारा विभ्रम समजत असावेत तिचा.
ताई माई अक्का आत्या मावशी आजी
ताई माई अक्का आत्या मावशी आजी पणजी काहीही चालेल. नावापुढे दी आणि जी सोडून काहीही चालेल.
आम्ही पूर्वी ५ मिनिटात पळवत पाहायचो आता ३ मिनिटात बघतो .. त्यामुळे "ईशाला राजेशच्या मुलाचा बॉल नन्दूच्या खोलीत सापडला" हे मिसल मी .. पण जाऊदेत ..
आणि तो झेंडे सारखा विस ला फोन काय लावत असतो ? सरळ मेल / व्हाटस अँप वरून घडलेल्या घटना नाही सांगता येत ? आणि विस ला सुद्धा अजिबात काळजी नाही इकडे काय चाललं असेल हि बया काय काय घोळ घालत असेल हे विचारावं याची ?
शिवाय आपल्या जादूच्या कपाटातून तन्मणी आणि इशा चा फेक जन्मदाखला निघाला काल !!! केड्या कुठे फेडशील हे चमत्कार !!
7th October 1998 बाळाची
7th October 1998 बाळाची जन्मतारीख..
... आपल्या कोणाकडे पंचांग App किंवा तारखेवरुन तिथि नक्षत्र इत्यादि कोणाला कळत असेल तर प्लीज पाहणार का...
पाहू तरी त्या दिवशी खरंच अष्टमी होती का?
... की केडोबाने तिथेही माती खाल्ली आहे.... कदाचित् लेखणीतून अशीच ढिशकॅव करून बर्थ डेट कागदावर सांडली असेल..
बघा please
गायत्रीचे कालचे हसू खरंच
गायत्रीचे कालचे हसू खरंच हॉरिबल ऐकू येत होते, सगळ्यात अगदी कळून येत होते.>>>>> +१.
की केडोबाने तिथेही माती
की केडोबाने तिथेही माती खाल्ली आहे
>> भरभरून माती खाल्ली आहे. त्या तारखेला द्वितिया आहे.
https://www.askganesha.com/panchang/default.aspx
https://vedicrishi.in/panchang/
https://www.prokerala.com/general/calendar/hinducalendar.php?year=1998&m...
शेवटचा श्वास घेतेवेळी ...घरघर
शेवटचा श्वास घेतेवेळी ...घरघर लागली असताना एखाद्याचं कह्णणं रडणं जसं ऐकू येईल ना, तशी आपली इशा "हसते." सिरीअलमधे मात्र एकदाही हसली नाहीये तशी. तसं हसण्याचे प्रसंगही नव्हते म्हणा...बाकी चहयेद्या मधे ती सुंदर दिसते तशी इथे का नाही दिसत?
नाव नुसते चालेल. ताई माई
नाव नुसते चालेल. ताई माई अक्का आत्या मावशी आजी पणजी काहीही चालेल. नावापुढे दी आणि जी सोडून काहीही चालेल. >>>
भरभरून माती खाल्ली आहे. त्या
भरभरून माती खाल्ली आहे. त्या तारखेला द्वितिया आहे.>>>> वाटलेलंच मला!!
... एवढया चुका करताना त्याला आणि त्याच्या टीमला काहीच कसं काय वाटत नाही!!! ....
काय रे देवा....ईशा आणि
काय रे देवा....ईशा आणि मायराचा फेस-ऑफ....पार गंडला राव...zero dramatic background...कुठे आश्चर्य दाखवायचं आणि कुठे डोळ्यात पाणी आणायचं याचा काही ताळमेळच नाही. ईशाची शून्य एक्टिंग आणि मायराची ओवरएक्टिंग.
"या सरंजामे घरात...."
आता काय तर टिक-टाॅक करत बहुतेक विक्रांतची ऐंट्री...आणि बाई हातात कात्री घेऊन तयार सेल्फ डिफेन्ससाठी...व्व्वा....
बाई हातात कात्री घेऊन तयार
बाई हातात कात्री घेऊन तयार सेल्फ डिफेन्ससाठी>>>> त्यापेक्षा दाराला कडी घालायची ना आतुन.
आता काय तर टिक-टाॅक करत
आता काय तर टिक-टाॅक करत बहुतेक विक्रांतची ऐंट्री...आणि बाई हातात कात्री घेऊन तयार सेल्फ डिफेन्ससाठी>> हे काय मला कळलं नाही .. प्रोमो मधे दाखवलं का ?
बाई हातात कात्री घेऊन तयार
बाई हातात कात्री घेऊन तयार सेल्फ डिफेन्ससाठी... >>>>>
बघायला पाहिजे मग. कात्री कुठली दिलीये ? दुधाच्या पिशवीचा कोपरा कापायला / मिशा कमी करायला वापरतात तसली ३ इंची?
सर्जेराव येतील -- "ताई पावसाळ्यापूर्वी गुलाबांची छाटणी करायला तुम्ही स्वतः येणार म्हणाला होतात... जाऊ या ना?" म्हणत...... म्हणून कात्री हातात घेऊन ताई जन्म क्र २ उभ्या .....प्रेक्षकांचा पचका ..... नेहमीसारखा
इशा मायरा चं dinner झालं का
इशा मायरा चं dinner झालं का
मिशा कमी करायला वापरतात तसली
मिशा कमी करायला वापरतात तसली ३ इंची>> शी ग !
मला तर ती सुरी वाटली.
मला तर ती सुरी वाटली. अंधारामुळे :हीही :
chala hawa yeu dya pahila.
chala hawa yeu dya pahila. Kay bhayan haste . Ti sangat hoti tila khup prashansa milat ahe. Isha peksha rajanandini cha role bara karte asa sangitla konitari. KON AHE TE PRASHANSHAK KAY MAHIT ????
chala hawa yeu dya pahila.
chala hawa yeu dya pahila. Kay bhayan haste .>>खूप irritate होत होतं ऐकताना
शिवाय आपल्या जादूच्या
शिवाय आपल्या जादूच्या कपाटातून तन्मणी आणि इशा चा फेक जन्मदाखला निघाला काल !!! >>>>>>>>> तो फेक दाखला सॉनयानेच ठेवला होता त्या कपाटात. दाखवल होत ते.
आज विस येणार आहे ( आनन्दाने नाचणारी बाहुली)
मिशा कमी करायला वापरतात तसली
मिशा कमी करायला वापरतात तसली ३ इंची>> शी ग ! >>>> नशीब नाकातले केस कापायला वापरातात तसली .... नाही म्हटलं
तो फेक दाखला सॉनयानेच ठेवला
तो फेक दाखला सॉनयानेच ठेवला होता त्या कपाटात. दाखवल होत ते.>> हो ...बरोबर आहे .. मला तेच म्हणायचंय कि ज्या कपाटात छड़ी त्याच कपाटात तन्मणी !!!
ना लॉकर ..ना कशाला कुलूप ना काही सुरक्षितता .. आणि जेव्हा आईसाहेबांनी आधी खालचं कपाट उघडलं तेव्हा सोन्या म्हणाली अहो ते ब्रो इन लॉ चं आहे ... मग आईसाहेबांनी वरच उघडलं ... म्हणजे ते दोघात मिळून एवढं एकच कपाट !? आणि इशा ला त्यातलाच छोटा भाग .. !!बरं मागे त्या वरच्याच कपाटातून विस ने कपडे काढले होते बॅग भरायला .. हा केड्या म्हणजे एक कहर आहे आणि एडिटर आणि डायरेक्टर डबल टिब्बल कहर ..
@ स्वस्ति नशीब नाकातले केस
@ स्वस्ति नशीब नाकातले केस कापायला वापरातात तसली .... नाही म्हटलं>> : "नाक मुरडून .. आता तुला मार मिळणार" असं दाखवणारी बाहुली :
हे बघ अशी
हेच लाटणं कोणीतरी केड्या , एडिटर, आणि डायरेक्टर च्या डोक्यात घाला
Pages