तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy बाऊलमध्ये चिठ्ठ्या ठेवायच्या आणि दर १ तारखेला भिशी काढायची. ज्याचे नाव तो १ महिना सी ई ओ

म्हटलं आता त्याचा गालगुच्चा घेते की काय? >>>> नाही हो, .... आता आमचा जयडू रोज ऑफीशला जाणार नं शोना ? मग अ‍ॅपल खा बघू म्हणत स्टीव्ह जॉब्ज कसे अ‍ॅपल खाऊन स्ट्राँग झाले त्याची गोष्ट सांगणार.

त्याचे काही उत्तर गेल्या काही भागांत आले होते काय? >>>>>> सगळे भाग बघणारे सोशिक जीव सांगतील.... पण वाटत नाही... तुपारे = फोल-पट होते, आहे, असेल.

हनिमून कधी झाला ?? >>>> ई श्या ची खरखर कमी करायचा यत्न म्हणून एकदा विस मधाचे चाटण घेऊन आला होता + तेव्हा खिडकीतून चांदोमामाही दिसत होता. झालाच की मग...

रानंच्या म्रुत्यूचा काहीच तपास झाला नाही? ती अचानक गेली असं हजारवेळा एैकवल. दासा् च्यावेळी तब्येतीचं कारण करून सारवासारव केलेली एकवेळ ठीक आहे पण धडधाकट रानं मारली गेली तर तपास वगैरे झाला नाही ते पण सो कॅाल्ड सेलिब्रीटी असून!! ? का कठड्यावाल्या गच्चीवरून पाय घसरून पडली असं पटवलं गजानी? सगळीच पात्र मंदपणाचे पुतळे दाखवायचा चंग बांधला आहे त्यामुळे माफी..

काल च्या भागातल ईशा च वाक्य बाबाना फोनवर "बाबा मी कुठलेही हिशोब ठेवत नाही..मग हे तर पुनर्जन्माच देणं आहे".... हे वाक्य इतक्या एकाच पट्टीत म्हणते. गदागदा हलवून सांगावस वाटत की अग बये हे पुनर्जन्म प्रकरण आहे..2018 मधली उधारी नाही.. हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे.. डायरेक्टर सांगत नसेल का??!!

>>काल च्या भागातल ईशा च वाक्य बाबाना फोनवर "बाबा मी कुठलेही हिशोब ठेवत नाही..मग हे तर पुनर्जन्माच देणं आहे".... हे वाक्य इतक्या एकाच पट्टीत म्हणते.
"मी ऑफिसमधून उशीरा येईन आज" इतकं casual वाटलं.

आज आॉफिस मध्ये पंटर्स बसले आहेत हा सीन होता. त्या मायरा नाकफुगे ला ईबाळानं चांगलाच झटका दिला आहे. त्या सपनाचे शर्ट बघता वाटतंय की सुभाचे जुने कपडे देतात तिला बहुतेक.
बादवे झेंडेभाऊ चांगल्या भूमिकेत बघायचे असतील तर मराठी चित्रपट किल्ला जरूर बघावा.

2018 मधली उधारी नाही.. हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे.. डायरेक्टर सांगत नसेल का??!! >>>>>>>>>>

"मी ऑफिसमधून उशीरा येईन आज" इतकं casual वाटलं........................>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आज आॉफिस मध्ये पंटर्स बसले आहेत हा सीन होता. त्या मायरा नाकफुगे ला ईबाळानं चांगलाच झटका दिला आहे. त्या सपनाचे शर्ट बघता वाटतंय की सुभाचे जुने कपडे देतात तिला बहुतेक. >>>>>>>+++++++++++++++++++++१११११११११११११११११११हसुन हसुन दमले......

2018 मधली उधारी नाही.. हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे.. डायरेक्टर सांगत नसेल का??!!>>>>> +++ ११११
त्याने लाख सांगितलं तरी जमायला हवं नां! शेवटी त्यालाही रिळं संपवायची घाई असेल तर दर्जा कोण बघणार

तुपारे = फोल-पट होते, आहे, असेल. >>>
गदागदा हलवून सांगावस वाटत की अग बये हे पुनर्जन्म प्रकरण आहे..2018 मधली उधारी नाही.. हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे >>> Lol

त्या सपनाचे शर्ट बघता वाटतंय की सुभाचे जुने कपडे देतात तिला बहुतेक. >>> लोल. नशीब सपनाने विक्याचे जुने कपडे घातले की तिच्यातही विक्या संचारतो वगैरे दाखवत नाहीत.

आणि हिशेब ठेवत नाहीत हे कोणाचं काही उधार/बाकी ठेवत नाही अशा अर्थाने कधीपासून वापरू लागले? की कायमच वापरत होते? हिशेब ठेवत नाही म्हणजे कसलेही अकाउण्टिंग नसून अंधाधुंद कारभार आहे असा अर्थ समजायचो मी.

आणि हिशेब ठेवत नाहीत हे कोणाचं काही उधार/बाकी ठेवत नाही अशा अर्थाने कधीपासून वापरू लागले? की कायमच वापरत होते? हिशेब ठेवत नाही म्हणजे कसलेही अकाउण्टिंग नसून अंधाधुंद कारभार आहे असा अर्थ समजायचो मी.>>>>> Happy फारएण्ड, सही पकडलं!

ही सिरीअल म्हणजेच अंधाधुंद कारभार आहे हे किती सूचकतेनं सांगितलंय आणि तुम्ही नावं कशी काय बरं ठेवता?

ही सिरीअल म्हणजेच अंधाधुंद कारभार आहे हे किती सूचकतेनं सांगितलंय आणि तुम्ही नावं कशी काय बरं ठेवता? >>> Happy हो पुणे-५२ सारखे गहन चित्रपट असतात तसे काहीतरी असावे. "जीवनातील गुंतागुंतींवर यातील कथा भाष्य करते. ज्यांना ते समजत नाही त्यांनी एलदुगो पाहावी" असे काहीतरी सखोल समीक्षण करायला हवे कोणीतरी.

सखोल, व्यापक, संमिश्र, व्यामिश्र वगैरे वगैरे...ज्याला जे कळेल, आकळेल, समजेल, झेपेल त्यानं ते ते घ्यावे.

अग बये हे पुनर्जन्म प्रकरण आहे..2018 मधली उधारी नाही.. हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे.. >>>>>> Lol

सुभा का लाजत होता?

त्या बाळाला बेसिकली पुनर्जन्माचा रोलच कळलेला नाही.एका माणसाने मला गेल्या आणि आताच्या जन्मात फसवल यावरच गाडी अडली आहे.
अग भवाने,त्या माणसाने तुझ्या गेल्या जन्मात तुझा आणि तुझ्या वडिलांचा असे दोन मुडदे पाडले आहेत,गेल्या 20वर्षात अनेक लोकांंचे मुडदे पाडले असतील.राजेशची अख्खी फँमिली मारली याने.एका खुन्यासोबत तुझ लग्न झाल आहे.
बाई,त्या जालिंदर सारखी पेटून उठ.माहित असलेल्या गोष्टीच परत परत विचारत आहेस.
सुभा आल्यावर बहुधा आटपेल सिरियल.

सुभा आल्यावर बहुधा आटपेल सिरियल. >>> बहुतेक तो वैतागून स्वतःच गच्चीवरून उडी मारेल आणि सगळं झंझट संपेल.
या बाळाच्याने काय होईल असं वाटतं नाही

सुभा का लाजत होता? >>>> जनाची नव्हे मनाची हो सस्मित....

त्या बाळाला बेसिकली पुनर्जन्माचा रोलच कळलेला नाही. >>>>>>>
त्या बाळाला बेसिकली रोलच कळलेला नाही. असेही चालले असते.

विसने तिला सांगितलेली रानं स्टोरी आणि खरी स्टोरी वेगळी आहे याचेही काही सोयर सुतक दिसत नाही तिला.

एका खुन्यासोबत तुझ लग्न झाल आहे. >>>>>
UP लोकांच्या लिहीण्यावरून कळते की बाळ पावरबाज झालेलं हाय. तुमच्याही स्वप्नात येऊन चिरक्या आवाजात दोन डोळे, बारा हातांची गोष्ट सांगेल हं......मग किंचाळत उठाल बरं ... Happy

सुषमा ताई कुठे गेल्या? दोन पानात दिसल्या नाहीत? रोज बघतात बिचार्‍या.... कशा आहात हो?

आहेss आहे, या जन्मात तू पारे बघायचे भोग भोगतेय...
गा दा ला नावं ठेऊन ठेऊन कंटाळा आला...
हा धागाच काय तो माझी संजीवनी आहे गड्या!!!..
अजुनही पाहते आहे रे.... दातार काकांकडून बक्षीस मिळवणारच आहे...
धागा प्रतिसाद देणार्‍या मेंबरांएवढी तरी चाकलेटे मिळो एवढीच अपेक्षा आहे!!
.... बाळाची पोक्त रा नं साकारताना अभिनयाची केविलवाणी अवस्था पहावत नाही आहे...

काहीही चालू आहे...जैडूला खुर्ची सम्राट तर केलंय...
.... बघू, केड्या अजुनी काय काय दिवे लावणार आहे ते लवकरच कळेल..
... सुभा बहुतेक आरोपी म्हणुनच डायरेक्ट जेलातच दाखवून शिरेलीला गुंडाळून डब्यात भरतील असं वाटतं आहे...

.... थोडी बिझी आहे...
पण तुपारे मी पहातेच रे..
त्यामुळे धागा वाचतेच रे..
आणि चारोळी लिहितेच रे..
जीवाची करमणूक करतेच रे..

ई बाळ, तिचा दिव्य अभिनय, केड्या, त्याची पटकथा, तुपारे निर्माते, दिग्दर्शक, संपादक, झीम वाहिनी, आणि मालिकेतील पडद्यावरील आणि पडद्यामागील तमाम उरली सुरली मंडळी यांचे हिशोब up to date ठेवलेत मी....

आता मी पुढच्या जन्मी कोण होऊ म्हणजे मला सगळा हिशोब चुकता करता येईल या विचारात आहे मी सध्या!!!

काल तिने घरातल्या त्या ह्यांना (विश्वासू नोकर.. नाव तोंडात आहे आठ आठवत नाही )का सांगितलं ? कि मी राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे असं ? Uhoh
आता सुभा लंडन हुन यायच्या आत हि इकडे भराभर सूत्र हलवणार का ? कालचा अभिनय थोडासा बरा होता असं म्हणायचं का ?
आज आॉफिस मध्ये पंटर्स बसले आहेत हा सीन होता. त्या मायरा नाकफुगे ला ईबाळानं चांगलाच झटका दिला आहे. त्या सपनाचे शर्ट बघता वाटतंय की सुभाचे जुने कपडे देतात तिला बहुतेक. >>> शी !! पण हसून मेले मी.. Lol Lol
हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे.. डायरेक्टर सांगत नसेल का??!!>>> तेच विचारतोय कि आम्ही रोज कानी कपाळी ओरडून ... कि डायरेक्टरा .. काय करतोयस काय ?! एडिटरा झोपलास काय ?! पण त्यांनी कान डोळे आणि मेंदू सगळं बंद च करून ठेवलाय जणू .. Sad
"मी ऑफिसमधून उशीरा येईन आज" इतकं casual वाटलं.>>+१११
मायरा पतंगे -नाकफुगे Wink
आणि हिशेब ठेवत नाहीत हे कोणाचं काही उधार/बाकी ठेवत नाही अशा अर्थाने कधीपासून वापरू लागले?>> मी ऐकलंय बऱ्याचदा बहुतेक .. हिशेब ठेवत नाही चुकता करतो .. ते नॉट ओनली पैश्याच्या बाबतीत पण इन जनरल पण बोलतात देणं ठेवत नाही या अर्थाने . आणि तुम्ही म्हणता ते हि वापरतात कसलाही हिशेब नाही म्हणजे काई देणं घेणं व्यवहार कशाला कशाचा पत्ता नाही अनागोंदी कारभार तुपारे सारखा Wink

सुषमाताई. Lol

.जैडूला खुर्ची सम्राट तर केलंय... >>>>>>>>> ते बरोबरच आहे म्हणा. सरन्जामे इण्डस्ट्री जयदीपची आहे ति त्यालाच मिळायला हवी. पण इतक्यात झटपट अस कुणालाही हेड करता येत? त्यासाठी काही लिगल प्रोसिजर असते की नाही?

त्या मायरा नाकफुगे ला ईबाळानं चांगलाच झटका दिला आहे. >>>>>>>>> +++++++++११११११११११

आता सुभा लंडन हुन यायच्या आत हि इकडे भराभर सूत्र हलवणार का ? कालचा अभिनय थोडासा बरा होता असं म्हणायचं का ? >>>>>>>>> सध्या तरी असच वाटतय.

काल तिने घरातल्या त्या ह्यांना (विश्वासू नोकर.. नाव तोंडात आहे आठ आठवत नाही )का सांगितलं ? कि मी राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे असं ? >>>>>>>>>>>> सर्जेराव नाव आहे त्याच. झेण्डेच्या सागण्यानुसार सर्जेरावने दासाची औषधे बदलली हे तिला कळलय. नाहीतरी त्याला ती पुनर्जन्म आहे हे कधी ना कधी कळणारच होत म्हणा.

हे सगळ आमानवीय किंवा दैवी आहे..रोज घडणारी घटना नाही..जरा तरी घाबरणे, झाल्या प्रकाराने राग येणे असं मिश्र भाव येऊ दे.. डायरेक्टर सांगत नसेल का??!! >>>>>>>>> अगदी अगदी

की जर त्याला इस्टेट मिळू नये ही अट असेल तर ती राजनंदिनी, ईशा, आईसाहेब कोणाच्याच मार्फत मिळणार नाही - त्याचे काही उत्तर गेल्या काही भागांत आले होते काय? >>>>>>>>> दासाने त्याला इस्टेट मिळू नये हि अट ठेवली होती पण ती कोणाच्याच मार्फत मिळणार नाही अस काही दासाने ठरवल होत की नाही ते आता आठवत नाही बुव्वा.

पण हे बाळ ज्याला त्याला काय सांगत सुटल आहे की मी नंदूचा पुनर्जन्म आहे ,उद्या लिगल कारण देताना ही काय सांगणार आहे,,,,सर्रांनी मला गेल्या जन्मात खाली फेकून दिल होत.
येड का खुळ.

पण हे बाळ ज्याला त्याला काय सांगत सुटल आहे की मी नंदूचा पुनर्जन्म आहे ,उद्या लिगल कारण देताना ही काय सांगणार आहे,,,,सर्रांनी मला गेल्या जन्मात खाली फेकून दिल होत.
येड का खुळ.>>>> Rofl Rofl Rofl

गेल्या एकदोन भागात ईबाळाची ॲक्टिंग जरा सुधारलेली वाटतीये.. बदला घ्यायचाय त्यामुळे जास्त इमोशन्स दाखवायची नाहीत हे बाळाच्या पथ्यावर पडलंय कदाचित.
आणि लाजणं /रडणं सध्याच्या कथेत नाही त्यामुळे आपलीही सुटका! तिथे बाळाची हमखास विकेट पडते

सुभा कुठे गायब झालाय..? मध्यंतरी कुठेतरी बाहेर गेला होता म्हणून आणि नाटकाचे दौरे होते म्हणून सुट्टी घेतली असणार आहे.. पण आता येऊनही बरेच दिवस झालेत की. गुंडाळायला घेतली आता सीरिअल..

काल ईआई व ईबाबा यांना संबोधताना ईबाळ सतत आईबाबा असं एकत्रितपणे म्हणत होतं. मी आठवून पाहिलं पण असं माझ्या आईवडिलांना एकत्रितपणे हाक मारताना (तिथेच हजर असतानाही) आठवलं नाही बौ.
साॉन्या चांगले एक्स्प्रेशन देते. सध्या तिला बरा वॉर्ड रोब दिल्याचं दिसतंय

कोणी नोटिस केलं का? इशा जेव्हा आईला किंवा बाबांना संबोधून काहीही म्हणते तेव्हा ती प्रत्येक वाक्याची सुरूवात कशी करते? "आई, अगं, असं काय करतेस?" , "बाबा, अहो, तुम्ही काळजी करू नका" वगैरे. ते अगं आणि अहो इतकं विचित्र वाटतं. त्याहीपेक्षा विचित्र हे वाटतं की समोर बसलेल्या माणसाशी बोलताना प्रत्येक वाक्याला त्याचं नाव कशाला घ्यायला हवं? कोण लिहीतं असे डायलॉग्ज?

Pages