चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<< त्या पेक्षा तुमच्या नजरेने थापा मारत असलेला नेता कणखर आहे हवी तशी सत्ता चालवून स्थिर सरकार देवू शकतो.
मग कशाला मत वाया जावून द्यायचे अस्थिर सरकार साठी >>

------- स्थिर आणि अस्थिर असा मुद्दा पण नाही आहे. २०१४ नंतरचा कारभार बघितल्यावर देवगौडा यांचे अस्थिर सरकार चमकदार, कार्यक्षम वाटायला लागते. दिलेले कुठले आश्वासन पुर्ण केले नाही उदा - काळापैसा परत आणणे, रोजगारी.

कणखरपणा डोकलाम मधे दिसला.... उरी, पठाणकोट, पुलवामा येथे दिसला... ते हजारो कोटीचा काळा व्यावहार करणारे देशातुन पळाले तेव्हा दिसला... 'हल्ल्यात ' ३०० अतिरेकी मारले.... खोट्या बातम्या सांगुन आम्ही कणखर आहोत हे सिद्ध होत नाही.

१३० कोटी जनतेला काय हवे आहे याचे संशोधन करा आणि ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जनतेला गोरक्षा, नोटबंदी असे अघोरी उपाय नको आहे, ते ज्वलंत प्रश्न नाही आहेत. आणि जनतेला दर दिवशी रडणारे स्थिर सरकारही आवडत नाही. आहे त्या परिस्थितीत काय चांगले करु शकता हे बघा.

DJ
तुमच्या पोस्ट मला खुप आवडतात पंखा झालो की काय मी तुमचा
कारण मुद्दे खुप चांगल्या पद्दतीने मांडता येतात तुम्हाला.

पण मी वोट तर बीजेपीलाच देणार.

देशात लोकशाही आहे.. कुणाला हवे त्याला मत देण्याचा अधिकार आहे. फक्त आपल्या अमुल्य मतामुळे एक खोटारडा, माजोरडा, अहंकारी, कपटी चौकीदार देशाच्या मानगुटीवर बसणार नाही याबाबत काळजी घेतलेली बरी. Proud

मला प्राँब्लेम काँग्रेसची नाहीये
मला प्राँब्लेम आहे त्या राहुल गांधीशी नविन व्यक्तीला ते सत्तेत येउच देत नाहीत
बापाची जागीर असल्यासारखा बसकन मारुन बसलाय.

मोदीला पर्याय राहुल गांधी कधिच असु शकत नाही.
काँग्रेस मध्येही तल्लख बुद्धीचे प्रतिनीधी असतील त्यांना येऊद्या ना सत्तेवर.

लोकशाहीत कुणी कुणाच्या बापाच्या जागीरीवर बसकण मारुन येत नाही. लायकी असेल तर लोक निवडुन देतात.
ज्या पक्षाचे खासदार २/३ संख्येने निवडुन येतात ते आपला प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी निवडतात.
भारतीय लोकशाहीत तुम्ही किंवा मी डायरेक्ट पंतप्रधान निवडुन देऊ शकत नाही.

काँग्रेस मध्येही तल्लख बुद्धीचे प्रतिनीधी असतील त्यांना येऊद्या ना सत्तेवर.>> ते तर नेहमीच आले आहेत. Proud

मला हसायला येतं जेव्हा इतके नॉन-गांधी सत्तेवर येऊन गेले तरी नविन कोणाला सत्तेवर येउ देत नाही म्हणतात लोक.
एवढीच अडचण असेल राहुल गांधीची तर पक्ष सोडून नवा पक्ष काढतील की काँग्रेसी. आजवर तेच तर झालंय. जनसंघ ज्यातून भाजप जन्मला तोही तर काँग्रेसमधून फुटलेल्या लोकांचाच आहे. काँग्रेसला दत्तक दिलेला नाही देश. कोणीही निवडणूक लढवून बहुमत घेऊन पंतप्रधान होऊ शकतो अशी तजवीज धुरिणांनी करुन ठेवली आहे. त्या तरतुदीच्या आधारेच तर मोदी छत्रचामरे ढाळवून घेत आहेत. कैच्या कैच.

मीच आले आहेत. Proud

Submitted by DJ. on 5 April, 2019 - 08:51
मला हसायला येतं जेव्हा इतके नॉन-गांधी सत्तेवर येऊन गेले तरी नविन कोणाला सत्तेवर येउ देत नाही म्हणतात लोक
तुम्ही वेड घेवून पेडगावला जात आहात कॉंग्रेस निवडून आली तर गांधी घरातील व्यक्ती पंतप्रधान न होता कॉंग्रेस मधील च दूसरा व्यक्ती प्रधान मंत्री म्हणून निवडण्याच धाडस आहे का कॉंग्रेस मध्ये .

@ रश्मी

"गुलामाला त्याच्या गुलामगिरीत ची जाणीव झाली कि त्या क्षणापासून त्याचा मुक्तीसाठी लढा सुरु होतो"असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
इथल्या काँग्रेसी गुलामांची तशी इच्छाच दिसत नाहीये.... प्रयत्न तर खूप दूरची गोष्ट झाली.

Stockholm syndrome उत्कृष्ट उदाहरन म्हणजे इथले काँग्रेस समर्थक/मोदी द्वेषी आयडी !!
Rajesh188 सारख्या तटस्थ आयडीला सुदद्धा या गुलामांनी निरर्थक युक्तिवादाने धडका देऊन देऊन मोदींच्या समर्थनार्थ बोलायला भाग पाडले.

हि असली निर्बुध्द आणि समाजमाध्यमांवरील टोळ अशी गुलाम मंडळी स्वतःला काँग्रेस साठी मौल्यवान समजतात खरे तर हि पिलावळच भाजप आणि मोदींची खरी ताकद आहे.

जास्त उपद्रव माजवायला लागली कि जनता एकदाच निवडणुकीच्या माध्यमातून या पिलावळीच्या पेस्ट कंट्रोल चे काम निर्दयीपणे करते !

डॉ. जितेंद्र अव्हाड ... तो इशरतचा भाऊ का ?
Submitted by उनाडटप्पू on 4 April, 2019 - 15:13>>> हो हो... तोच तो जितुद्दीन!

राहुल गांधी म्हणतो तुम्ही मला वोट द्या मी तुम्हाला 72 हजार रुपये देतो.
ही लोक जनसामान्यांना असली अमिष दाखवुन प्रतिनीधी होऊ पाहतात.

. लायकी असेल तर लोक निवडुन देतात.

हा विषय खूपच वेगळा आहे .निवडणूक जिंकायला काय लायकी लागते त्याची यादी
लोकशाही ला अपेक्षित आहे त्याच्या पेक्षा खूपच वेगळी आहे

लखु तू मूळव्याधीची पेस्ट आणून ठेव. बूड सलामत तो पेस्ट पचास.

गेल्या पाच महिन्यात पाच राज्ये उलथली ना रे ?

2014 मधिल निवडणुकामध्ये देखिल असल्याच प्रकारच पेस्ट कंट्रोल झाल निर्दयीपणे. त्याच्याने तुमच मत परिवर्तन झालं का.

हा विषय खूपच वेगळा आहे .निवडणूक जिंकायला काय लायकी लागते त्याची यादी
लोकशाही ला अपेक्षित आहे त्याच्या पेक्षा खूपच वेगळी आहे

~ काय बोलता? म्हणजे मोदी आणि भाजप लोकशाहीला अपेक्षित लायकी नसतांना निवडून आलेत? मग ते कोण बोंबलत असते सारखे की सनदशीर मार्गाने लोकपाठिंब्याने निवडून आलेले सरकार इत्यादी?

राहुल कडे तल्लख बुद्धी नाही >>> बरोबर त्याच्या कडे बुद्धीच नाही तेव्हा तल्लख वगरेचा प्रश्नच नाही ...
विरोध काँग्रेसला नसून त्यांच्या गांधी चाटूगिरीला आहे ... किती ती गुलामीची मानसिकता ?

2014 मधिल निवडणुकामध्ये देखिल असल्याच प्रकारच पेस्ट कंट्रोल झाल निर्दयीपणे. त्याच्याने तुमच मत परिवर्तन झालं का.

नाही हो !!
त्यांचे हे दुखणे क्रॉनिकल आहे. अशा संकेतस्थळाच्या ठिकाणी तर ते अत्यंत तीव्रतेने उफाळून येते. उपचार घेण्याचा आत्मीयता पूर्ण सल्ला देऊन थकलेत सगळे.
फरक नाही पण !

आपल्या देशात गुनेहगारी पार्श्व भूमी असलेली लोक सुधा निवडून आलेली आहेत .
जनतेनी नेमकी काय अपेक्षा ठेवून त्यांना निवडून दिले असेल हा प्रश्न तुम्हाला पडत
नाही का

{{{ पचास करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, बलात्काराच्या धमक्या, बाजारबसवी यासारखे शब्द वापरणार्‍यांची मांदियाळी म्हणजे भाजप. संघाचे स्त्रियांबद्दलचे विचार उघडच आहेत.
तर अशा पक्षाला हे स्त्रीवादी स्त्रीआयडी पाठिंबा का देतात?}}}

मग काय तंदूर संस्कृतीच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा का?

https://khabar.ndtv.com/news/india/release-1995-tandoor-killer-sushil-sh...

शिवाय ते काँग्रेस की विधवा चा पूर्ण इतिहास लिहावा. अर्धवट कशाला लिहिता? सोनियाजींनी स्वतःच आधी स्वतः चे राजकारणातले योगदान (?) सांगताना आपल्या सासुबाई व पती यांनी देशाकरिता बलिदा न दिले आप्ण विधवा झालो असा गळा काढला होता. तोच संदर्भ घेत भाजप नेत्यांनी काँग्रेस विधवेच्या नावाने मत मागत आहेत असा उल्लेख केला होता. मग भरतलॉजिक नुसार तरीही भाजपवालेच दोषी का?

मोदी एका भाषणात बोलले होते, वो काँग्रेस की कौनसी विधवा है , जो देश की विध्वंओ का पेन्शन खा रही है?

आमच्याकडे एच आय व्ही पेशनटणा आम्ही संजय गांधी निराधार योजना व विधवा पेन्शन योजनेतून मदत मिळवून देतो, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यालाच जमा होतात, कुणी काही खात नाही.

केवढी ही तयारी .
असे फोटो तुमच्या कडे save केलेले आहेत की कोण्ही पुरवत.

RAGA च्या जाहीरनाम्या मध्ये ७२०००/- चा संदर्भ आहे हा ७२०००/- संदर्भात एक शब्द लक्षात घेण्यासारखा आहें
quote " an annual cash transfer of 72000 for the poorest 20% household sent to the account of the woman in the family WHENEVER Possible .

Ref Times of india dt 3/4/19 .

WHENEVER चा अर्थ काय ?

whenever = कधीच नाही, बसा बोंबलत, चालते व्हा, तोंडाला पाने पुसणे, शेंड्या लावणे, खिसा कापणे, इ इ - का ?

जाहिरनाम्यातले नेमके शब्द आहेत - As far as possible, the money will be transferred to the account of a woman of the family who has a bank account, or who will be urged to open a bank account;

यातलं As far as possible हे पैसे देण्याबद्दल नसून सरळ बँकेत जमा करण्याबद्दल आहे, हे भक्तांना कळेलच असं नाही.
या सरकारचं इंग्रजी चं ज्ञान STREANH आणि सर्वोच्च न्यायालयात ल्या प्रतिज्ञापत्रात दिसलंच आहे.

Pages