भेळ
वांगी, मेथी भरुन पाटीत
माझा दादा बाजारा जातो
धोतराचा पकडत सोगा
सायकलीवर टांग मारतो
गांजलेली जुनीच सायकल
दादा हवा नवीन भरतो
चाळण झालेल्या ट्यूबला
ठिगळ नवे रोज लावतो
अडचणींच्या फुफाट्यात, दादा
प्रयत्नांचे पायडल मारतो
घामाचे मोती सांडत वाटेत
फाटका संसार रेटत नेतो
विरोधातच वारा त्याच्या
सायकल तरी सावरतो
कोरड पडल्या ओठावर
आशाळभूत ओल पेरतो
बाजारात पोहचताच
सावलीला उन्हाच्याच
दुकान लागले भाजीचे
जीवाच्या आकांताने, तो
ओरडतो " भाजी घे "
सांज होता बाजार सरला
भेळीच्या दुकानी दादा शिरला
हाटेल चहाचे आडवे येता
त्याने कोरडा आंवढा गिळला
भेळ खायचा सण माझा
जीव कुठंच रमत नाही
किती किती मोठा दिवस
आज सरता सरत नाही
दुरुन दिसता दादा येताना
गगनभेदी मी केली गर्जना
भेळ आली, भेळ आली
घराला सुखाची भोवळ आली
मुठ मुठ भेळ वाटताना
दादाचा शीण पळतो
तांब्याभर पिऊन पाणी
तो समाधानी ढेकर देतो
तो समाधानी ढेकर देतो
© दत्तात्रय साळुंके
छान लिहिलीय! मस्त!
छान लिहिलीय! मस्त!
माझा दादा समाधानाची ढेकर देतो
माझा दादा समाधानाची ढेकर देतो
गरीबीतही संसाराचा गाडा रेटत राहतो
त्यावर मी मात्र कविता लिहून टाकतो
अन् मायबोलीकरांची शाबासकी मिळवतो
@ Mi Patil Aahe
@ Mi Patil Aahe
<<<< माझा दादा समाधानाची ढेकर देतो
गरीबीतही संसाराचा गाडा रेटत राहतो
त्यावर मी मात्र कविता लिहून टाकतो
अन् मायबोलीकरांची शाबासकी मिळवतो >>>>
मी काय करावे/लिहावे हा सर्वस्वी माझा अधिकार आहे.
पाटलांच्या ओंजळीने पाणी प्यायचे दिवस गेले. आहात कुठं ?
तुम्हाला आमंत्रण केले नाही.
तुमच्या शाबासकीची मला गरज नाही .
आवडली, मनापासून!
आवडली, मनापासून!
@ वाली, अज्ञातवासी खूप
@शाली, अज्ञातवासी खूप धन्यवाद....
निःशब्द... ह्रदयस्पर्शी....
निःशब्द...
ह्रदयस्पर्शी....
शशांकजी खूप धन्यवाद
शशांकजी खूप धन्यवाद
तुम्हा सर्वांचे प्रेरणादायी प्रतिसाद चांगले लिहायला प्रवृत्त करतात.
दादाची कुतरओढ मांडलीत.
दादाची कुतरओढ मांडलीत.
शेवट छान केलात
छान लिहीलीत कविता..
छान लिहीलीत कविता..
मी खर तर भेळ हे नाव वाचुन आले होते,
पण भावनिक ओलावा असलेल काव्य वाचायला मिळाल
विनिताजी
विनिताजी खूप धन्यवाद ....
प्रत्येक घरात एक दादा असतो. तो वडील किंवा वडीलपण घेतलेला भाऊ असू शकते. थोडक्यात मला काय अभिप्रेत आहे......
सायकल द्विअर्थी योजलेला शब्द आहे. गांजलेली सायकल म्हणजे गांजलेला संसार. हवा नवीन भरतो म्हणजे संसारात प्राण फुंकतो. चाळण झालेली ट्यूब म्हणजे फाटका संसार त्याला रोज नवे ठिगळ लावतो. विरोधातला वारा म्हणजे साध्या साध्या गोष्टी करताना येणाऱ्या परिस्थितीजन्य अडचणी तरी सायकल सावरतो म्हणजे संसार सावरतो. असे करत कोरड्या जगण्याला आशेची ओल देतो. बाजारात तो चहा सुध्दा पीत नाही . पण घरी आल्यावर सगळ्यांना भेळ वाटून देतो आणि स्वतः फक्त एक तांब्या पाणी पिऊन पोट भरल्याचे नाटक करतो. असे करताना त्याचा शीण कुठल्या कुठे पळतो.
चांगली लिहिलीय.
चांगली लिहिलीय.
साळुंके दादा कविता आवडली.
साळुंके दादा कविता आवडली. अर्थ उमगला. हृदयात कुठेतरी कळ पण उमटली.
@ किल्लीजी
@ किल्लीजी
घराला सुखाची भोवळ आणणारी एक मुठभर भेळ म्हणजे बाल्यांसाठी खाद्योत्सव आहे.
@ देवकीजी खूप धन्यवाद
@ रश्मीताई तुम्हाला या अनुभुतीतले कारुण्य दिसले तर काहीना मी अनुभुतीचे भांडवल करतो असे वाटते . कोमल , संस्कारी मन असाव लागतं माणसाला तरच जग समजतं.
खूप धन्यवाद....
छान लिहीलीत कविता.. आवडली .
छान लिहीलीत कविता..
आवडली .
आवडली कविता!
आवडली कविता!
मस्त !
मस्त !
'तेन तक्तेन भुंजित:' हा विचार
'तेन तक्तेन भुंजित:' हा विचार आपण शब्दशः उलगडून दाखवलाय.
निव्वळ अप्रतिम काव्य !
सायकल द्विअर्थी योजलेला शब्द
सायकल द्विअर्थी योजलेला शब्द आहे. गांजलेली सायकल म्हणजे गांजलेला संसार. हवा नवीन भरतो म्हणजे संसारात प्राण फुंकतो. चाळण झालेली ट्यूब म्हणजे फाटका संसार त्याला रोज नवे ठिगळ लावतो. विरोधातला वारा म्हणजे साध्या साध्या गोष्टी करताना येणाऱ्या परिस्थितीजन्य अडचणी तरी सायकल सावरतो म्हणजे संसार सावरतो>>>>
हे नसलं तरी चालतय की. यापेक्षा खरोखरची सायकल इमाजिन करून अजून आवडली.
@ कुमार १, वावे, मुक्तेश्वर
@ कुमार १, वावे, मुक्तेश्वर कुळकर्णी, योगेश_जोशी
प्रेरणादायी प्रतिसादासाठी खूप आभार
@ अज्ञातवासी धन्यवाद द्वितीय प्रतिसादासाठी.
मी कविवर्य पाडगावकरांचा चाहता आहे . त्यांच्या सरळ वाटणा-या ओळीत असे गर्भितार्थ असतात. ते मला भावले . मी सुध्दा जिथे अगदी सहज जमते तिथे तशी शब्दयोजना करतो.
खूप आवडली ! असे बरेच दादा
खूप आवडली ! असे बरेच दादा डोळ्यासमोर उभे राहिले
कविता आवडली.
कविता आवडली.
@ anjali_cool, मंजूताई
@ anjali_cool, मंजूताई
तुमचा प्रतिसाद बहुमोल आहे....
सुंदर आहे कविता! आवडली.
सुंदर आहे कविता! आवडली.
@ फारएण्ड
@ फारएण्ड
खूप आभार , तुमचा प्रतिसाद बहुमोल आहे...