ही बीबीसी वरची न्यूज वाचली.
महात्मा गांधींना 'वर्णद्वेशी' ठरवत त्यांचा पश्चिम अफ्रिकेतील घाना विद्यापीठाच्या आवारातील पुतळा कायद्याच्या शिक्षक आणि विद्द्यार्थांनी काढून टाकला. गांधीजींवर त्यांच्या दक्षिण अफ्रिकेतील वास्तव्या दरम्यान त्यांनी केलेल्या लिखाणातून कृष्णवर्णीय लोकांना 'काफिर' (अफ्रिकेतील 'निग्रो' अर्थाचा शब्द) म्हणण्याचा आणि भारतीयांना कृष्ण्वर्णीयांपेक्षा वरच्या श्रेणीचे म्हणण्याचा आरोप केला गेला आहे.
तुम्हाला हे ईतिहासाला चुकीचे वळण लावण्यासारखे वाटते की त्यांच्या अधिकारात घाना विद्यापीठातील विद्यार्थांची कृती बरोबर आहे असे वाटते?
हरिजनांच्या बाजुने जातीविरोधात आंदोलन ऊभारणार्या गांधींवरील ह्या आरोपात किती तथ्य आहे असे वाटते.
वर्तमानाशी सबंधित नसलेला ईतिहास ऊकरून त्यावरून स्वतःचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी बंडाळी करण्याचे हे दुर्दैवी लोण ईतरत्र पसरू शकते किंवा त्याचे पडसाद ऊमटू शकतात असे वाटते का?
ज्या काफिर शब्दावरून आज
ज्या काफिर शब्दावरून आज हलकल्लोळ होतोय, तो शब्द एकोणिसाव्या - विसाव्या शतकांमध्ये सर्रास, सहज वापरला जाई. त्याला आज आहे तसं आणि तितकं रेसिस्ट आणि अपमानजनक स्वरूप नव्हतं. काफिर लाईम, काफिर कॉर्न हे शब्द आपण अतिशय सहज वापरतो. गांधींची काही पत्रं कृष्णवर्णीयांपेक्षा भारतीय वरचढ, असं सुचवणारी असली तरी काफिर या शब्दावरून वाद घालणं चुकीचं आहे.
छान माहिती चिनूक्स!
छान माहिती चिनूक्स!
ही बातमी अजून परराष्ट्र मंत्रालयाच्या रडारमध्ये आली नाही असे दिसते.
पुतळा सिंबॉलिक आहे असे समजले तरी गांधी नावासमोर वर्णद्वेषी विशेषण लागणे त्यांची लीगसी कलंकित करण्यासारखे आहे.>>+१११
हो बरोबर!!
हो बरोबर!!
त्या शब्दांचं ही असं आहे की एका कृष्णवर्णीयाने दुसर्या कृष्णवर्णीयाला संबोधतांना मजेखातर तो कितीही वेळा वापरला तर चालतो.. पण दुसर्या कोणी तो वापरला की रेसिस्ट.
अतिशय कन्फ्युझिंग आहेत ह्यांच्या संवेदना.
Chinoox, Simba - good posts!
Chinoox, Simba - good posts!
या विसंगतींकडे, वैचारिक
या विसंगतींकडे, वैचारिक बदलांकडे त्या काळाच्या संदर्भात आणि या व्यक्तींच्या एकूण कारकिर्दीच्या संदर्भात बघायला हवं. >> हे तत्वतः मान्य आहे. पण याला दुसरी बाजू ही बरेचदा असते. अशा काही निर्णयांमुळे तुम्ही पर्सनली पोळले गेला असाल, तुमचे पूर्वज पोळले गेले असतील तर त्याला माफी माणसाचे मन चटकन देत नाही.
उदा. कॅनडाचे पहिले पंतप्रधान सर जॉन ए. मॅक्डोनाल्ड यांच्या मुळे कॅनडा अस्तित्वात आला, ठोस दृष्टी लाभली इ. इ. पण त्यांनीच फस्ट नेशनसच्या मुलांना त्यांच्या कुटुंबांपासून दूर करुन रेसिडेंशिल स्कूल मध्ये घालण्याचे बंधन घातले ज्यात भाषा/ अन्न/ ईश्वर/ धर्म वैविध्य बंद करुन टाकण्यात आले. अनेकांचे प्राण गेले. ह्या शाळांचे अस्तित्त्व आजच्या काळात कल्चरल जेन्यूसाईड मानतात. आणि ते अस्तित्त्वात आणणार्या सर जॉन ए. मॅक्डोनाल्ड यांच्या बद्दल टोकाच्या भावना आजही काही लोकांच्या मनात आहेत. दुसर्या बाजूला त्यांचा फोटो दहा रुपयांच्या नोटेवर आहे आणि रस्ते, पार्क ह्यांना त्यांचं नाव ही सगळीकडे देतात. दोन्ही गोष्टी सत्य आहेत, इतिहास सांगताना दोन्ही सांगितल्या जाव्यात.
काही जखमा लवकर भरत नाहीत, व्रण ही रहातातच. त्यातुनच शिकायचे.
जर गांधीजींनी तरुणपणी का
जर गांधीजींनी तरुणपणी का होईना असा उल्लेख केला असेल तर त्यांचा पुतळा हटवण्याचे कृत्य काही तितकेही गैर वा धक्कादायक नाही.
आणखी एक म्हणजे जिथे आपल्याच देशात तो एक पंचावन्न कोटीचा मुद्दा घेऊन गांधीजींचा अगदी टोकाचे तिरस्कार करणारे आणि त्यांच्या हत्येचे समर्थन करणारे कैक आहेत. तिथे दुसरया देशातील सर्वच लोकांनी त्यांना महात्मा म्हणून संबोधावे या अपेक्षा फार आहेत.
चिनूक्स माहिती चांगली आहे.
चिनूक्स माहिती चांगली आहे.
काफिर बद्दल मात्र बहुतेक याचा अर्थ आपण घेतो तसा नसून अफ्रिकेत तो वेगळ्या अर्थाने (एखाद्या वर्णद्वेषी शिवीसारखा) वापरला जातो
https://www.nytimes.com/2016/10/28/world/africa/south-africa-hate-speech...
तेच लिहिलं आहे. आता तसा अर्थ
तेच लिहिलं आहे. आता तसा अर्थ घेतला जातो. पूर्वी नव्हता.
माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स.
माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स.
काफर तसेच इतर अनेक शब्द काळानुसार संमत/असंमत/शिष्ट/अशिष्ट होत जातात. तेव्हा तत्कालिन संदर्भातून ते पाहावे लागतात. वरती एन शब्दाबद्दल उल्लेख आला आहे. हे एक चांगले पुस्तक आहे या शब्दाच्या प्रवासाबद्दल (https://www.amazon.ca/Nigger-Strange-Career-Troublesome-Word/dp/0375713719)**
घानामधल्या या बातमीकडे पाहताना इतर संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे. आफ्रिकेतल्या बहुसंख्य देशात व्यापारी वर्ग व आर्थिक सत्ता मुख्यत्वे भारतीय वंशाच्या, त्यातसुद्धा गुजराती (हिंदू व मुस्लिम) लोकांच्या हातात आहे. सर्व सत्ताधीश, रेबेल ग्रुप्स, मिलिशिया यांच्याशी यांचे उत्तम संबंध असतात त्यामुळे सहसा यांना धक्का लागत नाही. स्थानिकांना या भारतीयांकडून वंशद्वेशी वागणूक सर्रास मिळते. स्थानिकांसाठी वेगळे शौचालय, मालकासाठी वेगळे असे बर्याच कारखान्यांमधून दिसून येते. आर्थिक तफावर टोकाची आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भारतीय व्यापारी समाजाप्रति चांगली भावना खचितच असते.
घानाच्या या बातमीत गांधीजींचा पुतळा हलवण्यात असे काही स्थानिक संदर्भ आहेत का हे बघणे गरजेचे आहे. तसेच आफ्रिकन राजकारण फार ट्रान्झिअंट, क्षणिक असते. तेव्हा सद्य परिस्थिती व घटनांचा प्रभाव अधिक असतो.
क्वाने नकृम्हा व पंडित नेहरुंचे संबंधही चांगले होते.
** तुम्ही म्हणाल जिथे तिथे पुस्तकाच्या लिंका देतो पण आदतसे मजबूर
ह्या अमेरिकेतल्या एन* आणि
ह्या अमेरिकेतल्या एन* आणि अफ्रिकेतल्या के* शब्दांच्या अराऊंड ट्रेवर नोआचा एक स्टँड अप कॉमेडी एपिसोड आहे नेटफ्लिक्सवर.
एपिसोड काही मला फार हॅलॅरिअस वाटला नाही पण सद्यस्थितित हे दोन शब्द ह्या दोन प्रांतांमध्ये कसे आणि कुठल्या काँटेक्स्टमध्ये वापरले जातात ह्याची बरीच चांगली माहिती तो देतो.
टवणे सर,
सो कॉल्ड भारतीय वंशाच्या लोकांच्या भांडवलशाही बद्दलच्या द्वेषाचा अँगल जरा फार फेच्ड पण ईंट्रेस्टिंग वाटतो. पुन्हा तोकड्या बातमी नुसार काही मोठ्या जमावाची ही विचारधारा असावी असे वरवर तरी वाटत नाही पण अशा भावना वणव्यासारख्या पसरतात हे सुद्धा खरे आहे.
बहुतेक तरी या पुतळ्याला तो
बहुतेक तरी या पुतळ्याला तो जेव्हा उभारला गेला तेव्हापासूनच विरोध होता. त्यामुळे तो हटवला गेला यात वेगळे काही वाटत नाही.
ह्या चर्चांचा उपयोग काय असतो
ह्या चर्चांचा उपयोग काय असतो नक्की?
कोणाची आवड व श्रद्धास्थान काय असावी हे कोण ठरवणार?
आणि , गांधी सगळ्यांनाच आवडावे अशी अपेक्षा का?
त्यांची मतं ( देशकारभार व ईतर) हि आताच्या काळात इतर देशात पटतीलच असे आहे का?
Pages