"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथल्या हलवायच्या का इथे आधीच्या.

सध्यातरी माझी अत्यंत आवडीची मालिका. गेले दोन आठवडे बघतेय. अ भा सोडून सर्व आवडतात. पराग, त्याची आत्या आणि पुर्वाचा लक्ष्मीकाका फार गोड. अगदी सहज काम करतात.

सगळेच कलाकार नवीन व छान काम करतायत.पुणे-मंबई सोडून वेगळं शहर,वेगळी भाषा ऐकायला मजा येतीये.
दोन्ही साईडच्या आत्या गोड आहेत.

तिथल्या हलवायच्या का इथे आधीच्या<< हो चालेल कि.

हो सर्वच फार नैसर्गिक अभिनय करतात आणि एकेक पंचेस पण मस्त असतात<<< +१

धन्यवाद मोल नविन धाग्यासाठी. जावयाला अजून लटकावूनच ठेवला आहे, मला वाटले एवढे आत्महत्या प्रकरण झाल्यावर अप्पा लग्गेच निकाल लावतील, पण अजून दोन चार दिवस थांबा म्हणाले. पूर्वाला भाऊ घेऊन जातो आणि तेवढ्यात पराग येतो तेव्हाची घालमेल पूर्वाने छान दाखवली, हातात कागद, हाकही मारता येत नाही आणि जीवाला लागलेली चुटपूट. सोनी फार बारीक लक्ष ठेवते भावावर. रस्त्यावर जमलेली गर्दीपण धमाल.

ज्यान्च्या बेसिकमध्ये लोचा आहे पण कुतुहल आहे त्यान्च्यासाठी एक आढावा ... वंशावळ :
नायिका - पूर्वा शशीकांत बोराडे . एम.ए सायकॉलॉजी. आता पी.एच.डी करतेय.
वडील वारलेयत एका अपघातात. पण त्यांची फार ईच्छा होती मुलीने शिकावं म्हणून घरचे बाकी सगळे तिच्यामागे उभे आहेत.
आता लग्नाचं वय झालयं म्हणून , तिच्यासाठी स्थळ शोधतायेत. तिला लग्नानंतर शिक्षण चालू ठेवता येईल एवढी माफक अपेक्शा सासरच्यांकडून .
आप्पा बोराडे : पूर्वाचे आजोबा.नगरमधले कापड व्यापारी. थोडे जून्या विचाराचे ,पण प्रेमळ .घरात त्यांचा शब्द अंतिम.
लक्ष्मीकांत आणि छाया : पूर्वाचे काका काकू. काका जरा भोळसट , प्रेमळ आणि काकू तेवढीच खमकी , आप्पांना न घाबरणारी.
चंद्रकांत आणि मीनल : पूरवाचे दूसरे काका-काकू. पूण्याला construction चा बिझनेस आहे काकाचा. आप्पा आणि चंदूच भांडण आहे .
पूष्पा आणि दिपक : पूर्वाची आत्या आणि तिचा नवरा. आत्या नवर्याशी भांडून माहेरी आली आहे. दिपकराव बिचारे एकदम साधे , तिची समजूत काढायला तिच्या मागे आले . आत्या काय ऐकत नाही. त्यान्चा मुलगा अथर्व , वयाच्या मानाने फार मोठ्यांसारखं बोलतो-वागतो.
समीर आणि प्रांजल : पूर्वाचे दादा आणि नी. समीर आप्पाना दूकानावर मदत करतो . प्रांजल सासूला कीचनमध्ये. ती आणि पूर्वा एक्दम मैत्रीणींसारख्या.
लीलाधर काका : पूर्वाचा चुलत काका . आप्पंचा त्याच्यावर जास्त विश्वास आहे.

... to be continued....

नायक : पराग माधव निकम . ज्यु. कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे .
माधव आणि त्यांची पत्नी : परागचे आईवडिल. माधवराव बँक मॅनेजर आहेत. त्याना , एक कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे - सोनलं
सुनिल आणि दीपा : परागचे काका -काकू. काका वकिल आणि काकी स्थानिक राजकारणी . त्यांना एक मुलगी आहे.
हरिष : परागचा दूसरा काका . प्रेमभंगामुळे दारूडा बनला आहे .
चारूशीला आणि प्रकाश : परागची आत्या . तिचा परागवर फार जीव आहे. ती ब्युटी पार्लर चालवते आणि नवरा महसूल अधिकारी . एकदम नो-नॉन्सेन्स जावई माणूस Happy
अक्का : परागची आजी . तिला आयुर्वेदाची आवड आहे.कसले कसले चूर्ण आणि काढे बनवत असते.

अनुष्का : परागची मैत्रिण. परागला ती आवडतं असते . ( अभिज्ञा भावे)
प्रतिक : अनुष्काचा ex-boyfriend (आशिष कुलकर्णी)

शब्दार्थ :
मुन्न्या : परागचे घरचे नाव. अथर्वलाही सगळे मुन्न्याच म्हणतात . त्यामुळे कांदेपोह्याच्यावेळी विनोदी प्रसंग घडतो .
गिफ्टं : भेटवस्तुसाठी चारीआत्याचा शब्द . 'ट' चा उच्चार पूर्ण .
सेsssssssमं : हाही आत्याचाचं शब्द . 'म' चा उच्चार पूर्ण .माबोभाषेत 'अगदी अगदी'
पुराणिक : आप्पांचे चंदूकाकासाठी संबोधन. कारण तो पुराणिकशी लग्न करून पुण्यात स्थायिक झालायं ( आप्पांच्या भाषेत घरजावई झालाय)
अनशापोटी : उपाशीपोटी ,रिकाम्यापोटी,काहीच न खाता, early in the morning , empty stomach

Special general >>> Biggrin
अनशापोटीवरून आठवलं .....

"एका ग्लासात , अर्धा ग्लास गरम पाणी घ्यायचं "
"गरम ??"
"नायं .. तसं कोमट घेतलं तरी चालतं . तसही गरम पाणी कोमट होतयचं ना . ....... कोमटही गरम करता येतच म्हणा"

Rofl निव्वळ कहर

कालचं पण बेस्ट होतं..
' हा खरा पेन..म्हंजे तो पन खराच आहे.. पन हा खराच खरा आहे'

पराग कहर अभिनय, केवढा सहज करतो. हळूहळू दोघं एकमेकांना आवडायला लागली आहेत.

त्या पप्पीच्या मैत्रिणीने पण छान केलं परवा, मुन्यावर लट्टू झाली.

आप्पा मात्र तसे बेरकी आहेत, नातीवर मात्र खूप प्रेम करतात.

"एका ग्लासात , अर्धा ग्लास गरम पाणी घ्यायचं "
"गरम ??"
"नायं .. तसं कोमट घेतलं तरी चालतं . तसही गरम पाणी कोमट होतयचं ना . ....... कोमटही गरम करता येतच म्हणा">>> नका हो असल्या भारी scenes ची आठवण करून देत जाऊ...पुन्हा पुन्हा पहाण्याचा मोह होतो..: हाहा :

अहो किती वेळा sorry म्हणून राहिले तुम्ही?
-----------
पपी परवा परागला भेटायला जाताना घाबरली होती,खोटं बोलून जातोय म्हणून,रस्त्यात कोणी बघेल म्हणून.आधी तर भेटायला नकोच म्हणत होती.
आणि काल कशी स्वतःहून भेटली,निवांत गप्पा मारल्या.काल तिला परवानगीची गरज वाटली नाही,कोणी पाहिल याची भिती वाटली नाही.

अग आता तो आवडायला लागलाय, आणि मैत्रीण त्याच्यावर फिदा बघून जास्तच. बहुतेक जरा जास्त बोलली त्याचा पश्चाताप पण.

Btw ह्यातला जो परागचा दारुड्या काका आहे, शार्दूल सराफ नाव त्याचं. तो लेखक पण आहे. छोटी मालकीण पटकथा आणि अंजली मालिकेची कथा पटकथा तोच लिहितोय, इति मटा. कमलामध्ये वकील होता तो.

-----------
पपी परवा परागला भेटायला जाताना घाबरली होती,खोटं बोलून जातोय म्हणून,रस्त्यात कोणी बघेल म्हणून.आधी तर भेटायला नकोच म्हणत होती.
आणि काल कशी स्वतःहून भेटली,निवांत गप्पा मारल्या.काल तिला परवानगीची गरज वाटली नाही,कोणी पाहिल याची भिती वाटली नाही.>>>परवा तिचा class नव्हता ना म्हणून बाहेर जाताना घाबरत होती ती..एरवी जातेच ना..या आधी पण गेली होती लक्ष्मीकाका सोबत...

आज लक्ष्मीकाका सीन फार टचिंग. डोळ्यातून पाणी आलं. >>>> + १०००.
आप्पा उगाचच त्याला हड्तुड करतात . बैठकीच काय होइल याच त्याना टेन्शन नाही आलं . लक्ष्मीकांतने नकळत घोळ घातला याचा राग आला त्याना .

शब्दार्थात नविन शब्द टाकायाचा राहिला :
" शून्य मिनिटात आलो "

एकदम भारी सिरीयल आहे सगळ्यांचा अभिनय देखिल उत्तम मुलिला कुनी काढा देत काहो डेटवर गेल्यावर
काढा काय भेट म्हणून द्यायची गोष्ट आहे
त्या भागाला हसुन पारवाट लागली माझी

zee 5 vr bagha sagle episodes ahet tithe >> नाही आहेत .
पुढे पुढे जाताना , मागचे भाग उडतात बहुतेक. Happy

Pages