२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे
तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.
या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.
ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.
जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात
मामी यांनी बनवलेला नारळी
मामी यांनी बनवलेला नारळी भाताचा फोटो बघून तोंपासु. (२९ ऑग २०१५, पेज ५)
आला आला धागा वर आला, नारळी
आला आला धागा वर आला, नारळी पौ र्णिमा जवळ आली.
आली का नारळी पोर्णिमा??
आली का नारळी पोर्णिमा??
मला कुणीतरी नारळ वड्यांची / खोबर्याच्या वड्यांची रेस्पी द्या.
मला कुणीतरी नारळ वड्यांची /
मला कुणीतरी नारळ वड्यांची / खोबर्याच्या वड्यांची रेस्पी द्या.>>>> १ वाटी ओ.खोबरे,पाउण वाटीपेक्षा थोडं जास्त, चिरलेला/किसलेला गूळ एकत्र करून जाड बुडाच्या कढईत्/नॉनस्टिक भांड्यात घालून,मंद आचेवर ठेवावे.मधून मधून ढवळावे नाहीतर गूळ करपेल.जरा जाडसर होत आले की वेलची पावडरघालावी.सुका मेवा (ऐच्छिक) घालावा.मिश्रण कडेपासून सुटू लागले की तूप लावलेल्या ताटावर गूळ खोबर्याचा गोळा थापणे.गरम असतानाच वड्या कापणे.
साखर घालायची असेल तर तर हीच पद्धत.त्यात उकडलेला बटाटा कुस्करून घालतात.मला गुळाचा खमंगपणा आवडतो. त्यामुळे मी गूळ वापरते.
देवकी धन्यवाद. मला साखरेच्या
देवकी धन्यवाद. मला साखरेच्या करायच्या आहेत.
मी नेहमीच साखरेच्याच पाहिल्या / खाल्ल्या आहेत.
गुळाच्या म्हणजे मग ते मोदकाचं सारण झालं ना.
गुळाच्या म्हणजे मग ते मोदकाचं
गुळाच्या म्हणजे मग ते मोदकाचं सारण झालं ना ....... हो तसेच,पण घट्ट वडी मस्त लागते.
नारळी पौर्णिमा आली वाट्ट जवळ
नारळी पौर्णिमा आली वाट्ट जवळ
<<
हो ना.
काही स्पेसिफिक सणांच्या वेळी वर येणार्या हातखंडा पापिलवार रेस्प्यांपैकी इबांची ही एक.
लय भारी!
काही स्पेसिफिक सणांच्या वेळी
काही स्पेसिफिक सणांच्या वेळी वर येणार्या हातखंडा पापिलवार रेस्प्यांपैकी इबांची ही एक>>> +१
आणि संक्रांतीला सिंडरेलाची करायला गेले गूळपोळी रेस्पी.
दिवाळीला स्वाती आंबोळेंचीच पारंपारीक भारतीय नवर्यांiची ... आय मीन बेसन लाड्वांची
हिट रेस्प्या आहेत ह्या.
युडिकेन, आहार-प्रणाली, चायना
युडिकेन, आहार-प्रणाली, चायना स्टडी तसेच जॅक ललान बद्दल वाचून नारळी भाताचा बेत रद्द केला आणि नारळी किन्वा करायला घेतला. साखरेची चिमूटपण नाही.
काल ह्या रेसिपीने नारळीभात
काल ह्या रेसिपीने नारळीभात केला. कुकर मध्ये करायचा म्हटल्यावर माझ्या बाईने भुवया वर केल्या, गिच्चगोळा होईल म्हणे. म्हटले करून बघूया काय होते ते. पण अगदी व्यवस्थित झाला. पाणी अडीज वाट्या घेतले.
मी आज या कृतीने इन्स्टापॉट
मी आज या कृतीने इन्स्टापॉट वापरून केला नारळीभात. सॉटे मोड वर तांदूळ, लवंगा , खोबरे वगैरे परतून मग मॅन्युअल मोड वर ८ मिनिटे प्रेशर कुक केला. पाणी दुप्पट घातले. उघडल्यावर जरा हलवून फुलवून घेतला. मस्त झाला आहे, चिकट नाही आणि कच्चट पण नाही.
मी पण हा करून बघितला. पाणी
मी पण हा करून बघितला. पाणी थोडं जास्त लागलं.
पण अगदीच सोपा आणि मस्त. नो टेन्शन. धन्यवाद.
.
.
रेसीपी मस्त. मी वाचते दर
रेसीपी मस्त. मी वाचते दर नारळी पौर्णिमेला.
सालाबादप्रमाणे!
सालाबादप्रमाणे!
सालाबादप्रमाणे!>>>>>+१.
सालाबादप्रमाणे!>>>>>+१..
फक्त पाणी जास्त लागते.
जनहितार्थ
जनहितार्थ
मी गेल्या वर्षी या पद्धतिने
मी गेल्या वर्षी या पद्धतिने केला होता नारळीभात . मस्त झाला होता. यावर्षी ही उद्या करणार.
काल ह्या पध्दतीने नारळीभात
काल ह्या पध्दतीने नारळीभात केला.
तांदूळ १ वाटी (कोलम)
गूळ १ १/२ वाटी
पाणी ४ वाट्या
नारळाचा चव १ वाटी
बाकी काजू, बदाम, लवंगा, दालचिनी, तूप वापरले.
सुरेख झाला होता.
सालाबादप्रमाणे यंदाही
सालाबादप्रमाणे यंदाही धाग्याची गरज पडेलच म्हणून धागा वर काढून ठेवत आहे.
बरे झाले धागा वर आला.. शोधणार
बरे झाले धागा वर आला.. शोधणार होते..
धन्यवाद प्राची ..
मी आज केला नारळीभात तुमची
मी आज केला नारळीभात तुमची कृती वापरून .. एकदम मस्त झाला.. झटपट. आणि चविष्ट... मी ओला नारळ घातला.. म्हणजे तो फक्त मोदक.. किंवा कारंज्यासाठी वापरतात तो.. नेहमी मिळत नाही.. मला मिळाला....नारळ नाही घातला तर केशरभात हि असाच करता येईल .. करून बघेन..
प्रेशरपॅनची कल्पना मस्त आहे
प्रेशरपॅनची कल्पना मस्त आहे हे यापूर्वीच सांगितले आहे.मस्त नारळीभात झाला.
३ वाट्या तांदूळ
६ वाट्या पाणी,१.५ वाटी नारळाचे दूध.१.५ वाटी नारळ(खवलेला)
साखर , गुळ ?
साखर , गुळ ?
(No subject)
मीपण आज याच पाकृने केला. सेम
मीपण आज याच पाकृने केला. सेम प्रमाण. काहीच बदल नाही. मस्त झालाय!
(No subject)
मस्त फोटू
blackcat काय मस्त दिसतोय
blackcat काय मस्त दिसतोय तुमचा नारळीभात!
blackcat काय मस्त दिसतोय
blackcat काय मस्त दिसतोय तुमचा नारळीभात! >> रंग घातलाय का?
केशर असेल.
केशर घातले असेल.
Pages