"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल छान अभिनय केला चारूने पण नव-याला समजवायचे सोडून ती पूर्वाच्या मागे का लागलेली असते. हिस्सा जाऊ नये म्हणून वडिलांना दुस-यांच्या घरी ठेवणे किती माणूसकी सोडून आहे. परागचे आई बाबा फारच बिचारे वाटतात. आई तर दिवसभर चहा आणि स्वयंपाकच करत असते. दोन्ही घरात एवढी माणसं असतात पण नोकर एकही नाही, कुठल्याच कामासाठी Uhoh आत्या आणि तिच्या बुळ्या नव-याने पूर्वाला एक काॅलही केला नाही Angry चारूच्या नव-याला जिथे तिथे महत्व पाहिजे.

मराठी सिरियल्समध्ये कुठे दिसतात नोकर चाकर जास्त. श्रीमंत असतील तरी क्वचित दाखवतात. एका कलाकाराला पैसे कमी द्यायला लागतातना म्हणून ठेवत नाही. नोकर चाकर असतील तर घरच्या सुनाच काम करताना दाखवतात बरेचदा Lol

अभिनय मस्त केला खरंच चारूने. ती व्हिडिओ टेप उगाच पूर्वाने डिलीट केली चारूच्या नवऱ्याची, आत्ता कामी आली असती Lol

अंजू असतात ना नोकर आणि त्यांच्याबरोबर हिरो किंवा हिरवीणीचे प्रेेम पण दाखवतात, आठवा अवंतिका, बापमाणूस आणि स्टारवर चालू आहे ती गिरीश ओकची. त्या विडीओचा काय उपयोग झाला असता पूर्वाला, कळलं नाही मला, ब्लॅकमेल करायला का की नीट वागा माझ्याशी नाहीतर.... Happy

पुर्वा ने नाही दाखवायचा ग, परागने आत्याला दाखवायचं होतं की बघ व्हिडीओ, तुझ्या नवऱ्याला हिनेच वाचवलं.

आज पराग बरोबर बोलत होता आत्याला पण एक वाक्य असंही म्हणायला हवं होतं की पुर्वा ने नाही, सोनीने सांगितलं मला, पुर्वा लपवत होती उलट.

बापमाणूस मध्ये स्वयंपाक घरातल्या बायका करतात असंच दाखवलं होतं, नोकर चाकर असले तरी. मी आधी बघितलं तेव्हा.

फक्त तुझ्यात जीव रंगला मध्ये त्या मावशी करायच्या स्वयंपाक.

आत्ता बघितला एपि. मला एक समजत नाही की बाई लग्न झालेली असेल किंवा नसेल, तिला नेहेमीच हे एेकवलं जातं की तुुला काही बोलायचा अधिकार नाही कारण हेे घर तुझं नाही. नव-याचं घर हेच तुझं घर आणि म्हणूनच आपल्याकडे लग्न होण्याला अपरिमित महत्व दिलं जातं. मुलींचं शिक्षण, नोकरी हे सगळं लग्न याविषयाभोवतीच फिरत राहतं. कागदोपत्री सध्या मुलींना आईवडिलांच्या घरावर हक्क सांंगता येतो पण वडिलांच्या घरात मनात येईल ते बोलण्याचा अधिकार जो मुलांना जन्माने मिळतो तो कधी मिळणार. असो.
परागच्या आईने दोरीवरचे कपडे सरकवून पूर्वाला छान संदेश दिला.आता परत छाया आणि चारीचं भांडण होणार.

मला एक समजत नाही की बाई लग्न झालेली असेल किंवा नसेल, तिला नेहेमीच हे एेकवलं जातं की तुुला काही बोलायचा अधिकार नाही कारण हेे घर तुझं नाही. >>> हो ते चुक आहे.

फक्त स्वयंपाक कुठे करायचा आम्ही, पूर्वाला का बोललीस आणि तिच्या माहेरच्यांचा का उद्धार केलास एवढंच बोलायला हवं होतं.

तो काकाचं चारुला तुझा काय संबंध कोण तू म्हणायला लागला. मग तिनेही उत्तर दिलं. पण ती पुर्वाशी फार चुकीचं वागली. भाज्या पण फेकून दिल्या.

परागच्या आईने दोरीवरचे कपडे सरकवून पूर्वाला छान संदेश दिला. >>> हो ती आई फार गरीब आहे स्वभावाने. सर्वांना सांभाळून घेत असते.

कालचा भाग छान होता. परागची आई अगदी गरीब बिचारी आहे. डोळ्यातून पाणी आलं. छायानेही छान बातमी दिली. ती आजी कसली खडूस आहे. सुनीलचे वडिल एकदम गोड. चारी किती वाईट वागते दोघांशी, घालवून देते दोघांना. कालची पूर्वाची साडी छान होती, लाल आणि हिरवी.

ती आजी कसली खडूस आहे. >>> हो ना. तिला अनुष्का पुरुन उरली असती. चाल बघायची होती तेव्हा कसं केलं होतं, मज्जा आलेली. आधीची आजी छान होती. ही आगाऊच वाटते पहील्यापासून मला.

सुनील म्हणजे वकील आहे तो का, त्याचे बाबा छान आहेत.

चारुआत्याच वचावचा बोलतीये. परागच्या आईला एव्हढ वाईट वाटतंय मुलाबद्दल तर आत्याला थांबवत का नाही?
वडीलही गप्प का आहेत?

इथे कोणाला अनुष्काला दिलेल्या हिऱ्याच्या अंगठीची चिंता होती Wink , आली अंगठी परत परागकडे. ती gift देऊन गेली पुर्वाला तसंही अभिज्ञा ला वेळ नसेल अनुष्का साठी. मायरा आहे ना ती आता सु भा च्या सिरीयलमध्ये.

प्रकाशमामाची गुर्मी, आगाऊपणा वाढत चाललाय. हिस्सा मागतो म्हणून नाही, एकंदरीत.

ती व्हिडीओ टेप ठेवायलाच हवी होती परागने, चारु आत्याला दाखवायला. कसं वाचवलं पुर्वा ने ते दाखवायला.

चारुला नवऱ्याचे प्रताप माहिती नाहीत का.

हो, परागचे चुलत आजोबा.

मस्त होता एपिसोड. अण्णांनी छान काम केलं.

आजचा एपि टाकलाच नाही अजून. कालचा भाग छान होता स्वयंपाकघरातला. कसले वडे करत होती परागची आई. चारू आल्यावर पूर्वाची आई म्हणते कशी, तुझा डबा घेऊन जा बाई, नाहीतर परत म्हणशील, माझं हे राहिलं नि तेे राहिलं Proud वाटण्या कधी ना कधी होणारच आहेत ना मग करूनच टाकायच्या ना नाहीतर नुसती लिखापढी करायची आत्ता.

कसले वडे करत होती परागची आई >>> मेदुवडे.

वाटण्या कधी ना कधी होणारच आहेत ना मग करूनच टाकायच्या ना नाहीतर नुसती लिखापढी करायची आत्ता. >>> आत्ता नाही होणार, वकीलकाकांनी वचन दिलं आक्काला. प्रकाशकाकाशी कसं डील करणार काय माहीती. ते नाही ऐकणार. चारु आत्या अति वचवच करते.

ही संपणार आहे का??
1 ऑक्टोबर पासून नवीन सिरियल चालू होणार 7:30 ला. कुठल्यातरी चॅनेलवर सरस्वती नावाची सिरियल लागायची त्यातली हिराॅईन लीड करतेय. हिरो काय ओळखीचा नाही वाटला.

पण ती मालिका सात वाजता लागणार आहे. तितिक्षा तावडे होती सरस्वतीमध्ये आणि नविन मालिकेत ती नाहीये. सात वाजता देवा शप्पथ लागतं बहुतेक. बरं होईल ती संपली तर.

सात वाजता संग्राम समेळ आणि गौरी नलावडेची नवीन मालिका लागणार आहे. हे दोघे आवडतात मला म्हणून बघेन कदाचित.

साडेसातला तितिक्षा तावडे आणि एक न ओळखता येणारा दाढीवाला आहे, बहुतेक तो एक डबल रोलवाली सुयश टिळकची लवकर संपलेली सिरीयल होती त्यात मित्र होता त्याचा, तो असावा. तितिक्षा आवडते पण सिरीयल विचित्र वाटते. अति पझेसिव्ह नवरा असावा तो. त्यामुळे ती नाही बघणार.

so तात्पर्य काय कट्टीबट्टी पण संपतेय Sad .

ओह्ह देवा शपथ आणि ही दोन्ही संपत आहेत का Sad इतक्या लवकर कसे काय बदलतील काका \ मामा आणि आत्या ? आणि पूर्वाच्या घरचे पण ?

ह्म्म जरा गुंडाळत आहेत अस वाटतय आता. अर्थात आवडते अजून पण पूर्वाला घरची अज्जिबात आठवण येत नाही, आणि पराग कायम घरीच पडिक असतो हल्ली. अनुष्का चा शेवटचा सीन घेतलेला दिसतोय अंगठी परत देण्याचा, आता ती मायरा म्हणून बिझि आहे ना तिकडे Happy

सात वाजता संग्राम समेळ आणि गौरी नलावडेची नवीन मालिका लागणार आहे. >>>> आ? संग्राम समेळने ललित २०५ सोडली की काय? Uhoh

अरेरे सॉरी समेळ नाही साळवी. संग्राम साळवी. लिहिताना नेहेमी असं होतं माझं, डोळ्यासमोर साळवीचं होता Lol . संग्राम साळवी आवडतो मला, देवयानीपासून. सिरीयल त्याची फार कमी बघितली. रादर बघितल्याच नाहीयेत देवयानी पहिले काही दिवस सोडून पण आवडतो मला.

प्रकाश गाड्या आणि भोंगे आणतो भाड्याने प्रचारासाठी तिथवर बघितले. हहपुवा आहेत एपि. बॅनरवर प्रकाश आणि चारूचे गाॅगल घातलेले फोटो, चमचमीत जेवण आणि आमचा देश आमची मर्जी Rofl झगामगा आणि मला बघा आहे तो प्रकाशमामा. दीपाकाकू फारच गोड. जाऊन तिचे गाल ओढावेसे वाटतात. राजकारणी एवढे भोळे असतात का.

अरेरे सॉरी समेळ नाही साळवी. संग्राम साळवी. लिहिताना नेहेमी असं होतं माझं, डोळ्यासमोर साळवीचं होता Lol . संग्राम साळवी आवडतो मला, देवयानीपासून. सिरीयल त्याची फार कमी बघितली. रादर बघितल्याच नाहीयेत देवयानी पहिले काही दिवस सोडून पण आवडतो मला. >>>> मी शिवानी सुर्वे सिरियलमध्ये असेपर्यन्त पाहिली होती. नवीन देवयानी आल्यानन्तर सोडून दिली बघायची.

मी शिवानी सुर्वे सिरियलमध्ये असेपर्यन्त पाहिली होती. नवीन देवयानी आल्यानन्तर सोडून दिली बघायची. >>> मलाही ती जोडी आवडायची.

मी आधीच सोडली बहुतेक कारण त्याच वेळी माझे मन तुझे झाले सुरु झाली दुसरीकडे, त्यात रमले.

Pages