जमतच नाही कविता करणं

Submitted by 'सिद्धि' on 31 May, 2019 - 09:07

जमतच नाही कविता करणं
जस जमतच नाही आठवणी विसरण.

माते कडून पान्ह्याची
गुरु कडून ज्ञानाची
विधात्या कडून प्राणाची
अन विंदांच्या गाण्याची
अशी गुंफण केली दानाची
पण जमेनाच ते फेर धरन.

त्याच्या कडून चांगुलपणाची
तुझ्या कडून हळवेपणाची
तिच्या कडून सौंदर्याची
अन कृतज्ञतेच्या जाणिवांची
अशी गुंफण केली भावनांची
पण जमेनाच ते फेर धरन.

कल्पने कडून शब्दांची
स्मृतीं कडून भावनांची
तिमिरा कडून सरन्याची
अन उष:कालाच्या किरणांची
अशी गुंफण केली प्रारब्धाची
पण जमेनाच ते फेर धरन .

पानावर पड्ले शब्द शब्दची
सारेच बिघडले-अडखळले,
अनं चडफडले मी.
पुढे पंक्तिच सुचेना काव्याची
तरिही गुंफण केली रचनांची
का बर जमेनाच ते फेर धरन ?

( कविता करनं जमत नाही तरीही ही कविता पुर्णपणे माझीच आहे याची क्रुपया नोंद घावी.
मा.बो. वरील पहिलीच कविता त्यामुळे अपेक्षित बदल नक्की सुचवा. )

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!

मस्त ,

फक्त ते शब्द विसरणं , धरणं , पान्हा
पुन्हा तपासून पहा आणि सुधारून घ्या

कविता एकदम छान

सुंदर लिहीलय
विं.दा ऐवजी विंदां च्या अस पाहिजे वाटते...

मन्या ऽ, प्रांजली गौतम क... ,akki320
- thanks.

राजेंद्र देवी , mr.pandit
सुचनेनुसार अपेक्षित बदल केले आहेत.
धन्यवाद.

सिद्धि धागा बदलुन वाहतं पान का ग केलं?

कविता विभागातच आहे.मला वाटलं होतं कि लेखनाचा धागा बदलुन वाहतं पान केलं कि काय! Happy

मन्या ऽ
नाही वाहतं पानं असाच धागा होता..... पण कविता विभागातच आहे ना??

सुरेख! छान!
जमतचं नाही कविता करन>>> हे म्हणजे एखाद्या गायकाने ‘मला गाणे म्हणता येत नाही’ असे म्हणने झाले.

माते कडुन पान्हाची>> पान्ह्याची असे हवय का?

Tnx शालीदा.
म्हणजे मला जमलं तर ....

माते कडुन पान्हाची>> पान्ह्याची असे हवय का?
- होय पान्ह्याची बरोबर आहे. बदल केला आहे.

छान आहे कविता. Happy

खालील शब्द एकवार तपासून बघा.
जमतचं>> जमतच
करन>> करणं
विसरण>> विसरणं
कडुन>> कडून
धरन>> धरणं
क्रुतज्ञतेच्या>> कृतज्ञतेच्या
स्म्रुती>> स्मृती
उशत्कालाच्या>> उष:कालाच्या

अजूनही एक-दोन शब्द आहेत ते मात्र तुम्ही शोधा आणि शिर्षकही दुरूस्त करा. Happy

पुढील कवितेसाठी शुभेच्छा !

"विंदांच्या गाण्याची" - हे समजलेल नाही- A आदि
- विंदा करंदीकरांच्या कविता/ गाणी असा अर्थ घेतला आहे.

A आदि ,अज्ञातवासी - प्रतिसादा बद्दल थॅक्स .