Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्वी एम सी सी नावाची एक
पूर्वी एम सी सी नावाची एक क्लब टीम कसोटी दर्जाधारक होती. ती दौरेही करत असे शिवाय ईंग्लंदचीही वेगळी टीम असे. त्याचे पुढे काय झाले. हाल्ली नसते ती.
कोहलीला पुजाराशी काही
कोहलीला पुजाराशी काही प्रॉब्लेम आहे वाटतं >> Add Shastri to the list too. What the heck man ! Dhawan stays in spite of pair of ducks ? आफ्रिकेतल्या पहिल्या मॅच वरून काहीच धडा शिकलेले नाहित हे उघड आहे.
भाऊ तुमचे कालचे पुजारा, राहणेबद्दलचे पोस्ट टआईम मशिनमधे बसून लिहिलेले कि काय ?
पुजारा did it to himself.
पुजारा did it to himself. यॉर्कशायर कडून खेळताना सुद्धा तो patchy फॉर्म मधे होता आणी प्रॅक्टीस मॅच ला पण वाईट खेळला. अर्थात त्या लॉजिक ने धवन सुद्धा बाहेर जायला हवा होता. राहूल ला बाहेर बसवण्यासारखं त्याने काहीच केलं नाहीये. looks like, he earned his spot. उमेश यादव खूप inconsistent आहे. शामी ला ह्रिदम मधे यायला वेळ लागतो, पण ह्रिदम मधे आला की मस्त बॉलिंग करतो. England bat deep. Hopefully, आपला बॉलिंग अॅटॅक intensity sustain करू शकेल.
असामीजी, कदाचीत मी ' आऊटडेटेड
असामीजी, कदाचीत मी ' आऊटडेटेड ' असेनही . पण निवडसमिती व कर्णधार जर दौरयाच्या सुरवातीपासूनच ' 'कोअर' फलंदाजीबद्दलच साशंक असतील, तर ती धोक्याची घंटा ठरूं शकते. पुजाराला पहिल्याच कसोटीस वगळणं मला अनुचित वाटतं.
फे फे प्रश्न राहुलचा नसून
फे फे प्रश्न राहुलचा नसून पुजारा नि धवनचा आहे. ज्या क्रायटेरियावर पुजारा बाहेर असतोय तोच धवनला लागत नाही हे पटत नाही. पॅची असला तरी दोन डावात टीपीकल पद्धतीने धवनचे बाद होणे कुठला विश्वास निर्माण करतात हे देवच जाणे. वेगात धाव अन काढणे हा टेस्ट्साठी दुर्गूण नाही नि मधल्या फळीतल्या नि सुरूवातीच्या फळीतल्या फलंदाजांची पद्धती वेगवेगळी असू शकतात हे कधी पचणार कोहली नि शास्त्रीला देव जाणे. कमीट कमी शास्त्री ने स्वतःच्या बॅटींग कडे तरी बघायचे होते
"कमीट कमी शास्त्री ने
"कमीट कमी शास्त्री ने स्वतःच्या बॅटींग कडे तरी बघायचे होते" - बॉब क्रिस्टो बोलतोय असं वाटलं त्या 'कमीट कमी' मुळे
अरे, शास्त्री ने स्वतःच्या बॅटींग कडे बघून टीम निवडायला सुरूवात केली, तर ए टीम सुद्धा भारी पडेल.
धवन विषयी मी सहमत आहे. ज्या लॉजिक ने पुजारा बाहेर बसला, त्या लॉजिक ने धवन ला हॉटेल वरच ठेवायला हरकत नव्हती. भाऊंचं म्हणणं बरोबर आहे. पहिल्याच टेस्ट ला फर्स्ट चॉईस प्लेयिंग ११ मधे बदल करणं प्रचंड डिमोरलायझिंग ठरू शकतं.
आज दिवसातल्या शेवटच्या ओव्हरमधे पाचव्या बॉल ला कार्थिक ने कॅच सोडला, नाहीतर इंग्लंड पहिल्याच दिवशी ऑल-आऊट झाले असते. पण ते वगळता, मस्त खेचली मॅच बॉलर्स नी. आता उद्या-परवा बॅटींग जबरदस्त झाली पाहीजे. तर ही टेस्ट आणी संपूर्ण सिरीज साठी मस्त टोन सेट होईल.
बॉब क्रिस्टो >>
बॉब क्रिस्टो >>
शेवटच्या ओव्हरमधे पाचव्या बॉल ला कार्थिक ने कॅच सोडला >> जाऊ दे रे. एकंदर आपली स्लिप कॅचिंग बघून त्याला वाटले असेल त्याचे चान्सेस अधिक आहेत
पण सिरीयसली कोहली म्हणाला कि overcast condition मुळे त्यालाही पहिली बॅटींग करायला आवडले असते. मजा म्हणजे नऊमधली एकही विकेट कीपर किंवा स्लिप मधे नाही.
स्पिनरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. अश्विन ची शेवटची विकेट बॉल स्विंग झाल्यामूळे मिळाली. मग अँडरसन काय धमाल करू शकेल ह्याची कल्पना करवत नाही. उद्या दहावी विकेट अर्ध्या एक तासाने पडली तर पिच अधिक धार्जिणे झाल्यावर बॅटींग करायला मिळेल अशी आशा. म्हणजे शेवटची विकेट लवकर पण योग्य वेळी जाईल अशी, नाही तर आपला शेपटाबरोबरचा रेकॉर्ड काही आशादायक नाही. *पोस्ट ला थोडा झक्की टोन आला असल्यास दिलगिरी* 
झक्की टोन
झक्की टोन
आपली बॅटींग गंडण्याची पुरेपूर शक्यता आहे, पण तसं होऊ नये ही एक आशा पण आहे.
त्या शेपटाविरुद्ध चा आपला रेकॉर्ड बघता मला तर ६ विकेट्स नंतर विकेट पडेल की नाही असं वाटत होत, पण चांगली बॉलिंग केली.
फेफ
फेफ
पण त्यात दिलगिरी अलाउड नाही 
असामी - झक्की टोन
उद्या गावसकर रूल वापरा म्हणावं. पहिला तास बोलरला, मग पूर्ण दिवस आपला. विजय, धवन, आणि राहुल यांची मारण्याची खुकखुमी व्हर्सेस स्विंग होणारा बॉल, देखे किसे क्या मिलता है. या सर्व लोकांनी फक्त २०११ सिरीज मधली द्रविड ची बॅटिंग पाहावी.
राहुल ला मी जेव्हा खेळताना
राहुल ला मी जेव्हा खेळताना पाहिला आहे तेव्हा मला तो कधीही टेस्ट टेम्परामेण्ट चा वाटला नाही. त्याचे "अवे" परफॉर्मन्स पाहिले तर इंग्लंड सारख्या वातावरणात तो कसा खेळेल याचा अंदाज लावता येत नाही. सिडने, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेत त्याची एक एक शतके आहेत पण यातले कोणतेच अशा वातावरणात नाही.
राहुल चे लंके मधे फर्नांडॉ
राहुल चे लंके मधे फर्नांडॉ सारख्या ऑफ कटर टाकणार्या बॉलर ने उडवलेले त्रिफले बघितल्यावर खर तर राहुल ने एव्हढ्या धावा काढल्यात ह्याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. पण कदाचित त्याने स्वतःमधे सुधारणा केली असेल असेही असू शकेल.
बरं ही एक इण्टरेस्टिंग क्लिप,
बरं ही एक इण्टरेस्टिंग क्लिप, सध्याच्या सिरीज शी संबंधित नाही पण यू ट्यूब वर आली म्हणून पाहिली.
https://www.youtube.com/watch?v=l2CfvZR2IiY
इथे सुरूवातीपासून बघितलेत तर भारताचा डाव सुरू होत आहे. इम्रान ओपनिंग बोलर आहे. अगदी पहिल्या ओव्हरचे सुद्धा हायलाइट्स आहेत. आणि प्रत्येक वेळेला इम्रान तो बॉल घासून चकचकीत करतोय, अगदी थुंकी लावून सुद्धा. पण तो बॉल तर नवा कोरा आहे ना? सहसा ५-६ ओव्हर जुना बॉल झाला की एक बाजू घासण्याची गरज असते.
की इथे तो सुरूवातीलाच रिव्हर्स स्विंग करतोय? इतक्या नवीन बॉल वर मिळणारा स्विंग हा सहसा आउटस्विंग असतो. इथे गावसकर आणि विश्वनाथ च्या विकेट्स पाहिल्या तर बॉल आत आलेला आहे. विश्वनाथ ने तर बॉल बाहेर असे समजून सोडून दिला. इथे ते वेगापेक्षाही जास्त स्विंग् च्या दिशेचा अंदाज चुकल्याने गंडलेत.
बेसिक फंडा जो इथे गृहीत धरलाय - अगदी नवा कोरा बॉल असतो तेव्हा तो फक्त शिवणीच्या दिशेवर स्विंग होतो, कारण दोन्ही बाजू सारख्याच "सरफेस" च्या असतात. मग तो जुना झाला की एक बाजू घासून फरक पडतो.
- अगदी नवा कोरा बॉल असतो
- अगदी नवा कोरा बॉल असतो तेव्हा तो फक्त शिवणीच्या दिशेवर स्विंग होतो, कारण दोन्ही बाजू सारख्याच "सरफेस" च्या असतात. मग तो जुना झाला की एक बाजू घासून फरक पडतो. >> मी मधे एका aero nautical engineer चे पेज वाचले होते ज्यात हा बेसिक फंड १००% बरोबर नाही असे दिले होते. बॉलचा वेग, शिवणीची पोझिशन नि बॉलचा सरफेस ह्यावर अवलंबून दोन्ही दिशांकडे नवा बॉल सेम orientation ठेवूनही वळू शकतो नि कसा ते दिले होते. अर्थात हा प्रयोग फक्त air tunnel मधे केलेला होता. त्याचे म्हणणे होते कि reverse swing हा चूक शब्द प्रयोग आहे. conventional स्विंग हा शब्द प्रयोग बरोबर आहे. नंतर लिंक सापडली तर देईन.
इंग्लंड २८७ ऑलआउट. भारत २
इंग्लंड २८७ ऑलआउट. भारत २ ओव्हर्समध्ये १२. विजय आणि धवन काय करतायत बघूया आता.
सुरवात चांगली पण कुरियने
सुरवात चांगली पण कुरियने तिघांचे अवघ्या १० धावात तंबूत झटपट कुरियर केले!
राहुलचं आडनाव शर्मा होतं काय
राहुलचं आडनाव शर्मा होतं काय पूर्वी??? कोहली का इतका प्रेमात आहे त्याच्या? अन शास्त्रीची तर बातच सोडा. तो जितका सुमार प्लेअर होता तितकाच सुमार कोच वाटतो.
सिरीजच्या पहिल्या टेस्ट मधे सद्यस्थितितला 'टेस्ट स्पेशॅलिस्ट' केवळ बेस्ट ऑफ फॉर्म मधे नाही म्हणून टीम बाहेर कसा काय जातो? अफ्रिकेतल्या राहणे एपिसोडमधून 'थिंक टँक' काहीच शिकला नाही का? का यापुढे टेस्ट स्पेशॅलिस्ट्स ना टेस्ट मधेही जागा नाही??
कोहली स्वतः तीन्ही फॉर्मॅट्स मधे चांगला खेळतो म्हणून बाकी पूर्ण टीमनीही तसंच खेळलं पाहिजे का?
टी२० परफॉर्मन्स वर अजून किती दिवस टेस्ट सिलेक्शन होणार???
नुसतं सबकाँटिनेंट्सच्या पाटा ट्रॅक वर धावांचा रतीब घालणारे अन त्या पुण्याईवर ओव्हरसीज टूरमधे जागा मिळवून बाहेर शेपूट घालणारे अजून किती प्लेअर्स आपण चालवणार? अ संघाच्या दौर्यातून कोण कुठे कधी कसा परफॉर्म करतो या स्टॅट्सला टीम सिलेक्शनमधे काहीच महत्व नाही का?
मेजर चिडचिड होतिये.
मला राहुल फक्त टी२० योग्य वाटतो. बाकी टेस्ट तर सोडा, वन डेचं ही टेंपरामेंट नाही दिसत.
राहुलबाबा? सिरियसली? पुजारा
राहुलबाबा? सिरियसली? पुजारा निदान झोपी गेला असता पीचवर!
राहुल नि धवन दोघेहि नको तिथे
राहुल नि धवन दोघेहि नको तिथे बॅट घालून बाद झाले. हा काही २०-२० सामना नाहीये, अधून मधून संपूर्ण षटक निर्धाव गेले तरी चालते, पण प्रत्येक चेंडूला बॅट लावायच्या नादात विकेट फेकणे म्हणजे अतीच निष्काळजी पणा.
कोहली नि अँडरसन बघायला पाहिजे
कोहली नि अँडरसन बघायला पाहिजे. कोहली कधी चूक करतो! आशा आहे की कोहली जपून खेळेल, विकेट जपून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
चला निदान फॉलोऑन टाळून रहाणे
चला निदान फॉलोऑन टाळून रहाणे परतले!
कप्तान कोहलींच्या रुंद खांद्यावर आता सगळी मदार!
चला निदान फॉलोऑन टाळून रहाणे
चला निदान फॉलोऑन टाळून रहाणे परतले! >>> अर्र्र आत्ता लिहीणार होतो की रहाणेला म्हणावं ही संधी सोडू नको. ते १० ते ३० धावांचे काय लिमीट आहे त्याचे कळत नाही. कोणतेही भारी फलंदाज सहसा एकदा १० च्या पुढे गेले की टिकतात. रहाणे चे स्टॅट्स पाहिले नाहीत पूर्ण पण त्याचे असे अर्धवट धावसंख्येवर आउट होणे कॉमन दिसते.
हे लिहीपर्यंत कार्तिक ही गेला
हे लिहीपर्यंत कार्तिक ही गेला.
आता पुढे बघवत नाही.
आता पुढे बघवत नाही.
"आता पुढे बघवत नाही." - आता च
"आता पुढे बघवत नाही." - आता च तर खरी मजा आहे. पंड्या काऊंटर अॅटॅक करेल.
जोक्स अपार्ट. काल ह्याचीच भिती होती. धवन, राहूल, रहाणे चं आऊट होणं inexcusable आहे. कोहली आणी पंड्या चे लागोपाठ च्या बॉल्स वर उडालेले कॅचेस सुटले नसते, तर परिस्थिती आणखीन बिकट झाली असती. बघू कोहली आणी पंड्या काय करतात ते.
कोहली निदान चेंडू नीट
कोहली निदान चेंडू नीट नयाहाळून, पूर्ण एकाग्रतेने खेळतो आहे. बाहेरचे चेंडू सोडणं याहीपेक्षा 'बाऊंस" हा खरा शत्रू वाटतोय! कठीण असलं तरी पण सरावाने जमणार असं वाटतंय !
कोहली खूपच determined खेळतोय.
कोहली खूपच determined खेळतोय. मस्त! दुसर्या इनिंगपासून सगळे ह्यातून काहीतरी शिकतील अशी आशा आहे.
>>तो जितका सुमार प्लेअर होता
>>तो जितका सुमार प्लेअर होता तितकाच सुमार कोच वाटतो.
कोच?
रबर स्टॅंप आहे तो.... कोहलीच्या हो ला हो करणारा.... आणि याच बोलीवर तो कोच झाला असणार आहे!
मला नाही वाटत त्याला काही से असेल संघनिवडीमध्ये!
"रबर स्टॅंप आहे तो" - म्हणुनच
"रबर स्टॅंप आहे तो" - म्हणुनच खेळाडू आणी कोच म्हणून कन्सिस्टंट आहे.
कोहली मस्त खेळला. आता परत एकदा बॉलर्स ना चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. आणी ४ थ्या इनिंग ला खूप चांगली बॅटींग करावी लागणार आहे. पूर्वी २-३ टेल-एंडर्स ना हाताशी धरून शंभर-एक रन्स काढणारे बॅट्समेन होते, ते कुठे गेले? अशा वेळी मुख्य बॅट्समन बरोबर उभं राहून भागीदारी करणारे टेल-एंडर्स कुठे गेले?
आता इशांतला हाताशी धरून
आता इशांतला हाताशी धरून लक्ष्मणाने ९२ रन्स काढल्या होत्या मोहालीत. इथे तसलं काही झालं तर सोने पे सुहागा होईल.
६०पैकी २१ + १६ ओव्हर्स अँडरसन
६०पैकी २१ + १६ ओव्हर्स अँडरसन आणि कुरान जलदगती दुकलीने टाकल्या म्हणजे कमाल आहे. दमा म्हणावं दोघांना!
Pages