युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा, साबा सुरण फँन असल्याने ही भाजी वारंवार खावी लागते. सासुरवास गं बाई. आता खाऊन खाऊन तितकी वाईट लागत नाही. एकदा माहेरी गेल्यावर मासाहेबांनी सुरणाच्या भाजीचा बेत आखल्यावर मात्र मला फक्त गोडवरण भाताची भूक आहे असे सांगितले होते.

अरे सुरणाचा किस कसला भारी लागतो. >>> हो सही लागतो, आई उपासाला करायची. मी एवढे कष्ट घेत नाही, मी सुरण, बटाटा, थोडा लाल भोपळा भाजी करते उपासाची भाजी करते आणि वरून उपासाचा चिवडा घालून खाते Happy .

शिर्यात घालता येईल किंवा प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम ला टाॅपिंग

माझ्याकडे ही एक ब्राऊन शुगर च पॅकेट पडुन आहे. >> वेळीच सावरीलीस! सवय फार वाईट असते बरं.. Happy Wink
गूळाऐवजी आमटी-भाजीत वापरून संपवता येते. नाहीतर बेकींग (क्रंबल, कॉबलर इ.) उद्योग करावे लागतात.

माझ्याकडे साबुदाण्याचे पीठ आख्खी बरणीभर शिल्लक आहे. त्याचे नेमके काय करावे हे कळत नाही. एकदा त्यात थोडासा रवा टाकून, वडे करून पाहिलेत, पण अतिशय तेलकट व चिकट झाले. कोणीतरी काहीतरी सुचवा.

राजगिरा पीठ(न मिळाल्यास साध्या राजगिरा लाह्या विकत घेऊन मिक्सर मध्ये पीठ करता येईल), मिरची जिरे वाटण घालून भाकऱ्या थापता येतील साबुदाणा पिठाच्या, किंवा थालीपीठ.बरोबर दाणे मिरची जिरे आमसूल आमटी.

साबुदाण्याच्या पिठाचे लाडू करता येतात, क्रंच करता जरा सढळ हातानं सुकामेवा घालावा लागेल
मुरुक्कु करताना हे पीठ वापरता येतं
लापशी
उपासाची भाजणी करता येइल
उपासाचे थालीपीठं करतांना हे पीठ बाकी पिठांत मिसळून त्यात किसलेला बटाटा वगैरे जिन्नस घालून थालीपीठं करायची
लाडात असाल तर पिठात उकडलेला बटाटा मिसळून डो करायचा आणि पनीर क्रंबल, हिरवी मिरची, थोडी काळीमीरी क्रश करून आणि मीठ याचं सारण भरून पराठा/कचोरी टाईप करता येऊ शकेल (हे मी केलेलं नाहीय कधी; उगाच डोक्यात आलं अन लिहिलं मी... Wink )

माझ्याकडे साबुदाण्याचे पीठ आख्खी बरणीभर शिल्लक आहे. त्याचे नेमके काय करावे हे कळत नाही.>> उपवासाचे पापड करतात याचे, उकडलेले बटाटे, जिर्, तिखट मिठ,सा.पिठ घालुन मळुन घ्यायच , तुपावर लाटुन वाळवायचे , तळल्यावर अतिशय सुन्दर लागतात, ( कच्च्या लाट्या तर भारिच लागतात)

तिळाचे किंवा मोहरी चे तेल भाजी करायला वापरले तर चालते का ? ह्याचे बरेच फायदे वाचले म्हणून वापरण्याचा विचार करत आहे
पण उष्ण असते असे ऐकून आहे , हि तेल वापरायला काही टिप्स द्याल का ? कोणी रेग्युलरली वापरात आहे का स्वैपाक साठी ?

धन्यवाद राजसी !
तुम्ही तिळाचे तेल म्हणत आहात कि मोहरीचे ?
मी मागे एकदा तिळाचे वापरले होते पण त्याने मला पोटात आग पडल्या सारखी भूक लागली होती मग वाचले कि हे तेल उष्ण असते
काही काळजी घ्यायला हवी का कि नेहमीच्या तेल सारखेच वापरायचे ? तुम्ही कोणत्या ब्रँड चे किंवा घाण्याचे वापरता ते सांगाल का ?

मोहरी चे तेल भाजी करायला वापरले तर चालते का >>>> हो.पण ते तेल तापवताना धूर येऊ द्यायचा,मग त्यात फोडणी घालायची इति पंजाबी शेजारीण!

तिळाचे तेल मी वापरते पण मागे चुकून मोहरीचे आणले गेले. चष्मा नेला नव्हता आणि त्या सेल्सगर्लने हे तिळ तेल आहे सांगितलं, तरी विचारतेय एवढं डार्क कसं तर म्हणाली वेगळा प्रकार, तिला दोष देण्यात अर्थ नाही, माझा बावळटपणा पण त्याचा इतका उग्र वास येतो की मी स्वयंपाकात वापरू शकत नाही. एकदा आमटी केलेली पण मग त्यात गाईचं तूप घातलं मग जरा उग्र वास कमी झाला. म्हणजे एखादे तूप अगदी घरचं साजूक तूप किंवा खाण्याचे खोबरेल तेल घातलं तर तो वास उग्र कमी होईल. आता थंडीत भाजीचे, खजुराचे लोणचं करेन तेव्हा वापरेन ते तेल.

पण त्याचा इतका उग्र वास येतो की मी स्वयंपाकात वापरू शकत नाही>>>>>> अन्जू, आपल्याला नीट माहित नसते ते तेल कसे वापरायचे .कारण माझ्या पं.शे.च्या भाज्यांना काहीही उग्र वास येत नाही.

अमुल वगैरे च जे दही मिळतं, त्यात विरजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते bacteriya काढून घेतात त्यामुळे ते दही पुढे आंबट होत नाही तसेच ते वापरून विरजण लावता येत नाही असा ऐकलं होत . घरी अशी प्रोसेस करता येते का दही बिलकुल आंबट न होण्यासाठी

बाकी काही माहित नाही पण <<< त्यामुळे ते दही पुढे आंबट होत नाही तसेच ते वापरून विरजण लावता येत नाही असा ऐकलं होत >>> हे चुकीचे आहे, आम्ही लावतो विरजण अमुलचे दही घालुन. मस्त घट्ट होते अन जास्त दिवस ठेवले नाही तर आंबट देखील नाही होत. आम्ही दही लागल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवतो, त्यानेदेखील दही आंबट होत नाही.

Airtight food grade plastic container दही लावलं तर दही 4 ते 5 दिवस छान राहते. दही लागल्यावर फ्रिजमध्ये ठेवायचं झाकण नेहमी बंद हवं.

विरजणावरुन आठवलं, आमच्याकडे सततचं थंड हवामान असल्यामुळे इडलीचं पीठ आंबायला त्रास होतो. यावर उपाय म्हणून माझ्या एका दाक्षिणात्य मैत्रीणीने तिच्या घरचं थोडं इडलीचं आंबलेलं पीठ दिलं. मी दोन तीन चमचे माझ्या पीठात घातलं तर सकाळी लावलेलं पीठ संध्याकाळी इडलीसाठी तयार होतं. नेहमी इडल्या करत असल्यामुळे तिच्याकडे ती हे नेहमी करते. मी नेहमी करत नाही म्हणून मला तिने माझ्या नव्या आंबलेल्या पीठातून थोडं काढून फ्रीजरमध्ये ठेवायला सांगितलं आहे. पुढच्यावेळेस ते डीफ्रॉस्ट करुन वापरेन. इथे कुणाला हा त्रास असेल तर युक्ती म्हणून वापरुन पहा. Happy

हो ना.. ही भारीच आयडिया आहे. अर्थात आमच्या इथे पीठ आंबायला काही अडचण नाही येत कधीच. उलट उन्हाळ्यात कधीकधी पातेलं जास्त भरलेलं असलं की पीठ भरभरून वर येऊन सांडतं खाली.
पण आयडिया मस्तच.

ते वापरून विरजण लावता येत नाही असा ऐकलं होतं >>>
हो, मी विविध प्रकारे त्याचं विरजण लावण्याचा प्रयत्न केला आहे, पण तश्या दह्याला तार येते. गावाहून आल्यावर वगैरे नव्याने विरजण आणायचं असेल तर डेअरीतून दही आणते.

वापरून विरजण लावता येत नाही असा ऐकलं होतं >>>
हो, मी विविध प्रकारे त्याचं विरजण लावण्याचा प्रयत्न केला आहे, पण तश्या दह्याला तार येते. गावाहून आल्यावर वगैरे नव्याने विरजण आणायचं असेल तर डेअरीतून दही आणते.>>>>> अगदी हेच लिहायला आले होते. हमखास तार येते दह्याला. मग मी पण डेअरीतून आणते मुद्दाम विरजणासाठी दही.

घरी लोणी करत असाल तर खूप दिवसांनी गावाहून आल्यावर घरचं विरजण मिळणं शक्य आहे.

गावाला जायच्या आधी एक दोन दिवस घरच्या सायीच्या दह्याच लोणी काढायचं. अर्धी वाटी लोणी घेऊन त्यात ते बुडेल इतकं पाणी घालायचं आणि ती वाटी झाकण ठेवून फ्रीजर मध्ये ठेवून द्यायची.

गावाहून आल्यावर ती वाटी बाहेर काढून नॉर्मल ला आणायची त्यातलं पाणी फेकून द्यायचं. जे लोणी उरत ते चमच्याने खलल्या सारखं ढवळायचं म्हणजे लोण्यातला ताकाचा अंश वेगळा होतो . त्याचा विरजण म्हणून उपयोग करायचा. मस्त दही बनतं.

गेल्या वर्षी दोन महिने लंडन ला गेले होते . दरम्यान हे करून ठेवले आहे ते विसरले. म्हणून आल्यावर दुकानात गेले सुट्ट दही आणायला तर तो( हनुमान स्वीट ठाणा ) म्हणला गणपती आहेत म्हणून दहा दिवस दही मिळणार नाही. घरी येत असताना घरी विरजण ठेवून दिलंय ते आठवलं. मग बघितलं तर फ्रिजर मध्ये मस्त टिकलं होत . वरील पद्धतीने लावलं विरजण आणि सुंदर दही लागलं.

पण ह्या साठी घरी सायीच्या दह्याचे लोणी काढण् आवश्यक आहे. हल्ली तरुण मुलीना ते शक्य होत नाही व्याप भारी पडतो म्हणून.

Pages