Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाज्या घालून थालीपीठं (आधी
भाज्या घालून थालीपीठं (आधी करून ठेवायची आणि वेळेवर जरा गरम करून द्यायची), दही भात (हा आदल्या संध्याकाळीच करून फ्रीजात गार ठेवलेला) सुरळी वडी आणि आम्रखंड आपल्या त्या ह्या बंधूंचे. हा मेनू विसंगत नाही ना दिसेल?
नवीन मंडळी आहेत म्हणून, नेहेमीचे पाहुणे असले तर चालवलाच असता.
दहि भात आणी आम्रखन्ड दोन्ही
दहि भात आणी आम्रखन्ड दोन्ही दह्याचे पदार्थ झाले , सुरळी वडी पन आन्बटच असते जरा तेव्हा भाताचा दुसरा काहि प्रकार बघ
येस दही भात / आम्रखंड नो नो.
येस दही भात / आम्रखंड नो नो. पोटाच्या दृष्टीने पण बिघडायला फुल चान्स
झंपी, ते केळ दूध घालून आप्पे
झंपी, ते केळ दूध घालून आप्पे कसे करतात ते डिटेलमध्ये सांग. मला आप्पे चांगले जमतात आणि आवडतात. गोड केळ्याचे तर अति आवडतील.
नेहमी मी रव्याचे इन्स्टंट आप्पे बनवते.
मुगाच्या डाळीचे दोसे (
मुगाच्या डाळीचे दोसे ( पसरट्टू) ओल्या नारळ/टमाट्याची चटणी , शिरा व भाताचा एखादा प्रकार (दहीभात, कैरी भात, पलाव)
काल मी ज्वारीच्या लाह्या व साळीच्या लाह्या पाण्यातून काढून ताक घालून वाटलं (मिक्सरला) त्यात हिमी, कांदा, कोथिंबीर टाकून उत्तपे केले छान झाले होते व पौष्टीकही. बादवे वयोगट काय आहे.
दहीभाताऐवजी मसाले भात किण्वा
दहीभाताऐवजी मसाले भात किंवा दहीभात असेल तर आम्रखंडाऐवजी शेवयांची खीर/ जिलबी/गु.जा.
.पंचामृतात कालावलेल्या
.पंचामृतात कालावलेल्या कणकेच्या पोळ्या मस्त लागतात. > देवकी, पंचामृत सोडून पाणी वगैरे काही घालाय्च नाही का त्यात? आणि साधारण प्रमाण काय घ्यायचं? जरा सविस्तर सांगणार का.
जरा सविस्तर सांगणार का.>>>>
जरा सविस्तर सांगणार का.>>>> पाणी नाही घालायचे .मी ३-४ पोळ्या करून पाहिल्या होत्या.त्यामुळे अंदाजेच केलं.दही नव्हतं टाकलं बहुतेक.नाश्त्यासाठी केल्या होत्या.दूध,तूप ,साखर,मध.त्यातहीमध फार कमी घेतला.
ब्रंचला - आलू पराठे, उपमा व
ब्रंचला - आलू पराठे- दही, उपमा अथवा ढोकळा व गुलाबजाम.
जेवायला- व्हेज बिर्याणि ( किंवा मसाले भात!) , आलू पराठे, दही वडे, काकडी टोमॅटो सॅलड, गुलाबजाम.
ओके देवकी . आता एखाद्या
ओके देवकी . आता एखाद्या वाटीभरून पंचामृताचे पराठे करून पाहीन .
पंचामृतात कालावलेल्या
...
मीरा,
मीरा,
दूध नाही काय, दही घालून.
राजेळी नाहितर केरळा पिकलेलं केळं दह्यात कुस्करून त्यातच गुळ कालवायचा. मग त्यातच घरी वाटलेला तांदूळाचा रवा( गव्हाचा नाही) घालते आई. आपल्या आवडीप्रमाणे काजू, वेलची आणि मीठ घालावे. आई घालते.
पाच सहा तास मुरवून अप्पे करा.
तांदळाचा रवा भाजयाचा की कच्चा
तांदळाचा रवा भाजयाचा की कच्चा?
झंपी, धन्यवाद.
झंपी, धन्यवाद.
सोपी वाटते रेसिपी. केळी आहेत, सध्या उन्हाळ्यामुळे मस्त पिकताहेत. उद्या छान मऊ पिकलेली असतील. पण तांदूळ रवा नाही. तांदूळ पीठ आहे, पण त्याने पदार्थांचे टेक्स्चर बरोबर होणार नाही. उद्या तांदूळ धुवून वाळवावे लातील, मग रवा आणि मग आप्पे. इंतजार लंबा है।
तांदळाचा रवा भाजयाचा की कच्चा
तांदळाचा रवा भाजयाचा की कच्चा? >>>> देवकी, बघ मला हे विचारायचं सुचलं सुद्धा नाही.
>>>>तांदळाचा रवा भाजयाचा की
>>>>तांदळाचा रवा भाजयाचा की कच्चा? ><<<
माझी आई , कुठल्याही पद्दर्थात तांदूळाचा रवा देशी गाईच्या तूपात जरासा परतूनच घालते. त्याने पदार्थ चिकट होत नाही आणि अप्पे खुशखुशीत चविष्ट होतात. तांदूळाचा गुळाचा सांजा करतो त्यावेळी सुद्धा.
धन्यवाद झंपी
धन्यवाद झंपी
योकु, काय केलं मग फायनली?
योकु, काय केलं मग फायनली?
ओह, इथे लिहायचं राहीलं.
ओह, इथे लिहायचं राहीलं.
मावशी आल्या होत्या त्यांच्या कडून कसूरी मेथी चे पराठे आणि फुलके करवून घेतले. ब्रंच करता पराठे, ओल्या नारळाची चटणी, आम्रखंड आणि बासुंदी, फ्लॉवर घालून मसालेभात.
जेवणात फुलके, सेम गोड, बटाटा सुकी भाजी आणि मसालेभात. हो, अॅडिशनली कैरीची डाळ काकडीची कोशिंबीर.
वा वा भारी मेनु!
वा वा भारी मेनु!
मस्त!
मस्त!
Hello friends...can you
Hello friends...can you please help me to decide menu for 2 birthday parties (same group of people) total count 22(,only veg option)
One party of husband birthday (22april)
One for my 4 year old boy(4may)
M very confused about it I want suggestions on starter and main menu ....
Thanks in advance
२२ तारखेला मेन्यू
२२ तारखेला मेन्यू
पन्हं स्टार्टर, सोबत पनीर टिक्का किंवा चिंटू बटाटावडा
जेवणात पोळी, ग्रेव्ही ची भाजी (भरली वांगी/पाटवडी/ भरले ढेणसं)
परतून केलेली कुठलीही दुसरी भाजी
कैरी भात (चित्रान्ना मध्ये लिंबू वगळून कैरी घालून केलेला)/वरण भात/ तोंडली भात).
ताजं कैरीचं लोणचं आणि काकडीची किंवा लाल भोपळ्याची दह्यातली कोशिंबीर
गोडात आवडत असेल आणि करायची तयारी असेल तर आंबा फिरनी. नाहीतर आम्रखंड.
चार वर्षांच्या मुलाच्या वाढदिवशी
मँगो शेक, यात आंब्याचे लहान लहान क्यूब्स आणि लहान सर्विंग
केक असेल पण नेहेमी क्रीम केक खाऊन कंटाळा आला असेल तर साधा केक आणून संत्र्याच्या रसानं जरा मॉईस्ट करायचा आणि आंब्याचा जॅम सॉस करोन सजवायचा. याचे पीस करूनही ठेवता येतील सँडविचच्या साईज चे. बारके पोट्टे शेक आणि केक मधे निपटतात बराब्बर.
मोठ्यंना दही बुत्ती आणि पावभाजी. ( हे अर्थात लहान पोरसुद्धा खाऊ शकतीलच)
पार्टीला लोकांना बोलवून भरले
पार्टीला लोकांना बोलवून भरले ढेणसं... वर आग्रह करून करून वाढायची काय? सोनाक्षीच आठवली "यह काम अपनी हयात मे ना कर पाओगे तो मरने के बाद भी पछताओगे!!!!!!"
बाकी मेन्यू भन्नाट आहे!
ढेणसं म्हणजे क्वाॅय?
ढेणसं म्हणजे क्वाॅय?
पाटवडी, भरली ढेमस स्किलफुल
पाटवडी, भरली ढेमस स्किलफुल वर्क आहे त्यामुळे पार्टिच्या टेन्शनमधे २२ लोकाना करायला कुणी मदतिला हव त्यापेक्षा सोप म्हणजे मटकी उसळ , फ्लॉवर-बटाटा-मटार रस्सा
पुनम ! योकुने छान मेनु सुचवला
पुनम ! योकुने छान मेनु सुचवला आहे पण तरी तुम्हाला दोन्ही पार्टीला पुर्ण जेवणाचा मेनु हवा ठेवणार की वन डिश मिल टाइप, पार्टि सन्ध्याकाळी की दुपारी? अस अजुन जरा लिहा मग मन्डली तुम्हाला चिकार सजेशन देतिल
हे काही सजेशनस
पावभाजी-गुलाबजाम-समोसा
मिसल-पाव गाजर हलवा-अळुवडी
वडा-पाव, पुलाव-टोमॅटो सार-कटलेट् -
भेळ-हक्का नुडल्स-मिनी समोसा
ढेणसं म्हणजे टिंडा ग, फ्रोझन
ढेणसं म्हणजे टिंडा ग, फ्रोझन पण मिळतो.
ओह कळलं पण हा काही पार्टी
ओह कळलं पण हा काही पार्टी आयटम वाटत नाही. मेनली बच्चे कंपनी तर ढुंकून पण पाहणार नाहीत.
नाहीतर काय.म्हणजे मेनू बरेच
नाहीतर काय.म्हणजे मेनू बरेच मोठे लोक असतील तर त्यांना नेहमीपेक्षा चेंज म्हणून छान वाटेल.एकदम देशी डेलिकसी. पण लहान मुलं असतील तर त्यांना ढेमसं काय ते मेक्सिकन फिल्ड काहीतरी, किंवा रिमिक्स फलाफल असे नाव देऊन वर बेकड चीज घालून वाढले तर खाण्याची 2 टक्के शक्यता.
Pages