Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43
झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी आता लीला ला आणखी पुड्या
बाकी आता लीला ला आणखी पुड्या द्यायला नकोत - बोराडेंनी स्वतःहूनच त्याच्या नावाने जमीन करून द्यायचे ठरवले आहे!
तो अर्थातच बक्कळ पैसे घेऊन पुराणिक काकाला जमीन विकेल नि बोराडे लोक बसतील बोंबलत!
आत्याच बुटीक कुठाय , ब्युटी
आत्याच बुटीक कुठाय , ब्युटी पार्लर आहे . पण आत्याला कंपनी चांगली होईल अनुषकाची .
आज नाही बघितला एपिसोड आणि काल
आज नाही बघितला एपिसोड आणि काल केबल नाटकं करत होती. तो प्रतिक पिऊन गाडी चालवत होता की काय आणि ह्याला नाचवत होता, हा रोड तो रोड असं काहीतरी सुरु होतं.
आजचा नेट वर बघेन.
बघितला एपिसोड, काय तमाशा नी
बघितला एपिसोड, काय तमाशा नी पोलिस स्टेशन ड्रामा. आजही असेल पण एक बरं झालं परागने सांगितलं प्रतिकला की अनुष्का त्याची गफ्रे नाही ते, प्रतिकचं खरं प्रेम आहे अ वर अशी त्याची खात्री पटली. आता आज पो स्टे ड्रामा उत्तरार्ध असेल, सगळे इथले तिथले धावत येतील तिथे.
अनुष्काने चित्र उभं केलंय
अनुष्काने चित्र उभं केलंय तेवढा वाईट नसेलच प्रतीक.. पऱ्याचा अनुष्कावर आंधळा विश्वास आहे.. दोघांमध्ये नक्की काय बिनसलंय हे त्याने विचारलंच नाही अनुष्काला
ब्युटी पार्लर आहे>>> - बरं
ब्युटी पार्लर आहे>>> - बरं ब्युटी पार्लर मधे करावे बोटिक चालू. जागा आयती, गिर्हाईक तर आहेतच. आत्या शहाणी असेल तर पैसे घेऊन थोडी जागा देईल तिला.
पोलीस स्टेशनमधे जशी नेहेमी मारहाण करतात पकडलेल्या लोकांना तसे केले नाही अजून! दर सिनेमात हेच दाखवतात!
दुसर्या कुठल्यातरी सिनेमात तर घरातल्या बायको मुलींना, अगदी दहा वर्षाच्या मुलीला पण!!
म्हणूनच कुणि रस्त्यावर अपघात झाला तर जखमी लोकांच्या मदतीला यायला घाबरतात - उगाच पोलीस आपल्यालाच पकडून मारहाण करायचे.
जसे अमेरिकेतले पोलीस दिसला काळा की घाल गोळी करतात तसे.
क ब मध्ये दीपा काकूने बुधवार
क ब मध्ये दीपा काकूने बुधवार एपिसोडमध्ये छान काम केलं. छान सुनावलं अनुष्काला.
पराग पूर्वा दोघांकडची माणसे त्या दोघांवर खूप प्रेम करतात, परागची बहिण मात्र खूप आगाऊ आहे.
पूर्वाला स्पष्ट बोलता येत नाही, परत प्रेसेंटेशन बुडणार बहुतेक. लक्ष्मीकाका पण काय काकूला आधी डॉक कडे घेऊन जा मग बोंबाबोंब कर.
सतत अधे मध्ये काही कारणे
सतत अधे मध्ये काही कारणे निघून तिचा अभ्यास न होणे, अडथळे येणं हे जरा अति रिपीट होतंय.
zee 5 वर कधी कधी हे बघावं
zee 5 वर कधी कधी हे बघावं लागतं. त्यात तो Trivago man येऊन इतका बोअर करतो की त्या साईटवर असलेल्या हॉटेलात फुकट पण जाऊ नये, too much irritative adds.
काय डोबल करणार आहे ही पीएचडि
काय डोबल करणार आहे ही पीएचडि करुन? साध स्प्ष्ट बोलता येत नाही हिला? परागला तर स्पष्ट सान्गुच शकते की माझ प्रेझेटेशन आहे? नगर काय एवढ मेट्रो सिटि थोडिच आहे अशी किति गर्दी असणार आहे सन्ध्याकाळि गेल तर काही पण!
इथे आता अनुष्काला आईशप्पथ
इथे आता अनुष्काला आईशप्पथ झोडायला हवंय, परागच्या प्रेमात पडली ते ठीक पण त्याला जाणवून का देते. त्या परागला झोडून काढायला हवं, प्रतिसाद देतो. प्रीकॅपमधे दाखवलं. ती पुर्वा म्हणेल बरं झालं सुंठेवाचून खोकला गेला. आता पीएचडीकडे वळूया.
मला हे असं झालं तर सिरीयलला गुडबाय करायला लागेल. एक जरा बरी सिरीयल होती, तिचीपण लागणार वाट.
लक्ष्मीकाका बिचारा जरा
लक्ष्मीकाका बिचारा जरा डोक्याने कमी आहे. पण प्रेमळ आहे. साधाभोळा.
तिकडे अनुष्का पडतेच आहे परागच्या गळ्यात. पडू दे, पूर्वा तरी सुटेल सगळ्या झंझटातून.
एकत्र कुटुंब, प्रेमळ माणसे, पण काही प्लान्स नाहीत. केंव्हाहि उठावे, काहीहि ठरवावे नि इतरांना जणू काही कामेच नाहीत असे समजून प्रेमळपणे या ना म्हणायचे.
उद्या कुणि हार्टसर्जन, फायर फाईटर असेल घरात नि त्याला इमर्जन्सी कॉल आला तरी त्यालाहि सांगतील, प्रेमळपणे, थांब ना जरा, एव्हढे अंगठीचे डिझाईन बघून मग जा!
आता पूर्वाला परागचा खराखुरा राग आला आहे - बहुधा आता ती सगळा शेळपट पणा सोडून स्वतंत्र भारताची स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभी राहू शकणारी महिला बनून सर्वांना वठणीवर आणेल! मग मज्जा येईल.
काय ते अनुष्का पराग, परागचं
काय ते अनुष्का पराग, परागचं तिच्यावर प्रेम असेल तर सांगावं स्पष्ट, कशाला 2 दगडावर पाय ठेवतोय. ती पण प्रेमात पडलीय असं वाटतं, गावाहून आल्यावर सांगेल बहुतेक.
लक्ष्मीकाका परागच्या आत्याचा फोन आल्यावर खुश असतो, काकू खाऊ का गिळू करते काकाला .
आज जास्त वेळ पेडणेकर ज्वेलर्स ऍड करण्यात घालवलेले. नगर मध्ये फेमस आहेत वाटतं.
लक्ष्मीकाकाला एवढा मान देऊन
लक्ष्मीकाकाला एवढा मान देऊन परागची आत्याच बहुतेक त्याच्याशी बोलते, महत्व देते. तिचं बोलणंही गोड आहे, सर्वांशीच गोड बोलते.
लक्ष्मीकाकाला एवढा मान देऊन
लक्ष्मीकाकाला एवढा मान देऊन परागची आत्याच बहुतेक त्याच्याशी बोलते, महत्व देते. तिचं बोलणंही गोड आहे, सर्वांशीच गोड बोलते >> + १००००
पराग ईतका बेशिस्त कसा काय बुआ ?? दूसर्याच्या वेळेची अजिबात किंमत नाही .
कधी कुठे वेळेवर पोचत नाही.
आपल्या मतांबद्दल ठाम नाही.
फक्त मधे मध्ये काहीतरी २/३ आदरशवादी डायलॉग मारतो .
ते बैठकीच्या कापड खरेदीवेळी पपीची आत्या तिला बरोबर बोलते ..
तुला खोटं बोलावं लागतं , तर काय उपयोग तुझ्या शिक्षणाचा .. कशाला शिकायचं मग?
पपीलाही आपलं म्हणणं स्पष्ट मांडता येउ नये ??
पप्पी मुखदुरबळ आहे, उद्या
पप्पी मुखदुरबळ आहे, उद्या फटाफट बोलणार आहे बहुतेक.
दुरबळ शब्द नीट लिहिता येत नाहीये मोबाईल वरून.
उद्या एकदाची पपी भडाभडा
उद्या एकदाची पपी भडाभडा बोलणार पर्याला.
मी आधी पासून बघत नव्हते त्यामुळे कल्पना नाही. पर्याला अनुष्का आवडते पण ती त्याला दाद देत नसते आणि आता अचानक तिला तो आवडायला लागलाय असं आहे का ?
हो प्राजक्ता असं वाटायला
हो प्राजक्ता असं वाटायला लागलंय, कालच्या प अ सीनवरून.
इतके दिवस अनुष्का परागला
इतके दिवस अनुष्का परागला हुकुमी नोकर म्हणून वागवत होती, आता तिला परागबद्दल आदर नि प्रेम उत्पन्न झाले.
हे सगळे आता कुठे जाणार आहे? का असेच चालायचे सात आठ महिने? नि नंतर एकदम पुराणिक काका येऊन सर्वांना वठणीवर आणेल. मग पराग नि पूर्वा चे लग्न होऊन एकदाचे सगळे संपेल!
मी हि सिरियल बघत नाही. पण
मी हि सिरियल बघत नाही. पण इकडच्या वाचनावरुन असे वाटतेय की, पुर्वा त्या सरान्शी ( मन्गेश देसाई) लग्न करेल.
अरेरे, नको नको
अरेरे, नको नको
सर प्रेमात पडतील असं वाटतंय.
हो हो सर प्रेमात पडतील .
हो हो सर प्रेमात पडतील .
हे फारच होयला लागलयं की पूर्वाला शिक्षणासंबंधी काहीतरी असतं तेव्हाच निकमांकडे काहीतरी समारंभ निघतो.
अरेरे, नको नको Lol
अरेरे, नको नको Lol
सर प्रेमात पडतील असं वाटतंय. >>> सरान्च प्रेम एकतर्फी असेल. मग पुर्वा आणि सरान्च लग्न होईल. लग्नानन्तर सुरुवातीच्या काही दिवसात मी पलन्गावर झोपते, तु चटईवर झोप अशी नाटके होतील. नन्तर पुर्वाही सरान्वर प्रेम करायला लागेल. पराग व्हिलन बनून नवरा बायकोन्मध्ये भाण्डणे घडवून आणेल, 'तु जर माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाहीस' म्हणत पुर्वाच्या मागे लागेल.
नवरा-बायकोची भाण्डने, वादावादी, गैरसमज, मिलना- बिछडना- फिर मिलना असा सिलसिला चालूच राहील. पुर्वाचे शिक्षण गेले खड्डयात. आणि अश्या प्रकारे 'कट्टी बट्टी' टिपिकल डेलिसोप सिरियल बनेल आणि सिरियलचे शिर्षक सार्थ करेल.
पराग का बरे व्हिलन बनेल? तो
पराग का बरे व्हिलन बनेल? तो अनुष्का बरोबर लग्न करेल नि सुखी होईल.
बहुतेक त्या शिक्षकाने बहुधा पूर्वी एखाद्या मुलीचा प्रेमभंग केला असावा. म्हणून त्याने जर पूर्वाशी लग्न केले तर त्याला छळायला ती परत येईल.
कारण सिरियल जाम वैतागवाणी झाली नि तोपर्यंत एखादी नवी नटी सापडली, किंवा जुन्या लोकप्रिय नटीची सिरियल संपली तर तिला घेतील नि सिरियल चालू ठेवतील.
इकडे हेदर लॉकलिअर अशीच बाई होती. सिरियल कंटाळवाणी व्हायला लागली की तिला आणत. मग आणखी काही दिवस चाले सिरियल.
मला तर असेच वाटते की
मला तर असेच वाटते की पुराणिकचा मुलगा अमेरिकेतून परत येईल नि त्याचे नि पूर्वाचे जमेल.
पुराणिकचा मुलगा पुर्वाचा भाऊ
पुराणिकचा मुलगा पुर्वाचा भाऊ होणार नाही का?
माबोकरांना शिरेल चांगली असली तरी जमत नाही...
(No subject)
पुर्वाने परागला संगमनेर ला
पुर्वाने परागला संगमनेर ला जायचं आहे आधीच सांगितलेलं तरी त्याची अपेक्षा रेवा बड्डे ला यावं. पूर्वा पण मठ्ठ. रेवाला म्हणायला हवं होतं सकाळी येऊन जाईन, नंतर मला बाहेर जायचं आहे. तू हवं तर सकाळी एक केक काप तो मीच आणते आणि संध्याकाळी दुसरा काप. काय नाटकं, सकाळी रेवा कडे जाऊन मग जाऊ शकली असती तिकडे.
परागचा आतोबा अति करतो, आत्या गोड आहे.
आतोबा म्हणजे फट म्हणता रुसतो,
आतोबा म्हणजे फट म्हणता रुसतो, काहिपण! आत्या खुप गोड आहे. पुर्वा सराशी फोनवर बोलायला कन्फ्युज, नवर्याशी बोलायला कन्फ्युज, सासुशी बोलायला पण तशिच... इतक काय कुणि अडखळत नाही बर का!
चला, एकदा तरी बिचार्या
चला, एकदा तरी बिचार्या पूर्वाने स्वतःच्या मनासारखे केले.
नाहीतरी तिला लग्नात इंटरेस्ट नव्हताच, सांगावे की मला पी एच डी करायची आहे, तुमच्या असल्या फुटकळ कारणांसाठी त्यात अडचण आणू नका. नसेल जमत तर मोडा लग्न!
तिचे आजोबा देतील परागकडच्यांना उत्तर.
काय तो पराग, कुणिही यावे नि थप्पड मारावी. त्याच्यापेक्षा जास्त चांगला नवरा कुठेहि मिळेल तिला. आता शांतपणे पी एच डी करावी, नि मग बघावे लग्नाचे.
Pages