रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आण्णा गोळ्यो झाडता आन पाटणकर त्याक घाबारता ता एपिसोड मी पाह्यलंय. पुढे काय झाला?
कुणी सांगात काय माका? काल हळद उतरवणीच्ये कारेक्रमात शेवंता दिसूक नाय. नक्की काय झाला?

Dj ,
आवो धाग्याक काय नटवतास? आमी हयसर इलो, चायपानी देना नाय काय? मी काय म्हनतंय, चायवांगडा खारीयो पन देवा. Happy
(ही भाषा बोलण्याचा केलेला पहिला प्रयत्न )

माझा कालचा episode miss झाला Sad ही serial हळूहळू आवडायला लागली आहे.... !

@ दक्षिणा : शेवंताच्या घोचो हातभर फाटलो असतां.. आता ती वाड्यावर येत नसतंलंय.

@ रत्न : चायपानी देतंय की... चायवांगडा खारी देतंय.. घे गो बाय माजे.. पॉटभरुन खा..

tea1.jpg

कालचो भागात लय काय नाय झालो. मटान खाल्येलो काशी पेंगत घरी ईलो आन खाटेवर बेसुद पडलो. त्येंका इंजाक्षान देऊक डाक्टर बोलव्ल्यान (सरिताक इंजाक्षान देऊक बोलवलेल्याकच डाक्टर असां..).. डाक्टरच इंजाक्षान देऊक घाबरुक असां. मगे वच्छी त्येका लय बोलुक होया. हयसर नाईकांक वाड्यार सरिता दुसरं जेवान बनवुक ठेवतंलां.. ह्या बातमी घेऊक अभिरामा आण्णाक सांगतलो का सरितावैनीने जेवान बनवलं असां.. मगे आण्णाचो राग निवळतां. आण्णा सगळ्या पावण्याक दम देऊन जेवाय बसवतां त्याईक टायमाक वच्छी वरडुक वाड्यार येतली.. "काशीक खांदा देऊचा सोडुन मटान काय खाउक असतले..!" असां बोलतंली.

गे बाय माजे ! डिजे तुमाला आणी किल्लीला इतकी काय घाई झाली की आधीच्या धाग्याचे २००० पुरे व्हायच्या आधी २ धागे काढले. Proud

बरे, रवान दे. हयंसर आणी थयंसर दोन्हीकडे लिहीन.

डिजे तुमाला आणी किल्लीला इतकी काय घाई झाली की आधीच्या धाग्याचे २००० पुरे व्हायच्या आधी २ धागे काढले.>> तुमचो धागो मॉप पळुक असतंल्यान.. २००० होउक टायम लागुचा नाय म्हनुन काडलो. Proud

चायपानी देतंय की... चायवांगडा खारी देतंय.. घे गो बाय माजे.. पॉटभरुन खा.. > बरा झाला चाय दिल्यानी...! माका चायच हवी होती..! Happy

कालचो भागात लय काय नाय झालो. मटान खाल्येलो काशी पेंगत घरी ईलो आन खाटेवर बेसुद पडलो. त्येंका इंजाक्षान देऊक डाक्टर बोलव्ल्यान (सरिताक इंजाक्षान देऊक बोलवलेल्याकच डाक्टर असां..).. डाक्टरच इंजाक्षान देऊक घाबरुक असां. मगे वच्छी त्येका लय बोलुक होया. हयसर नाईकांक वाड्यार सरिता दुसरं जेवान बनवुक ठेवतंलां.. ह्या बातमी घेऊक अभिरामा आण्णाक सांगतलो का सरितावैनीने जेवान बनवलं असां.. मगे आण्णाचो राग निवळतां. आण्णा सगळ्या पावण्याक दम देऊन जेवाय बसवतां त्याईक टायमाक वच्छी वरडुक वाड्यार येतली.. "काशीक खांदा देऊचा सोडुन मटान काय खाउक असतले..!" असां बोलतंली. > काशि मेलो नायच..! Sad वच्छीची गंमत वाटते.. Episode बघायला हवा

मिया तर हयसरच लिवतंलंय Proud माका चाय दिल्यानी ना...!

आता हयसरच लिवा.. काय च्यायपानी करुचा असां तां सांगा Biggrin>> व्हय तर..! Lol

हयसर प्रश्न इचारलो ना..? मगे हयसरच लिवां.. Proud

रश्मी.. वयनीचो जुना धागो २०००+ होऊक ईलंय.. तेका २००० झाल्या का मगे हयसर लिवा..

Dj Lol

मला कोणी खालील विभक्ती-प्रत्यय मालवणीत सांगेल का प्लिज :

१. माझा/माझी/माझे - माझो/ माझा/माझे
२. तुझा/तुझी/तुझे - तुझो/ तुझा/ तुझे
३. याचा/याची/याचे- हेचो/ हेचा/ हेचे
४. मला (स्त्रिलिंगी/पुल्लिंगी/नपुसकलिंगी) - माका
५. तुला (स्त्रिलिंगी/पुल्लिंगी/नपुसकलिंगी) - तुका
६. याला/हिला - हेका
७. त्याला/तिला - तेका
८. होता/होती/होते - होतो/ होता/ होते
९. असतो/असती/असते - असता/ असता/ असते
१०. नसता/नसती/नसते - नसता/ नसता/ नसते
११. आलो/आली/आले- इलो/ इला/ इले
१२. गेलो/गेली/गेले - गेलो/ गेला/ गेले
१३. हा येईल्/तो येईल्/ते येतील - ह्यो येतलो/ तो येतलो/ ते येतले - ह्यो येईत/ तो येईत/ ते येती
१४. ही येणार आहे/ही आली आहे/ ती येणार होती - ह्या येतला/ ह्या इला हा/ ता येणार होता
१५. हा येणार आहे/हा आला आहे/ हा येणार होता - ह्यो येतलो/ ह्यो इलो हा/ ह्यो येणार होतो
१६. तो/ ती/ ते- तो/ ता/ ते
अजुन काही टिप्स असतील तर प्लिज सांगा..

कालचो भाग वच्छीन पार गिळुक टाकल्यान..! वच्छीन आण्णाक टश्शन दिल्यान. आण्णाचो घरात आण्णाचो डोळ्याक डोळा भिडवुक दम भरल्यान. आण्णान तेका डोक्याक बंदुक लावलो तरी वच्छी घबरलो नाय. आण्णावांगडा समदा नाईक, पावणा-रावळोच्या समोर आण्णाक खिजवलां असां. समद्यासमोर थुकुक वच्छी घरी गेल्यान.

हो, कालचा दिवस वच्छीचा होता. काल दार कोण वाजवतयं असा प्रश्न वच्छी व शोभाला पडला होता, बहुतेक त्याचे उत्तर सरीता असेल. कारण सरीताला तिच्या बाबांनी दिलेले पैसे ती कशीच्या उपचारासाठी द्यायचे मनात ठरवते. मात्र आता ती वच्छीकडे येणार कशी? इकडे अण्णोबा टल्ली होऊन पाटणकर कडे जातात भविष्य विचारायला. आज कळेल ते.

काशिचो काय ता निकाल लागांदेत आज.. किती दिस तेका बेशुद्ध ठेवतले देवाक म्हायत.
वच्छिचो अभिनय येक नंबर वाड्यात्सून भायर पडताना ता जा काही थुंकता त्याक तोड नाय Proud

आज काल आणि परवाचा दोन्ही episode पाहिले

अण्णाला बंदूकिच्या लाल गोळ्या कोण पुरवते? Uhoh

वच्छी छान acting करते माईचा एक episode रडण्याविना जात नाही
वच्छीच्या वागण्याबोलण्यावरुन तो विषारी लाकडी तुकडा ती ठेवते असे वाटत नाही.... मग कोणी केले असावे?

दोन ( का 3 ) episode शेवंता दिसली नाही..! Sad Lol

वच्छीच्या वागण्याबोलण्यावरुन तो विषारी लाकडी तुकडा ती ठेवते असे वाटत नाही.... मग कोणी केले असावे? >> छाया काय करेल काही काही सांगता येत नाही..!! Uhoh

नाही, तो तुकडा छायाने पण ठेवलेला नसेल. कदाचीत स्वयंपाक करणार्‍यांनाच त्याच्या विषयी माहीत नसेल, म्हणून चार लाकडे सारली असतील त्याची. किंवा मग पांडुला लाकडे आणायला सांगीतली असतील रानातुन, तेव्हा त्यानेच अजाणता आणली असतील.

छाया मागे माईस काय म्हणाली आठवते का..? म्हणे माईने तिला सोन्याचा हार दिला नाही तर एक दिवस घरातल्या सगळ्यांचे गळे चिरुन सोनं घेउन जाईल..! Uhoh

छाया काय करेल काही काही सांगता येत नाही..!! Uhoh > खरेय Uhoh

नाही, तो तुकडा छायाने पण ठेवलेला नसेल. कदाचीत स्वयंपाक करणार्‍यांनाच त्याच्या विषयी माहीत नसेल, म्हणून चार लाकडे सारली असतील त्याची. किंवा मग पांडुला लाकडे आणायला सांगीतली असतील रानातुन, तेव्हा त्यानेच अजाणता आणली असतील.> असू शकते..! Serial मधे त्या ठोकळ्याबद्दल सांगायला हवे होते

Pages