चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
नालायक लोकांना काढून टाका,
नालायक लोकांना काढून टाका, लायक लोक आपोआप येतील.
ज्याचा भावोजी इस्टेट एजंट
ज्याचा भावोजी इस्टेट एजंट असून जमिनी चोरतो अशा एका मतिमंद माणसाचं नाव नवीन चौकीदार म्हणून सुचवलं जातंय. त्याला तुम्ही विचारलं कि तू गेल्या १५ वर्षांच्या अनुभवात काय केलंस? तर तो फक्त दाढीवाल्या चौकीदारावर आरोप करत सुटतो ! त्याची बाजू घेणाऱ्यांनाही त्याने १५ वर्षांत नक्की काय केलं ते सांगता येत नाहीय..
- एक सोसायटी मेंबर
Lol. संयम संपला.bearing सुटलं
Lol. संयम संपला.bearing सुटलं.
मतिमंद, चाटू शब्दसंपत्ती उधळणं सुरू झालं.
आता तर एकच धागा काढलाय मी.
अभी तो इनको बहोत जलील होना
अभी तो इनको बहोत जलील होना बाकी है
(No subject)
एका मतिमंद माणसाचं नाव नवीन
एका मतिमंद माणसाचं नाव नवीन चौकीदार म्हणून सुचवलं जातंय >>> हे पात्र या कथेत असायला हव होत. किंवा लेखक महाशय घाबरत असतील त्यांच्यावर लिहायला
Lol. संयम संपला.bearing सुटलं
Lol. संयम संपला.bearing सुटलं.
मतिमंद, चाटू शब्दसंपत्ती उधळणं सुरू झालं.
आता तर एकच धागा काढलाय मी.
>>> मी कोणाचं नाव लिहिलं नाही तरीही एव्हढा जळफळाट? lol
लागला.. तीर निशाण्यावर लागला.
लागला.. तीर निशाण्यावर लागला..!!
चौकीदार बदलणं अजुनही आपल्या
चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा. >>>> सेक्रेटरी, खजीनदार आणि दोन कावेबाज सभासद सोडून जर सगळ्यांकडे चोर्या आणि त्यांच्या नातलगांचे खून होताहेत तर आशा कशाला पाहिजे ... चौकीदार बहूमताने बदलता येईलच की. पण सगळ्यांकडे जर चोर्या झाल्याच नसतील आणि खून सुध्दा पडले नसतील तर मात्र अश्या कंड्या पिकवणारे इतर सभासद आपल्या अफवांवर विश्वास ठेवतील अशी आशाच करू शकतात. अश्या कंड्या पिकवणारे हे पुर्वीचा चौकीदार (जो नेहमी चोर्या होताना बघायचा पण डोळे झाकून घ्यायचा) असताना सोसायटीच्या सार्वजनिक मालमत्तेचा दुरूपयोग करणारे, सोसायटीच्या रक्कमेचा स्वतःच्या आणि स्वतःच्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी अपहार करणारे, सोसायटी मध्ये चोर्यामार्या करणारे पण नविन चौकीदार आल्यापासून ज्यांचे पुर्वीचे धंदे बंद पडल्यामुळे उपासमारीने विव्हवळत असणारेच असतील हे वेगळे सांगणे न लगे.
जुन्या चौकीदाराची निवडच मुळी सोसायटीच्या काही धुर्त व चोर सभासदांनी स्वत:ची चोरी उघडकीस येऊ नये म्हणून केली होती.
सर्व मित्रांना एक विनंती
सर्व मित्रांना एक विनंती मुळात वरील लेखन अतिशय बालिश वाटते. यावर प्रतिसाद विचार करून दया.
वैसे आयेगी तो भाजपा ही
लागला.. तीर निशाण्यावर लागला.
लागला.. तीर निशाण्यावर लागला..!! >>
औषध लावून घ्या.. जखम चिघळायला देऊ नका भाउ
पू निघतोय तर निघु द्या..
पू आपणहुन निघतोय तर निघु द्या..
पू आपणहुन निघतोय तर निघु द्या
पू आपणहुन निघतोय तर निघु द्या.. Rofl >>
तुमचं चालूदे.. फक्त सांभाळा स्वतःला आणि घाबरू नका.. तुम्हाला २०१९ च्या निवडणुकीचा निकाल ऐकायला देव धैर्य देवो हीच सदिच्छा
तुम्हीच तर चालवताय आमचं..
तुम्हीच तर चालवताय आमचं.. आम्हाला कुठे सायास पडताहेत
त्या वात्रट चौकीदाराने त्या
त्या वात्रट चौकीदाराने त्या बाहेर पळुन गेलेल्या गुंडाला अटक करवली बरं का !
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pnb-fraud-case-nirav-modi-arre...
वा वा.. मग आता परत भारतात कधी
वा वा.. मग आता परत भारतात कधी आणताहेत..? की त्या मल्ल्या अंकलसारखं ५ वर्षं चोर-पोलिस खेळणार..??
Pnb fraud favouring nirav
Pnb fraud favouring nirav Modi started in 2008
आणि जानेवारी 2018 मध्ये मोदी
आणि जानेवारी 2018 मध्ये मोदी सरकारनी हा घोटाळा उघड केला
बरं मग त्याला पळुन जाण्यासाठी
बरं मग त्याला पळुन जाण्यासाठी कितिचा हफ्ता घेतला बरे चौकीदाराने..?
मोदींचे मित्र निरव मोदी,
मोदींचे मित्र निरव मोदी, मेहुल चोक्सी.
2008 पासून ज्यांनी डोळे झाकून
2008 पासून ज्यांनी डोळे झाकून घेतले होते त्यांना सुधा प्रश्न विचारा
कॉंग्रेसने भारतातले मोदी
कॉंग्रेसने भारतातले मोदी सरकार उलथवून टाकायला २०१५ मधे पाकिस्तानकडे मदत मागितली होती तश्याच मदतीची गरज २०१४ मधे कॉंग्रेसला निरव मोदीकडून अपेक्षित असावी. म्हणूनच २००८ पासून भेष्टाचार करणार्या निरवला कॉंग्रेसने हात देखील लावला नाही.
ह्या चोर्टाकसकडे काहीही नविन
ह्या चोर्टाकसकडे काहीही नविन मुद्दे नाहीत. २०१५ मध्येच कॅसेट अडकली आहे तेही चुकीच्या गाण्यावर.
@ किरणुद्दीन....Nirav Modi
@ किरणुद्दीन....Nirav Modi Arrested in London....मोदी च येणार .. :-):-)
हातातोंडाशी आलेला घास ( ५
हातातोंडाशी आलेला घास ( ५ राज्यात काँग्रेसला मिळालेला विजय ) नेमका पुलावामा अॅटॅकने हिरावुन घेतला. वास्तवीक , त्यात राहुल गांधी आणी पर्यायाने काँग्रेसला नवीन संजीवनी मिळावी होती. पण नेमके देशावर परत हल्ला झाला आणी मोदींनी सैन्याला पूर्ण अधिकार दिले. आणी त्यात अभिनंदन्कुमार पण सुखरुप घरी परतला. आठवते का सौरभ कालिया केस? काही म्हणा, लोकांचा विश्वास मोदींनी परत संपादन केलाय. इथे कितीही धागे काढा, चर्चा करा. इतक्या वर्षात शत्रुला जरब बसली नाही ती आता बसायला लागली आहे. ( नोट : बसायला लागली आहे, पूर्ण बसलेली नाही )
मल्ल्या आणी नीरव मोदी यांना मी देशात परत आणीनच हे पण पंप्र मोदींनी सांगीतले होते, ते आता दिसु लागल्याने काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली असेल. ते कबुल करणार नाहीतच हो. सोडुन द्यायचे. देशाचे अपराधी परत येतील तेव्हा परत होळी खेळु, येतीलच ते. प्रत्येक पापकर्माची सजा ही मिळतेच, मग ती लवकर असो वा उशिरा.
पोराने पहिल्यांदा हातात सिगारेट धरली तेव्हा बाप वरडला होता, पण मायने त्येला पदराखाली झाकला . आता जेव्हा पोरगं सिगारेटच्या आहारी ग्येलं तवा, माय त्या पोराच्या बापालाच वरडतीय. धन्य हो !
कोणत्या भावविश्वात अशा
कोणत्या भावविश्वात अशा बातम्या येतात ते माहिती आहे. आयटीसेल एका वेगळ्या पॅरलल युनिवर्सिटीत मग्न असते....
China on Tuesday assured Pakistan of firm support to protect its territorial integrity and dignity during a high-level bilateral strategic dialogue in Beijing. At this meeting, Islamabad had raised the “rapidly deteriorating” situation in Kashmir and called on New Delhi to relook its policies in the state.
कालचीच बातमी. मोदीजी चिन्याला झोके देत बसले, आणि त्याने पाकिस्तानला मांडीवर घेऊन खाऊ घालायला सुरुवात केली. आता म्हणा ह्याला नेहरुच जबाबदार.
हातातोंडाशी आलेला घास ( ५
हातातोंडाशी आलेला घास ( ५ राज्यात काँग्रेसला मिळालेला विजय ) नेमका पुलावामा अॅटॅकने हिरावुन घेतला. वास्तवीक , त्यात राहुल गांधी आणी पर्यायाने काँग्रेसला नवीन संजीवनी मिळावी होती. पण नेमके देशावर परत हल्ला झाला आणी मोदींनी सैन्याला पूर्ण अधिकार दिले. आणी त्यात अभिनंदन्कुमार पण सुखरुप घरी परतला. आठवते का सौरभ कालिया केस? काही म्हणा, लोकांचा विश्वास मोदींनी परत संपादन केलाय. इथे कितीही धागे काढा, चर्चा करा. इतक्या वर्षात शत्रुला जरब बसली नाही ती आता बसायला लागली आहे. ( नोट : बसायला लागली आहे, पूर्ण बसलेली नाही ) >> आपले ४४ जवान पुलवामा मधे चौकीदाराच्या झोपांमुळे मारले गेले त्याबद्दल एक अवाक्षर की हो नाही तुमच्याकडुन..!
पुलावमा तर जसे घडलेच नाही असे
पुलावमा तर जसे घडलेच नाही असे वागत आहेत, त्याची जवाबदारी कोणाची?
पुलावमा तर जसे घडलेच नाही असे
पुलावमा तर जसे घडलेच नाही असे वागत आहेत, त्याची जवाबदारी कोणाची?>> हे काय विचारणं झालं का..? अर्थात ७० वर्षांपुर्वी जो चौकीदार होता त्याचीच...!!
फितूर कोण आहे ह्याचा शोध
फितूर कोण आहे ह्याचा शोध सरकार घेत असेल जसा निरव मोदी पकडला तसा फितूर पण सापडेल थांबा थोडे दिवस
Pages