Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिडीस वाटली ती..
हिडीस वाटली ती.. मेकअप आणि दागिने भयानक होते..
तिचा परफॉर्मन्स पण उगाच घेतला होता. तोही शेवटाकडे दाखवला. मला टीआरपी गिमिक वाटलं ते.
हिडीस वाटली ती.. मेकअप आणि
हिडीस वाटली ती.. मेकअप आणि दागिने भयानक होते..>>खरच... उलट नेहेमी शेवंताच्या मेकअप मध्ये छान दिसते.. कमी मेकअप मध्ये मादक... आणि कशाला सदा सर्वदा हिन्दी गाणी हवीत अशा function मध्ये.. शेवंताच्या रुपाला गावरान गाणी किंवा लावणी फर्मास वाटली असती.. #nobodyshame पण तरी तिच्या एकुण अंगकाठीला घेतलेली गाणी शोभली नाही आणि तिला carry नाही करता आली..
काहीही अचाट प्रकार होता तो.
काहीही अचाट प्रकार होता तो.
हिडीस शव्द बरिबर, कपडे पण बळंच प्रकारातले होते.
पुर्ण परफॉरमन्सच बळंच होता.
टीआरपी गिमिक>>> +१
कोनी पाटणकरणीचो ड्यांस
कोनी पाटणकरणीचो ड्यांस बगल्यानं?>>>> कोणत्या चॅनेलवर होता?
झी गौरव पुरस्कार, ३१ मार्च
झी गौरव पुरस्कार, ३१ मार्च २०१९
चॅनेल - झी मराठी
धन्यवाद रश्मी!
धन्यवाद रश्मी!
पाटणकर बाईच्या डान्सवर खूप
पाटणकर बाईच्या डान्सवर खूप टीका आली आहे फेबुवर. लोक खूप नावं ठेवत आहेत. मला स्वतःला पण नाही आवडला तो प्रकार, असले परफॉर्मन्स का दाखवतात अवॉर्ड शो मध्ये? इंडस्ट्री मधल्या अतिशय सिनियर मंडळींसमोर असला डान्स करणे खरच अशोभनीय वाटलं मला.
इंडस्ट्री मधल्या अतिशय सिनियर
इंडस्ट्री मधल्या अतिशय सिनियर मंडळींसमोर असला डान्स करणे खरच अशोभनीय वाटलं मला.>>>+१००
खूप टीका आली आहे फेबुवर>>> लिण्क देता का?
झी गौरव मधे पाटणरीणचा मादक
झी गौरव मधे पाटणरीणचा मादक डान्स बघत असताना समस्त महिलावर्गाच्या चेहर्यावर एकप्रकारची आसुया पसरलेली दिसत होती. शेवंतासारख्या जाड्या बाई(?)ला (आम्हालातर तसे वाटत नै बुवा..! ) एवढ्या शिट्या, कौतुक मिळालेलं पाहुन खुप चिडचिड झालेली दिसली. काहीही करुन शेवंता पाटणकरीण कशी जाड आहे, तिचा ड्रेस किती पकाव आहे, दागिने कसे साखळदंड आहेत, डान्स तरी येतो का हिला, स्टेजवर पाण्यात काय भिजली वगैरे दुषणे दिली गेली. हे इथे माबोवरच नाही तर प्रत्येकाच्याच घरात महिला वर्गाकडुन बोलले गेले हे एव्हाना मित्रांशी, ऑफिस मधे चर्चा करताना सर्वांच्या लक्षात आले असेलच..
बाकी शेवंता पाटणकर सारखा कमी वेळात मोठा फॅनक्लब मिळवणे आपणाला का जमले नाही हे समस्त मराठी तारकांच्या चेहर्यावर दिसुन येत होतं. तिचा डान्स परफॉर्मन्स हा 'शो स्टॉपर' होता यावरुन शेवंताची क्रेझ लक्षात येते
झी अवॉर्डस फक्त सिद्धार्थ
झी अवॉर्डस फक्त सिद्धार्थ जाधवचा सन्मान झाला तिथपर्यंत बघितल, नंतर बंद केलं. पुढे दाखवणार असं प्रोमोज दाखवत होते त्यात शेवंताबैचा डान्स प्रोमो बघून बघायची इच्छा झाली नाही. अतिशय चीप वाटत होते प्रोमोज, सॉरी बट रिअॅलिटी.
झी फेसबुकवर कोणीतरी योग्य टीका केलीय, तिथे मी सपोर्ट पोस्ट टाकून आले काल.
काहीही हं !! डिजे. गंमत
काहीही हं !! डिजे. गंमत म्हणजे तिचा हा डान्स माझ्या सुदैवाने मला एक क्षणच अनूभवायला मिळाला. दुसर्या क्षणाला आमच्या घरात पाहुण्यांनी एंट्री केल्याने त्यांच्या सरबराईत शेवंताचा हॉट शॉट चूकला.
आधी मला ती शेवंता हाये हे माहीतच नव्हते. म्हणलं कोण आला हा ढब्बुडा, पाहिले तर पाटणकरीण बाई. पण काय करणार आम्ही बिचारे गप रवलो माईगत. अण्णा पण नाचत होते काय तिथे?
झी फेसबुकवर कोणीतरी योग्य
झी फेसबुकवर कोणीतरी योग्य टीका केलीय>>> अन्जू, लिंक प्लीज.
आधी मला ती शेवंता हाये हे
आधी मला ती शेवंता हाये हे माहीतच नव्हते. म्हणलं कोण आला हा ढब्बुडा, पाहिले तर पाटणकरीण बाई. पण काय करणार आम्ही बिचारे गप रवलो माईगत.>> योग्य केलंत.. सत्य पचवण्यास कठीण जाते तेव्हा गप्प रहाणेच श्रेयस्कर ठरते.. नाहीतर संतापात वाईट-साईट बोलले जाते..
अण्णा पण नाचत होते काय तिथे?>> नाही.. त्यांना नव्हतं बोलावलं.. बोलावलं असतं तरी त्यांचा डान्स बघायला कोणी उत्सुक असेल असे आजीबात वाटत नाही
@ रश्मी : योग्य आणि संतुलीत प्रतिक्रिया
अन्जू, लिंक प्लीज. >>> माझ्या
अन्जू, लिंक प्लीज. >>> माझ्या फेसबुकचं काहीतरी तंत्र बिघडलंय. मला तो लिंक कॉपी करु देत नाहीये आणि अजून काही सटरफटर प्रॉब्लेम्स येतायेत. कालच इथे लिंक पोस्ट करणार होते. कोणीतरी फेसबुक फ्रेंडने त्यावर कमेंट लिहीली म्हणून मला ती पोस्ट दिसली, लगे हात मीपण कमेंट टाकली तिथे, नंतर लिंक कॉपी करायला गेले, तर होईनाच. परत ट्राय करेन.
लगे हात मीपण कमेंट टाकली तिथे
पोस्ट दिसली, लगे हात मीपण कमेंट टाकली तिथे, नंतर लिंक कॉपी करायला गेले, तर होईनाच. परत ट्राय करेन.
Submitted by अन्जू on 2 April, 2019 - 07:58 >>
देवाच्या दारात न्याय आहे हेच खरे..!
हा हा हा.
हा हा हा.
चार पाच दिवस येतोय हो हा प्रॉब्लेम पीसीवर. मला टेक्निकली काही कळत नाही, नवरा करेल सॉल्व्ड. पण सध्या त्याला वेळ नाहीये.
मीही तिला पटकन ओळखलं नाही, कोण ही अतिशय जाडी बाई (सॉरी, असं लिहीणं आवडत नाही पण वाटलं) असंच मनात आलं पण कोणीही असूदे हा डान्स चीप वाटतोय, नाही बघायचा असं ठरवलं. मग एका मैत्रीणीने सांगितलं, ती शेवंता आहे. असंही मी ही सिरीयल बघत नाही, मला आवडत नाही.
डिजे, तुमच्या पुर्ण पोस्टशी
डिजे, तुमच्या पुर्ण पोस्टशी सहमत
धन्स..
धन्स..
अत्यंत बिभित्स डान्स होता
अत्यंत बिभित्स डान्स होता
हि घ्या लिंक
https://www.mtalky.com/o/m.aspx?m=1716&s=1&g=Full%20Event&c=108016
काल वच्छी आणि तिच्या सुनेने
काल वच्छी आणि तिच्या सुनेने सरिताला चांगलेच वश करुन घेतले. इथुन पुढे नाईक वाड्यात होणार्या सर्व भानामती, चेटुक, करणी यांसाठी आता सरिताच जबाबदार असणार.
माई हा धागा वाचतात वाटतं.
माई हा धागा वाचतात वाटतं. कारण हल्ली " गे बाय माझे " होत नाही. त्यादिवशी अभिराम पाण्यात बुडाला, हे कळलं तरी माई खूपच शांतपणे रडल्या. अपेक्षाभंग झाला माझा. खरंतर तेव्हा हंबरडा प्रसंगोचित वाटला असता.
दत्ता पण तिथेच घुटमळत राहिला, भावाला आणायला लगेच जायचं तर.
माई हा धागा वाचतात वाटतं.
माई हा धागा वाचतात वाटतं. कारण हल्ली " गे बाय माझे " होत नाही.>>>>> अगदी अगदी. लक्षात येण्याजोगा फरक आहे.चांगलं आहे की!
सरिता नवीन सून असूनही सासू ला
सरिता नवीन सून असूनही सासू ला काहीही न विचारता बराच भोचक पणा करतेय
अत्यंत बिभित्स डान्स होता Sad
अत्यंत बिभित्स डान्स होता Sad
हि घ्या लिंक
https://www.mtalky.com/o/m.aspx?m=1716&s=1&g=Full%20Event&c=108016
लिंक ओपन होत नाही काय प्रोब्लेम असेल
झी च्या अॅपवर आहे हा व्हिडीओ.
झी च्या अॅपवर आहे हा व्हिडीओ.
शेवंताने झी गौरव गाजवला हे
शेवंताने 'शो स्टॉपर डान्स' करुन झी गौरव गाजवला हे सत्य आहे. आता तिला नावे ठेवुन काय उपयोग. एनी पब्लिसिटी इस गुड पब्लिसिटी. शेवंता सारखा पटाका डान्स मराठीतल्या कोणाही अॅक्ट्रेसला जमणार नाही (मानसी नाईक सोडुन)
सरिता नवीन सून असूनही सासू ला
सरिता नवीन सून असूनही सासू ला काहीही न विचारता बराच भोचक पणा करतेय>>> +१
शेवंताने 'शो स्टॉपर डान्स'
शेवंताने 'शो स्टॉपर डान्स' करुन झी गौरव गाजवला हे सत्य आहे.
ड्रेस सेन्स पूर्ण चुकला होता .dance च्या स्टेप्स अयोग्य होत्या असे नाही म्हणता येणार ड्रेस मुळे शेवंतीची जाड शरीर बेढफ दिसले बस
बाकी चेहरा तिचा छानच आहे
नाईकांच्या सुना
नाईकांच्या सुना - शोभल्या आणि सरू
राखेचा - अव्हेंजर्स
राखेचा - अव्हेंजर्स
Pages