फोनची रिंग वाजली, रियाने फोन उचलला पलीकडून हाय रिया शब्द ऐकले आणि रियाचे मन भूतकाळात गेले.अमित, कसे विसरू शकेन हा आवाज. कॉलेज ची सगळी वर्षे मित्र होता, त्याच्या डोळ्यातून कळायचे की त्याला मी किती आवडायचे ते.मलाही तो आवडायला लागला होता. दिसायला देखणा, हुशार आणि कमावलेले शरीर. कोणाला नाही आवडणार. दिवसच असे होते, कोणीच पुढाकार घेतला नाही. नंतर माझे लग्न झाले आणि संपर्कच तुटला.आज इतक्या दिवसांनी फोन?
हॅलो.. आहेस का.. या वाक्यांनी ती परत वर्तमान काळात आली.
हो अमित, आहे मी. आज इतक्या दिवसांनी, मी थोडी शॉक झाले आवाज ऐकून.
हो रिया, मी फिरतीच्या जॉब वर आहे, आज तुझ्या शहरात आहे, विचार केला तुझी हालचाल विचारावी आणि माफी देखील मागावी. कारण मी इतके दिवस संपर्क ठेवला नाही.
रिया उत्तरली- का अमित का? का संपर्क तोडल्यास तू?
अमित थोडासा उदास होत बोलू लागला. रिया तू मला खूप आवडायचीस कॉलेज मध्ये. पण कधीच बोलू नाही शकलो. आज इतक्या वर्षांनी समजले की ते प्रेम नव्हतेच, फक्त आकर्षण होते.
रिया हे ऐकून शांत झाली. म्हणाली - अमित तू माझ्या संसारात ढवळाढवळ करायला आला नाहीयस हे ऐकून चांगले वाटले.मला पण मन मोकळे करू दे, मला पण तू खूप आवडायचास. आणि मलादेखील जाणवले की ते फक्त आकर्षण होते. तू तेंव्हादेखील अबोल होतास आणि आजही आहेस. पण मी मात्र बोलणार आहे.
योगायोगाने माझा नवरा ऑफिस कामासाठी शहराबाहेर आहे. मी हॉटेल मध्ये रूम बुक करते, तुझी वाट बघेन मी तिथे.येशील ना रे...
जुना मित्र - वास्तविकता
Submitted by कटप्पा on 27 May, 2019 - 12:51
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रिया अमित जोडीच्या अनेक
प्रिया अमित जोडीच्या अनेक
बकवासकथा वाचून झाल्या आता रिया बद्दल नवीन कंगोरे असलेल्या कथा वाचायला आवडेल !... आणि ते हॉटेल मध्ये भेटले.
... आणि ते हॉटेल मध्ये भेटले. अमितला पाहून रिया म्हणाली किती बदलला आहेस रे. ढोल्या झालास. टक्कल पडले. अमित म्हणाला, "तेवढे होणारच गं. ते असो. पण तू मला विसरू नको. कुटुंबातील सर्वाना सांग कि इथून पुढे आमच्याच पक्षाला मत द्या. हेच सांगायचे होते बाकी काही नाही"
आभारी आहे विक्ष।
आभारी आहे विक्ष।
अतुल - जिथे तिथे राजकारण आणणे
अतुल - जिथे तिथे राजकारण आणणे गरजेचे आहे का? अमित म्हणजे अमित शहा नाहीय, रिया म्हणजे प्रियांका नाहीय.
ती त्याला बोलली लॉज बुकिंग
ती त्याला बोलली लॉज बुकिंग करते तू येशील ना? तो हो म्हणाला, परंतु काही कारणास्तव तिला यायला उशीर झाला तेव्हा तिने त्याला फोन करून सांगितले तू पुढे जा आणि लॉज बुकिंग करून ठेव,...
पुढील कथा आणि चर्चा खालच्या लिंकवर आहे
https://www.maayboli.com/node/67847
लोल.. बोकलत ☺️
लोल.. बोकलत ☺️
बोकलत... कडक फोडणी दिली राव
बोकलत... कडक फोडणी दिली राव
बोकलत, चरप्स आणि अजिंक्यराव
बोकलत, चरप्स आणि अजिंक्यराव पटेल - प्रतिसादासाठी आभारी आहे।
@ बोकलत
@ बोकलत
जब्बरदस्त तडका!
तडका वगैरे ठीक आहे, कथा कशी
तडका वगैरे ठीक आहे, कथा कशी वाटली ते सांगा.
अजिंक्यराव पाटील - इथेही
अजिंक्यराव पाटील - इथेही संपादनाची मुदत निघून गेली आहे। माफी असावी।
तडका वगैरे ठीक आहे, कथा कशी
तडका वगैरे ठीक आहे, कथा कशी वाटली ते सांगा.>>> अपूर्ण वाटली... (हेमावैम)
अपूर्ण वाटत असेल कारण लॉज
अपूर्ण वाटत असेल कारण लॉज वरची स्टोरी इकडे कशी पोस्ट करणार
अपूर्ण कथा लिहूण विचारताय
अपूर्ण कथा लिहूण विचारताय
कथा कशी वाटली
आता बंद दारामागे काय घडले हे
आता बंद दारामागे काय घडले हे पण मीच लिहू का? Use your imagination !