Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेक्सिकन फिल्ड काहीतरी, किंवा
मेक्सिकन फिल्ड काहीतरी, किंवा रिमिक्स फलाफल असे नाव देऊन वर बेकड चीज घालून वाढले >> "यह काम अपनी हयात मे ना कर पाओगे तो मरने के बाद भी पछताओगे!!!!!!"
मेनू सुचवणे नाही जमणार मला,
मेनू सुचवणे नाही जमणार मला, पण --
२२ तारखेला सोमवार + संकष्टी आहे चंद्रोदय १० वाजता आहे.
याचा विचार करावा लागेल असे कोणी येणार्या पाहुण्यात आहे का बघा.
बिन कांदा लसणाची सुकी भाजी व
बिन कांदा लसणाची सुकी भाजी व रस्सा भाजी यांच्या रेसिपीज सुचवा... ग्रेवीचे वाटण बनवण्यासाठी मायबोली वर काही लिंक्स असतील तर याही शेअर करा... प्लीज...
कांदा+ लसुण नसलेली ग्रेव्ही
कांदा+ लसुण नसलेली ग्रेव्ही पाहीजे असेल तर
१) ओला नारळ + आले+ हिर्वी मिर्ची + कोथिंबीर+ कढीपत्ता २ पाने ( पानेच, डहाळी नाही )
२ ) सुका/ ओला नारळ + आले + टॉमेटो + कोथिंबीर + कच्ची मोठी बडीशेप ( २ चिमुटभर )
३ ) सुके कोबरे किस + कोथिंबीर + फुटाण्या चे डाळे + भाजलेले शेंगदाणे
काजू खसखस टमाटो + मसाले. काजू
काजू खसखस टमाटो + मसाले. काजू आणि खसखस भिजत ठेवायचे.
ही वापरून मकई कुर्मा, नवरतन कुर्मा, शाही पनीर, इ. प्रकार होतात.
निशा मधुलिका हे युट्युब चॅनेल
निशा मधुलिका हे युट्युब चॅनेल पाहा. तिच्या कुठल्याही रेसीपीमध्ये कांदा, लसूण नसतो.
चैत्रातल्या नवरात्रात चण्याची
चैत्रातल्या नवरात्रात चण्याची रसदार भाजी खाल्ली. ओला नारळ, आलं वाटून जिर्याच्या फोडणीवर चणे घातले होते.वरून चणा मसाला घातला होता.भाजी मस्त झाली होती.
टोमॅटो + हि. मिरची + आलं
टोमॅटो + हि. मिरची + आलं यांची पेस्ट
तेल+तुप/बटर मधे परतायची तेल सुटेपर्यंत
सुके मसाले अॅड करायचे (हळद लाल मिर्च पा. धने-जिरे पुड ग. मसाला आमचूर पा.)
आवडीच्या भाज्या तळून किंवा स्टिम करून ग्रेव्हीत अॅड करायच्या (flower+ potato/ panir./ green peas etc)
रश्मी, भरत, योकु, देवकी,
रश्मी, भरत, योकु, देवकी, shraddha... सर्वांना धन्यवाद..योकु yes.. निशामधुलिका विसरलेच होते... नक्की पहाते...
तयार आंबोळी पीठ आणले आहे. कसे
तयार आंबोळी पीठ आणले आहे. कसे वापरायचे?
त्या पाकिटावर सूचना नाहीयेत
त्या पाकिटावर सूचना नाहीयेत का ?
साधारण पणे डोश्यासारखं/घावनासारखं सरसरीत पीठ भिजवा .. त्यात हवं असल्यास लसूण बारीक चिरून कोथिंबीर वगैरे घालू शकता .. मी असं मिश्रण अर्धा तास झाकून ठेवते .. पण वेळ असेल तर २ तास ही चालेल .. मग ते पीठ कदाचित किंss चित घट्ट होतं /फुगतं. मग त्यात चवीनुसार मीठ हळद तिखट (तुमच्या पीठात घातलं असेल तर चव घेऊन बघा आधी )हव तर जिरं जर्रा खरंगटून घाला ..
आणि घावन घालतो तसे आंबोळ्या करा
आधी थोड्याश्या पिठाच्या करून बघा ..कसं होतंय
धन्यवाद.. करुन बघते... त्या
धन्यवाद.. करुन बघते... त्या पाकीटावर सूचना नाहीत.
एक जोडपे ये णार आहे जेवायला..
एक जोडपे ये णार आहे जेवायला...पाहूण्याना नोन-व्हेज जास्त आवडते, पण आम्ही पडलो घास - फूस वाले.. बेत काय करावा?
हा विचार करतेयः
- आम्बा रस, पूरी (थोड्या पूर्या गरम गरम करेन, बाकी करून ठेवीन म्हणतेय)
- भरले वान्गी
- कैरी किसून तक्कू / काकडी कोशीम्बीर
- पनीर भाजी (मुगलाई )
- तोन्डली भात ग्रीन
लन्च ला येणार आहेत, ११ वाजे पर्यन्त.. त्यामुळे धावपळ असणार
काही सुचवा
स्वप्नाली, बेत मस्त आहे.
स्वप्नाली, बेत मस्त आहे.
आमरसपुरीपुढे भरली वांगी / पनीरभाजी जरा साईडला पडतील का? माझ्या मते एकच भाजी असू द्यावी.कुरडया/पापड इ.ने जागा बरून काढता येईल.
पुरी + भरली वांगी फार काय
पुरी + भरली वांगी फार काय अपील नाय होत. त्याऐवजी पनीर चालेल. बाकी मेन्यू मस्त.
एक चुकीतून शिकलेली गोष्ट :
एक चुकीतून शिकलेली गोष्ट : पाहुण्यांना पथ्य पाण्यानुसार काय चालते तेही बघून घ्या..आम्ही आमरस, पोळी, गवारीची अंगापुरता रस्सा असलेली भाजी, बटाट्याच्या काचर्या, कैरीची चटणी, साधं वरण-भात आणि कुरड्या-पापड्या असा बेत केला होता. त्यातले पाहुणेबुवा डाएबेटिक निघाले. त्यामुळे आमरस बाद. त्यांना कैरी आवडत नव्हती त्यामुळे चटणी बाद, इतर कुठल्याश्या पथ्यामुळे गवार खात नाहीत त्यामुळे गवार बाद. त्यांनी थोडीशी बटाट्याची भाजी, वरण-तूप आणि पोळी खाल्ली फक्त. पाहुणीण बाई बर्या जेवल्या, पण त्यांनाही साधं वरण आवडत नाही म्हणे म्हणून त्यांनी भातावर मेतकूट आहे का विचारलं..ते नेमकं नव्हतं घरात! त्यांची मुलगी पण फक्त बटाटा भाजी, आमरस आणि पोळी एव्हढच जेवली!!
आमच्या दृष्टीने सामान्य मेन्यु चा पोपट झाला..मंडळी लांबच्या नात्यातलीच होती त्यामुळे कल्चरली सिमिलर! तरी ही अवस्था
एक चुकीतून शिकलेली गोष्ट :
एक चुकीतून शिकलेली गोष्ट : पाहुण्यांना पथ्य पाण्यानुसार काय चालते तेही बघून घ्या.. >> खरतरं आपणही कोणाकडे जेवायला जात असू तर जमलं तर आपली पत्थ्य , आवडी अगोदरच सांगावीत .
मुलाच्या मैतिणीच्या घरी जेवायला बोलावलं होतं . आम्ही तिघ आणि अणखी एक ओळखीचे ग्रुहस्थ .
तिच्या आई-आजीने खूप आवडीने बासूंदी केली होती .
आम्ही दोघे पडलो - दूघ आणि खीर , बासून्दी,रबडी अशे पदार्थ न आवडणारे लोक
लेकही बासून्दी खात नाही .
मला ईतकं वाईट वाटलं नंतर .
आमरसपुरीपुढे भरली वांगी /
आमरसपुरीपुढे भरली वांगी / पनीरभाजी जरा साईडला पडतील का? माझ्या मते एकच भाजी असू द्यावी.कुरडया/पापड इ.ने जागा बरून काढता येईल. >>> अगदी अगदी. पुऱ्या असतील तर फ्लॉवर मटार बटाटा रस्सा किंवा एखादी उसळ किंवा नेहेमीची सुकी बटाटा भाजी जास्त धावेल.
एक चुकीतून शिकलेली गोष्ट :
एक चुकीतून शिकलेली गोष्ट : पाहुण्यांना पथ्य पाण्यानुसार काय चालते तेही बघून घ्या.. >> खरतरं आपणही कोणाकडे जेवायला जात असू तर जमलं तर आपली पत्थ्य , आवडी अगोदरच सांगावीत . >>> दोघींच्या म्हणल्याला मम.
पथ्य नसेल आणि एखादा पदार्थ आवडत नसेल पण त्याची allergy नसेल आणि आपण कल्पना दिलेली नसेल, तर जे केलं असेल ते त्यांच्या समाधानासाठी खावं असं माझं मत.
नेहेमीची सुकी बटाटा भाजी
नेहेमीची सुकी बटाटा भाजी जास्त धावेल.>>>>> हेच माझ्याही मनात आधी आले होतं.पण मग वाटलं की करणारे/ खाणारे रसिक असू शकतील.
पथ्य नसेल आणि एखादा पदार्थ
पथ्य नसेल आणि एखादा पदार्थ आवडत नसेल पण त्याची allergy नसेल आणि आपण कल्पना दिलेली नसेल,तर जे केलं असेल ते त्यांच्या समाधानासाठी खावं असं माझं मत.<<
(लाईफ थ्रेटनिंग अॅलर्जी खूप रेअर असतात. त्या सोडून)
पानात वाढलेले असेल ते खाल्ल्यामुळे जीव जाणार नसेल, तर ते गऽप खावे. घरी तर खावेच, अन बाहेर गेल्यावर ताट स्वच्छ केलेच पाहिजे हा नियम लहानपणापासून अंगी बाणलेला आहे. न आवडीची वस्तू आधी औषध खाल्ल्यासारखी संपवून मग इतर सगळे संपवणे ही आयडिया लहानपणी करत असू. आजकाल आवडत नाही से काही उरलेच नाहिये. तेव्हा सगळे बरोबर संपते.
पाहुणे म्हणून कुठे गेल्यावर मला अमुक आवडत नाही अन तमुक आवडत नाही, हे स्वयंपाक तयार झाल्या *नंतर* सांगणे हे मला तरी अतीव उद्धटपणाचे वाटते.
पाहुणे म्हणून कुठे गेल्यावर
पाहुणे म्हणून कुठे गेल्यावर मला अमुक आवडत नाही अन तमुक आवडत नाही, हे स्वयंपाक तयार झाल्या *नंतर* सांगणे हे मला तरी अतीव उद्धटपणाचे वाटते.>>> +1000000
आरारा प्रतिसाद आवडला
आरारा प्रतिसाद आवडला
आम्ही पण कुठेही गेली की ताटात जे पडते ते शांतपणे , कोणतीही नाटके न करता खाते. शेवटी कोणीतरी खूप मेहनत घेतलेली असते त्यासाठी. अन राहिली गोष्ट अन्न ताटात सोडायची, तर मम्मी ने लहान पणापासून शिकवले आहे की जितके खाऊ शकता तितकेच घ्यावे. अन्न नासवू नये☺️
बाकी नावडता पदार्थ आधी संपवायची युक्ती मी अजून वापरते
आम्ही आमरस, पोळी, गवारीची
आम्ही आमरस, पोळी, गवारीची अंगापुरता रस्सा असलेली भाजी, बटाट्याच्या काचर्या, कैरीची चटणी, साधं वरण-भात आणि कुरड्या-पापड्या असा बेत केला होता>
शरी, काय सुंदर मेन्यु आहे हा! मला बोलवा जेवायला कधीतरी! न्याय देईन इतक्या सुंदर जेवणाला नक्की!!!
बाकी नावडता पदार्थ आधी
बाकी नावडता पदार्थ आधी संपवायची युक्ती मी अजून वापरते
>>>रिस्क आहे - मग यजमानांनी तो पदार्थ आणखी वाढला तर?
पानात वाढलेले असेल ते
पानात वाढलेले असेल ते खाल्ल्यामुळे जीव जाणार नसेल, तर ते गऽप खावे >>+१११
आपली कडक पथ्यं किंवा आवडी नावडी असतील तर आपणच त्या जेवायला जायच्या आधी होस्ट ना सांगणे हे आपले काम आहे.
मला असले काही नमुने भेटलेत, आधी काही बोलायचे नाही, अन जेवायला वाढल्यावर अगं आज माझा उपास आहे. किंवा अग आता तमके खातच नाही अजिबात हे सांगणे!! काही तर मी आधी काही पथ्यं वगैरे आहेत का विचारून पण काही नाही गं काहीही कर म्हणून पुन्हा तेच. मला ना ब्रेड चे प्रकार नाही चालत. त्या ह्याला दुधाचे प्रकार नाही आवडत अमूक अन तमूक. ऐन वेळे करणार काय? होस्ट ची भयंकर ऑकवर्ड सिचुएशन होते. अत्यन्त उद्धट वाटते हे मलाही .
रिस्क आहे - मग यजमानांनी तो
रिस्क आहे - मग यजमानांनी तो पदार्थ आणखी वाढला तर?>>> एकदा खाल्ला न मग दुसऱ्यांदा प्रेमाने नकार देता येतो की. पण जर तो आधी नाही खाल्ला तर मग काही खरे नाही
हो - मुलीला पीनट अॅलर्जी आहे
हो - मुलीला पीनट अॅलर्जी आहे हे पानावर बसेपर्यंत गुपित ठेवणारे एक महाभाग आमच्याकडेही येऊन गेलेत!
जरा अवांतर आहे पण गैरसोय होऊ
जरा अवांतर आहे पण गैरसोय होऊ नये म्हणून
पाहुणे किती वाजता भोजन करू इच्छित आहेत तेही जमल्यास विचारून पहा. आमच्याकडे एकजण अंधेरी हून आली होती अकरा वाजता सकाळी. साडे बारा एक सुमारास पानं वाढायला घेतली तर तेव्हा सांगितले की दीक्षित डाएट आहे आणि त्यामुळे त्या घरी जशा दोन अडीच वाजता जेवतात तशा इथेही जेवणार.
पथ्य आवड वगैरे आधीच विचारले होते पण हा मुद्दा राहिला.
बाकी नावडता पदार्थ आधी
बाकी नावडता पदार्थ आधी संपवायची युक्ती मी अजून वापरते >>> मी पण.
Pages