एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
चिनूक्स यांची अनेक मते मला
चिनूक्स यांची अनेक मते मला पटलेली नाहीत; त्यांपैकी काही ही.
१. उज्ज्वल, जाज्ज्वल्य.
Submitted by चिनूक्स on 30 April, 2009 - 18:04 <<
जाज्जवल्य मी कधीच वाचलेले नाही.
२. 'अशा' हे शुद्ध रूप आहे. स्त्रीलिंगी अनेकवचनी रुपासाठी 'अश्या' हे रूप वापरण्याचा प्रघात होता. मात्र नवीन नियमांनुसार 'अशा' , 'तशा' ही रुपे वापरली जावीत.
Submitted by चिनूक्स on 20 May, 2009 - 17:03
असाचे सामान्य रूप अशा(पुल्लिंग), असेंचे सामान्य रूप अशीं (नपुंसकलिंग) आणि अशाचे सामान्य रूप अश्या (स्त्रीलिंग) . ह्यांत शुद्धलेखनाच्या नवीन (अशास्त्रीय)नियमांनी कोणताही बदल झाल्याचे माहीत नाही.
अश्या स्त्रिया हेच बरोबर वाटते, अशा स्त्रिया योग्य वाटत नाही.
याा धाग्याची पाने नवीनतम ते आधी आणि सर्वात जुने ते शेवटी अशीं करता येणार नाहीत का? शोधायला फार त्रास होतो.
शुद्ध मराठी, तुमचे म्हणणे
शुद्ध मराठी, तुमचे म्हणणे बरोबर वाटतेय.
अशा हे एकवचनच दर्शविते असे वाटते.
असा माणूस - अशा माणसाला
अशी स्त्री: अशा स्त्रीला
अनेकवचन असेल तर
अशी माणसे - अश्या माणसांना
अश्या स्त्रीया - अश्या स्त्रियांना.
in spite of = ही
in spite of = ही
मी ते करू शकलो, तो असल्यामुळे नही तर त्याच्या अनुपस्थीतीत ही .
हो माधव.
हो माधव.
माझ्या मते, वरील उदाहरणात 'तो
माझ्या मते, वरील उदाहरणात 'तो' नेहमीच अनुपस्थितीत नव्हता, कधी उपस्थित, कधी अनुपस्थित असा होता. अश्या परिस्थितीत त्याच्या उपस्थितीचा फायदा होण्याऐवजी तो अनुपस्थित असतानाच मी जास्त काम करू शकलो असे असावे. त्याच्या असण्याचा काम पूर्ण होण्यात जेवढा वाटा होता त्यापेक्षा त्याच्या नसण्याचा होता अश्याप्रकारची रचना करता येऊ शकते.
चुभुद्याघ्या.
झोजा मल्हारी असा शब्द आहे का?
झोजा मल्हारी असा शब्द आहे का? हा एक लोक कलाकार घालतात त्यातला कपड्यांचा प्रकार आहे. मला कायम काळे घोळदार लूज फ्रॉक सारखे कुड ते घालायला आव डते. खाली चुडीदार. हा वेस्टर्न ड्रेसेस पैकी लूज ब्लॅक ड्रेस असू शकतो किंवा शिवलेला अनारकली बिबा चा कुर्ता.
असे कपडे घातले की माझे बाबा आला झोजा मल्हारी म्हणून चि ड वत. आज तसला एक कुडता फोल्ड करून इस्त्रीला देताना आठवन झाली.
ह्यातील लोककलाकाराच्या ड्रेस मध्ये कव ड्या मणी लावलेले असतात व तो वासुदेवासारखाच घरोघरी फिरत असे. वाघ्या मुरळीतला वाघ्या असावा बहुतेक. वडूज कराड भागातील शब्द आहे.
झोजा मल्हारी म्हणजे ढगळ कपडे
झोजा मल्हारी म्हणजे ढगळ कपडे घातलेला किंवा कपड्याचा पार बोंगा झालेला माणूस. झोज हा खडीबोलीतला ढेरीसाठीचा शब्द आहे जो उत्तरेकडून आपल्याकडे आला. झोजा म्हणजे सुस्तावलेला, पोट सुटलेला असा माणूस. मोल्सवर्थमध्ये झोजा/झोज्याचा अर्थ ढेरपोट्या (burly and unwieldy fellow) असा दिला आहे. अशा माणसाचे कपडे जर कोणी घातले तर निश्चितच त्याला ते मापाला मोठे होऊन घोळदार दिसणार. खंडोबाच्या वाघ्याचे कपडे सहसा असेच ढगळ आणि घोळदार असतात. त्यावरून झोजा मल्हारी असा वाक्प्रचार आला असावा.
बहुभाषिक की बहुभाषक ?
बहुभाषिक की बहुभाषक ?
योग्य शब्द कुठला?
भाषिक म्हणजे भाषेसंबंधी.
भाषिक म्हणजे भाषेसंबंधी.
भाषक किंवा भाषी म्हणजे (भाषा) बोलणारा.
उदा0- सरकारचे भाषिक धोरण, . मराठी भाषक, बहुभाषी, अल्पभाषी, मृदुभाषी, वगैरे.
मला एक शंका आहे. कृपया निरसन
मला एक शंका आहे. कृपया निरसन करावे.
असावे या अर्थी असाव लिहिल तर असाव मधल्या व वर टिंब देणे (देणं) सध्याच्या मराठी व्याकरणाच्या नियमानुसार आवश्यक आहे काय ?.
बहरणार आणि बहरणारं यात फरक नाही का ? मग नुसत (नुसते, नुसतं) बहरणार अस (कि असं, असे याअर्थी) लिहून कस ( की कसं, कसे या अर्थी) चालेल?.
बहरणार झाड आणि बहरणार (बहरणारे या अर्थी ) झाड यात अर्थ बदलत नाही काय.
तुमचे म्हणणे बरोबर आहे... पण
तुमचे म्हणणे बरोबर आहे... पण इंटरनेट आणि वॉट्सॅप च्या जमान्यात काहीही चालते त्यामुळे लोक जमेल ते लिहीतात.. (माझे वैयक्तिक मत)..
देसायांस +१
देसायांस +१
असावं, बहरणारं हे बरोबर
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/7295?page=3
इथे खालून दुसरा प्रतिसाद. - चिनूक्स जाज्ज्वल्य बरोबर म्हणताहेत.
शब्दरत्नाकरात जाज्वल्य आहे.
मोल्सवर्थमध्येही.
मला नेहमी पडणारा एक प्रश्न -
मला नेहमी पडणारा एक प्रश्न -
सर्वांचे धन्यवाद मानते
की
सर्वांना धन्यवाद देते
यातील कोणते रुप बरोबर आहे? आभार मानतात हे माहीत आहे पण धन्यवाद मानतात की देतात?
सर्वांना धन्यवाद - एवढंच
सर्वांना धन्यवाद - एवढंच म्हणावं. कारण धन्यवाद म्हणजेच 'धन्य' असल्याचे वदणे किंवा बोलणे.
थोडे उच्चाराविषयीही ओडिओ
थोडे उच्चाराविषयीही ओडिओ असावेत. श आणि ष यांच्याबद्दल नक्की कसे उच्चारायचे.
पोटफोड्या ष साठी जिभेचा शेंडा
पोटफोड्या ष साठी जिभेचा शेंडा आत टाळू कडे वळवायचा बोलताना . अस सध्या मी भगवद्गीता शिकतेय तेव्हा स्पष्ट उच्चारण कसं असावं ते शिकवताना शिक्षक सांगतात.
मागची सगळी पाने आता लक्षात
मागची सगळी पाने आता लक्षात नाही पण मानले जाते हे अशुद्ध आणि मानल्या जाते, केल्या जाते हे शुद्ध असे आहे का? की बोलताना आपण म्हणले जाते म्हणतो आणि लिहिताना म्हटले जाते लिहितो तसं आहे हे
हिंदीसाठी हे सापडले
हिंदीसाठी हे सापडले
https://www.setumag.com/2016/12/write-better-hindi-anurag-sharma.html?m=1
आमंत्रण आणि निमंत्रण यात फरक
आमंत्रण आणि निमंत्रण यात फरक काय आणि ते कुठे वापरायचे?
चिनूक्स यांनी शब्दार्थाच्या
चिनूक्स यांनी शब्दार्थाच्या धाग्यावर हे लिहिलं होतं.
एखादं कार्य टाळता येणं शक्यच नसेल, उदा., श्राद्ध, यज्ञ, तेव्हा त्या कार्याचं बोलावणं करण्यासाठी 'निमंत्रण' हा शब्द वापरतात.
एखाद्या कार्यास न जाऊन चालणार असेल, तर 'आमंत्रण' हा शब्द वापरतात.
अरे बाप रे हा फरक माहीत
अरे बाप रे हा फरक माहीत नव्हता.
मागची सगळी पाने आता लक्षात
मागची सगळी पाने आता लक्षात नाही पण मानले जाते हे अशुद्ध आणि मानल्या जाते, केल्या जाते हे शुद्ध असे आहे का? की बोलताना आपण म्हणले जाते म्हणतो आणि लिहिताना म्हटले जाते लिहितो तसं आहे हे>>>>>
हे. मानल्या , केल्या, घेतल्या, वाटल्या एका भागात बोलायची पद्धत आहे. मी ही मायबोलीवरच प्रथम पाहिली. त्या आधी असले शब्दप्रयोग कधीही ऐकले नव्हते. तुम्हाला जसे हे असेच बोलल्याशिवाय जमत नाही तसे मला हे असे ऐकुन जमत नव्हते. आता ऐकले की ‘ओह, तिकडचा आहे होय‘ हा विचार मनात येतो :). माझ्यासाठी इकडचे म्हणजे कोकणातले. तिकडचे म्हणजे पल्याड देशापुढचे, विदर्भ वगैरेतले.
आमंत्रण आणि निमंत्रण
आमंत्रण आणि निमंत्रण
https://www.loksatta.com/do-you-know/what-is-difference-between-amantran...
वाचले.
वाचले.
..
सध्या लोकसत्तामध्ये आठवड्यातील पाच दिवस भाषासूत्र सदर चालू असते. त्यातील एका लेखकांना मी या विषयाचा संदर्भ मिळेल का अशी विचारणा केली होती. त्यांचे मला आलेले उत्तर त्यांच्याच शब्दात असे:
"दातेकर्वे कोशात आमंत्रण व निमंत्रण या दोहोंचा अर्थ बोलावणे , असा दिला आहे.
व्युत्पत्ती कोशात आमंत्रण याचा मूळ संस्कृतमधील अर्थ निरोप घेणे असा दिला आहे.
त्यामुळे आपल्याकडे फरक केला जात असावा . वैयक्तिक पातळीवर अगत्यपूर्वक बोलावणे याला निमंत्रण असे म्हणणे रूढ झाले आहे".</em>
कुठे लिहायचं ते माहित नाही
कुठे लिहायचं ते माहित नाही त्यामुळे इथेच विचारते.
मुलीला औपचारिक पत्रलेखन आहे. त्यांना आई वडिलांना पत्र लिहितांना सा न वि वि सांगितले आहे. खरंतर ते शि सा न वि वि हवे ना?
आई/वडील/आजी/आजोबा यांना शि सा न वापरायचे ना?
यात काकू/आत्या/मावशी/मामी यांना काय मायना वापरायचा ती स्व आणि सा न वि वि?
वि वि- विनंती विशेष
वि वि- विनंती विशेष लिहिण्यामागे काय कारण असते? त्याचा अर्थ काय होतो
काही 'विशेष ' असल्यास कळवावे
काही 'विशेष ' असल्यास कळवावे ही विनंती
असं आहे का ते ?
विशेष = काही नवं जुनं ?, गोड बातमी etc
नसता भोचकपणा !
गवसणी म्हणजे तानपुर्याला
गवसणी म्हणजे तानपुर्याला असलेले कापडी कव्हर. 'आभाळाला गवसणी घालणे' हा वाक्प्रचार ओळखीचा आहे. पण फौजदार पदाला गवसणी हे चुकिचे आहे असे वाटते. Mixed metaphors.
https://pudhari.news/maharashtra/nashik/589206/nashik-shaila-did-the-har...
बरं झालं हा धागा वर आला
बरं झालं हा धागा वर आला
कृषीतज्ञ कि कृषितज्ज्ञ
परतंत्र्य कि पारतंत्र्य
Pages