दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरोईन गोल गरगरीत चंद्राला बघुन आपल्या प्रेमाची महती गातेय.
चंद्राप्रमाणेच तिचं कुंकुही गोल गरगरीत.

काय झकास दिसते त्यात साधना. आहाहा !

एक पाऊसगाणं. नायिका भरुन आलेल्या ढगांना विनवते आहे. (मराठी अभिनेत्री)

नाही. गाता गाता नायिका पाण्यातल्या प्रतिबिंबात पाहून मधेच आपल कुंकू सारख करते.

बरोबर.

बरोब्बर.. हैद्राबादवाल्यान्नाच ओळखु येइल ते. Proud
भाषा भारीय पण ती, अन मेहमुद स्टाईल डान्स!
अरी ओ पोट्टी, कहा चल्ली, पल्लट मेरे अन्नार की कल्ली... Lol

स्टेशनमध्ये गाडी उभी आहे, फलाटावर नाच सुरू आहे. फलाटाच्या एका टोकाला सुपरस्टारचा मोठा फ्लेक्स आहे.

स्टेशनमध्ये गाडी उभी आहे, फलाटावर नाच सुरू आहे. फलाटाच्या एका टोकाला सुपरस्टारचा मोठा फ्लेक्स आहे>>>
लुंगी डांस @ चेन्नई एक्सप्रेस

बरोबर!
तुम्ही हे लगेच ओळखाल हे माहीत होते.

Pages