चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
पूल नेहरुने तोडला गुपचूप
पूल नेहरुने तोडला गुपचूप रात्रीतून येऊन. गडकरी, मोदी, फडनवीसला कायबी पत्ता लागला नाय>>>
या पुलाच्या टोकाजवळ हेलाभाऊ रोज रात्री बसत असतील, नाहीतर या गोष्टी कशा माहीत पडणार म्हणा?
--- म्हणजे आहेच ना संबंध? बोल
--- बोल जमुरे सब को उछल उछल के सच बता.... बच्चा लोग ताली बजायेंगे. >>>
हे कोणाला उद्देशून आहे?
आंधळा विरोध करू नका विचारी
आंधळा विरोध करू नका विचारी पना दाखवा .
आंधळा विरोध करू नका विचारी
आंधळा विरोध करू नका विचारी पना दाखवा .
तुमच्या वाईत रोज घनटागाडी
तुमच्या वाईत रोज घनटागाडी कोण पाठवते ? राष्ट्रवादीचा आमदार की मोदी ?
पुलाच काम सुधारणार नाही.
पुलाच काम सुधारणार नाही. त्यापेक्षा त्या पुलाचे फोटो काढा आणि PMO, मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींना पाठवा. काही ठोस तक्रार करायची असेल तर सरकारच्या पब्लिक ग्रीवन्स वेबसाईट वर तक्रार टाका. एक नागरिक म्हणून वाईट गोष्टी राज्यकर्त्यांना दाखवून देणे आपली जबाबदारी ठरते.
हा योग्य मार्ग आहे
Blackcat, घंटागाडी पाठवायला
Blackcat, घंटागाडी पाठवायला राष्ट्रवादीचा आमदार ग्रामपंचायतीत आहे काय?
आंधळा विरोध करू नका विचारी
आंधळा विरोध करू नका विचारी पना दाखवा .
~ काँग्रेसविरोधकांना सांगत आहात का? सांगा सांगा. त्यांना खरंच गरज आहे. आम्ही तर विचारीपणानेच विरोध करत आहोत. सत्ताधार्यांवर त्यांचा पक्ष न पाहता कार्य पाहून टिका करणे ह्याला विचारीपणा म्हणतात. जो सत्तेत असतो त्याला उत्तर द्यावी लागतात. जबाबदार्या घ्याव्या लागतात. आधी काँग्रेसला प्रश्न विचारले, टिका करुन करुन तिला घालवले, आता भाजपची पाळी. सत्ता करायची तर उत्तरदायीपणा पाहिजेच. संसार करायला हवा पण जबाबदारी नको असे कुठे असते?
ग्रामपंचायत काय काम करते हे
ग्रामपंचायत काय काम करते हे पण सांगावे लागेल का
हेला या धाग्यातल्या माझ्या
हेला तुम्ही या धाग्यातल्या माझ्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही अजून
हेला जबाबदारी कोण्ही नाकारू
हेला जबाबदारी कोण्ही नाकरावी असे शशांक सुधा बोलत नाहीत फक्त ती स्थानिक नेत्याची जबाबदारी आहे pm chi Nahi ase mat vyakt kelay आम्ही
म्हणजे तुम्ही कबूल करताय की
म्हणजे तुम्ही कबूल करताय की भाजपा पार्टी नीट काम नाही करत आहे... मग कोण जबाबदार आहे त्याला? नेहरु?
नेहरूंचा काय संबंध त्या
नेहरूंचा काय संबंध त्या पुलाचे काम नाही झाल त्याला पण काश्मीर प्रश्न नेहरु न शी संबंधित आहे चुकीच्या वेळी त्यांनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र समिती कडे उपस्थितीत केला .
आणि मला वाटतं हे तुम्हाला सुधा पटल पाहिजे
ओ ते गुज्जी भाऊ रोज दोन तास
ओ ते गुज्जी भाऊ रोज दोन तास का काय ते फरफट होते ते सांगत आहेत. त्याची जबाबदारी कोण घेत आहे?
स्पष्ट बोला ना तुम्ही रजेश१८८
स्पष्ट बोला ना तुम्ही रजेश१८८ की पूल दुरुस्त न होणे, लोकांची गैरसोय होणे ही सत्तेवर आहे म्हणून भाजपाची जबाबदारी आहे लाजता का घाबरता आहात?
भाजपाची जबाबदारी आहे लाजता का
भाजपाची जबाबदारी आहे लाजता का घाबरता आहात? >>>
इथे कोणीही घाबरत नाहीय, मी तर आधीच सांगितलंय की त्या पुलाचे फोटो भाजप सरकारांतील संबंधित खात्याला व PMO (त्यांचा संबंध नसतानाही) ला पाठवा तसेच पब्लिक ग्रीवन्स वेबसाईट आहे. ते gujji करतीलच याची मला आशा आहे.
प्रश्न तुम्ही करत असलेल्या खोट्या वक्तव्याचा व मारलेल्या PJ चा आहे. त्याविरुद्धच्या प्रश्नांना सोयीस्करपणे बगल देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून सुरू आहे (immature behavior)
जे काही लिहिताय त्यावरील प्रश्नांची उत्तरं देण्याची धमक नसेल तर लिहू नका, म्हणजे पळपुटेपणा करण्याची वा फालतुगिरी करून विषय बदलण्याची गरजच पडणार नाही.
http://www.dainikaikya.com
http://www.dainikaikya.com/20180928/4685079760174429388.htm
वाई ग्रा पं देखील राष्ट्रवादी , काँग्रेसकडेच आहे,
तिथे भाजपाची सत्ता असती तर एव्हाना , आमच्याकडे भाजपा आहे व त्यामुळे घंटागाडी येते , हे तुम्ही आवर्जून सांगितले असते,
राजेश 188 तुम्ही दोन आयडी
राजेश 188 तुम्ही दोन आयडी चालवत आहात का? एक आयडी पुरेसा नाही का?
मीरा ह्यांचे बरोबर आहे..
मीरा ह्यांचे बरोबर आहे..
सदर लेख चोर लेखकाने एफबी वरील बोक्याशेठ पेज वरून ढापला आहे
मीरा ह्यांचे बरोबर आहे..
मीरा ह्यांचे बरोबर आहे..
सदर लेख चोर लेखकाने एफबी वरील बोक्याशेठ पेज वरून ढापला आहे >>
मला वाटत आपण DJ यांना वरील गोष्टीबाबत स्वतःच मत मांडण्याची संधी दिली पाहिजे
वाई ग्रा पं देखील राष्ट्रवादी
वाई ग्रा पं देखील राष्ट्रवादी , काँग्रेसकडेच आहे,
तिथे भाजपाची सत्ता असती तर एव्हाना , आमच्याकडे भाजपा आहे व त्यामुळे घंटागाडी येते , हे तुम्ही आवर्जून सांगितले असते,
वाई तालुका आहे तिथे नगरपालिका आहे .
माझे गाव वाई तालुक्यात आहे असं लिहलय मी नीट वाचा .
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=LfmnG_392_Q&feature=share
ये दुनिया नही है जागीर किसी की
राजा हो या रंक यहा पर सब है चौकीदार
काही का असेना , तुमच्याकडे
काही का असेना , तुमच्याकडे भाजपा नाही , अन तरीही घंटागाडी येते, हे नक्की आहे
मुझे यह बात कहने मे बहुत गर्व
मुझे यह बात कहने मे बहुत गर्व है की हा मै भक्त हुं. चाहे मुझे कोई अंधा क्यो न कहे. अरे लकाहो पोरं जनायची तुम्ही आन लोकाकडं रोजगार मागायचा.
कोणाचा चौकिदार आहे हा?
कोणाचा चौकिदार आहे हा?
फेसबुक वरुन आनन्द शितोले
देशभक्तीच्या आरोळ्या मारताना आपण कुणाला निवडून दिलेलं आहे आणि ज्यांना मसीहा समजतो ते प्रत्यक्षात कुणाचे दलाल आहेत ते समजून घेण गरजेच आहे.
पोस्ट मोठी असली तरी नीट विचारपूर्वक वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
विकासाला कुणाचीही ना नसते.
अंगावर आलेली सूज तात्पुरती असते, कालांतराने ओसरून जाते.
वाढ एकांगी असते.
विकास संकल्पना ज्यावेळी म्हणतो त्यावेळी देशाची,समाजाची सर्वांगीण प्रगती होताना भवताली असणाऱ्या पर्यावरणाचा नाश न होता , संस्कृतीची जपणूक होऊन कमीतकमी माणसांना त्याग करावा लागेल आणि त्याची योग्य भरपाई होईल अशी असते.
मूळ मुद्दा.
छत्तीसगड मध्ये हसदेव अरंद जंगल आहे.जंगलाचा विस्तार १७०००० हेक्टर्स परिसरात आहे.हे जंगल हत्तींचा अधिवास आहे.ह्या जंगलाच वैशिष्ट्य म्हणजे इथल जंगल अतिशय घनदाट असून इथली जैवविविधता अतिशय समृद्ध आणि दुर्मिळ आहे.
ह्याच कारणाने कोळशाचे साठे असूनही ह्या जंगलात २००९ पासून सरकारने “ नो-गो “ धोरण राबवलेले आहे. जयराम रमेश पर्यावरण मंत्री असताना त्यांचा कडक कल सगळ्यांना अडचणीचा होता.
ह्या जंगलात कोळसा खाणींना परवानगी मिळावी म्हणून बऱ्याच कंपन्या धडपड करत होत्या.
फेब्रुवारी २०१८ पासून सरकारकडे प्रस्ताव नव्याने सादर करून पडलेला होता.
आता निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावर जावडेकर ( जे पर्यावरण मंत्री कमी आणि उद्योगांना क्लिअरन्स देणारी खिडकी जास्त आहेत ) त्यांनी परवानगी दिलीय.
ओपन कास्ट माईन चा अर्थ असा आहे आधी जमिनीवरच जंगल तोडल जाणार, मग त्यातली माती बाजूला केली जाणार आणि त्यानंतर त्यातून कोळसा काढला जाणार.
ह्या ओपन कास्ट माईन मुळे ७७३० हेक्टर्स जंगल थेट तोडल जाईल आणि तिथून बाकीच्या जंगलातून रस्ते वाहतूक करताना होणार नुकसान वेगळच.
पर्यायाने इथली जैवविविधता धोक्यात येणार नाही तर पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.
आता हि परवानगी मिळालेली कंपनी राजस्थान कोलरिज लिमिटेड ( आरसीएल ) हि गौतम अदानी समूहाची असणे हा निव्वळ योगायोग आहे.
बातमीची लिंक :-
https://www.hindustantimes.com/…/story-F60Pb7W8ybegHntaQ9YB…
ह्या सरकारने देशातल्या जंगलाचे आणि पर्यावरणाचे नुकसान करण्याची, इथली जैवविविधता नष्ट करण्याची, सगळी नैसर्गिक संपत्ती ओरबाडून घेण्याची हि पहिलीच वेळ आहे का ?
मग हे वाचा.
१.संवेदनशील अश्या वन आणि जंगल क्षेत्रात मोठी बांधकामे आणि महामार्ग उभे करायला पर्यावरण आणि वन मंत्रालयाची परवानगी आता लागणार नाही म्हणजे खाजगी कंत्राटदार कसे काम करतील हे सांगायला नकोच
२.२००० ते १०००० हेक्टर साठी पाटबंधारे प्रकल्प उभारायला केंद्राची मंजुरी गरजेची नाही फक्त राज्य सरकारे मंजुरी देणार.२००० पेक्षा कमी क्षमतेचे प्रकल्प उभे करताना हरित परवाना ( वन क्षेत्र ) गरजेचा नाही
३.प्रदूषण करणाऱ्या मध्यम उद्योगांना वन क्षेत्रापासून १० किमी अंतरावर उद्योग उभारायला परवानगी होती ती आता 5 किमी वर आली आहे
४.अतिप्रदूषित विभागात उद्योग उभारायला असलेली बंदी उठवली , गुजरात मधील वापी किंवा कानपूर सारख्या ठिकाणी अनिर्बंध उद्योग उभे राहणार आणि सामान्य लोकांच जगण मुश्कील करणार
५.NBWL National Board for Wild Life ह्या सरकारी संस्थेवर स्वतंत्र सदस्य संख्या १५ वरून थेट ३ वर आणली आहे आणि ह्या संस्थेने १२ ऑगस्ट रोजी १४० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे
६.राष्ट्रीय हरित लवाद कायद्या मध्ये ह्या लवादावर निवृत्त न्यायाधीश असायचे आता हा लवादावर प्रमुख म्हणून सरकारी अधिकारी येणार आणि तोच सुनावणी करणार , म्हणजे तक्रार आमच्याविरुद्ध आणि निर्णय पण आमचाच ..
७.वनाधिकार कायदा ज्यामूळ ग्रामसभेची खनिज उत्खनन करायला परवानगी गरजेची होती तो ग्रामसभेचा अधिकारही काढून घेतला आहे
८.१६ दशलक्ष टन प्रतिवर्ष पेक्षा कमी क्षमतेच्या कोळसा खाणी च्या विरोधात जनसुनावणी घ्यायची गरज नाही
९.भूसंपादन कायदा कमकुवत केला गेला आहे , ज्यामध्ये सामाजिक प्रभाव विचारात घेणार नाहीत. बाजारभावाप्रमाणे मूल्य देण बंधनकारक नाही , न वापरलेली जागा पुन्हा मूळ मालकाला परत मिळणार नाही
१०.पन्ना व्याघ्र प्रकल्पाची ४० चौरस किमी जागा केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाला देण्यात आली आहे
११.महाराष्ट्र सरकारने सीआरझेड कायद्यात केलेले बदल आणि नदीकिनाऱ्या पासून उद्योग उभारणी करण्यासाठी अंतराची रद्द केलेली अट ह्या गोष्टी डोळ्यासमोर आहेत.
२०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने नदीच्या काठापासून किती लांबवर उद्योग उभारावेत ह्याचे नियम थेट मोडीत काढलेत.
पूर्वी कोळसा खाणी साठी नदीपासून २ किलोमीटर ची अट होती ती थेट २५० मीटर वर आणलेली आहे.
बातमीची लिंक :-
https://www.downtoearth.org.in/…/maharashtra-to-allow-coal-…
आपण नेमक कुठल सरकार निवडून दिलेलं आहे आणि ते देशाची साधन संपत्ती कशी ओरबाडून आपल्या व्यापारी मित्रांना आंदण देत आहे हे लक्षात घ्या
हेला तुम्ही उपस्थित केलेल्या
हेला तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व pointvar चर्चा करूच .
पण प्रधम हे संगवावे असे वाटत .
उद्योगपती,श्रीमंत लोक,आणि समाजातील प्रभावशाली लोकांची लॉबी सरकार दरबारी कार्यान्वित असते तशी लॉबी सामान्य लोकांची नसते त्या मुळे सरकार कोणाचे ही आसू द्यात सरकार सरकारी निर्णयात सामान्य लोकांचे हित japal जात नाही .
हेला तुम्ही उपस्थित केलेल्या
congress la nakarun bjp vijyi jhali tya mage fakt dharmic prachar he karan nahi
भाजप समर्थक आणि बेशरम हे
भाजप समर्थक आणि बेशरम हे समानार्थि शब्द आहे हे प्रत्येकवेळि सिद्ध होतेच.
(No subject)
भाजप समर्थक आणि बेशरम >>>>
भाजप समर्थक आणि बेशरम >>>>
Pages