एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
>>>
>>>

जा + ऊन = जाऊन
घर + ई + घरी
<<<
अनुच्चारित अनुस्वारांबद्दल
अनुच्चारित अनुस्वारांबद्दल काय मत आहे आपले?
म्हणजे ते गुरुजी नि ते गाढव या दोन्हीतला ते सारखाच का?
का ते गुरुजी काय लायकीचे यावर अवलंबून आहे?
नाही, प्रश्न विचारणारा काय
नाही, प्रश्न विचारणारा काय लायकीचा आहे त्यावर ते अवलंबून आहे. ! अरिष्ट मेलं !!
अरिष्ट कसंकाय मेलं?
अरिष्ट कसंकाय मेलं?
आसवे आणि अरिष्टे यांची पण
आसवे आणि अरिष्टे यांना पण एक्सपायरी डेट असते.
जाऊन मधला ऊन हा पंचमीचा
>>>> चिंधी आणि चिंधोटी हे समानार्थी शब्द आहेत असे मी समजत होते. चिंधी + ओटी असे असेल तर चिंधोटीचा अर्थ काय आहे नेमका ?
जा( णे) हे क्रियापद आहे ना ? मग त्याला विभक्ती कशी काय? जाऊन हे क्रियापदाचे रूप नव्हे काय ?<<
चिंधोटी म्हणजे लहान चिंधी. असेच शब्द लंगोट-लंगोटी, घर-घरटे, भित्रा-भित्रट, बावळा-बावळट, वगैरॆ. यांतले 'ट' प्रत्यय हे संस्कृतमधील कुत्सितार्थे टच् प्रत्ययासारखे आहेत.
जाऊन मधला ऊन हा पंचमीचा प्रत्यय नव्हे. तो धातूला लागणारा त्वान्तसारखा पूर्वकालवाचक प्रत्यय आहे. धातूंनाही प्रत्यय लागतात. संस्कृत धातूला मि व: म:, सि थ: थ, ति त: अन्ति, असले वर्तमानकाळासाठीचे प्रत्यय लागतात. मराठीतल्या जा धातूलाही त्याच उपयोगाचे तो/तें , तो; तोस/तेस, तां; तो/ते, तात हे प्रत्यय लागतात.
चिंधोटी म्हणजे लहान चिंधी.
चिंधोटी म्हणजे लहान चिंधी. असेच शब्द लंगोट-लंगोटी, घर-घरटे, भित्रा-भित्रट, बावळा-बावळट, वगैरॆ. यांतले 'ट' प्रत्यय हे संस्कृतमधील कुत्सितार्थे टच् प्रत्यसारखे आहेत. >>
चिंधी + ओटी असा संधि लिहिलात वरती. ते दोन वेगळे शब्द आहेत ना ? ओटी चा अर्थ काय धरायचा मग? हातोटी , गारगोटी या शब्दांची पण अशीच फोड असेल काय ?
शोनू, जा+ऊन ही फोड
शोनू, जा+ऊन ही फोड वाचल्यावरही तुला आणखी प्रश्न विचारावेसे वाटतायत का खरंच?
गारगोटी म्हणजे गार नावाच्या
गारगोटी म्हणजे गार नावाच्या दगडाचा छोटा तुकडा. (गोटी नाही). येथे टी हा कुत्सितार्थे प्रत्यय आहे. (यात गो कोठून आला, माहीत नाही. )
हातोटी म्हणजे हाताचे कौशल्य, त्याचा चिंधोटीतल्या ओटीशी काही संबंध नसावा. पण वांझ-वांझोटी हा नक्कीच चिंझोटीसारखा आहे.
आता चिंधीपासून चिंधुकली होते, त्यावेळी चिंधीचे चिंधु होऊन प्रत्यय लागतो, तसेच कदाचित चिंधीपासून चिंधोटी होताना चिंधीचे चिंधो होत असेल, नक्की माहीत नाही. माझ्याकडे व्युत्पत्तिकोश असता तर त्यात शोधता आले असते.
हिंदीमध्ये मनौती, चुनौती, कटौती असे शब्द आहेत, त्यांतला औती हा कदाचित मराठीतल्या औटीसारखा असावा.
मनौती, चुनौती, कटौती >>
मनौती, चुनौती, कटौती >> पनौती राहिला वरच्या यादीत
मग बायकांची ओटी भरतात म्हणजे
मग बायकांची ओटी भरतात म्हणजे काय? त्यातहि काही कुत्सितार्थ दडलेला आहे?!
<अरिष्ट>
<अरिष्ट>
या शब्दाची व्युत्पत्ति सांगा! अरी + इष्ट?!
अरि -शत्रु. त्याला आवडेल ते
अरि -शत्रु. त्याला आवडेल ते अरिष्ट
>>मग बायकांची ओटी भरतात
>>मग बायकांची ओटी भरतात म्हणजे काय? त्यातहि काही कुत्सितार्थ दडलेला आहे?!<<
येथे ट-टी-ओटी-गोटी या प्रत्ययांबद्दल चर्चा चालली आहे, कुणाच्या पोटाबद्दल नाही.
कुत्सितार्थे 'ट'चे आणखी नमुने
कुत्सितार्थे 'ट'चे आणखी नमुने : करपट, काळपट, घाबरट, घामट, धश्चोट**, धसकट्या, धांधरट, फळकूट, भुसकट, मारकुटा, मळकट, लांवसट, वांझोटी, हलकट
टीप : बळकट, तुपकट, तेलकट, दणकट, दाणकूट, हातोटी ही कुत्सितार्थे 'ट' ची उदाहरणे नाहीत.
** सुखाभोज्या, मठानिद्रा , अतिविषयलंपटा । दीर्घद्वेषी, ( दीर्घवादी ), बहुक्रोधी धश्चोटं पंचलक्षणं । [ धस + चोट ]. अव्यवस्थित , आडमुठ्या , आडदांड ( माणूस ), बेशिस्त,. रानवट , वाटेल तसे वागणारा, वाटेल तेथे खाणारापिणारा माणूस.
मराठीत आणखी एक कुत्सितार्थासाठीचा प्रत्यय आहे. - कुत्सितार्थे 'डाच्'. यातला डा शब्दाला लागून कुत्सित शब्द तयार होतात. उदा0
कुत्तरडा, गधडा, चुराडा, धगुर्डा, फटाकडी, भटुर्डा, मास्तरडा, म्हारडा, शिंपुर्डा, हेंगाडा
टीप : बागुरडा, तेरडा, सरडा, ही कुत्सितार्थे डाच् ची उदाहरणे नाहीत.
कौतुकासाठीचा डा : चिमखडा, चिमुरडा, धगुर्डा
मुतखडा?
मुतखडा?
मुतखड्यासारखे आणखी शब्द :
मुतखड्यासारखे आणखी शब्द : गाॅल ब्लॅडरडा, गुदद्वार-खडा
गारगोटी या शब्दाबद्दल थोडेसे:
गारगोटी या शब्दाबद्दल थोडेसे: गार हे एक प्रकारच्या दगडाचे नाव आहे. गारेचा दगड असेही म्हणतात. आपल्याकडे कुठे कुठे गारांचा पाऊस पडतो. त्यातली गार ही या दगडासारखी टणक, स्फटिकशुभ्र शिवाय थंडगार असते. गोटी म्हणजे गोलसर आकाराची वस्तू, छोटा कठिण गोळा.
गारगोटी, गोट्या खेळणे, सागरगोटे इत्यादि. किंवा आयुर्वेदातली गुटी, गुटिका, (म्हणजे उगाळून द्यायची गोळी) बाळगुटी वगैरे. या संदर्भात गोळी,गोळा,गोल यांची व्युत्पत्ती तपासता येईल. जाणत्यांनी खुलासा करावा.
जमालगोटा या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी कोणी सांगू शकेल काय?
गारगोटी म्हणजे चकमकीचा दगड.
गारगोटी म्हणजे चकमकीचा दगड. हा गोलच असेल असे नाही. गारेच्या कोणत्याही आकारच्या तुकड्याला गारगोटी महणतात.
जमालगोटा म्हणजे Croton tiglium. हे एक कठीण कवचाचे फळाचे बी आहे. बहुधा गोल असावे. जमालगोटा हा हिंदी भाषेतला शब्द मराठीतही वापरला जातो.
जमालगोट्याच्या फळाला संस्कृतमध्ये बहुधा दंतीफल म्हणतात. जयमाल + गोटा = जयमालगोटा -> जमालगोटा.
अरबी भाषेत जमाल म्हणजे सौंदर्य. त्याचा जमालगोट्याशी संबंध नसावा. जमाल म्हणजे जालीम नव्हे.
गारगोटी म्हणजे चकमकीचा दगड.
गारगोटी म्हणजे चकमकीचा दगड. हा गोलच असेल असे नाही. गारेच्या कोणत्याही आकारच्या तुकड्याला गारगोटी महणतात.
जमालगोटा म्हणजे Croton tiglium. हे एक कठीण कवचाचे फळ आहे. बहुधा गोल असावे. त्याचे बी रेचक असते. जमालगोटा हा हिंदी भाषेतला शब्द मराठीतही वापरला जातो.
जमालगोट्याच्या फळाला संस्कृतमध्ये दंतीफल आणि जयपाल म्हणतात. व्युत्पत्ती :- जयपाल (संस्कृत) + गोटा = जयपालगोटा -> जमालगोटा.
अरबी भाषेत जमाल म्हणजे सौंदर्य. त्याचा जमालगोट्याशी संबंध नसावा. जमाल म्हणजे जालीम नव्हे.
त्यातहि काही कुत्सितार्थ
त्यातहि काही कुत्सितार्थ दडलेला आहे?!
>>
जख्खी बुवा तुमच्या पोस्टीतून नाग नदीतून तुडुंब गटार वहावे तसा कुत्सितार्थ दुथडी भरून वाहत असतो.....
कुत्सितार्थ हा अधिकृत
कुत्सितार्थ हा अधिकृत पारिभाषिक शब्द आहे, मी बनवलेला नाही.
Inspite of ला मराठी पर्याय
Inspite of ला मराठी पर्याय काय?
उदा. I could do it not because of his presence but inspite of his presence.
हिंदीत अशावेळी बावजूद चा उपयोग करता येईल, मराठीत काय ?
Inspite of ला मराठी पर्याय
Inspite of ला मराठी पर्याय काय? <<< मानव, तुमच्या उदाहरणात ’किंबहुना‘ हा शब्द वापरता येईल का?
किंबहुना म्हणजे फार कशाला.
किंबहुना म्हणजे फार कशाला.
तरीसुद्धा, असूनही हे शब्द आठवले.
गजानन, हिंदीत:
गजानन, हिंदीत:
हां, मैंने वो किया. लेकिन वो उसकी मौजूदगी की वजहसे नही बल्की उसकी मौजूदगी के बावजूद.
मराठीत.
हो, मी ते करू शकलो. पण ते त्याच्या उपस्थितीमुळे नव्हे, तर.....
इथे किंबहुना कसे वापरता येइल? मला तरी वाटते नाही येणार.
कदाचित पूर्ण वाक्य रचनाच बदलावी लागेल, तर कशी करावी नेमका अर्थ पोचवण्यास?.
I stand corrected.
I stand corrected.
किंबहुना म्हणजे इतकेच नव्हे, फारतर.
शिवाय?
शिवाय?
तरीसुद्धा, असूनही हे शब्द
तरीसुद्धा, असूनही हे शब्द आठवले. >>>
भरत, हो, इथे तो उपस्थित असून सुद्धा असे म्हणता येईल की.
याच प्रमाणे मला जे भाषांतर करायचे आहे तिथे क्रियापदे वापरून "सुद्धा" वापरता येईल. धन्यवाद.
सोपे होते पण क्लिक होत नव्हते.
भरत, मानव, हो. तुमचे म्हणणे
भरत, मानव, हो. तुमचे म्हणणे लक्षात आले.
मी ते वाक्य काहीसे असे चालवत होतो -
होय, मी करू हे शकलो. पण हे त्यांच्या उपस्थितीमुळे (शक्य झाले) असे नव्हे, किंबहुना ते तिथे उपस्थित असतानाही मी ते करून दाखवले.
Pages