चला , वजन कमी करूया -- भाग २

Submitted by केदार जाधव on 16 April, 2019 - 01:55

आधीचा धागा एडीट करता येत नाही , म्हणून हा नवीन धागा Happy

थोडी पार्श्वभूमी ? (Background) हवी असल्यास खालील धागे पहा ही विनंती Happy

१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )
https://www.maayboli.com/node/48355

चला , वजन कमी करूया

https://www.maayboli.com/node/50148

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

आणि आजपासून गुण मोजायला सुरू करू. फक्त एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Happy

२६.०४.२०१९

केदार जाधव ८८/१००
अतरंगी १०९/१२०
राजकूमारी ६/१०

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५ ४" = १.६२ मीटर
१.६२x१.६२x२० = ५२.५ किलो <- BMI २० हवा असेल तर.

Ok

आजच वजन केले BMI २०च आला. पण तरीही मला अजून २ किलो कमी करावे असे वाटत आहे.

१, २ ,३ वगैरे मी करणार नाही.
५, ६ नेहमी करतेच.

४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
७. चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
धागा आल्यापासून ∆ या दोन गोष्टी करायचा मी प्रयत्न करतेय. खरंतर या सगळ्या पदार्थांच मला व्यसन आहे.

४ ऐवजी विकतचे राजगिरा लाडू खाल्ले तर चालेल का?
७ दोन खायचे मोठे चमचे (ते टीस्पूनच्या कपॅसिटीचेच असतात का?) बोर्नव्हिटा घालून एक मग दूध. यात किती डायरेक्ट साखर होईल?

१, २ ,३ वगैरे मी करणार नाही

>> अ‍ॅमी , वर भरत यानी म्हटल्याप्रमाणे १ नाही तर सगळ व्यर्थ आहे , अर्थात तुमच्या रोजच्या कामात शारीरीक कष्ट असतील तर गोष्ट वेगळी ,
पण रोज ३० मि व्यायाम हा माझ्या मते तिशी नंतर मस्ट आहे (तिशी कारण त्या आधी भटकंती , क्रिकेट , फुटबॉल काही तरी चालू असते) अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच Happy

४ ऐवजी विकतचे राजगिरा लाडू खाल्ले तर चालेल का? >> सवय होईपर्यंत चालेल Happy

७ दोन खायचे मोठे चमचे (ते टीस्पूनच्या कपॅसिटीचेच असतात का?) बोर्नव्हिटा घालून एक मग दूध. यात किती डायरेक्ट साखर होईल? >> बोर्न्व्हीटा , बूस्ट ची तुम्हाला आम्हाला काही गरज नाही हे माझ मत , त्यात ऑलरेडी बरच काही असत , त्यात अजून २ मोठे चमचे साखर म्हणजे थोड जास्तच होईल Happy

हो व्यायाम आवश्यक आहे माहित आहे. पण सध्या काही करायचा विचार नाही.

मैदा-साखर-पाम तेल यांना राजगिरा-गुळ-शेंगा ने रिप्लेस करणे <- हेदेखील तात्पुरतेच ठिकय? वजन आटोक्यात असताना, प्रिडायबेटीक नसताना साखर-गुळ खाल्ला तर काय प्रोब्लेम आहे?

अजून २ चमचे साखर कुठे लिहलं मी :D. दोन चमचे बोर्नव्हिटातून किती डायरेक्ट साखर खाल्ली जाते विचारलं. आता गुगल करून मिळालं उत्तर
Every two spoonful of Bournvita in a glass of milk provides you carbohydrate – 8g,
protein – 1g,
sugar – 6g

काल प्राहा ने थोडा धुव्वा उडवला Happy पण इतक चाललोय की बरचस जिरल असेल

केदार
१९/०४ १०/१०
२०/०४ ७/१०

संध्याकाळी ६.३० वाजता वाटीभर उपमा, पास्ता , मॅगी किंवा ओट्स , एक सफरचंद किंवा संत्री.
रात्री काही नाही. ->???? मला भुके मुळे झोप येत नाही..

केदार

२१/०४ ९/१०
२२/०४ १०/१०
२३/०४ ९/१०

>>>
Every two spoonful of Bournvita in a glass of milk provides you carbohydrate – 8g,
protein – 1g,
sugar – 6g
<<<

१ टीस्पून म्हणजे साधारणपणे ५ ग्रॅम आणि १ टेबलस्पून म्हणजे साधारणपणे १५ ग्रॅम समजतात इथे. याचा अर्थ तुम्ही १ टेबलस्पून बोर्नविटा घेताय आणि त्यात ८+६ = १४ ग्रॅम्स नुसती साखर आहे.

परवा Avengers Endgame बघताना , एकदाच तर आहे , म्हणून टब पॉपकॉर्न संध्याकाळी एकट्याने खाल्ले .

पॉपकॉर्न ने काय होतय हे लॉजिक होत .

काल वजन ९०० ग्रॅम नी वाढलेल . चीज अन मीठ Sad

Classic Example of difference between What we think can cause weight gain and what actually does Happy

सो , पॉपकॉर्न बिग नो Happy

> याचा अर्थ तुम्ही १ टेबलस्पून बोर्नविटा घेताय आणि त्यात ८+६ = १४ ग्रॅम्स नुसती साखर आहे. >
ओके. कार्ब म्हणजेपण 'केवळ साखर' पकडायचा का?

केदार
२४ ७/१०
२५ १०/१०
२६ ८/१०

. कार्ब म्हणजेपण 'केवळ साखर' पकडायचा का?>>
दिलेल्या उदाहरणात हो.
काही वेळा लेबल मध्ये एकूण कर्बोदके दर्शविले असतात, ठळक अक्षरात आणि त्याखाली त्यापैकी साखर किती आणि फायबर किती हे लिहिले असते. फायबर हे सुद्धा कार्ब्स आहेत पण न पचणारे. अशा वेळी एकूण कार्ब्स मधून फायबर वजा करावेत. तेव्हा लेबल वर फायबर हे वेगळे लिहिले आहेत की एकूण कर्बोदकांमध्ये समाविष्ट केले आहेत ते बघावे.

केदार
२७ ९/१०
२८ ९/१०
२९ ९/१०

चहावरचा ताबा परत सुटायला लागलाय Sad

Pages