दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, ठीक आहे. दुसरे देतो तोपर्यंत.

एक सुंदरी. जिला एक जण नृत्याचा आग्रह करीत आहे तर दुसरा तिजला सर्वांसमक्ष नृत्य करण्यास आक्षेप घेत आहे.

हिंट : आक्षेप घेणा-याचा संवाद सुप्रसिद्ध आहे
"हे बसन्ति एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य|"

मानव पृथ्वीकर
आधीच्या कृष्णधवल गाण्याची हिंट

हे गाणे ज्या सिनेमातले आहे त्या नावाचा उत्सव गुजरातेत प्रसिद्ध आहे. एक अभिनेता एका नेत्याबरोबर त्या उत्सवात सामील झाला याची चर्चा झाली होती.

"हे बसन्ति एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य|" >>>
संस्कृत शोले अलीकडेच कायप्पा वर फिरत होता Proud
जब तक है जान जाने जहाँ मैं नाचूंगी..

जब तक है जान जाने जहाँ मैं नाचूंगी >>>> बरोब्बर

रच्याकने , शोले खरंच संस्कृत मधे आला आहे का ?

हिरो गावात प्रोजेक्टर लावून गावकर्यांना एकीचे महत्त्व पटवून देत आहे. सोबत लहान मुले मुली नाचत आहेत. श्रवणीय संगीत।।

श्यामा एका प्रशस्त दालनात गाते नाचते आहे. दालनात पियानो आहे, तीन आरसे असणारा ड्रेसिंग टेबल आहे, त्यात तिच्या एकदा तीन प्रतिमाही दिसतात. नायक पाईप ओढत कोण गातंय याचा शेध घेत शेवटी दालनात येतो.
श्यामा खरं तर त्याला आकर्षीत करण्यास मुद्दाम गात आहे पण तसे ती त्याला कळु देत नाही.

चित्रपट कृष्णधवल असला तरी गाणे सर्वांच्या महितीतले आहे.

मराठी चित्रपट
नायक रात्री एकाचा खून करतो व पळून घरी येत़ो
सकाळी त्या व्यक्तीच्या खूनाची बातमी ऐकून नायक नायिका आनंदाने हे गाणे गातात

कोई बता दे दिल है जहाँ
क्यों होता है दर्द वहाँ
तीर चला के ये तो न पूछो
दिल है कहाँ और दर्द कहाँ

कार रस्त्याच्या बाजूला थांबलीय. ड्रायव्हर सीट वर नायक व मागच्या सीट वर नायिका. गावातल्या मुली घागरी घेऊन नदीवर पाणी भरायला आल्या आहेत आणि नाचत गात आहेत.

राजा हिंदुस्तानी

आए हो मेरी ज़िन्दगी में तुम बहार बन के
दिल में यूँ ही रहना हाय.. मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार प्यार बन के

नाही. गावातल्या मुली गात आहेत.. वेल.. मुख्य गाणारी एकच. नायक नायिका त्यात सामील होत नाहीत.
हिंट: गाणारी नटी: मिनू मुमताझ.

एक माझ्याकडून... गावात एक शाहीर एका भोंदू साधूला त्याच्यासमोर नकला करून नंतर जाब विचारीत आहेत.

नायक रात्री एकाचा खून करतो व पळून घरी येत़ो
सकाळी त्या व्यक्तीच्या खूनाची बातमी ऐकून नायक नायिका आनंदाने हे गाणे गातात
>>
घनचक्कर_ दत्तु मेला नी आम्हा दोघांचा नशिब बदलुन गेला

नीट बघा. नटी कोण हे न ओळखताही गाणे ओळखता येईल. सगळ्यांच्या माहितीतले गाणे आहे हे, ओरिजिनल नाही तर रिमिक्स तरी.

Pages