चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
५० वर्षांचा शिशु आता लंगोट
५० वर्षांचा शिशु आता लंगोट नेसून सर्वांना का़का काका म्हणायला येईल.... कुण्णी त्याला ओळ्ळखणारच्च नाही !
(No subject)
चौकीदार चोर है वर मै भी
चौकीदार चोर है वर मै भी चौकीदार हूं हे भारी काढले पण, काही म्हणा!
मी भी _कीदा__
मी भी _कीदा__
पुन्हा म्हणाल अपशब्द का वापरता !
https://www.bbc.com/news
https://www.bbc.com/news/world-asia-india-46341433
नाही हो किरणूद्दिन, काय
नाही हो किरणूद्दिन, काय म्हणायचे ते म्हणा
नरेंद्र लहान होता तेव्हाची
नरेंद्र लहान होता तेव्हाची गोष्ट. मुलांचे मन चंचल असते, त्यांना नवनवीन गोष्टींचे आकर्षण असते, त्यात कमीपणा जास्तपणा वाटत नसतो.
एकदा अशीच सर्व मुले जमली असताना मोठेपणी कोण होणार यावर चर्चा सुरू झाली.
मुलांची चर्चा चालू असताना मोठी माणसे कौतुकाने ऐकत होती. बाल नरेंद्र ची पाळी आली. नरेंद्र स्वप्नाळू दृष्टीने उद्गारला मी मोठेपणी चौकीदार होणार.
वडीलांचा चेहेरा झर्रकन उतरला, त्रासिक झाला. ते तापट होते. त्यांना मुलाच्या उत्तराने चारचौघात अपमान झाल्यासारखे वाटले.
नरेंद्रच्या माता तिथेच होत्या. त्या शांत, सुस्वभावी होत्या, विचारी होत्या, सेवाभावी होत्या. त्यांनी लगेच छोट्या नरेंद्र ला उचलले व तेथील पाताळात गाडलेल्या बळी राजा व राखणदार भगवान विष्णू यांच्या तस्बिरीसमोर उभे केले व म्हणाल्या बेटा नरेंद्र ! हो, तू मोठेपणी अवश्य चौकीदार हो! पण जगाचा सर्वात मोठा चौकीदार म्हणजे भगवान विष्णूच ! त्याच्यासारखी राखण कर. तो बळी राजाचा द्वारपाल तर आहेच पण इतरांचाही तो चौकीदार आहे. तू तसा चौकीदार हो!
वातावरण निवळले. वडीलांचीही बेचैनी दूर झाली.
अरे बापरे.. हा
अरे बापरे.. हा सत्यनारायणाच्या भाकडकथेतला ९ वा अध्याय का?
वातावरण निवळले. वडीलांचीही
वातावरण निवळले. वडीलांचीही बेचैनी दूर झाली. >>>
अरे बापरे हा धाग्यातल्या भाकडकथेचा प्रिकवेल आहे का?
चौकीदारच्या ढेंगेखालून चोर
चौकीदारच्या ढेंगेखालून चोर घुसतायेत आणि पळतायेत , त्यामुळे वैतागून सर्वांना चौकीदार करून जबाबदारी टाळली .
सोसायटीची मीटिंग झाली पण फक्त
सोसायटीची मीटिंग झाली पण फक्त एक दोन सभासदांना चोकिदार च चोर आहे आस वाटलं पण बाकी सभासदांनी पूर्वीच्या सर्व चोरीच्या केसेस तपासल्या आणि चोकिदर निर्दोष आहे हे ठरवून चोकीदर बदल हा ठराव फेटाळून लावला
आणि नंतर तपासात आस निष्कर्ष
आणि नंतर तपासात आस निष्कर्ष काढण्यात आला की सोसायटी मध्ये चोऱ्या होतच नव्हत्या आणि कोणाचे खून सुधा होत नव्हते फक्त तशा प्रकारची स्वप्न काही सभासदांना पडत होती.आणि ते स्वप्न खर आहे असे समजत होते
चोऱ्या होत नव्हत्या? मग पकडून
चोऱ्या होत नव्हत्या? मग पकडून कोणाला आणायच्या बाता मारत आहेत.
तुमच्या बिल्डिंगचा चौकीदार
तुमच्या बिल्डिंगचा चौकीदार रोख पैसे घेतो की cashless चा आग्रह धरतो?
DJ. >>> तुमच्या भिकार कुठे
DJ. >>> तुमच्या भिकार कथेसारखाच सारखाच हा पण एक भाग आहे ...
मायबोलीकर सावधान , काँग्रेस
मायबोलीकर सावधान , काँग्रेस आयटी सेल मधली मंडळी एक एक धागे काढत सुटली आहे, ऍडमिन आवरा ह्यांना ...
आणखीन एक ...
कितीही धागे काढा पुन्हा मोदीच येणार
पुन्हा, नीरव कि ललित ?
पुन्हा, नीरव कि ललित ?
किरणुद्दीन - तुमच्या बुद्धीची
किरणुद्दीन - तुमच्या बुद्धीची किंवा येते ... जे निवडणूक लढवणारंच नाही त्यांचा जप करत बसला आहात ... जरा सामान्य ज्ञान वाढवा कि
काबेबाज मंडळींमध्ये एवढी
काबेबाज मंडळींमध्ये एवढी घबराट का पसरली आहे पण?
काबेबाज मंडळींमध्ये एवढी
काबेबाज मंडळींमध्ये एवढी घबराट का पसरली आहे पण?
अर्थातच पुन्हा मोदी येतील म्हणून घबराट पसरलीय, खास करून सर्जिकल स्त्राईक 2 मुळे राजकीय युद्ध हरल्याची भावना या मंडळींत आलीय. त्यामुळे इथे एकामागोमाग एक धागे काढणे , कावेबाज मंडळींच्या कंपुतील पत्रकारांनी दर एक दिवसाआड मोदींविरोधी लेख लिहिणे, त्यांच्या कबिल्याच्या सरदाराने तावातावाने पुरावाहिन आरोप करून फाटक्या स्वरात ओरडणे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
अरे बापरे.. हो का? अजुन काय
अरे बापरे.. हो का? अजुन काय काय वाटतं बरे तुम्हाला?
अरे बापरे.. हो का? अजुन काय
Duplicate
अरेच्चा ! म्हणजे नीरव मोदी
अरेच्चा ! म्हणजे नीरव मोदी आणि ललित मोदी परत येणार नाहीत तर... एव्हढं चिडायचं काय त्यात !
सांगा नाही जमत
ट्विटरवर वाचलेलं
ट्विटरवर वाचलेलं
चौकीदार काय करतो? श्रीमंत लोकांच्या घराबाहेर पहारा देतो, त्यांचं रक्षण करतो.
चौकीदार काय करतो? श्रीमंत
चौकीदार काय करतो? श्रीमंत लोकांच्या घराबाहेर पहारा देतो, त्यांचं रक्षण करतो.>> म्हणजे मल्ल्या, निरव मोद्या, ललित मोद्या, अडाणी, अंबानीच्या घराबाहेर का?
आता सोसायटी वर पण काहीतरी
आता सोसायटी वर पण काहीतरी लिहा ..
अरे बापरे.. हो का? अजुन काय
अरे बापरे.. हो का? अजुन काय काय वाटतं बरे तुम्हाला?
बरंच काही वाटतं, पण ते ऐकणं फालतू जोक मारणाऱ्यांना झेपायच नाय नि मला मायबोलीची बूज राखायचीय .. जोकर मागच्यावेळसारखे ऍडमिन कडे रडत जायचे उगाच.. म्हणून लिहीत नाही.
घबरु नका.. बिनधास्त लिवा...
घबरु नका.. बिनधास्त लिवा... मायबोली आपलीच असा..
घबरु नका.. बिनधास्त लिवा...
घबरु नका.. बिनधास्त लिवा... मायबोली आपलीच असा..
मी बिनधास्तच लिहीतो आणि लिहीत राहीन , कोणालाही घाबरत नाही....
चाैकीदार साठी नवीन नाव नाही
चाैकीदार साठी नवीन नाव नाही सुचविले सोसायटी सभासदांनी की उमेदवारच नाही.
Pages