Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्याही स्वप्नात येऊन
तुमच्याही स्वप्नात येऊन चिरक्या आवाजात दोन डोळे, बारा हातांची गोष्ट सांगेल हं......मग किंचाळत उठाल बरं ... >>>>
सुषमाताई
काल ईआई व ईबाबा यांना
काल ईआई व ईबाबा यांना संबोधताना ईबाळ सतत आईबाबा असं एकत्रितपणे म्हणत होतं. मी आठवून पाहिलं पण असं माझ्या आईवडिलांना एकत्रितपणे हाक मारताना (तिथेच हजर असतानाही) आठवलं नाही बौ. >>> सेम मी पण हेच म्हणलं काल
गेल्या एकदोन भागात ईबाळाची
गेल्या एकदोन भागात ईबाळाची ॲक्टिंग जरा सुधारलेली वाटतीये.. बदला घ्यायचाय त्यामुळे जास्त इमोशन्स दाखवायची नाहीत हे बाळाच्या पथ्यावर पडलंय कदाचित.....अगदी अगदी.पूर्णपणे सहमत
कारण "मी देणी चुकती करणार आहे,मायरा,आजपासून सरंजामे इंडस्ट्री ज ची जबाबदारी जयदीप सांभाळेल"यांसारख्या संवादात एक्स्प्रेशन्सची गरज नाही.जी आताही बाळाच्या डोळ्यात आणि बोलण्यात नाहीत.
परवाच्या भागात मायराला सुनावताना टेबलवर हाताची कोपर ठेऊन हाताची मूव्हमेंट इतकी पढवल्यासारखी होती.अचानक भिवजींचा जयदीप होण,मायरा मँमची मायरा होण,परांजपे सरांऐवजी परांजपे होण,सर्रांऐवजी विक्रांत होण,हे दाखवण म्हणजे बाळाला स्मार्ट ,बदललेल दाखवण,अस केड्याला आणि डडिरेक्टरला वाटत असेल,तर खरच त्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते
परत एकदा सुभाबद्दल वाईट वाटत की कुठे अडकला.
कुणी मायराच्या गळ्यातील साखळी
कुणी मायराच्या गळ्यातील साखळी नोटीस केली का? आधीच्या भागात एक साखळी गेट अप सेम, दुसरा भाग पुढे continue झाला गेट अप तोच, साखळ्या 2 , एकाच दिवसात एवढं टेन्शन असताना मायरा बाई गळ्यातल्या सोनसाखल्या बदलतात
गोल्डन सॅंडल आहे अजूनही,
गोल्डन सॅंडल आहे अजूनही, आरशात बघून नंदूशी बोलतानाच्या सीन मध्ये बर्याच technical चुका आहेत
. ओहो किल्ली. अगं मायराचे दोन
. ओहो किल्ली. अगं मायराचे दोन साखळ्या घालणे मला कित्येक दिवस डाचत होते (तिला टोचत नाहीत कशा) शिवाय तिच्या नाक फुगवण्याच्या बरोबरीने ती गळ्याला चिकटलेली साखळीसुद्धा लगालगा हलते बघ.
गेल्या एकदोन भागात ईबाळाची
गेल्या एकदोन भागात ईबाळाची ॲक्टिंग जरा सुधारलेली वाटतीये.. >>>>>>> +++++++++१११११११११, मायराला झापण्याचा सीन तिने छान केला. तिला डायलॉग्जही छान दिले होते. उदा. ' मार्ग दाखवणाराच तुमचा मार्ग चुकवू शकतो.' तिने आवाजाचा टोनही हळूवार केलाय.
बाकी ईशा सगळयान्ना आपणच नन्दू आहोत सान्गत सुटलीये हे पटत नाही. आपल्याला भास झाला होता हे ईआईबाबान्ना खोटच सान्गायला हव होत तिने. विसशी प्रेमाच नाटक करायच, विस तिच्या खरच प्रेमात पडतो, ओम शान्ती ओमची कॉपी करुन ( तसही केडयाला कॉपी करणच जमत) विसच सत्य सर्वान्समोर आणायच, मग विस फ्रस्टेशनमध्ये येऊन नकळतपणे आपला गुन्हा कबूल करतो अस दाखवायच.
ईशाने नन्दूची ' मायक्रोफोनची आयडिया' वापरुन नन्दूचीच चूक रिपीट करु नये म्हणजे झाल. आता तरी गनिमी कावा खेळावा तिने.
काल विस झेण्डेशी फोनवर बोलताना दिसला. म्हणजे त्याने मालिका सोडली नाही.
काल विस झेण्डेशी फोनवर
काल विस झेण्डेशी फोनवर बोलताना दिसला. म्हणजे त्याने मालिका सोडली नाही.>>>>>>>>>>>> तेव्हा त्याचा आवाज म्यूट केला होता का काल?
ईशाची ती पर्स विनोदीच दिसते एकदम. लहान मुली सगळीकडे कशा घेऊन फिरतात तसंच वाटतं ते! त्यात एक टिकलीचं पाकीट, लॉलीपॉप, लिमलेट गोळ्या, स्टिकर असं काहीतरी सापडेल बहुधा.
ईशाची ती पर्स विनोदीच दिसते
ईशाची ती पर्स विनोदीच दिसते एकदम. लहान मुली सगळीकडे कशा घेऊन फिरतात तसंच वाटतं ते! त्यात एक टिकलीचं पाकीट, लॉलीपॉप, लिमलेट गोळ्या, स्टिकर असं काहीतरी सापडेल बहुधा. Lol >>> खरं तर काय
ईशाची ती पर्स विनोदीच दिसते
ईशाची ती पर्स विनोदीच दिसते एकदम. लहान मुली सगळीकडे कशा घेऊन फिरतात तसंच वाटतं ते! त्यात एक टिकलीचं पाकीट, लॉलीपॉप, लिमलेट गोळ्या, स्टिकर असं काहीतरी सापडेल बहुधा. Lol हा हा हा हा हा हा.....काहीतरीच
काल विस झेण्डेशी फोनवर
काल विस झेण्डेशी फोनवर बोलताना दिसला. म्हणजे त्याने मालिका सोडली नाही.>>>>>>>>>>>> तेव्हा त्याचा आवाज म्यूट केला होता का काल?>>>>>>> मला तर वाटत आहे ...आधीच्या सिन एडीत करून लावला आहे... त्याचा लुक जुना होता...
काल विस झेण्डेशी फोनवर
काल विस झेण्डेशी फोनवर बोलताना दिसला. म्हणजे त्याने मालिका सोडली नाही.>>>>>>>>>>>> तेव्हा त्याचा आवाज म्यूट केला होता का काल? >>>>>>>>> हो
मला तर वाटत आहे ...आधीच्या सिन एडीत करून लावला आहे... त्याचा लुक जुना होता... >>>>>>>> अगदी अगदी
वेडिंगचा सिनेमात गा दा आहे क?
वेडिंगचा सिनेमात गा दा आहे क?
तिथे ---- चित्रपट कसा वाटला धाग्यावर --- आशुचँपनी लिहीलेय --
एक तर त्या हिरवणी ला अजिबात अभिनय येत नाही आणि वर पुन्हा आवाज इतका भसाडा. पत्र्यावर कौलं घासावा तसा.
....मला एकदम ओळखीचे अरण्यरूदन वाटले. हल्ली अशाच हिरवणी 'इन' आहेत का?
वेडिंगचा सिनेमात गा दा आहे क?
वेडिंगचा सिनेमात गा दा आहे क?>> नाही तिथे ऋचा इनामदार आहे.
पत्र्यावर कौलं घासावा तसा.>>>
पत्र्यावर कौलं घासावा तसा.>>>
https://lokmat.news18.com
https://lokmat.news18.com/entertainment/one-populer-serial-will-finish-a...
इतकीही भराभर गुंडाळू नये
इतकीही भराभर गुंडाळू नये मालिका.कालच्या 15मिनिटित जयडुला विक्याच सत्य समजत,हा सीन विक्यासमोर व्हायला हवा होता.
वाघ पिंजर्यात नसताना पिंजर्यात एखाद्या प्राण्याने मोकाट फिरण्यासारख आहे.विक्या असताना त्याच्या डोळ्यात धूळ फेकून त्याला एक्पोज करण्यात जी मजा होती ,ती अजिबात येत नाही.
काल मात्र जयदीपसमोर विक्याच सत्य आल्यावर जेव्हा एक्स्प्रेशन्स द्यायची वेळ आली तेव्हा बाळ आल आपल्या मूळपदावर मख्ख चेहरा घेऊन,खरतर फेशियल एक्स्प्रेशन्सला केवढा स्कोप होता.तिलाही हा धक्काच होता ना.पण नहीच जम्या.
केड्याला किती रंगवता आली असती सिरियल.पण नाही,माती खाणारच.
populer-serial-will-finish >>
populer-serial-will-finish >>>>>
will-finish हे ठीक आहे, होणारच आहे ....... populer-serial हा गैरसमज कोणाचा झालाय ? लोकमत की झीम? कधीपासून?
खरतर फेशियल एक्स्प्रेशन्सला केवढा स्कोप होता. >>>>> आठवणीने फेशियल करून आली होती हो ती... पण नंतर तोंड धुतले ना.... त्यात एक्स्प्रेशन्स धुतली गेली, फेस राहिला फक्त.
केड्याला किती रंगवता आली असती सिरियल. >>>> रंगांचे डबे संपले....नवीन डबे सँक्शन नाही झाले.
वाघ पिंजर्यात नसताना
वाघ पिंजर्यात नसताना पिंजर्यात एखाद्या प्राण्याने मोकाट फिरण्यासारख आहे.विक्या असताना त्याच्या डोळ्यात धूळ फेकून त्याला एक्पोज करण्यात जी मजा होती ,ती अजिबात येत नाही. >>>>>>>>> अगदी अगदी. विस जस तिच्याशी प्रेमाच नाटक करत होता तस तिने प्रेमाच नाटक करुन त्याला एक्सपोज करायच होत. जर विस खरच तिच्या प्रेमात पडला असेल तर त्यालाही विश्वासघाताच दु: ख झाल असत. अस दाखवण्यात पॉईण्ट आहे.
जयदीपला गोळया कधीपासून आणि का दयायला ( खोट कारण) सुरुवात झाली ते मात्र दाखवल नाही. मुळात नन्दूच्या खुनाचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता की नाही ह्याचा पत्ताच नाही. सॉन्याचा विसवर पहिल्यापासूनच विश्वास नसतो, तरीही त्या गोळयान्बदल तिला जराही डाउट येत नाही? जयदिप थोडा मोठा झाल्याचा एक प्रोमो दाखवला होता त्याच पुढे काय झाल?
केड्याला किती रंगवता आली असती सिरियल. >>>>>>>>>> +++++++++++१११११११११
रंगांचे डबे संपले....नवीन डबे सँक्शन नाही झाले. >>>>>>>>>>>
बाळाला कसं कळतं , डील 100
बाळाला कसं कळतं , डील 100 करोडचं आहे.???
सर्वच प्रतिसाद हहपुवा..
सर्वच प्रतिसाद हहपुवा..
मालिका गुंडाळताहेत.. हुश्शsss..
सुटेन एकदाची..माझ्या पुनर्जन्माचा निर्णय कॅन्सल..
...
गादाचीच काळजी वाटते आहे.. काय करेल बाळ आता..
एक शक्यता... बीबॉ वाइल्ड कार्ड एंट्री होऊ शकते..
शीग्रेटीची सोय असते म्हणे..
जा बाई जा.. तिथे तरी काहीतरी करून दाखव बाई
बाळाला कसं कळतं , डील 100 करोडचं आहे.???>>>>जैडूच्या केबिन मध्ये प्रांज्पे(ई बाळ असा उच्चार करते) नी बसवलेल्या मायक्रो फोन वरुन मॅडम तिच्या केबिन मध्ये बसून सर्व डील ऐकते
जैडूच्या केबिन मध्ये .....
जैडूच्या केबिन मध्ये ......बसवलेल्या मायक्रो फोन वरुन मॅडम तिच्या केबिन मध्ये बसून सर्व डील ऐकते >>>>>>
पण जैडूच्या केबिनमध्ये तो माणूस ८० करोड डील दुसरीकडे झालेले आहे असे सांगतो फक्त. मग जयदीपराव मी त्यापेक्षा जास्त देईन इतकेच म्हणतात. १०० करोड गोडाऊनमध्ये ठरते.
बहुतेक, मायक्रो फोन आणि मॅडमचे कान वायफायवर चालतात.
जयदीपला गोळया कधीपासून आणि का
जयदीपला गोळया कधीपासून आणि का दयायला ( खोट कारण) सुरुवात झाली ते मात्र दाखवल नाही. मुळात नन्दूच्या खुनाचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता की नाही ह्याचा पत्ताच नाही. सॉन्याचा विसवर पहिल्यापासूनच विश्वास नसतो, तरीही त्या गोळयान्बदल तिला जराही डाउट येत नाही? जयदिप थोडा मोठा झाल्याचा एक प्रोमो दाखवला होता त्याच पुढे काय झाल? >>>
आणि सिरीयलच्या सुरूवातीला जयदीप चिडखोर आणि बिनडोक दाखवला आहे. तो ईशाच्या लग्नानंतर एकदम हआहैको मधल्या मोहनीश बहल सारखा (फक्त धाकटा) कुटुंबवत्सल वगैरे होतो. त्याबद्दलही काही खुलासा आला का?
त्याबद्दलही काही खुलासा आला
त्याबद्दलही काही खुलासा आला का? >>>>
सगळं भाग पहात नाही..... त्यामुळे डीटेल माहीत नाही.... पण माफ्रेव त्याच्या गोळ्या बंद करते ..... सतत औषधांवर विसंबण्यापेक्षा गोळ्यांशिवायही हॅप्पी फ्रेश रहाता येतं... असं सांगून. त्याला कंटाळाच असतो गोळ्यांचा म्हणून तो ऐकतो. हे पाहिलेले.
बहुतेक, मायक्रो फोन आणि
बहुतेक, मायक्रो फोन आणि मॅडमचे कान वायफायवर चालतात.>>>
जयदिप थोडा मोठा झाल्याचा एक प्रोमो दाखवला होता त्याच पुढे काय झाल? >>> कधी????...कधी दाखवलेला.. मी कस्काय नाही पाहिला? की विसरून गेले बहुतेक
लोकहो, हे बघा.. काय करावे आता
लोकहो, हे बघा.. काय करावे आता
अभिनय कौशल्य आणि निरागस
अभिनय कौशल्य आणि निरागस सौंदर्य
इ बाळ परवा त्या फसवणार्या
इ बाळ परवा त्या फसवणार्या माणसाला म्हणाली की तुमच्या कलेचा (तो अभिनेता असतो ) चांगल्या गोष्टींसाठी वापर करा.
एवढ आहे तर आता बाळानेच खरतर अभिनय शिकून घ्यावा ना.
आजच कुणाकडे तरी गेलो होतो
आजच कुणाकडे तरी गेलो होतो तेव्हा ही सिरियल चालु होती. यात हिरोचा भाउ १०० कोटीचा चेक , ५०० रुपयाचे लाईट बिल साठी चेक लिहतो तसा लिहुन देत होता, १०० कोटीच सोल्युशन घेताना ना बिल , ना मालाची तपसणी, ना घासाघीस. ना डिलिव्हरी कशी हणार त्याबद्दल काळजी. दुकानात जाउन साबणाची वडी घेतो तसे १०० कोटी देउन सोल्युशन हेण्यासाठी चेक लिहित होता . तेवढ्यात हिंदी चित्रपटासारखी हिरोयिन येते आणि त्याला सांगते की मालाची तपसाणी करायला सांगते. मग तपासणी करुन खोटेपणा बाहेर काढते . सिरियल पहिल्यांदा बघत असल्यामुळे संदर्भ लागला नाही पण एकदम अचाट सिरियल वाटली
सो, विस १०० कोटीचा मालक
सो, विस १०० कोटीचा मालक बनता बनता राहिला.
आपल्या बायकोचा प्रताप बघून आता तरी विस तणतणत येईल भारतात. होप सो.
बादवे, कुणी आज म.टा. मध्ये ' बेपनाह प्यार' सिरियलच पोस्टर आणि त्याची टॅगलाईन पाहिली का? आजपासून सुरु होतेय कलर्स हिन्दी वर तुपारे हिन्दि मध्ये येतय अस वाटतय.
Pages