१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
लाजो, तुम्ही दिलेल्या
लाजो,
तुम्ही दिलेल्या रेसिपीनी मी पेढे केले. मस्त झाले. कलाकंदासारखा रंग आला.
मला जो थिकन्ड क्रीम चा डबा मिळाला तो ३०० मि.ली. चा होता.तर त्यातल ५०मि.ली. क्रीम उरलय्,त्याच काय करु? त्याची एक्सपायरी डेट २४ ओक्टोबर आहे.ते पंजाबी भाजीत घातले तर चालेल का?
मेथी मलाई मटर करु शकता ती
मेथी मलाई मटर करु शकता ती क्रीम वापरून. नाहीतर कुठलीही पंजाबी भाजीत खपवू शकता नाहीतर क्रीम भरपूर फेटत रहा टीवी समोर बसून मस्त लोणी मिळेल.
सही, थान्कु मनु.
सही, थान्कु मनु.
कसली टेम्पटिंग रेसिपी आहे. मी
कसली टेम्पटिंग रेसिपी आहे. मी आजच कन्डेन्सड मिल्क आणि मिल्क पावडर आणली. कार्नेशनची नाही मिळाली. पण दुसर्या ब्रँडची नॉनफॅटच मिळाली. कन्डेन्सड मिल्क १४ आउंझस चे आहे. सायो, सिंडी, ते सगळे वापरले तर मिल्क पावडरचे प्रमाण तेच ठेवायचे का ? दोन कप म्हणजे इथे जे मोजण्याचे कप मिळतात त्या प्रमाणाने का ? मिश्रण गरम असतानाच थापायचे ना ?
मला वड्या शनिवारी एका पार्टीला करुन न्यायची इच्छा आहे. दिवाळीनिमित्त
This recipe certainly gets
This recipe certainly gets the most popular recipe Mobel award. So versatile and easy. Will certainly try out. May be we can add two different colours like white and light pink/green.
ते सगळे वापरले तर मिल्क
ते सगळे वापरले तर मिल्क पावडरचे प्रमाण तेच ठेवायचे का ? >>>> हो. मग साखर वेगळी घालु नकोस. तेवढ्या प्रमाणात पुरेशी गोड होते बर्फी.
दोन कप म्हणजे इथे जे मोजण्याचे कप मिळतात त्या प्रमाणाने का ? >>> हो.
मिश्रण गरम असतानाच थापायचे ना ? >>> जर मिश्रण पातळ वाटत असेल तर थोडे कोमट झाल्यावर थापले तरी चालेल. नाहीतर गरम असतानाच वाटीला तूप लावुन त्याने एकसारखे पसरव म्हणजे छान गुळगुळीत होतील वड्या.
मामी, most popular recipe मोदक
अगो, सिंडीचा सल्ला फॉलो कर.
अगो, सिंडीचा सल्ला फॉलो कर. मस्त मलई बर्फी दहा मिनिटांत तयार. माझ्याही उद्याला ३,४ बॅचेस आहेत.
मी त्यात हर्शे चॉकोलेट पावडर
मी त्यात हर्शे चॉकोलेट पावडर व व्हॅनिला इसेन्स घालुन ट्राय कर्णार आहे. some possible combinations
1. very light yellow food colour, pineapple essence served with pineapple chunks.
2) very light orange colour orange essence served with orange half moons.
3) very light pink colour with strawberry essence served with what else strawberries.
४) mix yellow and orange to get that mango shade. very light mango shade, with mango essence and served with alphanso bits.
5) banana flavour and served with banana bits. served on banana leaves in a tambe ka plate for desi touch.
Please check US regulations on flavours and food colour before using and start with very small flavour quantities as flavours are concentrated and may ruin the delicate consistency of the barphi.
I am in the flavours business and could not resist the combinations. not tried though so proportions one has to work out. Go girls!
It is also possible to make Indian tricolour as well as stars and stripes. make stripes and stick the stars from cake decorations. Well eating just upma now and dreaming up.
मी पण उद्याच्या दिवाळी
मी पण उद्याच्या दिवाळी पार्टीसाठी ट्राय करणार आहे या. सायो, तू दिलेल्या प्रमाणाच्या दुप्पट (म्हणजे ~२५ वड्यांसाठी) ग्रॅन्युलेटेड साखर किती घालायची? (चालते का? माझ्याकडे पिठीसाखर नाही). मला प्रमाण दे प्लीज. आणि सिंडी तू साखर घालायची नाही असं म्हणत्येस ते कंडेन्स्ड मिल्क जास्त वापरणार असू तरच ना?
शतकी उत्तर- हो
शतकी उत्तर- हो
खरच खुपच मस्त आहे हि रेसिपि,
खरच खुपच मस्त आहे हि रेसिपि, आतापर्यंत ज्यांच्यासाठि केलि त्या सगळ्यांना आवडलि अगदि माझ्या मैत्रिणिच्या चार वर्षांच्या मुलापासुन ते माझ्या सासुबाईंपर्यत ! शिवाय दहा मिनि. तयार (म्हणुन माझि आवडति :)) ). खुप खुप धन्यवाद सायोनारा.
मी आतापर्यंत मावा मिल्क पावडर नेच केलि (माझ्याकडे तिच होति) पण मग बटर मात्र दिलेल्या प्रमाणाच्या अर्धे किंवा त्यापेक्षा कमि घालायचे. कन्डेस्ड मिल्क मी सिंड्रेला ने सांगितल्याप्रमाणे १४oz घेतले नेहमि त्यामुळे कधिच साखर घालायचि गरज नाहि पडलि.
ह्या बर्फिच मी ट्राय केलेल व्हेरिएशन.
१ कप अंजिराचे तुकडे (वाळलेले अंजिर सुक्या मेव्यात असते ते)
१ कप दुध
१ कॅन कन्डेस्ड मिल्क
४ कप मावा मिल्क पावडर
२ टेबलस्पुन बटर
अंजिराचा स्वतःचा रंग आणि स्वाद असल्याने बाकि काहि टाकायचि गरज पडलि नाहि.
काजु बदाम वगैरे मी काहि टाकले नव्हते.
अंजिराचे तुकडे दुधात ४ तास भिजवुन त्याचि पेस्ट बनवुन घेतलि, बाकि कृति सायो ने दिल्याप्रमाणेच. फक्त ह्या प्रकारात मायक्रोवेव्ह मध्ये बराच वेळ ठेवायला लागल नेहमिसारख ३,२,१ ने होत नाहि. मला नक्कि वेळ आठवत नाहि पण आधि पारंपारिक पध्धतिने केलेलि असल्यास कुठल्या पॉईंटवर वड्या पडतिल हे कळु शकते. कुणाला हवा असल्यास फोटो टाकिन ह्या वड्यांचा फोटो टाकिन.
चाफ्या, कंडेन्स्ड मिल्कचा १४
चाफ्या, कंडेन्स्ड मिल्कचा १४ औ. चा पूर्ण कॅन घातलास तर कोण्त्याच साखरेची गरज नाही.
मी ही करून पाहिली. छानच
मी ही करून पाहिली. छानच झाली.
पण यात कॅलरीज इतक्या आहेत की ही रेसिपी नुसती वाचली तरीही वजन वीस ग्रॅम ने वाढेल.
हि मी केलेली मलई बर्फी. मी
हि मी केलेली मलई बर्फी. मी थोडासा बदल केला.
मी साजूक तूप, साखर ,दीप ची मिल्क मावा पावडर आणि fat free evaporated milk वापरून केली.
खूप छान झाली आहे.
सायोनारा तुला रेसिपी बद्दल धन्यवाद !!
हे मी लक्ष्मीपुजनाला केलेले
हे मी लक्ष्मीपुजनाला केलेले पेढे - क्रीम + कंडेन्स्ड मिल्क + मिल्क पावडर
लाजो खतरा दिसताहेत तू केलेले
लाजो खतरा दिसताहेत तू केलेले पेढे, आकार पण मस्तय खूप.
सही! सायोनाराचीच रेसिपी
सही!
सायोनाराचीच रेसिपी वापरुन केलेस का?
खुपच टेंम्टीग दिसतायेत पेढे.
मी त्यातले ४ घेतलेत ग.
रुनी, भावना धन्यवाद... अगदी
रुनी, भावना धन्यवाद... अगदी आवर्जुन घ्या पेढे
नाही सायो ची रेसिपी नाही. मी त्यात बटर अजिबात घालत नाही. त्याऐवजी थिकन्ड क्रिम घालते. मस्त मऊसुत होतात. पेढे, मोदक, बर्फी... काहिही बनवा...
लाजो, तुझी रेसिपी लिही न.
लाजो, तुझी रेसिपी लिही न.
लाजो , अग मला पण तुझी रेसीपी
लाजो , अग मला पण तुझी रेसीपी डिटेल मधे हवी आहे. लवकर टाक. आणी त्या पेढ्यांना आकार कसा दिलास ते पण लिही ना!!
बहुतेक मूद पाडायचा साचा येतो
बहुतेक मूद पाडायचा साचा येतो त्या आकाराचा, त्यात शेप दिला असावा पेढ्यांना. लाजो, रेसिपी टाक लवकर
हो गं बायांनो टाकते १-२
हो गं बायांनो टाकते १-२ दिवसात रेसिपी....
हापिसात जरा बिझी आहे, शुक्रवारी टाकते
..
..
लाजो, तुझ्या रेसीपी मस्त आहे
लाजो, तुझ्या रेसीपी मस्त आहे ग. अशी थिकन्ड क्रीम घालून चव ही अतीव सुंदर लागते. एकदम कंदी पेढा.मी परवा लक्ष्मिपूजनाला अंबा बर्फीत नुसते दूध वपरण्याएवजी त्यात थिकन्ड क्रीम घातले व शुद्ध तूपच घालून केली,साखर वेगळी नाही टाकली(रस होता ना). उच्च लागत होती. धन्यवाद. सगळे उलट सुलट प्रयोग केले मी एक दूध पॉवडरचे पाकीट संपवायला.
कोणीतरी Recipe for Dummies पण
कोणीतरी Recipe for Dummies पण लिहा! सायोच्या मूळ रेसिपीने मला वड्या तर सोडाच, पेढे पण जमले नाहीत. एकतर आधी गिच्च गोळा झाला. तो ताटात पसरल्यावर आणि गार झाल्यावर (फ्रीजमध्ये ठेवूनही) त्याच्या खुटखुटीत वड्या पडत नव्हत्या. सगळं मिश्रण सुरीला लागून येत होतं. मग शेवटी पेढे वळले तर ते खाताना दाताना चिकटत होते! नक्की काय चुकलं? मनूची पोस्टस वाचून घाबरत घाबरत मिडियम पावरवरच मायक्रोवेव केले होते. मी कंडेन्स्ड मिल्क, नॉनफॅट दूघ पावडर व बटर वापरले होते!
चाफा, तुम्ही प्रमाण काय घेतले
चाफा, तुम्ही प्रमाण काय घेतले होते.तुम्ही त्यात कन्देन्ड क्रीम किती घातले?
खरे तर ते आधी वस्तुंचे प्रमाण व नंतर मायक्रोवेव कसे केलेत त्यावर अवलंबून आहे.
इतके चिकट झाले तर थोड्यावेळ ओवन मधे ठेवायचे. होते मग खुटखुटीत अश्या नरम पडलेल्या वड्या.
तूप एकदम कमी होते का? कारण काय आहे ना दूधाची पॉवडर तशी चिकटच होते पाणी वा तत्सम काहीही लिकविड घातले की.
chaafaa, नाहीतर एक ट्रिक आहे,
chaafaa,
नाहीतर एक ट्रिक आहे, ह्या सर्वाचा गोळा करायचा(पॉवडर, कन्डेन्स्ड मिल्क टाकून, बटर ) मग छोटी चपाती तूप लावलेल्या फॉइलला थापून सरळ ओवन मध्ये १२५ वर १५ मिनीटे ठेवा. मग पेढा वळा छोटे गोळे घेवून ओवन मधून काढल्यावर. कलकंद प्रकारचा पेढा लागेल. बर्याच माझ्या नॉन-माबो मैत्रीणींनी केलेय त्यांच्या घरी.
चाफ्या, मी मागेच कुणाला तरी
चाफ्या, मी मागेच कुणाला तरी उत्तरात लिहिलं होतं की मी मायक्रोवेव्हचं टेंप कधीच सिलेक्ट करत नाही. आत मध्ये मिश्रण टाकून फक्त ३ मि. करता गरम करायचं.
चाफा, तुम्ही नॉनफॅट मिल्क
चाफा, तुम्ही नॉनफॅट मिल्क पावडरऐवजी दीपची मिल्क मावा पावडर वापरुन बघा. कदाचित नॉनफॅट मिल्क पावडर चिकट होत असेल. मी थोडे वेगळे प्रमाण घेतले होते.
१ - १४ आउंझ्स कन्डेन्सड मिल्क
२ १/२ कप मिल्क मावा
१ स्टिक बटर
साखर अजिबात लागली नाही
३-२-१- ३० से.-३० से. असे ७ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवले.
९/१३ बेकिंग डिश ( काचेच्या ) मध्ये मस्त थापल्या जातात. वाटीला तूप लावून त्याने एकसारखे पसरले जाते.
wal-mart मध्ये great value
wal-mart मध्ये great value brand चा बॉक्स मिळतो. त्यात छोटे पाउचेस असतात. १४ oz ला ते एक पाउच, बटर घालून नीट ढवळून मायक्रोवेव्ह करायचं. दर एक मिनिटाला काढून, नीट ढवळून परत १ मिनिटासाठि ठेवायचं. असं ३ मिनिटं (मावे जर पॉवरफुल नसेल तर जास्त वेळ लागतो) आणि शेवटि ३० सेकंद मावेमध्ये ठेवायचं. कच्च राहिलं कि मिश्रण चिकट होतं.
Pages