चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आपले ४४ जवान पुलवामा मधे चौकीदाराच्या झोपांमुळे मारले गेले त्याबद्दल एक अवाक्षर की हो नाही तुमच्याकडुन..!>>>>>> डिजे, दुसर्‍या बाफावर मी लिहीलेच होते त्या विषयी. मला माहीत होते की हे कोणामुळे घडले, का घडले, कशासाठी घडले हे पण प्रश्न येतीलच. त्याचा तपास केला जावाच. मग इतिहास खणायचा तर मुंबईत बाँब स्फोट का घडले इतपासुन सुरुवात होऊ शकेल.

दाऊदला भारताबाहेर पळवण्यासाठी कोणी मदत केली, भोपाळ दुर्घटनेच्या अँडरसनला पळुन जायला कोणी मदत केली हे पण आहेच. मात्र हे प्रश्न दुसर्‍या बाफावर सोयीस्कररित्या डावलले गेले. तरी बरे, आज लोकसत्तात ( लिंक उघडा बरे ) प्रकाश आंबेडकरांनीच आरोप केलेत अजाण राजावर. आणी ते ही दाऊद बाबतीत. सत्तेत काँग्रेसच अस्तांना मुंबईच्या किनार्‍यावर RDX कशी उतरवली गेली हे पण मुद्द्यात आहेच की.

असे अनेक आरोप प्रत्यारोप भाजपा- काँग्रेस मध्ये होत रहाणार. स्थानिक लोक या बाहेरच्यांना सामिल असतात हे पण कैक वेळा सिद्ध झालेय. यात दोन्ही धर्माचे लोक आहेत, जे पैसा आणी धर्म दोन्हीच्या लालसेला बळी पडलेत. पुढे काय?

टु बी व्हेरी फ्रँक, तो मल्ल्या टुल्ल्या काय आणी तो नीरव काय, यांनी नुसते मोदी वा राहुलचे नुकसान नाही केलेय, तर पूर्ण देशवासीयांचे नुकसान केलेय, बँकांचे केलेय. त्याला आता परत आणले जातेय तर केव्हा येणार? कसा येणार? सकाळी येणार का दुपारी? या का पुढल्या महिन्यात असेच प्रश्न अव्याहत सुरु रहाणार. तोड नाही !

ट्विटर ज्ञान-
२०१४ मै आश्वासन दिया था की देश को जपान बनायेंगे
लेकिन २०१९ मै देश नेपाल बन गया #मैभीचौकीदार

आताचा चोकीदार खूप कडक आहे बाबा चोरी केली की लगेच पकडतो त्या पेक्षा तो पहिलाच बरा होता चोरी होत असेल तरी डोळे बंद करून घायाचा

आताचा चोकीदार खूप कडक आहे बाबा चोरी केली की लगेच पकडतो>> +++१११ हो ना... आणि काहीशे करोडची चिरीमिरी पार्टी फंड म्हणुन दिली की लगेच ९-१०-१२ हजार करोडच्या बॅगांसहीत चोराला विमानात बसवुन देतो. असे बरेच चोर त्याने विमानात बसवुन परदेशी घालवले.. उदा. मल्ल्या, नीरव मोद्या, ललित मोद्या.., ...., ...., ....

चोर चोर्‍या करत असताना ड्युटीवर कोण होते म्हणण्यापेक्षा चोर चोरी करुन बॅगा भरुन पळुन जाताना ड्युटीवर कोण होतं त्याची जबाबदारी आहे.

आत्ता प्रश्न हाच की चोर चोर्‍या करुन बॅगा भरुन पळुन जात होता तेव्हा त्याला पकडणे शक्य होते का आता दुसर्‍या सोसयटीमधे पकडुन त्याला आपल्या सोसायटीमधे आणणे शक्य आहे..??

Rofl

पीएनबी: थे थुम्हि लोक चोर चौकिदार खेलत र्‍आवा आंदी मांझे पैचे कधी परत मिर्नार थे शांआ...

१००

DJ, मला राजकारणातील काही कळत नाही आणि कणभरही इंटरेस्ट नाही. पण मला डिटेक्टिव्ह कथा खूप आवडतात. आता सांगा की फेसबुकवरचे 'बोक्या शेठ' तुम्हीच की तुम्ही वर लिहिलेला लेख त्यांच्या फेसबुक पेजवरून चोरला आहे?

त्यांची पोस्ट 18 मार्चची आहे. नाही तर उलट येऊन तुम्हाला रिपोर्ट केलं असतं की तुमचा चौकीदार बोक्याने चोरला

योग DJ यांना ... ७० वरशाचा हिशेब मागणे आता चूक आहे,... ५वर्षात काय काय झाले ते सांगा ... . चौकीदार खरे बोलतो काय... म्हणे २कोटी रोजगार देणार होता (अमेरिकेतील मेंबर्स क्षमा करा) पण भारतातील नागरिकांनी तुमच्या किती मुलाबाळांना चांगला रोजगार १६ मे २०१४ नंतर मिळाला हे आपल्या घरी आजूबाजूला अन मित्र परिवार व नातीवाईकत बघा असे खरोखर रोजगार मिळाले असल्यास नक्की या धाग्यावर सांगा आणि असे नसेल तर नक्की खोटे बोलले गेले आहे सत्य माना (निदान मनात तरी), चौकीदार प्रत्येक झिल्ल्यात मेडिकल कॉलेज काढणार होता पण असे काही घडले नाही, निरव मोदी, मल्या हे तर चौकीदार कडक ना खाऊंगा न खाणे दुंगा अश्या अत्यंत कडा पहर्यातून पैसे घेऊन सहली सलामत पळले आणि नंतर चौकीदार इंग्लंड मध्ये बुकिंघम पलेस मधे राणी बरोबर भेटून आला पण आज पर्यंत पकडू शकला काहीही वाकडे करू शकला नाही बजेत चे पहिले वाक्य म्हणे agriculture income doubled म्हणजे समजा कल शेतकऱ्याचा घरात २०००० होते तर १फेब्रुवारी २०१९ सकाळी बघतात तर काय ४०००० झालेले, मी मुद्दाम अनेक अग्रिकल्चरिस्त कुटुंबियांना पेपर मधील बातमी दाखवून खरोखर असे काही घडले का असे विचारले, पण एकही जण असे काही घडले असे बोलला नाही,. अजून एक चौकीदार ... .. २०१५ मधे म्हणाला .... कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी करतो ...६५०० कोटी देणार.... १ लाख रोजगार तयार होणार. .. आणि २०१९ मधे रस्ते असेच खड्डे असलेले अता आपण यांना आपण स्मार्ट खड्डे म्हण्याचे... पत्री पुल पडून रोज २तास ट्रॅफिक जाम होतो तो सोसत स्मार्ट आनंद घायचा .... MIDC मधे अनेक कंपन्या बंद पडून अनेक रोजगार नक्की गेले... ..... तर असा आपला .अनुभव ... चूक भूल असल्यास क्षमा मागतो... ...... बाकी मतदार सुज्ञ आहेच....

सध्याच्या चौकीदाराच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला हाकलून लावण्याची वेळ जवळ आली आहे.
ज्यांना खून झालेले दिसत नसतील ते अजून बोळ्याने दूध पित असावेत.

ते बीजेपी वाले ४० पैसे देतात असे ऐकलेय..हेला डिजे भरत ह्याना एवढ्या पोश्टी टाकाव्या लागतायत वाटते १० पैसे मिळत असावेत

मायबोली वरच्या तमाम नमोरुग्णांची अवस्था मे मध्ये निकाल लागल्यानंतर खरोखरच वाईट होणार आहे. आजारपण तीव्रतेने उफाळून येणार आहे. त्यात प्रामुख्याने मूळव्याध,बद्धकोष्ठ,स्किझोफ्रेनिया,गळू,हृदयविकार या आजारांचा समावेश असेल.
भारतात रहात असतील तर ठीक आहे. पण दुसऱ्या कोणत्या देशात रहात असतील तर उपचारांचे खर्च परवडणार नाहीत. त्यांनी मे नंतर आयुष्मान भारत योजनेत उपचार करून घ्यावेत हि सूचना देऊन ठेवत आहे.

Gujji, 5 वर्षांत काय झाले यावर योग यांनी एक धागा काढला होता. तो वाचा.

agriculture income doubled ची डेडलाईन 2019 ची होती का ते पुन्हा तपासा.

मोदी कल्याणला स्मार्ट सिटी बनवणार म्हणजे जादूची कांडी फिरवणार नि कल्याण स्मार्ट सिटी बनणार अस आहे काय? तुम्ही जे नगरसेवक/ आमदार कल्याणमध्ये निवडून दिलेत ते काय करत आहेत याचा जाब तुम्ही त्यांना विचारलाय का? कारण रस्ते चांगले ठेवणे (राष्ट्रीय व राज्य महामार्ग सोडून, कारण ते अनुक्रमे केंद्र व राज्य सरकार पाहते) हे महानगरपालिकेचे काम आहे.

बाकी मोदींना हटवल्यावर तुम्ही म्हणता सर्व गोष्टी नक्की कशा सुधारतील ते सांगता काय? कुणी काही आश्वासने दिलीत काय?

एकच पोस्ट परत परत चिकटवली तरी पैसे मिळतात का हो लखू रिसबूड?

निरव मोदीच्या अटकेबद्दल द टेलिग्राफचे आभार .

एकच पोस्ट परत परत चिकटवली तरी पैसे मिळतात का हो लखू रिसबूड?

मी पण हेच विचारणार होतो..

निरव मोदीच्या अटकेबद्दल द टेलिग्राफचे आभार .

मला वाटत, की केवळ दीड आठवड्यात भारतीय ईडी कडून तक्रार स्वीकारून, तिचा नीट अभ्यास करून, निरव मोदी विरुद्ध वॉरंट काढणार्या व त्याला अटक करणाऱ्या ब्रिटिश सरकारी व्यवस्थेचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत.

अरे वा !
फारच लवकर ध्यानात आले................ म्हणजे अजूनही सुधारण्याच्या आशा आहेत म्हणायचे तर !
अनुभव असा आहे कि रुग्णांना आपण नक्की काय करतोय? कुठे चाललोय हेच ध्यानात येत नाही.
पहिली पायरी म्हणजे अशा काळजीतून आलेल्या प्रतिसादांची दाखल घेणे.
ती तुमच्याकडून घेतली गेली ..... आनंद वाटला.

आता पुढची पायरी- त्या प्रतिसादातील शब्दांचा अर्थ समजावून घेणे.
हळूहळू प्रयत्न करत राहावे. नक्की जमेल

मला वाटतं अशा प्रकारच्या प्रतिसादाला सर्वांनीच दुर्लक्षित करून मूळ विषयावर चर्चा करावी

<< निरव मोदीच्या अटकेबद्दल द टेलिग्राफचे आभार . >>
----- पहिले तो अनेक वर्षे गैर-व्यावहार करत होता.... भाजपाची केंद्रात सत्ता असताना तो अलगद देशाबाहेर निसटला. याआधी पण विजय माल्या, ललित मोदी, चोक्सी निसटले. भ्राष्टाचारी दिवसा ढवळ्या, कॅमेर्‍यासमोर, अनेक सुरक्षा रक्षकांच्या साक्षीने विमानात बसुन देशाबाहेर निसटले याचा अर्थ चौकीदार गाढ झोपलेले होते.

टेलिग्राफने फोटोसकट वृत्त दिले नसते तर "कुणाला" यांगपत्ताही नसता लागला. आता एव्हढी मोठी बातमी आलीच आहे तर काहीतरी हालचाल करणे भाग आहे.... अटकेसाठी साकडे... आता अजुन कागदी घोडे नाचवायचे... तो पर्यंत निवडणूका होतातच....

भ्रष्टाचारा विरुद्ध लढताना भाजप कुठल्याही अर्थाने काँग्रेस पेक्षा काठोर किंवा प्रामाणिक नाही आहे.

उदय ह्या मध्ये एक पॉइंट वर चर्चा झाली पाहिजे .की निरव मोदी असेल किंवा मल्ल्या असेल हे जेव्हा देश सोडून गेले तेव्हा fir नोंदवून किती दिवस झाले होते आणि त्यांची परदेशवारी थांबण्ासाठी लागणारे पुरावे सरकारकडे होते का

मला तर नीरव मोदी प्रकरण अजून भयानक वाटत आहे, त्याने जे कर्ज उचलले होते , ते त्याच्या व्यवसायास म्हणजे हिरे खरेदीला असणार,

पण जिथे तिथे फक्त त्याची घरे व चररदोन पोस्टर जप्त झाले आहेत , हिरे गायबच आहेत,

जप्तीच्या वेळी करवंटी देऊन खोबरे पळवले गेले असणार

मला तर नीरव मोदी प्रकरण अजून भयानक वाटत आहे, त्याने जे कर्ज उचलले होते , ते त्याच्या व्यवसायास म्हणजे हिरे खरेदीला असणार,
त्यांनी खोटे हिरे त्याच्या ग्राहकाला विकले हा सुधा आरोप ग्राहक करत आहेत

The government may also seek details of any overseas travel planned by promoters of companies which have defaulter on loan payment .it takes some time before a loan default is classified as NPA and years to uncover a fraud taking advantage of this promoters of such companies flee from the country in advance

मी उपरोधिक पणे लिहिलेलं बऱ्याच जणांनी गंभीरपणे घेतलेलं दिसत. टेलिग्राफ मध्ये निरव मोदी बद्धल छापून आले म्हणून दीड आठवड्यांत कुठलाही देश अशी कारवाई करू शकत नाही. उलट त्याचा ठावठिकाणा ईडी आणि इंटरपोलला लागला तेव्हा ती बातमी सरकारी लोकांकडून टेलिग्राफला लीक झाली असेल असे माझे मत आहे.

लखुु रीसबुड आणि ShashankP रोजगार कीती तयार झाले यावर तुम्‍ही गप्‍प, कारण अनेक जणांचे रोजगार बुडले ही सत्‍य गोष्‍ट आहे, अग्री इंकम वर ओपनींंग स्‍पीच स्‍टेटमेंट होते, कल्‍याण मधे मुंंबई नाशिक राष्‍ट्रीय मार्गजातो,तर मला म्‍हणायचे होते की हे फेकु लाेेेकांनी फक्‍त अश्‍वासने दिली पैसा दिला नाही 2015 पासूुन काहीही स्‍माट ि‍सिटी साठी केलेलेनाही आणि म्‍हणे रोज 16कीमी रस्‍ते बनवतो पण 135 मिटर्स चा पुल पाडून अनेक महीने नवीन न बांधल्‍यामुळे आज रोज 2तास 135 मिटर्स पार करण्‍यास लागतात, रोजगारावर वेळेवर दोन दोन तास अधि ि‍निघुन न पोचल्‍यामुळे खाडे लागतात लोकांचे हाल होतात आण तरीही लोकांनी यांच्‍या बातांवर विश्‍वास का ठेवावा पुढाा'याने निदान खाेेेटे बोलू नये लिन्क देतो (https://www.loksatta.com/thane-news/chief-minister-devendra-fadnavis-dec...)
(https://timesofindia.indiatimes.com/city/thane/cm-devendra-fadnavis-fail...) (https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Government-will-create-1...

भक्त काहीही अन्‍य बघु शकत नाहीत तरीही अेकदा या लींक वाचा आणि या बातम्‍या वाचल्‍यावर यांचे राणा भिमदेवी अश्‍वासने म्‍हणजे निव्‍वळ धळफेक आहे हे समजते

ग्रामपंचायत ,नगरपालिका ,जिल्हा परिषद ,महानगर पालिका,राज्य सरकार ,केंद्र सरकार प्रतेकाच्या अधिकार आणि कामाच्या सीमा रेषा आहेत .पूल नाही बांधला ह्याला केंद्र सरकार कसे जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारात असेल तो त्याला विचारा .
प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान कसे जबाबदार असतील

Pages