
२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे
तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.
या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.
ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.
जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात
बहुतेक चिक्कीचा गुळ वापरला तर
बहुतेक चिक्कीचा गुळ वापरला तर गोडी वाढेल असं वाटतंय मला. >>> पन मला वाटते तांदुळ शिजायला प्रॉबलेम येउ शकतो.. आणी चिकट पण होउ शकते
स्वाती मस्त झाला
स्वाती मस्त झाला नारळीभात!सोप्या अन हुकमी होणार्या पाकक्रूतीबद्दल धन्यवाद!
ह्या सोप्या पाकृने माझा
ह्या सोप्या पाकृने माझा नारळीभात एकदम मस्त झाला. मऊ शिजलेला आणि मोकळा.
नुकताच केलेला गोड न खाण्याचा निश्चय ह्या भाताने मोडून पडलेला आहे!!
आज मी (चक्क) ब्राउन बासमतीचा
आज मी (चक्क) ब्राउन बासमतीचा नारळी भात केला...म्हणजे मुळात बासमती घरात फक्त ब्राउनच होता मग काय

मला तरी बरा वाटतोय...संध्याकाळी दूध का दूध होईलच.... आणि मी तो भात आधी शिजवून घेते...फ्रोजन नारळाचा कीस थोड्या तूप आणि लवंगेवर परतून मग गूळ घालून शिजलं की त्यात हा भात घालून वर केशर घातलेलं दोन-तीन चमचे दूध घालून मग साधारण हलवून झाकण घालून एखादं मिनिट वाफ आणायची..वर हवे ते सुकेमेवे आणि वेलची पूड ....यम्म्म्म्म ओ.....
मस्त पा. कृ. . मी केला होता
मस्त पा. कृ. . मी केला होता याच पद्धतीने. मी तांदूळ + नारळाच्या निम्मा गूळ घेतला होता. सुरेख झाला होता.
स्वाती, तुमची ना भा ची
स्वाती, तुमची ना भा ची रेसिपी हिट्ट! मी बासमती तांदूळ आणि कनक गुळाची पावडर वापरली .
माबोवर च्या सोप्प्या रेसिपी वापरून माझ्यावर सुग्रणीचा शिक्का मारून घेतेय!
स्वाती धन्स. छानच झाला
स्वाती धन्स. छानच झाला भात.
साबा बोलत होत्या नको करुस त्याला खुप वेळ लागतो, कटकट असते, पण मी हट्टाने केला तुझ्या पाक्रु वरुन आणि साबाना धक्काच बसला इतका मस्त झाला होता. आणि तोहि खुप कमी वेळात.
कालच जुन्या माबो वरून शोधुन
कालच जुन्या माबो वरून शोधुन काढली ही रेसिपी आणि राखी पौर्णिमे निमित्त हा नारळी भात केला होता. एकदम मस्त झाला होता अगदी सुगरणी सारखा.. !!! सासु-सासरे इथे आले आहेत ते तर जाम खुश झाले होते

मेनी मेनी धन्यवाद, स्वाती
स्वाती, फारच सुरेख झाला होता
स्वाती,
फारच सुरेख झाला होता भात. उद्या फोटो टाकते.
धन्यवाद.
रैना छाने फोटो!! स्वाती, सुपर
रैना छाने फोटो!!
स्वाती, सुपर डुपर रेसिपी!! धन्यवाद!!
मी त्यात २ चमचे ड्रायफ्रुट्ची पुड पण टाकली, छान वाटलं.
जबरदस्त झालेला!! फोटो पुढच्या वेळी
सर्वांना धन्यवाद. आईची रेसिपी
सर्वांना धन्यवाद. आईची रेसिपी आहे, तेव्हा तुमच्या सक्सेस स्टोरीज तिला कळवेन मुद्दाम.
फोटो सगळ्यांचे मस्त आहेत.
सॉरी, इथे प्रश्न विचारलेले पाहिले नव्हते.
@मंजूडी : गूळ मी आधी विरघळवून घेत नाही. पण सगळ्या भातात पोचतो व्यवस्थित.
@रूनि : गुळात कमीजास्त गोडीचा निघतो. कारण माहिती नाही (ऊस कमीजास्त गोड निघाल्यामुळे? पण मग साखरेत तसं का होत नाही? काही कल्पना नाही) पण तसा अनुभव आहे.
@रैना : मग नारळ कुठला वापरलास? प्रमाण काय घेतलंस?
मीही राखी पौर्णिमेला केला
मीही राखी पौर्णिमेला केला होता. मी त्यात उगीच जरा नारळाचे दूधही घातले. अमेझिंग झाला होता चवीला.
रंगामुळे मला डाउट होता जमलाय कि नाही. पण गुळ घातल्यावर असाच रंग येणार म्हणा. मी खाल्लेल्या सगळ्या नारळीभातात( की साखरभातात) साखर असल्याने सोनेरी रंग असायचा.
प्रचंड सोपी व न चुकणार्या रेस्पिबद्दल थँक्स!
स्वाती, तेच वापरले मग. १ वाटी
स्वाती,
तेच वापरले मग. १ वाटी तांदूळ, १ वाटी नारळाचे दूध, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकनट, १ वाटी पाणी, १ वाटी गूळ असे प्रमाण वापरले.
दुसरी बॅचपण केली पाव्हण्यांसाठी. तोवर जरा हातही बसला.
माझ्याकडे प्रेशर पॅन नसल्याने
माझ्याकडे प्रेशर पॅन नसल्याने मी साखरभातासारखा आधी भात शिजवुन मग त्यात जिन्नस घालायचे असा करत होते. यंदा पहिल्यांदाच सेम टु सेम ह्या पद्धतीने केला. बाकी सगळे प्रमाण हेच ठेवले तरी आधीच्या पद्धतीत गुळाला चटका बसल्याने जास्त खमंग लागतो भात.
रेस्पी वर काढण्याची आमची
रेस्पी वर काढण्याची आमची हॅटट्रिक
मंजूडी धन्यवाद!!! उद्या
मंजूडी धन्यवाद!!! उद्या नारळीपौर्णिमा आहे, त्यानिमित्त हा भात करण्यात येइलच!!!
बर झाल रेसिपि वर आलि. उद्या
बर झाल रेसिपि वर आलि. उद्या करुन बघते.
या कृतीने आज नारळीभात केला.
या कृतीने आज नारळीभात केला. मस्त झाला.
स्वाती अनेक धन्यवाद्....आज
स्वाती अनेक धन्यवाद्....आज केला भात.घरी सगळे खूश. मस्त झाला भात. तुमच्या आईंची रेसीपी आहे म्हणून त्यांना ही अनेक धन्यवाद. नारळी पोर्णिमेच्या शुभेच्छा.
आज केला हा भात. पहिल्यांदाच
आज केला हा भात. पहिल्यांदाच केला!! छान झाला होता!! रेसीपीसाठी अनेक धन्यवाद.
आज करुन पाहिला. छान झाला
आज करुन पाहिला. छान झाला होता. पण माझा सुद्धा थोडा अगोड झाला. गूळ कमी गोड असेल कदाचित.
- सुरुचि
नारळीपौर्णिमा उद्या? >>> हो,
नारळीपौर्णिमा उद्या?
>>> हो, आमच्याकडे आजच नारळीपौर्णिमा आणि राखी पौर्णिमा साजरी करतात. नारळीपौर्णिमेचा प्रसाद म्हणून नारळीभात करतात. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का?
आज या पध्दतीने भात केला. मस्त
आज या पध्दतीने भात केला. मस्त झाला.
सगळे जिन्नस लागोपाठ घालून एकदाच काय त्या शिट्ट्या द्यायच्या - हे माझ्यासारखीला फार सोयीचं आहे.
सगळे जिन्नस लागोपाठ घालून
सगळे जिन्नस लागोपाठ घालून एकदाच काय त्या शिट्ट्या द्यायच्या >>

म्हणूनच तर सकाळच्या गडबडीतही तो करायला जमतो.
मी आज करून आले आहे, आता घरी गेल्यावर कळेल कसा झाला होता ते...
ऑफिसमधून आल्यावर आत्ता ह्या
ऑफिसमधून आल्यावर आत्ता ह्या पद्धतीने नारळीभात केला. त्यामुळे आमच्या देवांनी आणि भावाने संध्याकाळीच राखी बांधून घेतली आणि नारळीभात खाल्ला. उत्तम झाला असा घरातल्या सगळ्यांचा अभिप्राय. केशर वेलची सिरप घातल्यामुळे सरसकट रंग आला आहे. मी कढईतच केला.
स्वाती_आंबोळे या कृतीने आज
स्वाती_आंबोळे
या कृतीने आज नारळीभात केला. पण २ वाटी आंबेमोहोर तांदळाला ५ वाट्या पाणी + १ वाटी नारळाचे दूध घालूनही तांदूळ जसाच्या तसा राहिल्याने ५ शिट्या दिल्या.अजूनही modification जरुरी आहे.पण तुमची
पाकृ सोपी आहे. धन्यवाद!
मी पण काल याच पध्दतीने नारळी
मी पण काल याच पध्दतीने नारळी भात केला. मस्तच झाला आहे. स्वाती तुम्हाला आणि आईला पण धन्यवाद.
मी पण या कृतीने नारळीभात
मी पण या कृतीने नारळीभात केला. मस्त झाला. अशीच साखरभाताची सोपी कृती आहे का? पाक नसलेली?
गेल्यावर्षी केला होता भात, आज
गेल्यावर्षी केला होता भात, आज आठ्वण आली या धाग्याची, म्ह्णून वर आणला.
धन्यवाद सामी. आता करायचाय
धन्यवाद सामी. आता करायचाय मला. इथे येऊन शोधणार होतेच. आयताच मिळाला - धागा. नारळीभात नाही. तो करायला लागणारच आहे.
अरे वा वा वा, अवलनं सीकेपी पद्धतीचा भात लिहिला आहे. धन्यवाद गो अवल.
Pages