"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आधीच सोडली बहुतेक कारण त्याच वेळी माझे मन तुझे झाले सुरु झाली दुसरीकडे, त्यात रमले. >>>> मी सुद्दा.

रक्षाबंधनाच्या दिवशी नी ने समजावलं पण बोलायला कधीपासून लागला बहिणीशी, तो सीन आठवत नाहीये.

मी बाप्पा आला त्या दिवसाचे नाही बघितलं पण उद्याचं कदाचित पहिल्यांदा बोलणार असेल.

हो अंजू, आज शेवटचा होता असं वाटतंय कारण शेवटी पुभा दाखवलं नाही. छ्या, चांगली मालिका लवकर संपवली. मागचे दोन एपि बघायचेत अजून. मला वाटत होतं की पूर्वाला दिवस गेले असतील, पण तसं काही नव्हतं. स्नेहालय बद्दल वाचलं होतं आधी. आप्पांचा रूसवा लगेच गेला, फुसका बार निघाला. मुली जन्माला घाला हा सामाजिक संदेश देऊन झाला.

हो उत्तम मालिका, लॉजिकल बोलणारे नॉर्मल माणस हे बहुधा प्रेक्षकाना वेगळ वळण लावतिल आणी आपल्या निर्बुद्ध मालिकात प्रेक्षक लॉजिक वैगरे शोधतिल की काय अस झी ला वाटल असेल. असोच... मालिका खरच चान्गली होती आणी फारच घाइघाइत सन्पवली.

हम्मम खरं आहे. प्रमोशन पण फार केलं नाही ह्या मालिकेचं. मी त्यांच्या fb पेजवर पण लिहिलेलं. अजून एक दोन जणांनी लिहिलं होतं.

या लोकांना चला हवा येऊ द्यामध्ये का नाही बोलवत. लागीरं ची टीम आत्ता परत येऊन गेली. त्यापेक्षा यांना बोलवायचं ना. सगळे नगरमधेच राहात असतील आणि नोकरदार असतील असा एक अंदाज (काही अपवाद).

काल, मकरंद अनासपुरेचा "कायद्याच बोला" बघत होते. एका कैद्याच्या भूमिकेत आप्पा बोराडे दिसले.

माझा पुरस्कार सोहळा बघायला गेले होते. तिथे परागची आई आली होती. तिला कुणी ओळखत नव्हते आणि तिच्याशी बोलायलापण जात नव्हते. बाकी बरेच तारे आल्यामुळे ती झाकोळली गेली होती.

माझा पुरस्कार सोहळा बघायला गेले होते. तिथे परागची आई आली होती. तिला कुणी ओळखत नव्हते आणि तिच्याशी बोलायलापण जात नव्हते. बाकी बरेच तारे आल्यामुळे ती झाकोळली गेली होती. >>> कोण anchoring करत होत्या त्या का. मला कुठेतरी बघितल्यासारखे वाटलं पण परागची आई असं वाटलं नाही. फार वेगळ्या दिसत होत्या.

विकी कौशलने मराठीतून आभारप्रदर्शन छान केलं, त्याला award मिळालं.

यातला पराग आणि आरती (पूर्वाची मैत्रीण) यांच लग्न झाल्याचे फोटो पाहिले नुकतेच. Happy

बाकी या सिरियल मधली लोकं अगदी साधी होती.

अंजू, अशोक मुळे यांचा माझा पुरस्कार सोहळा शिवाजी मंदिरला झाला काही दिवसांपूर्वी. स्वत: अशोक मुळे आणि संजय मोने निवेदन करत होते. तुम्ही म्हणताय तो वेगळा.
@निधी, कुठे बघितलेत फोटो. अश्विनी कासार त्या पापडाच्या जाहिरातीत आहे आणि आप्पा, मन बावरे मध्ये. बाकी लोक दिसलेच नाहीत परत.

अंजू, अशोक मुळे यांचा माझा पुरस्कार सोहळा शिवाजी मंदिरला झाला काही दिवसांपूर्वी. स्वत: अशोक मुळे आणि संजय मोने निवेदन करत होते. तुम्ही म्हणताय तो वेगळा. >>> ओहह सॉरी, कन्फुज्ड. मला लोकमत पुरस्कार, एबीपी माझावर पण दाखवले ते वाटले.

Pages