ही बीबीसी वरची न्यूज वाचली.
महात्मा गांधींना 'वर्णद्वेशी' ठरवत त्यांचा पश्चिम अफ्रिकेतील घाना विद्यापीठाच्या आवारातील पुतळा कायद्याच्या शिक्षक आणि विद्द्यार्थांनी काढून टाकला. गांधीजींवर त्यांच्या दक्षिण अफ्रिकेतील वास्तव्या दरम्यान त्यांनी केलेल्या लिखाणातून कृष्णवर्णीय लोकांना 'काफिर' (अफ्रिकेतील 'निग्रो' अर्थाचा शब्द) म्हणण्याचा आणि भारतीयांना कृष्ण्वर्णीयांपेक्षा वरच्या श्रेणीचे म्हणण्याचा आरोप केला गेला आहे.
तुम्हाला हे ईतिहासाला चुकीचे वळण लावण्यासारखे वाटते की त्यांच्या अधिकारात घाना विद्यापीठातील विद्यार्थांची कृती बरोबर आहे असे वाटते?
हरिजनांच्या बाजुने जातीविरोधात आंदोलन ऊभारणार्या गांधींवरील ह्या आरोपात किती तथ्य आहे असे वाटते.
वर्तमानाशी सबंधित नसलेला ईतिहास ऊकरून त्यावरून स्वतःचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी बंडाळी करण्याचे हे दुर्दैवी लोण ईतरत्र पसरू शकते किंवा त्याचे पडसाद ऊमटू शकतात असे वाटते का?
प्रत्येकाचा बघण्याचा
प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन. आता या घटनेचा भारतात कसा उपयोग करुन घेतला जातो ते पाहुया!
काही सांगता येत नाही, उगाच
काही सांगता येत नाही, उगाच गोंधळ करणारे निमित्त शोधत असतात.
Sadhya gandhijinchi chalati
Sadhya gandhijinchi chalati nahii.
Sabab, farase koni laksha deil ase vatat nahi
If gandhibaba still affected vote bank somehow....
Vedapatapana ani vidhweshache loN jagat sagalikadech disatey!
ज्यांना गांधीजींचे कार्य
ज्यांना गांधीजींचे कार्य समजले नाही त्यांच्याकडुन अशा घटना घडु शकतात.
बंडाळी वैगरे काही नाही हो.
बंडाळी वैगरे काही नाही हो. त्यांनी मुन्नाभाई पार्ट २ पाहिला असेल, त्यात गांधीजी सांगतात सब चौराहो से मेरा पुतला हटा दो, सडको का नाम मिटा दो, रखना ही है तो दिल में रखों, म्हणून त्यांनी पूतळा हटवून हृदयात स्थान दिलं असेल.गैरसमज नसावा.
चार राज्यात हरल्यानंतर
चार राज्यात हरल्यानंतर पुढच्या इनिंगची सुरवात आफ्रिकेतून केलेली असू शकते. यावेळी गांधी-नेहरूंना फक्त देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान करायचे ठरवलेय कि काय.
वय, आलेले प्रसंग, पाहिलेला
वय, आलेले प्रसंग, पाहिलेला समाज यानुसार विचार प्रगल्भता बदलत जाते.गांधीजींनी तरुणपणी असे काही विचार व्यक्त केलेही असतील.नंतर त्यांच्या कार्यात ते बदलले असतील.
आफ्रिकेला आधीच्या विचारावरून गांधीजींना जज करायचं असेल तर आपण थांबवू शकत नाही.
mi_anu +१११
mi_anu +१११
काही वांशिक समूहांची
काही वांशिक समूहांची आत्मप्रतिमा पराभूत व निम्नस्तरीय असते, ती सुधारून चांगली व्हावी म्हणून दुसऱ्या वंशांच्या महापुरुष ह्यांचा इतिहास कलुषित करण्यात येतो•
याची जगभर अनेक उदाहरणे आहेत, त्यामुळेच इतिहास पुर्णतः वास्तविक न राहता अतिरंजित होत जातो, ऐतिहासिक व्यक्ती कालांतराने सुपर ह्यूमन होत जातात,
सुंदर प्रतिसाद mi_anu
सुंदर प्रतिसाद mi_anu
अनु, +1
अनु, +1
त्यांनीच एक ठिकाणी लिहिले आहे,
मतितार्थ असा की " एकाच विषयावर मी 2 वेगवेगळ्या वेळी परस्पर विरोधी मते दिली असतील तर त्यातले लेटेस्ट मत ग्राह्य धरले जावे, कारण आयुष्यात वेगवेगळ्या अनुभवानं माणसाची मते बदलत असतात"
जे केले ते लिहिण्याची
जे केले ते लिहिण्याची /सांगण्याची त्यांच्याकडे हिम्मत होती, आज गांधीजी असते , आणि त्यांनी खरेच ते लिहिले असेल आणि त्यांना ते चुकीचे आहे असे पटले असते तर त्यांनी बिनशर्त माफी मागितली असती,
@बोकलत
@बोकलत
@ सिम्बा, एकाच विषयावर मी 2 वेगवेगळ्या वेळी परस्पर विरोधी मते दिली असतील तर त्यातले लेटेस्ट मत ग्राह्य धरले जावे, कारण आयुष्यात वेगवेगळ्या अनुभवानं माणसाची मते बदलत असतात">>>>>>>>>>> असं कुणी गांधीजींनी लिहिलंय?
म्हणून त्यांनी पूतळा हटवून
म्हणून त्यांनी पूतळा हटवून हृदयात स्थान दिलं असेल.>> बाहेरच्या जगात भारताचे म्हणुन प्रख्यात असणार्या गांधीना वर्णद्वेषी म्हणुन लोकांच्या हृदयात स्थान मिळणे विनोद करण्याचा विषय नाही.
खासकरून कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांसाठी बलिदान केलेल्या मंडेला आणि Martin Luther King ह्यांनी गांधीना श्रद्धास्थान मानलेले असताना.
सिंबा, दोन्ही प्रतिसाद आवडले.
सिंबा,
दोन्ही प्रतिसाद आवडले.
असं कुणी गांधीजींनी लिहिलंय?>
असं कुणी गांधीजींनी लिहिलंय?>>>
होय. आणि अशाच अर्थाचे आंबेडकरांनीदेखील म्हटले आहे.
सस्मित, वाचनमात्र राहा
सस्मित,
वाचनमात्र राहा
सस्मित,
सस्मित,
My aim is not to be consistent with my previous statements on a given question, but to be consistent with truth as it may present itself to me at a given moment. The result has been that I have grown from truth to truth. (H, 30-9-1939, p288)
हे मी वर सांगितलेले नेमके quote नाही, पण याचा अर्थ साधारण तसाच होतो.
Inconsistency is only apparent. It appears so to many friends because of my responsiveness to varying circumstances. Seeming consistency may really be sheer obstinacy. (YI, 16-4-1931, p77)
I am not at all concerned with appearing to be consistent. In my pursuit after Truth I have discarded many ideas and learnt many new things. Old as I am in age, I have no feeling that I have ceased to grow inwardly or that my growth will stop with the dissolution of the flesh. What I am concerned with is my readiness to obey the call of Truth, my God, from moment to moment. (H, 29-4-1933, p2)
Inconsistencies बद्दल चे हे त्यांचे काही विचार,
मी वर सांगितलेले एक्साक्ट quote मला मिळाले नाहीये पण शोधून इकडे टाकतो.
गांधी नावाची ऍलर्जी असणाऱ्या लोकांचे सल्ले सिरिअसली घेऊ नका
सिम्बा - मी ही साधारण असेच
सिम्बा - मी ही साधारण असेच वाचले आहे. आणि ते बरोबरच आहे. राजकारणात काय किंवा सामाजिक कामात काय, जे लोक ४०-५० वर्षे कार्यरत असतात ते साधारण विसाव्या वर्षी सर्व सामाजिक गोष्टींबद्दल पूर्णपणे विचार करून बनवलेली आणि कधीही न बदलणारी ठाम मते (Finished thoughts) घेउन पुढे आयुष्यभर कायम तसाच विचार करत असतील हे अशक्य आहे. अशा वेळेस नंतर व्यक्त केलेले मत हे खरे मानले पाहिजे.
अनेकदा स्वतःचे अनुभव विस्तारल्यावर मते बदलतात, तर कधी लोक्/पक्ष्/समाज बदलल्यावर. अत्र्यांची ४० च्या दशकातील कॉंग्रेसमधल्या नेत्यांबद्दलची वाक्ये आणि नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळची वाक्ये, पुलंची विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीबद्दलच्या लेखातील मते
आणि नंतर आणीबाणीच्या काळात उडवलेली खिल्ली - परस्परविरोधी आहेत. पण ती त्या त्या वेळच्या अनुभवांवर आहेत.
बर्ग, बाकी लेखाबद्दल
बर्ग, बाकी लेखाबद्दल प्रतिक्रिया नाही पण मूळ वाक्य "दक्षिण अफ्रिकेतील घाना विद्यापीठाच्या आवारातील पुतळा " चुकीचे आहे.
घाना विद्द्यापिठ दक्षिण अफ्रिकेत नसून घाना मध्ये आहे. घाना हा पश्चिम अफ्रिकेतील एक स्वतंत्र देश आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Ghana
https://en.wikipedia.org/wiki/University_of_Ghana
फारएन्ड
फारएन्ड
फारएण्ड, आता तुम्ही घाना मधे
फारएण्ड, आता तुम्ही घाना मधे जाऊन त्या लोकांना शिकवा. म्हणजे ते परत पुतळा उभा करतील.
भारत घाना ला आर्थिक किंवा इतर बाबतीत किती मदत करतो? चीन किती? जर चीन जास्त मदत करत असेल तर ते माओ चा पुतळा उभारतील, नाहीतर गांधीजींचा!
जगात सर्वच गोष्टी भावनेवर, सत्यावर आधारित नसतात. आजकाल बहुतेक गोष्टींमागे काही आर्थिक कारण असते.
लिहितांना दक्षिण-पश्चिम चूक
लिहितांना दक्षिण-पश्चिम चूक झाली होती...निदर्शनाला आणून दिल्याबद्दल धन्यवाद धनि.
बदल केला आहे.
माझे लेटेस्ट मत ग्राह्य धरावे
माझे लेटेस्ट मत ग्राह्य धरावे हे गांधीजींनी लिहीलेय ? कधी आणि कुठे ?
मी अन्य कुणाच्या नावे वाचले होते.
मी अन्य कुणाच्या नावे वाचले
मी अन्य कुणाच्या नावे वाचले होते.>>>>
शक्य आहे,
मी सुद्धा मूळ quote शोधतो आहे, मिळाल्यावर कन्फर्म सांगतो
हे वाक्य बाबासाहेब आंबेडकर
हे वाक्य बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे माझ्या मते. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळी सांगितलेले आहे. एका ठिकाणी सातत्य हा गाढवाचा गुण आहे असेही म्हटलेले आहे. सातत्य म्हणजे मतातील सातत्य. डॉ. अभिराम दीक्षित यांनी मिसळपाव वर संदर्भ दिले आहेत.
“Constant development is the
“Constant development is the law of life, and a man who always tries to maintain his dogmas in order to appear consistent drives himself into a false position.” - गांधीजी
एक व्यक्ती आणि तिने तिच्या
एक व्यक्ती आणि तिने तिच्या जीवनात केलेले कार्य, घेतलेले निर्णय, असलेली आणि कदाचित नंतर बदललेली मते ह्या सर्व गोष्टी त्या काळाच्या परिप्रेक्षातुन बघणे हे ही तितकेच महतत्त्वाचे असते. त्याकाळी असलेले सामाजिक नियम, चौकटी आणि बदल घडवून आणयचा असेल तर 'वन स्टेप अॅट अ टाईम' अशी दीर्घकाळ परिणामकारक पद्धत अवलंबण्याची गरज... हे सर्व न बघता एक एक स्वतंत्र घटना त्याच चौकटीत बघितली तर मनावर वेगळी प्रतिमा तयार होऊ शकते.
या केस मध्ये तसे झाले असेल तर ठीक आहे. त्या विशिष्ट घटनेसाठी त्या समाजाच्या मनात गांधींबद्द्ल कटू भावना असणे स्वाभाविक आहे, आज गांधीजी हयात नाहीत, त्यामुळे ते स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. त्यांच्या समोर गांधींचे उरलेले कार्य आणावे. पुतळा हटवण्याचा प्रश्न जीवन मरणाचा करु नये. नंतर तेथील व्यक्तींनी बर्ड्स आय व्हू घेतला की कदाचित त्यांची चूक त्यांना समजेल आणि सुधारतील.
नाही सुधारली तरी पुतळा नसल्याने फार काहीही फरक पडत नाही.
गांधीजी द. अफ्रिकेत गेले
गांधीजी द. अफ्रिकेत गेले तेव्हा २४ वर्षांचे होते. तिथल्या वास्तव्यात त्यांनी तिथल्या भारतीयांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी तिथल्या कृष्णवर्णीयांच्या स्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. गोर्या सत्ताधीशांना लिहिलेल्या पत्रांमधूनही त्यांनी भारतीय हे स्थानिक कृष्णवर्णीयांपेक्षा चांगले कसे, हे लिहिलं होतं. गोर्या सत्ताधीशांप्रमाणेच गांधी कृष्णवर्णीयांना 'काफिर' असं संबोधत. गुहा, अश्विन देसाई यांच्या पुस्तकांमध्ये हे तपशील आहेत.
१९०८ सालाच्या सुमारास गांधींची महात्मापदाकडे वाटचाल सुरू झाली. कृष्णवर्णीयांबद्दलचे गांधींचे विचार बदलले. कृष्णवर्णीयांना समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आणि लेखही लिहिले. गांधींच्या टॉलस्टॉय फार्मवर आफ्रिकन नेत्यांची येजा सुरू झाली. पुढे भारतात परतल्यावरही गांधींनी द. आफ्रिकेतल्या स्वातंत्र्यलढ्याला कायम पाठिंबा दिला. १९३१ साली गांधी इंग्लंडास गेले, तेव्हा तिथल्या भाषणांमध्येही त्यांनी कृष्णवर्णीयांना समान हक्का मिळावेत, ही मागणी केली. ही भाषणं दिल्लीच्या नेहरू मेमोरियल लायब्ररीत उपलब्ध आहेत.
भारतातल्या उजव्यांचा आदर्श असलेला मुसोलिनीही गांधींना आकर्षक वाटला होता. त्याच्या हुकुमशाही वृत्तीबद्दल लिहिताना त्याच्यात वाखाणण्याजोगे अनेक गुण आहेत, हे त्यांनी लिहिलं होतं. मुसोलिनीनंही गांधींना 'आधुनिक संत' असं संबोधलं होतं. पुढे इटलीनं इथिओपियावर हल्ला केला आणि गांधींचं मुसोलिनी-प्रेम नष्ट झालं.
मुलींना फक्त गृहोपयोगी शिक्षण द्यावं, त्यांना शाळा शिकवायची आवश्यकता नाही असं टिळक - आगरकर 'केसरी'त लिहीत होते. १८८४ साली मुलींसाठी हुजूरपागा शाळा सुरू झाली तेव्हा 'केसरी'नं आकांडतांडव केला. तेच आगरकर पुढे दोन वर्षांनी रखमाबाई राउतांच्या बाजूनं उभे राहिले. 'केसरी'तून बाहेर पडल्यावर 'सुधारका'तून त्यांनी 'मुलींना मुलांसारखंच आणि मुलांइतकंच शिक्षण द्यावं, त्यांना तांत्रिक शिक्षणही द्यावं' हे सतत लिहिलं. मुलींना मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण देण्याची गरज नाही, असं म्हणणार्या टिळकांनी आपल्या मुलीला मॅट्रिकपर्यंत शिकवलं. आगरकरांनी सुधारकातून तिचं अभिनंदन केलं. एरवी विधवा-पुनर्विवाहात पाणीही न पिणार्या आणि सुधारकांना शिव्या घालणार्या टिळकांनी आपल्या मुलीचं लग्न विधवा-पुनर्विवाह झालेल्या नाशकातल्या सुधारकी घरातच लावून दिलं.
या विसंगतींकडे, वैचारिक बदलांकडे त्या काळाच्या संदर्भात आणि या व्यक्तींच्या एकूण कारकिर्दीच्या संदर्भात बघायला हवं.
या विसंगतींकडे, वैचारिक
या विसंगतींकडे, वैचारिक बदलांकडे त्या काळाच्या संदर्भात आणि या व्यक्तींच्या एकूण कारकिर्दीच्या संदर्भात बघायला हवं. >> पूर्ण अनुमोदन.
सही माहिती! धन्यवाद चिनूक्स.
१९०८ सालाच्या सुमारास गांधींची महात्मापदाकडे वाटचाल सुरू झाली. कृष्णवर्णीयांबद्दलचे गांधींचे विचार बदलले. कृष्णवर्णीयांना समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आणि लेखही लिहिले. गांधींच्या टॉलस्टॉय फार्मवर आफ्रिकन नेत्यांची येजा सुरू झाली. पुढे भारतात परतल्यावरही गांधींनी द. आफ्रिकेतल्या स्वातंत्र्यलढ्याला कायम पाठिंबा दिला. १९३१ साली गांधी इंग्लंडास गेले, तेव्हा तिथल्या भाषणांमध्येही त्यांनी कृष्णवर्णीयांना समान हक्का मिळावेत, ही मागणी केली. ही भाषणं दिल्लीच्या नेहरू मेमोरियल लायब्ररीत उपलब्ध आहेत >> किती सोयीस्करपणे ही सगळी ऊपलब्ध माहिती दुर्लक्षित करून चुकीची माहिती पसरवली जाते.
ही बातमी अजून परराष्ट्र मंत्रालयाच्या रडारमध्ये आली नाही असे दिसते.
पुतळा सिंबॉलिक आहे असे समजले तरी गांधी नावासमोर वर्णद्वेषी विशेषण लागणे त्यांची लीगसी कलंकित करण्यासारखे आहे.
Pages