चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
राजेश१८८, हेमामालिनींनी हात
राजेश१८८, हेमामालिनींनी हात उंचावून व्हीची खूण केलीय. म्हणजे त्या स्वतःच तो फोटो काढून प्रसिद्धीसाठी माध्यमांना पुरवत आहेत. वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर आलाय. पेपरात छापूनही येईल.
हा व्हिडियो खास रश्मी
हा व्हिडियो खास रश्मी यांच्यासाठी.
एक सुनील दत्त आणि nana
एक सुनील दत्त आणि nana पाटेकर सोडले तर सामान्य लोकांचे प्रश्न चित्रपट srushti मधून राजकारणी झालेल्या लोकाना महित तरी असतील का
राजेश भौ, तमिळनाडूचा राजकीय
राजेश भौ, तमिळनाडूचा राजकीय इतिहास पहाल का थोडा? काय ते इवल्या इवल्या हळकुंडावर पिवलं पिवलं होत असता नेहमी.
मग 500 आमदार अन 500 खासदार
मग 500 आमदार अन 500 खासदार म्हणून सामान्य माणसेच आणायची का ?
भारतात लोकशाही आहे. पंतप्रधान
भारतात लोकशाही आहे. पंतप्रधान कोण करायचा हे बहुमताने निवडुन आलेल्या पक्षाच्या खासदारांनी ठरवयचे असते. नागरीकशास्त्रात असेच लिहिले आहे.- हो का , मग ७५ साली नागरिकशास्त्रातला धडा वगळला होता वाटत ..
पक्षाचा अध्यक्ष, लोकसभा नेता ठरवण्याचा हक्क त्या-त्या पक्षातील सदस्यांना आहे कुणा एकाच्या घराला/व्यक्तीला नाही:- तुम्ही भाजप चा पुढचा १० वर्षांनंतरचा अध्यक्ष सांगा आम्ही काँग्रेस चा पुढच्या २५ वर्षांनंतरचा सांगतो , बघू किती लोकशाही आहे तुमच्या पार्टी त ..
मला आवडतो म्हणुन अडवाणीला भाजप पुढे येऊ देत नाही असे म्हणण्यासारखेच आहे हे.- लैच पुळका आली आडवाणीचा वाटत ह्यांना , भाजप बघून घेईल तुम्ही आधी तुमच्या मुखर्जी ना येउद्या कि पुढं ..अजून वय नाही झाला त्यांचं ..
अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, सुब्रमणियम स्वामी, सुषमा स्वराज, नितिन गडकरी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा ई.ई. कितीतरी अभ्यासु गुणवान नेत्यांना संधी देण्याऐवजी मोदीला काहीच येत नाही ही वस्तुस्थिती नव्हे काय--ह्यांनी किती लोकांना संधी दिलीय हे देशाने बघितलंच आहे , हे म्हणजे आपला पहा वालयांमधले आहेत..
शाखेतुन आलेली नावे वाचुन मिळती-जुळती आहे की नाही ठरवण्यापेक्षा न्यायालयात जाऊन न्यायदेवतेच्या शब्दांवर विश्वास ठेवणेच श्रेयस्कर नव्हे काय- लैच विश्वास आहे ह्यांचा ह्यानचा गुणवंतवार पण लै धावाधाव होणार आहे ह्यांची, अगस्टा, हेराल्ड , वद्रा , एअर सेल मॅक्स , दीपक तलवार, लै मोठी लिस्ट हाय ह्यांची सगळं येतंय बघा बाहेर..
या लोकसभा ईलेक्षन मधे मोदीला शिक्षा द्यायला सांगताय का- बैलगाडी वर हे फिरतायत आणि मोदी ना शिक्षा, लै शिव्या येत असतील ह्यांचा मनात सगळी दुकानदारी बंद केलीय ह्यांची..
बापरे.. पुन्हा एकदा भाजपाची यादी पडताळुन बघाल का-अरे रे , ह्यांचा एक उमेदवाराला तर कोर्ट ने घरी बसायला सांगितलं ..बिचारा आधीच बेरोजगार होता..
टरबुज्याने या सर्व भ्रष्टाचारींना का नाही आत टाकले बुवा- आत गेले कि ह्यांना कळा सुटतात म्हणून..
वाराणशीत काय विकास झाला बाबा..? काही नाही निदान गटारगंगा स्वच्छ झाली का- तुम्ही तुमचा गटार चालू ठेवा आणि विचारा कि का नाही स्वच्छ नाही झाली ते ..हो त्याच च पाणी पिल ना मग तुमच्या उगवत्या बाईंनी ..
देशद्रोहाचा कायदा व AFSPA चा
देशद्रोहाचा कायदा व AFSPA चा पुनर्विचार करू असे धाडसी विधान जाहीरनाम्यात घातल्याबद्दल काँग्रेसचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. या दोन्ही विषयी खरे तर स्वतंत्र धागा काढूनच चर्चा व्हायला हवी. या दोन्ही विधाना मुळे भाजप वाले काँग्रेस वर तुटून पडले, नो सरप्राइजेस देअर. सुप्रीम कोर्टाने देशद्रोहाचा कायदा कधी वापरता येइल याचा निर्णय दिलेला असतानाही अशा केसेस घातल्या जातात हे खेदजनक आहे. आधीच बॅकलॉग ने त्रस्त असलेल्या न्यायालयावर हे आणखी एक ओझे ! जे एन यू मध्ये "भारत तेरे टुकडे होंगे !" अशा घोषणा दिल्या असल्या तरीही ( आणी अशा घोषणा मॉर्फ करून टाकलेल्या आहे हे स्पष्ट असतानाही तेच तेच उगाळत आहेत कसाब च्या बिर्यणी प्रमाणे हेही आता खरेच आहे असे लोकांना वाटू लागले आहे) तो देशद्रोह होत नाही. हा अत्यंत नाजूक विषय आहे आणी केवळ लोकानुनय न करता जे योग्य आहे तीच भूमीका कोंग्रेसने घेतली आहे. यामूळे काँग्रेसला तोटाच होईल कदाचित.
ह्यांची, अगस्टा, हेराल्ड ,
ह्यांची, अगस्टा, हेराल्ड , वद्रा , एअर सेल मॅक्स , दीपक तलवार, लै मोठी लिस्ट हाय ह्यांची सगळं येतंय बघा बाहेर..
मसूद सुटला
2 जी सुटले
सलमान सुटला
तेलगी प्रकरण सगळे सुटले
भुजबळ सुटले
राणे तर भाजपाचे अधिकृत प्रचारक आहेत
जे आत आहेत , तेच ह्यांच्या काळात बाहेर आले.
कुणी कधी पाणी पिले म्हणे ?
कुणी कधी पाणी पिले म्हणे ?
<<"गुलामाला त्याच्या
<<"गुलामाला त्याच्या गुलामगिरीत ची जाणीव झाली कि त्या क्षणापासून त्याचा मुक्तीसाठी लढा सुरु होतो"असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
इथल्या काँग्रेसी गुलामांची तशी इच्छाच दिसत नाहीये.... प्रयत्न तर खूप दूरची गोष्ट झाली. >>
------- याचा अर्थ ते काँग्रेसचे गुलाम नाही आहेत.
<< Stockholm syndrome उत्कृष्ट उदाहरन म्हणजे इथले काँग्रेस समर्थक/मोदी द्वेषी आयडी !! >>
--------- मला नाही वाटात यात मोदी द्वेष आहे.
मोदी यांनी काम केले असते, देशाच्या सामान्य जनतेचा विचार केला असता तर जनतेने स्वत:च डोक्यावर घेतले असते.
त्यांना, अमितजींना किंवा खासदार हेमा मालिनी यांना प्रचारासाठी वण वण फिरावे लागले नसते....
पण मिळालेली संधी वाया घालवली.... हित बघितले पण रिलायन्सचे, अंबानी, अडाणी....
गोरक्षा, गोमांस यांना ज्वलंत प्रश्न मानले.
लाखो कोटीचा बाहेर गेलेला काळा पैसा परत आणणे राहिले दुरच... पण आर्थिक गुन्हेगांना देशाबाहेर पळवण्यास पोषक परिस्थिती निर्माण केली.
आज बेरोजगारी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मागच्या ४० वर्षात एव्हढी वाईट परिस्थिती नव्हती. BSNL चा गळा घोटून रिलाय्न रिलायन्स ग जिओ ला प्रमोशन. राफेलसाठी रिलायन्सच्या नावाचा पाठपुरावा ( फ्रान्सचे माजी अध्यक्ष खोटे बोलतात... अशी बतावणी )
खोट्या, बनावट आकडेवारीचा डोंगर पोखरला तरी हरवलेला विकास सापडत नाही...
मोदी-द्वेष अजिबातच नाही...
तेल गेले (पाच राज्यातली सत्ता), तूप गेले (केंद्रातली सत्ता) आणि हाती धुपाटणे (विरोधी पक्ष) राहिले असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
<< Rajesh188 सारख्या तटस्थ आयडीला सुदद्धा या गुलामांनी निरर्थक युक्तिवादाने धडका देऊन देऊन मोदींच्या समर्थनार्थ बोलायला भाग पाडले. >>
-------- असे राजेश यांनी म्हटले आहे का ?
<< हि असली निर्बुध्द आणि समाजमाध्यमांवरील टोळ अशी गुलाम मंडळी स्वतःला काँग्रेस साठी मौल्यवान समजतात खरे तर हि पिलावळच भाजप आणि मोदींची खरी ताकद आहे. >>
-------- येथे टिका करणारे मोदी यांची खरी ताकद असेल तर चांगलेच आहे ना... विरोधी पक्ष आक्रमक असणे लोकशाही साठी पोषक असते. विरोधी पक्षाची भुमिका निभावण्यात भाजपा अनुभव संपन्न आहे.
<< जास्त उपद्रव माजवायला लागली कि जनता एकदाच निवडणुकीच्या माध्यमातून या पिलावळीच्या पेस्ट कंट्रोल चे काम निर्दयीपणे करते ! >>
------- सहमत. ते पाच राज्यात दिसलेच आहे...
हाताच्या कंकणाला आरशाची अवशक्ता नाही.
मिशेल च्या खुलाशानुसार
मिशेल च्या खुलाशानुसार
AP = आनंदी पटेल
FAM = फड़नवीस, अमित शाह, मोहन भागवत..
मिशेल च्या खुलाशानुसार
मिशेल च्या खुलाशानुसार
AP = आनंदी पटेल
FAM = फड़नवीस, अमित शाह, मोहन भागवत..
>
mala te FADANVIS AND MODI
mala te FADANVIS AND MODI Vatala
ब्लॅककॅट- छटकार
ब्लॅककॅट- छटकार
ऑक्टोबर २०१४ मधे, काळ्या पैसे धारकांची साधी यादी सर्वोच्च न्यायालयाला देण्यास नकार देणारे सरकार आज अचानक का जागे झाले? साडेचार वर्षे झोपा काढल्यावर अगदी निवणूकीच्या काही आठवडे आधी असे काही होत असेल तर हेतू बद्दल शंका येतात. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा सर्व काळात लढतो.
(No subject)
Abp majha Twitter:-
Abp majha Twitter:-
चौकीदार मोदींनी दत्तक घेतलेल्या हरिसाल या डिजिटल गावाची पोलखोल:-
https://t.co/9BasREGSV3
मल्ल्या,नीरव मोद्या पळुन गेले
मल्ल्या,नीरव मोद्या पळुन गेले तेव्ह्या कोण चौकीदार होता बरे..?
मल्ल्या,नीरव मोद्या पळुन गेले
मल्ल्या,नीरव मोद्या पळुन गेले- त्यांना पकडले पण, तुम्ही पळवून लावलेले अँडरसन, दाऊद, मिशेल चाचा ह्यांचा काय , तेंव्हा कोण होता मग चौकीवर..
अले बापले... हो क्का..? मग ही
अले बापले... हो क्का..? मग ही पकडापकडी निवडणुक जिंकण्यासाठीचा जुमला तर नव्हे..??
तुम्हाला जमलं नाही ते सांगा
तुम्हाला जमलं नाही ते सांगा ना , स्वतःची नामुष्की हि जास्त असली कि बाकीच्यांनी काहीही केल तरी निवडूणुकीच्या चष्म्यातून पाहणार हे सरळ आहे, आणि काँग्रेस कडून कसली उमीद ..
नवी दिल्ली :
नवी दिल्ली :
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 'संकल्प पत्र' या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो झळकताना दिसत आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावरून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचे फोटो यावेळी गायब झाले आहेत.
भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यावर मोदींसह ११ नेत्यांचे फोटो होते. त्यात वाजपेयी, अडवाणी, जोशी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह तेव्हाचे भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे शिंदे, रमण सिंह यांचा समावेश होता. यावेळी मात्र जाहिरनाम्याच्या मुखपृष्ठावर केवळ मोदींचा फोटो असून बाकी १० नेत्यांना मुखपृष्ठावर स्थान देण्यात आलेलं नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी या भाजपच्या तीन प्रमुख दिवंगत नेत्यांना जाहीरनाम्याच्या मलपृष्ठावर स्थान देण्यात आलं आहे.
मध्यप्रदेशात सरकार येऊन दोन
मध्यप्रदेशात सरकार येऊन दोन महिने उलटत नाहीत तोच कल्लूनाथच्या नोकराकडे 281 करोड रु. आले मग स्वत कल्लूनाथकडे किती रू. असतील. भ्रष्टाचार करण्यात ह्या कॉंग्रेसीनी तर पाकिस्तानला हि मागे टाकले.
श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल
श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी या भाजपच्या तीन प्रमुख दिवंगत नेत्यांना जाहीरनाम्याच्या मलपृष्ठावर स्थान देण्यात आलं आहे.- ह्यालाच संस्कृती म्हणतात , बाकी लैच पुळका आलाय ह्यांना भाजपच्या जेष्ठांचा , मनमोहन ला लाव कि निवडूंक लढवायला मग , प्रणव मुखर्जी चा फोटो कुठाय, लालबहादूर शास्त्री , नरसिहराव, कुठाय ह्यांचे फोटो ..आधी आपली संस्कृती बघा , किती आपण मान दिलाय गांधी सोडून, ह्यांनी तर स्वतः: लाच भारत रत्न जाहीर केला होता ..
मध्यप्रदेशात सरकार येऊन दोन
मध्यप्रदेशात सरकार येऊन दोन महिने उलटत नाहीत तोच कल्लूनाथच्या नोकराकडे 281 करोड रु. आले मग स्वत कल्लूनाथकडे किती रू. असतील. भ्रष्टाचार करण्यात ह्या कॉंग्रेसीनी तर पाकिस्तानला हि मागे टाकले.- किती जणांची कर्ज माफी झाली मध्य प्रदेश मध्ये, किती बेरोजगारांना अनुदान मिळाले , आप बस १० गिनीये ..ये चिफ मिनिस्टर नाही किया तो १० दिन में दुसरा आयेगा .. कुठय मग दुसरा ....
सुरक्षारक्षक, पाणी आणून
सुरक्षारक्षक, पाणी आणून देणारा सेवक यांच्याशी मोदी किती आपुलकीने, प्रेमाने वागतात, त्याचे अनेक व्हिडियो समोर आले आहेत.
https://www.facebook.com/1693077410957182/posts/2266354620296122/
नवीन Submitted by भरत. on 9
नवीन Submitted by भरत. on 9 April, 2019 - 13:37
<<
काय दिवस आलेत यांच्यावर,
पंतप्रधान श्री मोदींवर करण्यासारखे कोणतेही राजकिय आरोप नसल्याने आता फेक फेसबुक व व्हॉट्सअप फॉरवर्डचा आधार घ्यावा लागतोय.
हे काँग्रेसी गुलाम कुठल्या
हे काँग्रेसी गुलाम कुठल्या थरावर जातील काही सांगता येत नाही.
कुठे गुपित मोदीविरुद्ध भडकवण्याचे क्लासेस तर सुरु नाहीयेत ना.
नमोरुग्ण फारच हायपर झालेले
नमोरुग्ण फारच हायपर झालेले दिसत आहेत. फेकुच्या विरोधात एक शब्द बोललेलाही चालेना..
संसदेच्या पायऱ्यांवर जेव्हा
संसदेच्या पायऱ्यांवर जेव्हा डोके टेकले तेंव्हाच हा माणूस चमकोगीरीचा बादशाह आहे ह्याची जाणीव झाली, सफाई कामगारांचे पाय धुवून त्याने निराश केले नाही. आता २४ एप्रिलला पुन्हा शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे श्रेय घेऊन चमकोगीरीची संधी सोडणार नाही.
मार्मिक गोंडसे.
मार्मिक गोंडसे.
निवडणुका लढवण्यासाठी आणि लोकांच्या नजरेत ग्रेट होण्यासाठी एवढ तर करावच लागेल ना.
गटार साफ करायच आहे मग गटारीत तर उतरावच लागेल.
नाही का.
Pages