चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Proud

मला तर रॉबर्ट वदरा फार आवडला, ज्या लंडनने भारतावर राज्य केले , तिथे ह्याने 9 फ्लॅट / बंगले घेतलेत म्हणे.

नाहीतर भाजपयांचे नेते , संडास बांधून फोटो मिरवत बसलेत.

Proud

ग्रामपंचायत ,नगरपालिका ,जिल्हा परिषद ,महानगर पालिका,राज्य सरकार ,केंद्र सरकार प्रतेकाच्या अधिकार आणि कामाच्या सीमा रेषा आहेत .पूल नाही बांधला ह्याला केंद्र सरकार कसे जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारात असेल तो त्याला विचारा .
प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान कसे जबाबदार असतील>>> अहो असे कसे असे कसे.. असे कसे बोलुन बसलात? ह्या कामांसाठी तर ७० वर्षांपुर्वीच्या चौकिदाराला जबाबदार ठरवायला हवे कि हो तुम्ही..!! Proud

ह्या कामांसाठी तर ७० वर्षांपुर्वीच्या चौकिदाराला जबाबदार ठरवायला हवे कि हो तुम्ही..!!
माझ्या कोणत्याच पोस्ट मधून ज्या व्यक्तीचा संबंधच नाही त्या व्यकीवर आरोप नसतील

Gujji , रोजगार म्हणजे काय ते निवडणुकीत कळेल. तरुण लोक , रोजंदारीवर काम करणारे लोक मोदींना मते देतात की नाही हे दिसून येईलच. बाकी रोजगार म्हणजे तुम्ही नियमित पगार देणारी नोकरी म्हणत असाल तर मोदींच काय कुठलाही नेता दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ शकत नाही. परंतु सध्या जे काही पायाभूत प्रकल्प देशभरात सुरू आहेत ( आणि ज्यांचा परिणाम 2020 पासून दिसायला सुरू होईल) त्यांच्यावर करोडो लोक काम करत आहेत, ज्यांना माझ्या मते तरी रोजगार मिळालाय.

बाकी तुमच्या पुलाचा आणि मोदींचा संबंध जाणण्यासाठी मी तुम्हाला माबोवरील हेला नामक आयडीची शिफारस करु इच्छितो. हेला यांच्याकडे नागरिकाशास्त्रातील पुस्तकांचा खजिना उपलब्ध असून तुमच्याशी थोडी चर्चा करून योग्य पुस्तकाचं नाव ते तुम्हाला सुचवू शकतील.

135 मिटर्स चा पुल पाडून अनेक महीने नवीन न बांधल्‍यामुळे आज रोज 2तास 135 मिटर्स पार करण्‍यास लागतात,
~ हा कोणता पूल आहे? कुठे आहे?

कारण कल्‍याण डोंबिवली महापालिके मधे भाजप सेना यांचे गेले 30वर्ष राज्‍य आहे आणि स्‍मार्ट सटि करु या बाता मुख्‍यमंत्र्यांनी मारल्‍या पण काही पैसा दिला नाही आगदी भ्रष्‍टाचारा मधे सस्‍पेंड झालेया जोशी नावाच्‍या अधिका-यास घेण्‍यासाठी सेना भाजपा ने ठराव केला म्‍हणे ना खाउुना नाखाने दुंगा पुर्वी पाटबंधारे भ्रष्‍टाचारासाठी अजित पवार यांना भाजप जबाबदार धरीत असे पण आजपर्यंत 5वर्ष सत्‍ता हातात असुन यांना कोणताही पुरावा मिळाला नाही वा त्‍यांना अटक कराता आली नाही म्‍हणजे चौकीदार काही लोकांकरता डोळे बंद करातो की नाही जर आणि आच्‍छे दिन चा वादा मोदी यांनी केला मग ही फेकुगीरी नाही का आज ही शहराची दैैैैना झालेली आहे आणि अश्‍या परिस्थ्तिीत 16 कीमी रस्‍ते रोज बांधले चौकीदारहु हे सर्व जखमेवर मीठ चोळलयासारखे वाटते आणि यांचा वीट येतो तर मग सांगा आत्‍तापर्यंत कीती रोजगार गेले यांंच्‍या पॉलीसी मुळे असे हे खोटी अश्‍वासने देऊन जनतेला फसवणारे लोक आहेत भक्‍तांची पुन्‍हा एकदा मनपुर्वक क्षमा मागतो

महापालिकेत भाजप, राज्यात भाजप, केंद्रात भाजप, तरी ह्या कामांशी भाजप चा काही संबंध नाही म्हणत आहेत का समर्थकगण? नेहरूचाच असला पाहिजे मग.. Happy

हेला तुम्हाला प्रतिसाद नीट वाचण्याची नितांत गरज आहे. भाजपचा संबंध नाही असे कोण म्हणाले ते दाखवा..

अजूनही पत्री पुलाच्या कामाचा नि मोदींचा संबंध आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडची नागरिकाशास्त्राची पुस्तक तुम्ही स्वतःच वाचली नाहीत असं मी म्हणेन.

उदय, भरत, द टेलिग्राफ ने निरव मोडीबद्धल बातमी दिली, ती त्यांनी स्वतः शोध लावून दिली असं कुठे म्हटलंय काय?

सोडुन द्या ग्राऊंड रीयालीटी जर कोणी मांडली तर यांना वाईट वाटते ऊगाच आच्‍छे दिन चा बेरंग झााला असे वाटते कदाचीत काही चुका चौकीदारांकडुन झाल्‍या असतिल हे ऐकण्‍यास तयार नाही भाषणबाजीच्‍या कुभमळयात स्‍नान करुन पावन होणार शेवटी मला वाटते सदा सर्वकाळ एक माणुस एक विचारधाराच फक्‍त कायम बरोबरच असते ही भुमिका पटत नाही तर कान जमिनीशी असावेत म्‍हणजे फसवणुक होत नाही शेवटी दीसते तसे नसते हा अनुभव असतो शायनिंग इंडिया चा पुर्वी काय परीणाम झाला ते आठवते

माझ्या गावात सर्व योजना व्यवस्थित चालू आहेत अगदी कचरा गोळा करणारी गाडी सुधा खेडेगाव असून रोज येते करोडो रुपये ग्रामपंचायतीला मंजूर आहेत आणि त्यात गावात पूर्ण डांबरी रस्ते आहेत पाणीयोजना उत्तम चालते ,सिंचन प्रकल्प मस्त चालू आहेत कारण स्थानिक नेते चांगले आहेत
इथे पंतप्रधानच काय संबंध .
तुम्ही चुकीचे प्रतिनिधी निवडणार आणि पंतप्रधान दोषी आहेत असे आरोप करणार .

मोदींचा भाजपशी आणि भाजपचा मोदींशी, सरकारचा भाजपशी, भाजपचा कोणत्याही जबाबदारीशी काही संबंध नसतो.... Rofl
सर्व मंत्रालयांची कामे पीएमओतून होत असतील तर काय वाईट असे कोणीतरी बोलत होते बॉ...
जबाबदारी विचारली की अमक्याचा काय संबंध तमक्याचा संबंध....
वोट मागायला मोदीच्या नावावर अगदी ग्रामपंचायतीत ही मागणार... कामाची जबाबदारी आली का मोदीचा काय संबंध?
अगदी हेच हेच मी मोदीभक्तीत आंधळे झालेल्या सुजाण नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. की बाबारे तुझा नगरसेवक, तुझा आमदार, तुझा खासदार आज मोदीच्या नावावर तुला मत मागत आहे. उद्या काम झाले नाही तर तू कोणाला जाब विचारणार? तो मोदी म्हणेल माझा काय संबंध? आणि तो खासदार, आमदार नगरसेवक म्हणेल माझा काय संबंध विचार मोदीला, मत तर मोदीला दिले होते ना?

तो इसप्रकार मामला ऐसा है की हे लोक नेहमीप्रमाणे अंगावर आलेल्या कामाची कोणतीच जबाबदारी घेत नसतात, फक्त दुसर्‍याने केलेल्या कामाचे फोटो काढू काढु श्रेय घेण्यात पटाईत आहेत. हरामीपणा म्हणतात ह्या प्रवृत्तीला, बाकी काही नाही.

Gujji , कृपया वाक्याच्या शेवटी विरामचिन्हाचा वापर करावा, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते आम्हाला समजेल.

ग्रामपंचायत आणि नगरपालिका मध्ये पक्ष बघून मतदार मतदान करत नाहीत उमेदवार बघून करतात लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुकीत पक्ष बागितला जातो

हेला, तुम्ही लोकशाहीच्या धाग्यात सुचवल्याप्रमाणे जनजागृती का करत नाही? . जमलं तर सध्या बेकार असलेल्या काँग्रेसची मदत घ्या. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोदी कार्ड चालणार नाही.
नागरिकाशास्त्राच्या लंब्याचौड्या गप्पा मारायच्या आधी स्वतः अभ्यास करा.
आणि माझ्या मते हरामीपणा कशाला म्हणतात ते मी सांगतो.
1) 15 वर्षे राफुल गांधी खासदार, त्याआधीही काँग्रेसची सत्ता असतानाही अमेठीत अजून लोक चांगल्या रस्त्यांसाठी रडतात.
2) त्या रस्त्याच्या तक्रारींवर प्रियांका वद्रा 40 टक्के पैसे "इधर-उधर" द्यावे लागतात अस म्हणून भ्रष्टयाचाराच निर्लज्ज समर्थन करतात.

Gujji, तुमची ग्राउंड रिऍलिटी इथे लिहून पत्री पुलाच काम सुधारणार नाही. त्यापेक्षा त्या पुलाचे फोटो काढा आणि PMO, मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींना पाठवा. काही ठोस तक्रार करायची असेल तर सरकारच्या पब्लिक ग्रीवन्स वेबसाईट वर तक्रार टाका. एक नागरिक म्हणून वाईट गोष्टी राज्यकर्त्यांना दाखवून देणे आपली जबाबदारी ठरते.

चौकिदाराला जबाबदार ठरवायला हवे कि हो तुम्ही..!! >>>

DJ, मीरा नावाच्या आयडीन तुमका एक प्रश्न विचारल्यान आसा.. उत्तर नक्की देवा..

आता फोटो कशाचे ?
>>
कशाला PJ मारता राव?
ज्याला त्रास आहे त्या व्यक्तीला कशाचे फोटो काढायचे हे बरोबर समजतं.

Rofl पूल नेहरुने तोडला गुपचूप रात्रीतून येऊन. गडकरी, मोदी, फडनवीसला कायबी पत्ता लागला नाय.... व्हॉट्सप करा नाय तर ट्विटर करा गुज्जी भौ... मग ते तुम्हाला छानपैकी फोटोशॉप केलेल्या पुलाचा फोटो पाठवतील आणि म्हणतील के हे बघा झाला शांघायसारखा पुल एका रात्रीत....

भाजपच्या कामाबद्दल उत्तर विचारले की काँग्रेस काँग्रेस किंचाळायची सवय चांगली आहे. जंबुरे नाच करके बता, बच्चा लोग ताली बजाव.. Rofl

मीरा भायंदर कडून वसईकडे जातांना हॉटेल फाउंटेन जवळ खाडीवर एक पूल आहे. गेली पाच वर्षे त्याचे काम सुरुच आहे म्हणे. दोन्ही बाजुने तासभर थांबावे लागते. ते काम कुठवर आले काय माहित. बहुतेक गडकरी रोज बांधत असतील आणि नेहरु रोज रात्री पाडत असेल...

हेला, फालतू जोक मारण्यापेक्षा इथे त्या पत्री पुलाचा आणि भाजपचा संबंध नाही असं कोण म्हणाल ते सांगा....

प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ आली की नेहमी पळ काढता...

'बस दोस्ती बनी रहे"
"पुद्दुचेरी को वणक्कम'
नो प्रेस कॉन इन फाइव लॉण्ग यीअर्स..
पळ काढण्यावरुन आठवले...

इथे त्या पत्री पुलाचा आणि भाजपचा संबंध नाही असं कोण म्हणाल ते सांगा....

--- म्हणजे आहेच ना संबंध? बोल जमुरे सब को उछल उछल के सच बता.... बच्चा लोग ताली बजायेंगे.

Pages