
२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे
तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.
या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.
ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.
जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात
मी पण नापो ला हा भात केला.
मी पण नापो ला हा भात केला. धन्यवाद इतक्या छान सुटसुटीत रेसीपीसाठी. भात मस्तच झाला.
मी नारळीभात एकदाच केला होता
मी नारळीभात एकदाच केला होता आणि तो मी ओगले आजींच्या पद्धतीने केला होता. ही गोष्ट २००१ ची आहे. त्यावेळी इथे आम्ही तुज आहे तुजपाशी हे नाटक बसवत होतो. माझ्याकडे तालिम होती आणि अनायासे रक्षाबंधन सुद्धा जवळ आले होते. म्हणून मी हा भात करुन पाहिला तर सगळ्यांना तो इतका आवडला की प्रत्येकांनी तो एकदा घरी करुन पाहिला होता.
त्यानंतर मी कधीच नारळीभात करुन पाहिला नाही की खाल्लाही नाही. पण सहसा एका प्रयत्नात मला पाककृती जमतात
सगळ्यांचे नारळीभात छान झाले. गुळ साखर एकत्रित करणे मलाही आवडले नाही. गुळच छान लागतो नारळीभातात.
स्वाती, साधारण ४२ लोक (२८
स्वाती, साधारण ४२ लोक (२८ मोठे आणि १४ लहान) गणपती दर्शनाला येणार आहेत. सगळ्यांना अजून २-३ ठिकाणी जायच आहे. त्यामुळे नारळीभात, अळुवड्या आणि पन्हं असा सुटसुटीत बेत ठेवला आहे. प्रत्येकाला एक मूद भात द्यायचा असेल तर किती वाट्या तांदूळ लागेल?
रेवु, माझ्या मते सात वाट्या
रेवु, माझ्या मते सात वाट्या तांदूळ अगदी व्यवस्थित पुरतील.
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.
आज ह्या पद्धतीने केला .
आज ह्या पद्धतीने केला . मस्तच झालाय . आता ना भा करणे म्हणजे बाये हाथ का खेल झालाय . ( स्मित )
मी ही केला असाच भात आज.. पण
मी ही केला असाच भात आज.. पण तंदूळ जरा कच्चे राहिल्या सारखे वाटतायत.. काय झालं असेल?
३ शिट्ट्या केल्या होत्या प्रे.पॅ च्या
पाणी दुपटीने घातलं असशील तर
पाणी दुपटीने घातलं असशील तर गुळावर खापर फोड अवने
मग किती घातलं पाहिजे?? मी
मग किती घातलं पाहिजे?? मी दुपटीला थोडं कमी घतलं होतं
दुप्पट तर पाहिजेच, पण किंचित
दुप्पट तर पाहिजेच, पण किंचित जास्तही चालेल, कारण गुळामुळे तांदूळ आक्रसू शकतो.
ह्म्म.. नारळ भरपूर घातला होता
ह्म्म.. नारळ भरपूर घातला होता सो पाणी कमी घातलं खरं तर
आता वरून पाणी किंवा नारळाचं
आता वरून पाणी किंवा नारळाचं दूध शिंपडून वाफवून घेता येईल.
सोपी रेसिपी वाटतेय. उद्या
सोपी रेसिपी वाटतेय. उद्या करणार.
बरं भाताची मुद पाडतात त्याला काय म्हणतात?
मुदाळं
मुदाळं
ह्म्म.. ते केलच मग..
ह्म्म..
ते केलच मग..
सगळीकडेच मुदाळं का? की अजुन
सगळीकडेच मुदाळं का? की अजुन काही शब्द आहे?
हि कृती वापरुन आज केला होता
हि कृती वापरुन आज केला होता नारळीभात. झकास झाला होता. थँक्यु स्वाती.
हि कृती वापरुन आज केला होता
हि कृती वापरुन आज केला होता नारळीभात. झकास झाला होता. थँक्यु स्वाती.
तीन शिट्या झाल्या की दहा
तीन शिट्या झाल्या की दहा मिनिटं बारीक गॅस वर कुकर ठेवायचा म्हणजे भात छान फुलून येतो आणि मऊ मोकळा हि होतो.
आज मीपन तुमच्या रेस्पीचा टेकु
आज मीपन तुमच्या रेस्पीचा टेकु घेऊन नारळी भात केला.. फोटो टाकते काही वेळाने.. धन्यवा_\_/\_
(No subject)
फोटो नाही तरी सालाबादप्रमाणे
फोटो नाही तरी सालाबादप्रमाणे यंदाही या रेस्पीचा भात काल करून झाला! खल्लास!
म्हणजे अगदी ऐन वेळी ठरवून, प्रे पॅ नसताना हार्ड अॅनो भांड्यात मंदच आंचेवर ठेवून फार मस्त झाला. आताशा माझ्या हातून गोड पदार्थ अंमळ कमीच गोड होतायत पण मग आज पुन्हा खाताना अजून थोडं तूप आणि थोडी पिठीसाखर (मला हाणू नका यासाठी) घालून सारखा केला तर अजूनच खतरनाक म्हणजे मस्त भारीबिरी झाला!
काल केला ह्या रेस्पीने. छान
काल केला ह्या रेस्पीने. छान झाला होता. मोबिला हरवला आहे त्यामुळे काढला नाहीये.
मी पण मनीमोहोरप्रमाणे तीन शिट्यानंतर पाचेक मिनिट गॅस कमी करुन ठेवला होता.
मी पण ह्या क्रुती ने ना भा
मी पण ह्या क्रुती ने ना भा केला आणि उत्तम झाला होता. मी साखर वापरुन केला, साखरेचं प्रमाण तान्दुळाएवढच घेतल होतं. भाताचा प्रत्येक शीत वेगळा राहीला तरीही चव एकदम मिळुन आली होती.
खास प्रेशरपॅन आणून केला यंदा
खास प्रेशरपॅन आणून केला यंदा नारळीभात. छान झाला होता. दुसर्या दिवशी जास्त छान लागला. माझ्याकडून पाणी जास्त पड्लयामुळे थोडा ओलसर दिसत होता केला तेव्हा. एकच वाटी तांदूळ घेतला म्हणून आठवणीनं सगळी प्रमाणं निम्यानं घेतली पण पाण्याचं तेवढं विसरले. तरी तिसरी वाटी पाणी घातल्यावर लक्षात आलं त्यामुळे अगदीच खीर झाली नाही.
जशीच्या तशी रेसिपी फॉलो केल्यास पाप लागतं आणि गुळाला चटका लागल्याशिवाय छान खमंग चव येत नाही या दोन्ही थेर्या आवडत्या असल्यामुळे तुपाच्या फोडणीत तांदूळ, नारळासोबत गूळ पण घातला आणि आधणाचं पाणी घालण्याआधी ते मिश्रण छान परतून घेतलं.
धागा वर काढण्याची हीच ती
धागा वर काढण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण
मी हल्ली ह्याच पद्धतीने करते
मी हल्ली ह्याच पद्धतीने करते . मस्तच होतो . हा फोटो आज केलाय त्याचा .
रेसेपी वर आणावी.
रेसेपी वर आणावी.
मी शनिवारी केला होता.शिजताना
मी शनिवारी केला होता.शिजताना नारळाचे दूध आणि थोडे खोबरे घालते.मस्त झाला होता.प्रे.पॅ.ची आयडिया झकास आहे.
नारळी पौर्णिमा आली वाट्ट जवळ
नारळी पौर्णिमा आली वाट्ट जवळ
Pages