
२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे
तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.
या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.
ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.
जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात
बरं झालं धागा वर आला.
बरं झालं धागा वर आला.
salt ghalatat ka bhatat?
salt ghalatat ka bhatat?
मी किंचित घालते. 'नारळीभात
मी किंचित घालते.
'नारळीभात झाला म्हणून काय! चव मीठाने वाढणारच!' अशी एक चीनी म्हण आहे.
प्रेशर कुकर मध्ये याच
प्रेशर कुकर मध्ये याच पद्धतीने करायचा का? सॉरी मला प्रेशर पॆन व कुकर एकच की वेगळे तेही माहीत नाहीये.
आशू दोन्ही सेमच. कूकर म्हणजे
आशू दोन्ही सेमच.
कूकर म्हणजे बेबी कूकर असेल असं मी गृहित धरतेय.
हो आशूडी या रेसिपीने खूप मस्त
हो आशूडी
या रेसिपीने खूप मस्त होतो नारली भात. हमखास यशस्वी पाकृ.
वा वा थँक्स मंजू, प्राची.
वा वा थँक्स मंजू, प्राची. बेबी नाही पण टॉडलर कुकर आहे
पॆन म्हणजे पसरट हे इतकं फिट आहे ना डोक्यात. स्टिरिओटाईप!
टाकलाय शिजत. आतापर्यंत तरी
टाकलाय शिजत. आतापर्यंत तरी बरा लागतोय. मग फोटो टाकते....
टॉडलर कूकर
टॉडलर कूकर
आज केला नारळीभात ह्या
आज केला नारळीभात ह्या पद्ध्तीने.

अप्रतिम जमला आहे. भात गूळ असून सुदधा कुकरमध्ये छान शिजला. मऊ आणि मोकळा. सगळ्यांना आवडला.
आणि मला नो टेंशन. अगदीच सोपा आहे. मी तर रोजच्या भातावरच कुकर मध्ये ठेवला होता.
नारळाचा चव करायला आणि गूळ चिरायलाच जास्त वेळ लागला.
मी गूळ किती घेऊ? १:१ प्रमाण
मी गूळ किती घेऊ? १:१ प्रमाण अमेरिकेतल्या इंडियन ग्रोसरीमधल्या गुळाचं पुरेल का? आमच्याकडे जरा कमी गोड वगैरे चालत नाही. गोड पदार्थ गोडच लागतो..
Update
१:१ गूळ घेऊनच केला आणि मस्त झाला. धन्यवाद! पाक वगैरे करत बसावं लागलं नाही. खरंच सुटसुटीत रेसिपी आहे!
केला. सोप्पी सुटसुटीत
केला.

सोप्पी सुटसुटीत रेसिपी.
आज केला होता.आमच्याकडे
आज केला होता.आमच्याकडे नारळाचे दूध काढून घालतात.खरंच सुटसुटीत रेसिपी आहे.
आज केलाय आणि awesome झालाय!
आज केलाय आणि awesome झालाय! इतक्या सोप्या रेसिपीसाठी थँक्यू!
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
मी पण केला. मस्त झाला. कुकर
मी पण केला. मस्त झाला. कुकर मधे न करता भांड्यामधे केला. मला २:५ अस भात/पाणी प्रमाण लागल.
अवांतर, नारळी भात आधी कधीही केला नसल्यामुळे ह्याची कॉम्लिकेटेड रेसेपी काय असावी असा प्रश्न पडला. मायबोलीवर आहे का पारंपारीक नारळी भाताची कृती?
जबरी झाला आहे!! थॅक्यू!!
जबरी झाला आहे!! थॅक्यू!!
स्वती,खूप छान.मोकळा,खुटखुटीत
स्वती,खूप छान.मोकळा,खुटखुटीत 'नारळीभात "झाला.गूळ वापरुन पहिल्यांदाच केला.तुझ्या पद्धतीने बिनधास्त केला.साखरेचा करताना २-३ स्टेप्स वाढतात पण तुझी पद्धत खूपच छान सोप्पी आहे. आता एकदासाखर वापरुन करायला हवा.मी या नारळीभाताबरोबर आलुपराठे पंजाबी पद्धतीचे आणि दाणे-खोबरे-टोमॅटो-हि.मिरची-लसूण-लिंबू रस -मीठ-जिरे यांची चटणी केली.

यावर्षीचा नाभा पण मस्त झाला.
यावर्षीचा नाभा पण मस्त झाला. चुकायला कै स्कोपच नैये
धन्यवाद.
मी पण याच पद्ध्तीने केला या
मी पण याच पद्ध्तीने केला या वेळी. नेहमी सीकेपी पद्धतीने नारळाचे दुध घालुन करते.
कृती सोपी आहे त्यामुळे लगेच झाला, पण खोबरे मधेच कचकचते जे नारळाच्या दुधात शिजवून केला तर होत नाही.
यपध्द्तितेने नारळीभात
यपध्द्तितेने नारळीभात केला..मस्त च झाला
धन्यवाद स्वाती शनिवारी ह्या
धन्यवाद स्वाती
शनिवारी ह्या रेसिपीचे प्रिंट काढून सौ.सं देण्यात आली आणि रविवारी अप्रतिम नारळी भात खायला मिळाला.
मातोश्री सुद्धा खुश झाल्या सुनेच्या हातचा नारळी भात खाऊन
मस्तच झाला गो नारळी भात माझा
मस्तच झाला गो नारळी भात माझा पण. बेतास गोड आणि खुटखूटीत.शीतानशीत मोकळं.
मी बाहेर केला. पाणी अर्धी वाटी अधिक घातलं.
आता लागेलच शनिवारी. हमखास
आता लागेलच शनिवारी.
हमखास जमणारी, नो कटकट पाकृ.
प्राची, बर झाल वर काढलीस हि
प्राची, बर झाल वर काढलीस हि पाककृती.
अतिशय सुरेख बनतो भात ह्या कृतीने
Swati, its such a easy n
Swati, its such a easy n yummy recipe! Can I take dedicated coconut instead of wet coconut? What modifications I need to do? Please answer.. Sorry for English post ( I found typing in English is easy from mobile)
मृदुल, पान ३ वर रैनाची पोस्ट
मृदुल, पान ३ वर रैनाची पोस्ट आहे - १ वाटी तांदूळ, १ वाटी नारळाचे दूध, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकनट, १ वाटी पाणी, १ वाटी गूळ असे प्रमाण वापरले.
धन्यवाद अल्पना! उद्या ट्राय
धन्यवाद अल्पना! उद्या ट्राय करते नक्की!!
आज पहिल्यांदा ट्राय केला..
आज पहिल्यांदा ट्राय केला.. मस्त झालाय
निवडक दहात आहे.. इतकी सोपी
निवडक दहात आहे.. इतकी सोपी पाकृ आणी इतके पॉझिटिव्ह प्रतिसाद वाचून उत्साह वाटतोय करून बघायचा ..
Pages