Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यांच्या सूचना आवडल्या.
सगळ्यांच्या सूचना आवडल्या. योकू, नारळी भात मुरल्यावर जास्त छान लागतो याचा अनुभव घेतलाय. आदल्या दिवशी रात्री करून ठेवता येईल.
सीमंतिनी डायलॉग मस्तच!!!
साधना ला फार वेळ अटापिटा नको
साधना ला फार वेळ अटापिटा नको वाला मेनु हवा होता म्हणून सोप्यातला सोपा सुचवला, बटाटा भाजी अन्दाज चुकुन ( माझा नेहमीच चुकतो , कमी पडायला नको हे बहुधा जिन्स मधुन सगळ्या देशस्थी माउल्या पाठवत असाव्यात ) उरली तरी पराठे, सॅन्ड्विच, बटाटेवडे अस सगळ्यात वापरता येते.
योकु, अमाचा मेनु पण आवडला, स्पेशली सार आणि फ्लॉवर रस्सा दोघही आवडते पण दोन्ही माझे मनासारखे जमत नाही.
परवा कुणाल कपुर ने एक मखमली
परवा कुणाल कपुर ने एक मखमली पनीर का काय म्हणुन पांढरी गेव्ही असलेली भाजी करून दाखविली. छान होती एकदम. लिंक दिसली तर टाकते.
स्पेशली सार आणि फ्लॉवर रस्सा
स्पेशली सार आणि फ्लॉवर रस्सा दोघही आवडते पण दोन्ही माझे मनासारखे जमत नाही >> फ्लोवर चा रस्सा 'तसला' जमण्याकरता त्याच माउल्यांचा तेलाचा हात हवा. वता त्याल, तिखाट जरा आन आन मग पा भाज्यांचा रस्सा कसा झनाट बनते ते.
पर्फेक्ट योकु ! पण बहुधा ते
पर्फेक्ट योकु ! पण बहुधा ते इकडच्या फ्लॉवर, मेथीला अजिबात देशी चव नसते त्याने असेल .
प्राजक्ता , फ्लॉवरच्या भाजीला
प्राजक्ता , फ्लॉवरच्या भाजीला एव्हरेस्ट चा सब्जी मसाला वापरून बघ. गरम मसाला किंवा घरचा मसाला न वापरता. आणि थोड सढळ हाताने तेल योकुटल्याने म्हटलय तसं.
ओके सिमा करुन बघते चचच !!
ओके सिमा करुन बघते चचच !! खाते
Organic भाजीमुळे चव छान लागते
Organic भाजीमुळे चव छान लागते.
फ्लावर बटाटा मटार रस्सा ओले
फ्लावर बटाटा मटार रस्सा ओले खोबरे व हिरवे वाटण घालून. >>>>> अमा, हिरव्या वाटणात आले लसूण कोथिंबीर असते का?
अमा, हिरव्या वाटणात आले लसूण
अमा, हिरव्या वाटणात आले लसूण कोथिंबीर असते का>> आले लसूण ऑप्शनल. माझे वाटण : भरपूर ताजी कोथिंबीर, हिरव्या गार व तिखट असतात त्या मिरच्या चवीनुसार. भाजीवाल्याकडे अलग से मिळतात नाहीतर फिकट पोपटी बेकार कमी तिखट पण असतात त्या घेउ नयेत.
ताजे खवलेले ओले खोबरे मूठ भर. साखर मीठ जिरे. इतकेच. पुजेच्या स्वयंपाकात आले लसूण नाही.
माझ्या कडे नॉनव्हेज साठी आले लसूण पेस्ट असतेच मग हवीतर ती फोडणीत वेगळी घालता येइल.
फ्लावर बारक्या दांड्याचा बघून घ्यावा देशी. फुले पण लहान आकाराची असतात. व ह्यात अळ्या कमी असतात . नसतातच बहुधा.
तेलावर मस्त परतला जातो बघा. नेमका कापा वा. फार बारीक पण नाही मोठ्या फुलोर्या पण नाही असा.
टॉमाटो साराला तूप जिरे फो डणी व एक दालचिनी तुकडा एक दोन लवंगा मस्ट.
रस्सा गरम गरम खाताना वरून
रस्सा गरम गरम खाताना वरून कांदा बारीक चिरलेला व लिंबू रस पिळून ब्रेड बरोबर पण मस्त लागतो. जड जेव णे झाल्यावर रात्री खायला.
आमच्याकडे दरवर्षी गणपतीत भजन
आमच्याकडे दरवर्षी गणपतीत भजन असतं. तेव्हा त्या मंडळीना काहीतरी नाश्ता द्यावा लागतो. सर्वसाधारणपणे भेळपुरी, चायनीज भेळ असे पदार्थ असतात. मागच्या वर्षी रगडा चाट केला होता.
यंदा इडली चटणीचा बेत आहे. अजून काही वेगळे पदार्थ,, फार मोठा घाट घालावा लागणार नाही ,, असे सुचवाल का?
साधारण ३०--४० लोक.... वयोगट -- २० ते ३५ वर्षे..
फार मोठा घाट घालावा लागणार
फार मोठा घाट घालावा लागणार नाही ,>>>>>>>उप्पीट किंवा आप्पे+चटणी,बटाटवडा,मिसळ पाव(पण कांद्याशिवाय बनणार नाही.) इतकंच सद्या सुचतेय.
लहान मुलांच्या बर्थ डे पार्टी
लहान मुलांच्या बर्थ डे पार्टी साठी काही मेन्यू सुचवाल का ? शक्यतो ब्रेड नको. वयोगट ४-९.
२-३ पदार्थही चालतील..
मागच्या वर्षी ब्रेड पिझ्झा, चाट आणि आईसक्रीम होतं, त्यामुळे या वेळी परत ब्रेड नको असं वाटतंय...
करून ठेवण्यासारखे काही ?? आणि पोटभरू. (म्हणजे मोठ्यांसाठी ही होईल)
लहान मुलांच्या बर्थ डे पार्टी
लहान मुलांच्या बर्थ डे पार्टी >>> कटलेट,रगडापॅटिस्,शेवबटाटापुरी,पाणीपुरी यापैकी एक आणि फालुदा किंवा आईसक्रीम
केक, वेफर्स, रसना ऑरेंज,
केक, वेफर्स, रसना ऑरेंज, मटार करंजी कमी तिखट. सुकी भेळ, डॉलर जिलेबी. पांढरा ढोकळा. ह्या व्यतिरिक्त फ्रेश स्वच्छ धुतलेल्या फळांचे एक काउंटर ठेवा. आव्डते फळ मुले घेउन खातील.
कुकीज ओरिओ ब्राउनीज फज ह्या पैकी एक.
नॉन व्हेज चालत असेल तर नथिंग लाइक फ्राइड चिकन. मुलांना फार आव्डते. नगेट्स ची पाकिटे मिळतात वेंकीजची.
बटाट्याचे स्माइली हे पण मिळतात आयत्या वेळेस तळावे लागेल.
छान ideas...
छान ideas... Thank you..
मटार करंजी करून ठेवता येईल का? गार चांगली लागेल का? कटलेट पण चांगला ऑप्शन आहे..
फळांची idea great.. यावरून सुचलं की आवडती फळं आणि बाजूला vanilla ice cream .. आवडेल का मुलांना? पण कदाचित निवडक फळं ठेवावी लागतील जी आईस क्रीम सोबत चांगली लागतील ...
मोठ्यांसाठी पोट भरेल असं काही सुचवा ना please..
Non veg नाही खात आम्ही.. त्यामुळे वेज ऑप्शन्स च .. !!
मोठ्यांसाठी म्हणजे
मोठ्यांसाठी म्हणजे
छोले जिरा राइस.
पाव भाजी व दही बुत्ती
डोश्याची भाजी चटणी करून ठेवली तर
आयत्यावेळी एखादी नातेवाइक स्त्री दोश्याचे काउंटर संभाळू शकेल का.
आपले मराठी हवे असेल तर
मसाले भात. गरमा गरम, प्लस जिलेबी, टोमाटो सार
पाव व मटार उसळ,
मिसळ पाव आहेच. तुम्हाला पाव गरम करायला कोणीतरी बॅक अप लागेल.
आलू पराठे, पुलाव.
आलू पराठे, पुलाव.
दोन्ही सोबत रायता.
दोन्ही आधी करून ठेवता येईल
पुलाव मिक्रोवेव्ह मध्ये गरम करता येईल
ऐनवेळी.
कुणाला आवडला तर; इथे रेफ
कुणाला आवडला तर; इथे रेफ राहील. लास्ट रवीवारी हा मेन्यू होता डोजे मध्ये. अर्थात टू बी मदर करता घरचंच खायला होतं.
- टिपिकल उत्तरभारतीय प्रकारचे काळासर छोले - भटूरे (वेळेवर तळून; एकदम गरमागरम!)
- बारीक चिरून घातलेल्या क्रंची भाज्या, मटार आणी थोडं पनीर असलेला पुलाव
- आलू टिक्की चाट
- बूंदी रायता
- सलाड, पापड
- गोडात गरम ताजी साजुक तुपात तळलेली डॉलर जिलेबी आणि रबडी. (हा आयटेम सर्वोत्कृष्ट होता!)
संपूर्ण जेवण कांद्यालसणाशिवाय केलेलं होतं.
मोदक काडीत टोचून बार्बेक्यू
मोदक काडीत टोचून बार्बेक्यू होतील का?
डॉलर जिलेबी म्हणजे?
डॉलर जिलेबी म्हणजे?
भिशी पार्टी साठी मेनू काय
भिशी पार्टी साठी मेनू काय करावा.शक्यतो पाव / आंबवून केलेले
पदार्थ नको. ६० वर्षापुढील मंडळी आहेत. संध्याकाळी भिशी आहे.पोटभरीचे आणि आधी च करून ठेवता येईल अशी वन डिश काही सुचवा ना. जेवण नाही पण पोटभर नाश्ता टाईप काहीतरी.
ओजस,
ओजस,
सगळे साठी पुढचे असतील तर मी दलिया आणि मोड आलेले हिरवे मूग याची चमचमीत खिचडी, एक छानसं सलाड आणि छान घट्ट दही दिल असतं. अगदीच बोअरिंग प्लेट नको म्हणून एक पापड किंवा अळूवडी किंवा इलुपिलूसा बटाटा वडा. त्या वयोगटात बऱ्याच जणांना गोड चालत नाही त्यामुळे avocado + apple ची स्मूदी वर थोडेसे ड्रायफ्रूटस घालून. त्या वयात आहार कमी होतो, त्यामुळे मिल्कशेकचा ग्लास संपत नाही,म्हणून छोट्या ग्लासमध्ये स्मूदी. अगदीच गोडच हवं असेल तर स्मूदी मिक्सरमध्ये फिरवताना त्यात थोडं मध.
पावसाचे दिवस आहेत ना,
पावसाचे दिवस आहेत ना,
किती वाजता येणार? चहा तुमच्याकडेच घेणार का?( म्हणजेच किती वाजता येणार त्यानुसार सांगता येइल). बहुतेकांना ६० वयातले शत्रू असतात(मधूमेह, प्रेशर वगैरे तेव्हा ते अंदाज घ्या).
५ वाजता वगैरे येणारच असतील आणी पाउस असेल तर,
मुख्य पदार्थः
वेजीटेबल कटलेट आणि पुदीना चटणी/ गरम रवा वे़जीटेबल उपमा व चटणी / शेवया उपमा - ह्याची आधी तयारी करता येइल.
स्टार्ट्र्सः
कोथिंबीर वडी/ अळु वडी / मुगडाळीची कचोरी / मुगाचे पकोडे ( हे बहेरून मागवता येइल ). गरम पावसात जरा बरे वाटत्तात. वरील मेनू प्रमाणे मॅच करावे.
गोडः
मुगाचा शीरा / बेसन बर्फी / आंबा वडी / कजू कतली ( बाहेरून मागवू शकता).
गोडाचे पदार्थ आपणच खपून केले आणि खपलेच नाहित तर डोक्याला त्रास. तेव्हा ड्राय फॉर्म मधलेच बरे. शीरा वगैरे टिकवू शकतो. गोडाचे प्रमाण ठरवून सांगायचे जिथून कराल त्याला.
मी दुसर्या दिवशी वाटून टाकते बर्फी / वड्या वगैरे.
चहा / कॉफी , साखर मर्जीनुसार.
शक्यतो गरम पदार्थच बरे ह्या वयात. बटाट्याचे, दूधाचे कमीच पदार्थ खपतात ह्या वयातील लोकांना आजकाल. गोड सुद्धा बेताची खातात.
बघा काय जमते ते. सगळं क्राउड वर आहे.
मूग आणि हरबराडाळ एकत्र अशी
मूग आणि हरबराडाळ एकत्र अशी वाटली डाळ भरपूर लिंबू ओलं खोबरं कोथींबीर घालून, गुळाचा शिरा / खांडवी , आणि मसाला दूध किंवा जायफळ घातलेली काॅफी. जे. नां ना पारंपारीक पदार्थ आवडतात म्हणून तेच सुचवलेत. सगळं आधी करून ठेवता येईल.
व्हेज पुलाव दोन मूद.
व्हेज पुलाव दोन मूद.
बुंदी रायता किंवा काकडीची दह्यातील कोशिम्बीर.
गुलाब जामुन ( प्रत्येकी दोन)
कोथिंबीर वडी दोन बारके पीसेस प्रत्येकी.
ज्या दिवशी पार्टी आहे त्या दिवशी कोणाचे उपास आहेत का ते विचारोन घ्या म्हणजे सेपरेट थोडी खिच्डी करून ठेवता येइल साबुदाण्याची.
मेथी पराठे /ठेपल्या सारखे.
मेथी पराठे /ठेपल्या सारखे. लोणचे, चटणी. मुगाची उसळ- काहीतरी पातळ हवं म्हणून.
दही वडे किंवा एस्पी डी पी . व्हेज उपमा.
काजू कतली किंवा जिलबी.
सगळे आधी करुन ठेवता येईल.
साबुदाणा खिचडी, काकडीचे काप
साबुदाणा खिचडी, काकडीचे काप किंवा कोशिंबीर, वेफर्स, दही, आणि उ मोदक ... मस्त बेत होतो सगळे खुश
छे! साठीच्या वरचे लोक काय
छे! साठीच्या वरचे लोक काय खाणार साबु खिचडी आणि दही अणि वेफर्स !! हल्ली सगळे अवेअर असतात आणि हेल्थ काँशस!
पण नवरात्रात असेल भिशी तर उपासाचे विचारुन घ्या!
Pages