"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती प्रचंड मुखदुर्बळ आहे. एक मुस्कटात द्यावीशी वाटली काल. अग सांग तरी ना तो कसा आहे, कसा गैरसमज झाला ते.

हो ना. काहीच बोलली नाही, नुसती थरथर कापत होती. हिंमत नाही तर कशाला पडायचं प्रेमात. परागने जसं घरच्यांना सरळ स्पष्ट सांगितलं तसं हिला बोलता येत नाही का. परागला तर ताडताड बोलत असते नेहेमी. एकेकाला विश्वासात घेऊ शकली असती, बावळट कुठली.

हो गं झालं. पळून आली पुर्वा परागबरोबर आत्या आणि काकाच्या मदतीने. लग्न केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे परागच्या दाढीवाल्या काकाने पटवून दिलं कारण पुर्वाचा पाठलाग करत लीला आणि चंदु पोचले अनुष्काकडे. मिन्स आधी परागकडे गेले मग अनुष्काकडे.

गावातल्या गावात लग्न अगदी आरामात पार पडलं. अनुष्काने दार उघडलं त्याच्या आधी पूर्वा आणि पराग तिथून निघून गेले होते तरी पूर्वाच्या चपला तिथेच कशा होत्या. अनुष्का खमकी आणि त्याचवेळी कार्टून आहे. पराग पूर्वापेक्षा जास्त लाजत होता. आता राडा आणि रडारड होणार पूर्वाच्या घरी.

गैरसमज होतात दोन्ही कुुटुंबात, परत पराग पुरूषच नाही असं वाटत असतं बोराडेंना म्हणून विरोध करतो चंदूकाका. आज का मारतो तो चंदूकाका परागला, नीट बोलता येत नाही का Angry अर्थवची उंची वाढली आहे. परागला त्याच्या घरच्यांनीही घरात नाही घेतले तर अनुष्काच्याच घरात राहावं लागेल दोघांना पीजी म्हणून. शेवट काय आणि कधी असेल.

परागला बोलू कुठे देतो तो, पोटात लाथ घालतो बिचा-याच्या. तो छोटा मुन्न्या सांगत असतो, त्यालाही गप्प करतात.

लक्ष्मीकाका rocked. डायलॉग्ज, अभिनय सर्वच मस्त. पुर्वा ने नशीब तोंड उघडलं. आत्या कशी नाही काही बोलली याचं नवल वाटलं. चंदू काका फुकटची दादागिरी करतो.

बघितला एपि. लक्ष्मीकाका सुपर्ब. एरवी बावळट वाटणारा आणि सगळे येता जाता ज्याचा अपमान करतात बरेचवेळा पू्र्वाही त्याने आज सगळ्यांना मस्त सुनावलं. नुसतं ऐकवलं नाही तर तो जीव द्यायलाही तयार होता पूर्वासाठी. त्याचे खरे प्रेम आहे पुतणीवर. आत्या नेहेमी सगळं घर डोक्यावर घेते पण बोलायची वेळ आली तेव्हा चीडीचूप. आता परागचे वडिल त्यांना घरात घेणार नाहीत. परागच्या घरी चाकू सुरे काढणारं कोणी नाही. जावई घाबरट आहे. फक्त शाब्दिक हल्ले होतील.

पण पूर्वा ने अस करायला नको होते..ती तिच्या घरच्यांना विश्वासात घेऊ शकत होती..घरच्यांचे गैरसमज दूर केले असते तर त्यांनी परवानगी दिली असती.घरच्यांचा विश्वास तोडायला नको होत..पण आता हे पाहणं रंजक ठरेल की पराग च्या घरचे काय करतील..तसे ते दोघांना स्वीकारतील अस वाटत आहे

परागच्या वडिलांचं वागणं बरोबर नाही वाटलं. चूक झाली म्हणून काय घरात घ्यायचं नाही का..आणि ती मुलगी पूर्वा तीचातरी विचार करायचा की...ती मुलगी कुठे जाणार.राग येणं साहजिक आहे पण म्हणून काय घरातून काढून टाकायचं का..

हो परागचे बाबा खरंच खूप चांगले आहेत, साधे सरळ आहेत एरवी म्हणून त्यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं.

तो सल खोलवर रुतलाय आपल्या मुलाला फार खालच्या पातळीची नावं ठेवली गेली हा.

आज सगळ्यांचाच अभिनय सुंदर. विशेषत: परागच्या आईबाबांचा. जावयाची चागलीच जिरली. हरिशकाकाने बेफाम षटकार चौकार हाणले, नाहीतर काही खरं नव्हतं पूर्वा आणि परागचं. आता गच्चीवर कसे राहणार आणि जेवणाचं काय.

गच्चीवरचे सीन बोर. आता पूर्वा हळूहळू घरात प्रवेश करणार आणि सगळं आलबेल होणार. शेवट ईथेच व्हायला हवा, पाणी टाकणार नाहीत ही अपेक्षा.

पराग भाड्याने घर का घेत नाही. तेवढा पगार असेल की त्याला. घरातल्या दोघांनी ग्रीन सीगनल दिला आहे, परागच्या आईवडिलांना फार वेळ नाही लागणार. जावई तणतणत का होईना पण स्वीकारेल.

हो ना खरं आहे.

पण आता एकेकाचे मन जिंकून घेणार सूनबाई इथे मग तिथे जावई जिंकून घेणार असं दाखवणार, टिपिकल formula. पी एच डी करणार त्यात एकीकडे.

गच्चीवर कायम राहणं प्रॅक्टिकली कसं शक्य आहे. डास नाही चावत का. ऊन, पावसाचं काय. गच्चीवर छोटी घरं बघितली आहेत पण असं उघड्यावर राहताना नाही बघितलं कोणाला.

गच्चीवर कायम राहणं प्रॅक्टिकली कसं शक्य आहे. डास नाही चावत का. ऊन, पावसाचं काय. गच्चीवर छोटी घरं बघितली आहेत पण असं उघड्यावर राहताना नाही बघितलं कोणाला. >>> अगदी अगदी. पत्रे पण नाहीत टाकलेले.

Pages