युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बडीशेप निवडून घेणे. एका वाटीत लिंबूरस, काळं मीठ, जराशी हळद असं मिक्स करून ते या शोपेला चोळायचं. नंतर मंद आचेवर भाजायची जरा सुकल्यासारखी झाली की. अफलातून चव असणारी मुखशुद्धी तयार. यातच धणाडाळ, तीळ वगैरे अ‍ॅड करू शकाल. वर शोप संपण्याबद्दल होतं म्हणून आधी ही अ‍ॅडिशन नाही सांगीतली...

मनिम्याऊ - बडिशेप काही खराब नाही होणार. संपवलीच पाहिजे असे काही कारण आहे का? तुम्ही मसाले करता का घरी ? मालवणी मसाला, चेटिनाड मसाला अशा बर्‍याच मसाल्यांमधे बडिशेप लागतेच. उसळींमधे बडिशेपेने मस्त फ्लेवर येतो. मी मटकी, चवळीला नेहमी वापरते. इतर मसाल्यासोबत बडिशेप फोडणीत किंवा कुटून घालायची थोडी. मी पण पाकिट आणून ठेवले की बरेच महिने राहते माझ्याकडे ते. कधी खराब नाही झाले.

मनिम्याऊ बडीशेप की बाळशोप????
बडीशेप जास्त असेल तर त्याचं टिकाऊ सरबत बनवू शकता.
बडीशेप 1 तास पाण्यात भिजवून मिक्सर मधून वाटून , रुमलातून गाळून घ्या . यात पाणी कमी असावे आणि रस जास्त. आता त्यात साखर घालून पाक करायचा. थंड करून काचेच्या बाटलीत भरून फ्रीज मध्ये टाकावे. सरबत तयार.
ग्लास भर पाण्यात दोन चमचे सरबत मिक्स करून प्यावे.
औषधी आहे. ऍसिडिटी, गर्मी वर रामबाण उपाय.

बाळशोप असेल तर ते मुखवास बनवून संपवावे. किंवा फोडणी , चटणी वगैरे मध्ये वापरून टाकावे.

Thank you

abehld : आंबेहळद की ओली हळद?
आमच्याकडे (विदर्भात) तरी जी आंबेहळद मिळे ती खात नसत. पुरळ, सूज, डॉकेदुखी यावर उगाळून लेप लावत.

खायची आंबेहळद पण असते का?

मानव +१
ओली हळद + आले याचे बारीक काप करून चालू चालू लोणचे करतात.

एक सुरणाचा तुकडा आणला.सुरण कधी खाल्लं नाही पण ते रताळ्या सारखं पण कमी गोड लागत असेल असा अंदाज.कुकर ला उकडलं. घरात नखरे करणारी मेम्बर जेवायला नसल्याने हे सुरण उकडून काप करून पाणिनी मेकर मध्ये मसाला लावून ग्रील करुन खायचे असा काहीसा प्लॅन होता.पण बाहेर जेवायला गेल्याने उकडून फ्रिज मध्ये ठेवलेय.
कोणी सुरण असे खाल्ले आहे का?ठीक लागते का?

सुरण चिरताना खाज आली का ? चिंच मस्ट आहे, खाजरं असतं सुरण. सुरणाचे कटलेट चविष्ट आणि झटपट होतील, उकडलेले असल्याने. मी परतून भाजी आणि भरीत खाल्लं आहे, कटलेट ऐकून माहीत आहे. छान लागते, खाजर नसेल तर.

कटलेट मध्ये सुरणाला जोड म्हणून आणि काय घालायचं?
(माफ करा, आमच्या सासर आणि माहेर च्या 3 पिढ्यात सूरण घरी आणणारी मी पहिलीच आहे.त्यामुळे बाळबोध प्रश्न.)

मला सुरणाचे नाव काढल्यावर बावर्चीमधला एक डायलॉग आठवतो. अरे भाई, खाना बनाना भी एक आर्ट हैं, बनानेवाला सुरन को मटन बना सकता है और मटन को सुरन!!

मॅगी मी पण ते च लिहायला आले सूरन के कबाब हिंग डालके माझ्या मते सुरण उकडून त्यात हिंग आले लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे वाटण , गरम मसाला व थो डे कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे . कबाब बनवावेत तळून किंवा शॅलो फ्राय करून घ्यावेत. मग मटणाची ग्रेव्ही करून त्यात सोडा वेत. सोर्स बावर्ची सिनेमा. ते एके हनगल काय क्यूट दिसतात. इतनी जल्दी इसने मट्न लाया कब और कबाब बनाये कब. ते सूरण के कबाब आहेत हे कळल्यावर तोंडाचा आ वासतात दोघे भाउ. दोघी भावजया ल ट के रागवतात.

लाल तांदुळ आहे घरात, त्याचे काय करावे? भात केला होता पण तो चवीला कडू लागत होता. हे तांदूळ मी असंच एकदा त्या ह्या स्वस्त मार्ट मधून आणले होते.

सुरण घेतना आतला रंग बघुन घ्यावा. लालसर गुलाबी सुरण खाजरा असतो. त्याउलट पिवळा / पांढरा रंग असेल तर जरा कमी खाजवतो

Receipe of Suran Cutlet: 3/4 kg Suran swatch dhun saal kadhun mothya Phodi karun, 2-3 mothe batate donhi ekatra pani n ghalta cooker madhe shijavayach.
Aadlya ratri ch Mee cooker karun thevte. Dusrya diwashi suran ani batate kisun/kuskarun tyat tikhat,meeth 2 limbancha raas dhane jeere powder kothimbir etc ghalun neet mix karayache. Ekaa seperate kadhai madhe 2-3 kande phodani karun changle partun ghyave v he mishran tya suranachya saranavt neet mix karave.
Tayaar saranche round cutlet karun shallow fry karun sauce barobar serve karave.

धन्यवाद मंडळी.उकडलेला तुकडा संध्याकाळ पर्यंत फ्रीज मध्ये होता.शेवटी घाईत चपटे तुकडे केले, त्यांना दही तिखट ताक मसाला मीठ लावून ग्रील कम पानिनी मेकर मध्ये खरपूस भाजले आणि सुरण आहे हे न सांगता दोन दोन तुकडे 2 मेम्बराना दिले.लहान मेम्बराने खाल्ले पण विशेष आवडले नाही(नावडलेही नाही).मोठ्या मेम्बराला सुरण घरात आले आहे(पिस्तोल जेल मे आ चुका है) हे माहीत होते पण स्त्री दाक्षिण्य म्हणून ते खाल्ले.उरलेले 4 पीसेस घरातल्या स्त्री ने खाल्ले.नथिंग टू राईट होम अबाउट.आवडले नाहीत आणि नावडले नाहीत.परत आवर्जून आणणार नाही.

अनु प्रतीसाद द्यायला उशीर झालाय. पण परत आणले तर छोटे चपटे तुकडे करून शॅलो फ्राय / एफ्रा करून चाट मसाला घालून खा.

Pages