क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< टेस्ट क्रिकेटवर, त्याच्यात आवश्यक असलेल्या स्किल्सवर [ व कसोटीसाठीच्या खेळाडूंच्या निवडीवर ] वनडे-T-20 चे किती आक्रमण झाले आहे ते ही परत दिसले.>> !!!! Wink

Usually England is rusty in first few matches and then they start to come into their elements. इंग्लंडने स्लिप मधले कॅचेस जर पकडले गेले असते तर मॅच एव्हढी अटीतटीची झाली असती का ह्याची शंका आहे. इंग्लंड चे चारी बॉलर्स टिचून बॉलिंग करताहेत नि ठरलेल्या प्लॅन वर राहून हारड्ली लॉज बॉल्स देतात हा आपल्या नि त्यांच्या बॉलिंग मधे मोठा फरक होता. पुढच्या मॅच मधे यादव ऐवजी बुमरा येईल , तो इंग्लंड मधे फारस खेळलेला नसल्या मूळे रस्टी असेल हे लक्षात ठेवून बाकीच्यांना बॉलिंग चा भार उचलावा लागेल.

धवन दोन्ही डावांमधे एकाच प्रकारे बाद झालाय (नि अश्विन ही) हे लक्षात घेता हे रुथलेसली expose केले जाईल.

असामीजी, इंग्लंड घरच्या वातावरणात व खेळपटटयांवर खेळताहेत जे आपल्यासाठी वेगळच नाही तर नेहमीच त्रासदायक ठरलंय. त्यामुळे , इंगलंडपेक्षा पुढील सामन्यांत सरावाने आपल्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्याची शक्यताच अधिक आहे, असं नाही वाटत ?

नंद्या43, उकाडयाची लाट असूनही खेळपट्टी न सुकता तजेलदार राहिली कारण ती तयार करताना सतत पाणी घातलं जात होतं, असं ' पीच कयूरेटर 'ने म्हटलंय; पण फक्त इंग्लंडलाच त्याचा लाभ मिळावा, अशी कुटील निती त्यामागे होती का, हें प्रत्येकाने सोयीस्करपणे ठरवावं ! Wink

एक प्रश्न - पाच लोक विकेटकीपरला झेल देऊन बाद झाले, याचा कुणि विचार करेल का? यावर काही उपाय आहे का? काय चुकते आहे?
का देवावर भरोसा ठेवून बॅट घालायची मधे, जमले तर चौकार नाहीतर बाद असे असते??

एक उपाय आहे पण तो आपल्या क्रिकेट व्यवस्थापनाला बहुतेक पटणारा व परवडणारा नसावा - आपल्या देशात कांहीं खेळपटटया ' फास्ट व बाऊनसी ' बनवाव्या व त्यावर आपल्या फलंदाजांना सराव करायची संधी द्यावी.

<<<परवडणारा >>>?
क्रिकेट व्यवस्थापनाकडे एव्हढे पैसे आहेत की ते भारतात खेळपट्ट्याच काय, जागा मिळाली तर अख्खे स्टेडियम उभारतील!
काय करणार हा प्रश्न भारतात फारच ऐकू येतो. हताश सगळे! फारतर काहीजण बोलतील पण प्रत्यक्ष कृति? अरे बापरे!

खरे तर अशी सूचना पन्नास वर्षांपूर्वीच समोर आली होती. पण तेंव्हा कुणाकडेच पैसे नव्हते. ब्रिटिशांनी जे बांधून ठेवले होते तेव्हढेच. आता काय कारण?

बरोबर - इंग्लंडमधे जाऊन कौंटी क्रिकेट खेळल्याने पैसे मिळतील, प्रसिद्धी होईल नि खेळहि सुधारेल - म्हणजे कसे, काही लोक शिकायला परदेशात जातात तसे! ऑस्ट्रेलियात घेत असतील तर तिथेहि जावे.

<< <<<परवडणारा >>>? >> अहो, खर्च परवडण्याचा प्रश्नच नाहीय; बाहेरच्या संघाना पहिल्या दिवसापासून हातभर चेंडू वळतील अशा खेळपट्ट्ट्यांवर इथं झोडपून काढणं, यावर तर बीसीसीआय चा डोलारा उभा आहे ! म्हणून ' फास्ट , बाऊन्सी' खेळपट्ट्या करणं परवडणारं नाही !!

इंगलंडपेक्षा पुढील सामन्यांत सरावाने आपल्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्याची शक्यताच अधिक आहे, असं नाही वाटत ? >> सतत खेळून सराव होईल का ह्याचे उत्तर छातीठिकपणे देणे अशक्य आहे, तसे असते तर कोहली ला २०१२ चा दौरा कठीण गेला असता का ? ह्याबाबत माझे मत 'आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार' असे आहे. धवन, राहुल, कार्थिक, पांड्या थोडाफार पुजारा ह्यांचे तंत्र मूळात faulty आहे त्यामूळे सीम धार्जिण्या पिचेस वर चांगल्या बॉलर पुढे ते expose होणे साहजिक वाटते. तंत्र असेल, पेशन्स असेल तर trigger movement टाळण्यासाठी सराव केला जाऊ शकतो, कुठले बॉल सोडायचे हे घोटवून घेतले जाउ शकते. सराव टेस्ट सिरीजच्या आधी असावा असे वाटते. पुजाराला जमेल असे वाटते. बाकीच्यांचे वाटत नाही. काही चुकार innings click होउ शकतील - होतील पण चार सामने consistently खेळणे सोपे नसेल. I hope I get proven wrong Happy

<, ह्याबाबत माझे मत 'आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार' असे आहे.>> १०० % सहमत. पण , बुडायचीच पाळी आली कीं पोहायला न येणाराही जीवाच्या आकांताने हात पाय मारून तरंगायला तरी शिकतोच; म्हणून, आपल्या << Usually England is rusty in first few matches and then they start to come into their elements. >> यावर तौलनिक दॄष्ट्या << इंगलंडपेक्षा पुढील सामन्यांत सरावाने आपल्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्याची शक्यताच अधिक आहे, >> असं म्हणायचं मी धाडस केलं इतकंच.

साऊथ अफ्रिकेत जे झालं तेच इथेही दिसतंय. मॅच प्रॅक्टिस चा आभाव. १४ दिवसांच्या गॅपमधे फक्त एक ३ दिवसाचा प्रॅक्टिस गेम झाला. एक पूर्ण सामना कॅन्सल आणि झालेल्या सामन्याचाही एक दिवस कमी करून काय साधलं देव जाणे. काही प्लेअर्स ए टीमकडून खेळले एवढंच काय ते.

अफ्रिकेत आपण दोन टेस्ट्स च्या मॅचप्रॅक्टिस नंतर तिसर्‍या सामन्यात ग्रिप घेऊ शकलो, तसंच काहिसं इथे ही होईल अशी अपेक्षा (कारण इथे ५ सामन्यांची मालिका असल्यानी थोडा स्कोप आहे). पण एकूणात मॅच प्रॅक्टिस कमी करून नेट सेशन्स वाढवण्याचं डिसीजन काही फार उपयोगी पडंत नाहिये हेच खरं.
कोहली अन शास्त्रीबुवा हे कितपत अ‍ॅक्सेप्ट करतील देव जाणे.

२०११ च्या इंग्लंड - ऑस्ट्रेलिया मधे झालेल्या पानिपतानंतर, भारतात अशा सिमिंग खेळपट्ट्या - डोमेस्टिक क्रिकेट साठी तयार करण्याचा प्रयोग केला होता. त्यातलच एक लाहिली चं मैदान आहे, जिथे अजुनही १५०-२०० चे स्कोअर्स विनिंग ठरतात. पण त्याची डाऊनसाईड म्हणजे, कुणीही सर्वसाधारण मिडियम पेसर भेदक वाटणे (स्टुअर्ट बिन्नी), आणी स्पिनर्स डिमोरलाईझ होणे असा झाला. (जडेजा हा मध्यंतरी डोमेस्टीक सर्किट मधला सर्वाधिक यशस्वी स्पिनर होता!!). त्यातून भारतीय फलंदाजांना मदत मिळाली नाही.

आता तर शास्त्रीबुवांचं राज्य आहे. बडबड झिंदाबाद, बोलबच्चन की जय! उगाच प्रॅक्टीस मॅच, ऊन जास्त आहे म्हणून कट-शॉर्ट करणे, मोठी-मोठी विधानं करणे, मॅच हारल्यावर, 'आपून ने दो-इच मारा, लेकिन क्या सॉल्लिड मारा' टाईप्स हास्यास्पद विधानं करणे हेच प्रकार जास्त दिसतात.

हे मॅच हारल्यावर 'गिरे तो भी टांग उप्पर' ची सुरूवात माझ्या पहाण्यात तरी महामहीम धोनीच्या काळात झाली. तो मॅच हारल्यावर एक मोठी मॅच समरी सांगायचा. मग त्यात काहीतरी फिलॉसॉफीचा टच द्यायचा - क्रिकेट म्हणजे आयुष्य नव्हे वगैरे. त्याच्या ह्या बाबा बर्वे स्टाईल (म्हणजे अतिशय शांत, संथ लयीत आणी विषयाशी असंबंधित) भाषणामुळे नेमकं मॅच कोण हारलय हा संभ्रम निर्माण व्हायचा. मग हळुच एक 'पहिल्या दिवशी लंच ला त्यांचा जेव्हा १००/१ स्कोअर झाला तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की आता मॅच जिंकणं काही शक्य नाही, तेव्हा मग आम्ही ड्रॉ तरी होते का ते पहायला सुरूवात केली, पण आमच्याकडे ड्रॉ करण्यासारखे बॉलर्स नाहीत त्यामुळे मग आम्ही हारणार हे मला दुसर्या दिवशी टी-टाईम लाच लक्षात आलं' छाप विधानं अ‍ॅड केली की मुलाखत घेणारा 'पांड्या, पांड्या, लेका बालिश्टर का नाही झालास' च्या नजरेनं त्याच्याकडे पहायचा. असो, ही संपूर्ण पोस्ट अशीच विषयाशी असंबंधित आहे, पण सहज सुचलं म्हणून टाकली.

पुढल्या मॅचला राहुल ऐवजी पुजाराला घेणे आवश्यक आहे. लॉर्ड्सवर रहाणेला काढण्याची घोडचूक शास्त्री - कोहली यांनी करु नये. गेल्या दौर्‍यात लॉर्ड्स टेस्टमध्ये रहाणेनेच सेंच्युरी ठोकली होती हे कोहली तरी विसरला नसेल अशी अपेक्षा. पंड्याऐवजी कुलदीपला घेणंही योग्य ठरू शकेल. मुळात याच टेस्टमध्ये इतक्या ड्राय विकेटवर कुलदीपला का घेतलं नाही हेच अनाकलनीय आहे. त्याबरोबरच करन नुकताच बॅटींगला आलेला असताना अश्विनला केवळ एक ओव्हरनंतर बदलण्याचा शुद्ध गाढवपणा कोहलीने का केला आणि तो देखिल अश्विनने कूक, जेनिंग्ज या लेफ्ट हँडर्सचा अक्षरशः मामा केलेला असताना, हे त्यालाच ठाऊक.

चला, उठा आतां. ती फास्टच आहे, जरासं खेळवून ती तुम्हाला हाकलणार, खात्रीच होती मला !
पण जन्माची खोडच आहे ना बाहेरच्या चेंडूमागे धांवायची, क्रिकेटवाले ना तुम्ही !!!
sharan.jpg

भाऊ, Lol

कुलदीप आणि पुजारा हे दोन बदल हवेतच!
पंड्यात कपिलदेवला शोधतायेत का शास्त्री आणि कंपनी? त्यात मदनलाल सुद्धा नाही!

<< पंड्यात कपिलदेवला शोधतायेत का शास्त्री आणि कंपनी? त्यात मदनलाल सुद्धा नाही!>> सहमत.
कपिलदेवला तुलनेसाठीही या गदारोळात ओढूं नये ! आपल्या क्रिकेटच्या इतिहासात विनू मांकड व कपिल देव हे दोनच खरेखुरे जागतिक दर्जाचे 'ऑलराऊंडर्स' असावेत. पंड्याशी तुलनेसाठी शास्त्रीसारखे अगणित तथाकथित ऑलराऊंडर्स आहेतच कीं !
*राऊळाच्या कळसाला लोटा कधीं म्हणू नये * !!

"पंड्याशी तुलनेसाठी शास्त्रीसारखे अगणित तथाकथित ऑलराऊंडर्स आहेतच कीं " - भाऊ, हे पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकलं (वाचलं).

कपिलदेव आणी विनू मंकड च्या मताशी सहमत. अर्थात विनू मंकड विषयी ची महिती सगळी वाचीव आहे. विजय, राहूल / धवन, पुजारा, कोहली, रहाणे, साहा, अश्विन, भुवनेश, इशांत ह्या टेस्ट च्या कोअर टीम ला, इंज्युरीज वगळता, पुढची २-३ वर्ष, अजिबात हात लावू नये. बाकी १-२ बदल, परिस्थितीनुरूप असावेत.

आपल्या क्रिकेटच्या इतिहासात विनू मांकड व कपिल देव हे दोनच खरेखुरे जागतिक दर्जाचे 'ऑलराऊंडर्स' असावेत. >> सलिम दुराणी पण एकदम जबरदस्त होता असे गावस्करच्या मुलाखतींमधे वाचले आहे. तुम्हाला माहित असेल.

पंड्याशी तुलनेसाठी शास्त्रीसारखे अगणित तथाकथित ऑलराऊंडर्स आहेतच कीं ! >> आपल्याला हे करण्याची भयंकर खाज आहे. इर्फान मधे आधी शोधला नि एक promising swing बॉलर खच्ची केला. पुढचा तेंडुलकर, धोनी, द्रविड हे आहेतच.

सलिम दुराणी पण एकदम जबरदस्त होता असे गावस्करच्या मुलाखतींमधे वाचले आहे. >>

तसेच एकनाथ सोलकर होते परंतु खेळलेले एकूण सामने म्हणजे कारकिर्दीची लांबी आणि बळी व धावांची संख्या ह्याचा विचार करता कपिल आणि विनु मांकड केवळ!

होय, दुराणी हा नि:संशय प्रतिभावानच नाही तर शैलीदार खेळाडू होता. वाडेकरचया संघातून वे.इंडिजच्या दौरयावर असताना त्याने सोबरसची घेतलेली विकेट खूप गाजली होती; केवळ मुख्यत: त्यामुळे आपण सामना जिंकलो महणून नव्हे तर ती दुराणीची अफलातून फिरकी गोलंदाजी होती म्हणून !
असामीजी, इतरही अनैक ऑलराऊंडरसनी ( त्यात,सोलकर, शास्त्री व पंडयाचाही समावेश आहेच ) वेळोवेळी मोलाची कामगिरी केली आहे व त्याची दखलही घेतली गेली आहे. पण 'असामान्य ' किताबासाठी तें पुरेसं नसतं , इतकंच !

दुर्दैवाने विनू मांकड खेळत असताना, टीव्ही नव्हता भारतात! प्रत्यक्ष मॅच बघायला जाणेहि परवडण्यासारखे नव्हते, फार तर एक किंवा दोन दिवस जमायचे. वर्तमानपत्रात वाचायचे नि कधी काळी फोटो आला तर कापून ठेवायचा!
कॉमेंटरीला व्हिझि होता. चालू मॅचपेक्षा पूर्वी तो इंग्लंडमधे असताना काय झाले ते सांगत बसायचा नि दिवसाच्या शेवटी सांगायचा भारत ऑल आऊट ५७ , इंग्लंड १ बाद १९७.

Pages