नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 July, 2009 - 09:47
naralibhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो पण लग्नातली/ देवळातली चव हवी आहे इतकं उच्च टार्गेट कशाला? नारळीपौर्णिमेला छानसा भात खायला मिळाली की झालं! Happy

मी ह्याच पद्धतीने करते आणि भारी होतो. मुलाला आवडतो ना भा . दरवर्षी इमाने इतबारे फोटो ही डकवते, हा बघा.

20220812_200314.jpg

ममो,परत मस्त आहे. कल्हईवाला कुठे सापडतो? >> थॅंक्यु देवकी , माझं ही ह्या परातीवर खूपच प्रेम आहे. रोज कणिक भिजवायला हीच परात वापरते त्यामुळे चकचकीत असते. सोन्याचीच वाटते. कल्हई नाही केलेली आहे एकदा ही . काल परातीत भात गार करण्यासाठी काढला होता कुकरमधून, मग तसाच फोटो काढला.

मी पण या पद्धतीने केला. अ‍ॅबसोल्युटली नो कटकट नाभा तयार! एकदम परफेक्ट शीत शिजलं ना कमी ना जास्त.
नारळाच्या दुधाची आयडिया पण आवड्ली आहे.

नारळीपौर्णिमेला छानसा भात खायला मिळाली की झालं! >>>>>>>>>>>>> काय झालं ओ? भात मिळाली? ये बात कुछ हजम नही हुई Wink

प्रतिपच्चंद्रलेखेव या धाग्यावरील प्रतिसाद पौर्णिमेपर्यंत वर्धिष्णु व्हावेत असं काहीतरी असावं Wink

दरवर्षी नारळी पौर्णिमेला ह्या नो कटकट पद्धतीने गीचका ही नाही , कच्चा ही नाही तर मऊ, मोकळा , नीट शिजलेला नाभा करणे , खाणे आणि इथे फोटो डकवणे हे एक रिच्युअलच झाल आहे. हा काल केलेला फोटो.

20230830_093715.jpg

धागा वर काढतेय.
केलेली आणि विश्वासार्ह पाककृती
( tried and tested recipe Happy )

बरं झालं रेसिपी वर काढली. कालच मैत्रिणीने तू करतेस ती नारळीभाताची रेसिपी पाठव असा मेसेज केला होता. दर वर्षी मी तिला आयता नारळीभात पाठवते. यावर्षी मी बाहेरगावी असल्याने तिला करावा लागणार होता.
आता यावेळी आईला आणि बहिणींना खावू घालेन या रेसिपीने नारळी भात.
स्वाती, तुझी ही रेसिपी मायबोली बाहेर पण खूप प्रसिद्ध आहे. मी कितीतरी माबो सदस्य नसलेल्या मैत्रिणींना या रेसिपी ची लिंक नेहेमी देत आले आहे.

ही एक जबरदस्त रेसिपी आहे. मी एकदाच केली आहे पण फार सुरेख झाला होता नाभा. मी नारळिपौर्णिमेला कायमच घरी नाहिये गेली काही वर्षं, आम्हाला सुटी मिळत नसल्यामुळे. साबा करतात त्यांच्या पद्धतीने. तोही छान होतो (आणि संध्याकाळी घरी गेले की मला आयता मिळतो Wink )पण मला कधीतरी मुद्दाम करायचा आहे तरी वेळ काढता येत नाहिये.

Pages