क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ मान्य फक्त अजून वर्षभरामधे संघामधे आज नसलेले येऊ शकतात हाही भाग आहेच. >> तुझ्या 'रीड बीटवीन द लाईन्स' मध्ये वरचा आख्खा पॅराग्राफ आहे होय.. Lol माबुदोस म्हणायचे न काय? Wink

माबुदोस बाजूला ठेव, मला अजूनही नाही कळले कि तुला त्या वाक्यात न कळण्यासारखे काय आहे ? मी लिहिलेल्यांमधे आज जे नाही हे वर्षभरामधे येउ शकतात एव्हढे साधे सरळ विधान होते. तू त्यापुढे पंत नि गिल बद्दल specifically विचारलेस (नागरकोटि इ. मी लिहिले नव्हते हे लक्षात घे - "जर आयपीएल च्या बेसिसवर तू पंत, गिल, शॉ वगैरेंना आत आणत आहेस" हे तुझे विधान होते ) म्हणून त्यांच्याबद्दल पुढे सांगितले. पण्ते बाकीच्या कोणालाही तेव्हढेच applicable आहे (माझ्या लिस्ट मधल्या). वर्षभरामधे अजून कोणीही आत येउ शकतो नि चांगला खेळला किंवा खेळेल असे कोहली नि शास्त्रीला वाटले तर ते पंटही करू शकतात त्यांच्यावर. settled team वगैरे हे तीन चार महिने आधी ठीक आहे, वर्षभर आधीच ? संत्रे एव्हढे उलगडायला लागेल मला काय माहित Happy

भाऊ, सहमत आहे. तसही, वर्ल्ड कप च्या आधी भारताच्या १०-१५ च वन-डेज राहिल्या आहेत. मला वाटतं की उपलब्ध / इअरमार्क्ड ५-७ खेळाडूंमधूनच ते उरलेले २-३ खेळाडू मिळतील.

वर्षभरामधे अजून कोणीही आत येउ शकतो नि चांगला खेळला किंवा खेळेल असे कोहली नि शास्त्रीला वाटले तर ते पंटही करू शकतात त्यांच्यावर. >> तुझ्या ह्या 'कोणीही' (पंत, शॉ, गिल ई. आयपीएल परफॉर्मर्स) वरच ईनडायरेक्टली आक्षेप घेतला होता रे.
माझे पसरट लिहिणे फेफने कसे एका वाक्यातच सांगितले बघ .. ईयरमार्क्ड.
रणजी, ईंडिया ए वगैरे होम सिरिज, टेस्ट सिलेक्शन साठी ठीक आहे... माझ्या मते ऊलट वर्ल्ड कप सारख्या ईंटरनॅशनल ईवेंटसाठी आयपीएल च अनुभव जास्त रिलेवंट आहे.
आता थेट सांगतो... कमीत कमी वीसेक वन-डे ईंटरनॅशनल चा अनुभव असल्याशिवाय त्या प्लेअर ला डिस्कशन टेबलवर घ्यावे असे मला वाटत नाही. आधी अनुभव मग फॉर्म, ईंग्लिश कंडिशन्स, टीम बॅलन्स वगैरे वगैरे.... चढत्या पायरीने.

तू कोणीही, कोणालाही असे रँडम बोलणे थांबव पाहू आधी. आपण नावे घेऊन आणि नावे ठेऊन बोलूयात. Proud

settled team वगैरे हे तीन चार महिने आधी ठीक आहे, वर्षभर आधीच >> बाबो.. काय म्हणतो आहेस ?... कर्स्ट्नने काय शिकवले मग आपल्याला. एबीडीने एवढ्या आधीच रिटायरमेंट का जाहीर केली असेल.

कर्स्ट्नने काय शिकवले मग आपल्याला. एबीडी एवढ्या आधीच ने रिटायरमेंट का जाहीर केली. >> settled team कुठे आहे पण ? पहिले तीन क्रमांक सोडले नि सध्या तरि पांड्याचा सहा वगळता मधले सगळे open आहे ना (इथे भ. भा. च्या शांतीसाठी धोनीच आहे असे धरूया पण तो कुठे बॅटींग करेल हे माहित नाही). मधल्या ह्या पॅचमधे कोण कोण येउ शकते तर माझ्या मते ती range मोठि आहे. रैना, राहाणे पासून ते थेट पंत, गिल पर्यंत. ह्यातल्या कोणीही अजून consistently असा खेळ केलेला नाही कि त्यांचे नावे डोळे मिटून आपोआप धरले जाईल. तुझ्या पोस्ट वरून तुला पंत नि गिल specifically नको असे वाटतेय असे मी समजतो. गिलबद्दल एक वेळ समजू शकतो पण पंत बरेच दिवस extended squad मधे फिरतोय. ११ मधे येऊन गेलाय. सध्या थेट England मधल्या (India A played ODI series and Tri-series) कामगिरीवर form आहे हे ही दिसतेय. धोनी नि कार्थिक असेच खेळले तर पुढच्या सिरीज मधे तो आतही येईल. पुढे मग World cup खेळेल कि नाहि हे तो कसा खेळेल ह्यावर ठरेल. "माझ्या मते ऊलट वर्ल्ड कप सारख्या ईंटरनॅशनल ईवेंटसाठी आयपीएल च अनुभव जास्त रिलेवंट आहे." हे म्हणतोस नि पुढे शॉ, गिल, पंत नको हे ही म्हणतोयस ? असो तूझा मुद्दा माझ्या लक्षात आला, आपण दोघे वेगवेगळ्या angle मधून विचार करत आहोत असे दिसतेय.

बाबो.. काय म्हणतो आहेस ?... कर्स्ट्नने काय शिकवले मग आपल्याला. एबीडी एवढ्या आधीच ने रिटायरमेंट का जाहीर केली. >> ABD ला बाजूला ठेवूया त्याच्या रिटायरमेंट मधे बरीच कारणे गुंतलेली होती. कर्स्ट्न ने सुद्धा रैना नि कोहलीला खेळवले होतेच ना. सध्याच्या packed season मधे वर्षभर आधी टीम ठरवून ठेवली नि ऐन वेळी बुमराह नि भुवी बाहेर गेले कि काय होते ते दिसलेय त्यामूळे आहे त्यापेक्षा मोठा base लागणार नि त्या base ला आधी खेळवून नक्की त्यांचा रोल काय आहे हे कळायला देणे जास्ती योग्य नाही का ? त्यापेक्षाही मुख्य गोष्ट म्हणजे मधल्या जागेवर जुन्या कोणीही claim stake केलेला नाही हे सत्य लक्षात घेता त्याच त्याच खेळाडूंना 'hopefully they will click now' असे म्हणून पंट करणे काय नि 'पंत, शॉ , गिल सारख्या नवशिक्या खेळाडूला संधी देणे काय' दोन्हीही risk च आहेत.

उपलब्ध / इअरमार्क्ड ५-७ खेळाडूंमधूनच ते उरलेले २-३ खेळाडू मिळतील. >> आणी हे ५-७ इअरमार्क्ड कोण असतील नक्की ? राहुल , पंत, कार्थिक, जाधव (मघाशी विसरलो होतो) , राहाणे , रैना (जाधव नसेल तर Raina will leap frog others since sadly he is the only one in entire list who is providing sixth bowling option that Kohli craves for) ? रायुडु (Original England ODI selection), अय्यर, अग्रवाल (Playing in India A ODI series) हे मिक्स मधे नसतील असे वाटते का ?

च्यामारी माझे आजचे पहिले पोस्ट होते कि वर्षभराने येणार्‍या World Cup पेक्षा आठवड्याने येणार्‍या टेस्ट ची चर्चा करुया Happy

हे म्हणतोस नि पुढे शॉ, गिल, पंत नको हे ही म्हणतोयस ? >> वीसेक ODI ची कंडिशन नाही फुलफिल होत आहे म्हणून नाही म्हणत आहे. प्रेशर हँडलिंगचा अनुभव नसल्यास वर्ल्ड ईवेंट मध्ये अवघड वाटते.
११ ला स्क्वाड मध्ये येण्याआधी कोहली आधी तीन वर्षे ODI मध्ये खेळला होता सातत्याने नाही पण खेळला ह्ता...त्याजागी दुसरा ऑप्शन शर्मा होता आणि तो कोहलीच्या बराच आधी येऊनही फ्लॉप होता. रैना ही पाच सहा वर्षे आधीपासून खेळत होता.

पंत, गिल, शॉ वगैरे खेळले तर त्यांचा ऑलमोस्ट डेब्यू असणार आहे वर्ल्ड कप. मला ही मोठी अनसर्टँटी वाटते. पंत तुला आवडतो हे माहित आहे पण धोनी आणि कार्तिकला मी ... अनुभव आणि क्रिकेट अ‍ॅक्युमेन च्या बेसिसवर राईट ऑफ करणार नाही.

आणी हे ५-७ इअरमार्क्ड कोण आहेत नक्की ? >>
शर्मा, धवन, कोहली, ( ईमा. पिक २ - राहूल, जाधव, रहाणे, अय्यर, रैना, कार्तिक, सॅमसन, रायुडू ), पंड्या, धोनी, भुवी, बुमराह, कु. यादव, चहाल. (ऊ. यादव, ठाकुर, कौल, चहार, सुंदर, शंकर )
ओपनर पैकी कोणी ईज्युअर झाल्यास मी १००% राहुलला घेईन. कोहली नसल्यास ३ साठी सॅमसन, रैना, अय्यर ह्या क्रमाने.
पहिले तीनही असल्यास ४ साठी (सॅमसन किंवा राहुल) आणि ५ साठी (जाधव, कार्तिक, रायुडु ह्या क्रमाने)
धोनी नसल्यास कार्तिक फिक्स... पंड्या नसल्यास जाधव किंवा रैना. पण पंड्याला थेट रिप्लेसमेंट म्हणून अजून एक अनुभवी ऑलराउंडर स्क्वाड मध्ये असावा असे वाटते पण दुसर्‍या पंड्या सोडून कोणी दिसत नाही... त्यात तो लेफ्टी ही आहे ही अजून एक जमेची बाजू पण अनुभवात मार खाणार.

Playing in India A ODI series ह्या क्रायटेरियाला माझ्या लेखी तरी काही वॅल्यू नाही.

पंत तुला आवडतो >> गैर समज नको, मी त्रयस्थ आहे त्याबाबत. पण तो माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक consistently नि जबाबदारीने खेळलाय इंग्लंडमधे. त्याचा natural खेळ ४-५ क्रमांकावर suitable पण आहे.

त्यांचा ऑलमोस्ट डेब्यू असणार आहे वर्ल्ड कप.>. हे बरोबर आहे पण हा भाग लक्षात घे कि हे सर्व U 16 पासून competitive Intentional cricket खेळत आहेत. They are more matured due to more exposure . World Cup होइतो दोन IPL चा अनुभव पाठीशी असणार आहे. आतापासून अर्धे अधिक सामने खेळवले तरी त्याचा फायदा होईल. कसलेही दडपण न घेता clean mindset ने खेळणारे खेळाडू कामाला येउ शकतात.

Playing in India A ODI series ह्या क्रायटेरियाला माझ्या लेखी तरी काही वॅल्यू नाही. >> Happy IPL आहे म्हणालास World Cup साठी तरी, मग त्या न्यायाने ... Happy

सॅमसन कसा घुसला त्या वरच्या लिस्ट मधे ? त्याला तर International चा अजिबातच अनुभव नाहिये, थोडा फार India A होता तिथेही फारसा खेळला नव्हता. हा भेदभाव का My Lord ? Happy

अरे हो सॅमसनबद्दल गोंधळच झाला जरा.... राजस्थान रॉयल्स चा युनिफॉर्म ईंडियासारखाच आहे ना त्यामुळे Wink माफी असावी.

आयपीएल ह्यासाठी म्हणालो की तिथे जवळ जवळ सगळे ईंटरनॅशनल लेवल वरचे प्लेअर्स, कोच, सपोर्ट स्टाफ, बाकी रिसोर्सेस, एनवॉयर्नमेंट, प्रेशर वगैरेही एकदम आय-लेवल असते.
A टीम मॅचेस मध्ये बहूतेक करून सेकंड टीअर, आऊट ऑफ फॉर्म, रिकवरिंग, ट्रायल वाले वगैरे प्लेअर्स असतात. पुन्हा मेन स्ट्रीम प्लेअर्स असतील तरी ते त्यांचा A-game खेळण्याएवढे सिरिअस असतातच असेही नाही.

They are more matured due to more exposure . World Cup होइतो दोन IPL चा अनुभव पाठीशी असणार आहे. आतापासून अर्धे अधिक सामने खेळवले तरी त्याचा फायदा होईल. कसलेही दडपण न घेता clean mindset ने खेळणारे खेळाडू कामाला येउ शकतात. >> हे पटले पण .. वर्ल्ड कप पर्यंत कॅप्ड प्लेअर्सना डावलून नवख्यांना टेस्ट करण्याच्या तेवढ्या संधी ऊपलब्ध नसल्याने मला ही मोठी रिस्क वाटते.

मला वाटते ते स्किलसेटची गरज आणि अनुभव ह्या दोघांना बॅलन्स करून पंतसारख्याला घेता येत असेल, तर घ्यावे. वाटल्यास पंतला पुढच्या प्रत्येक सिरीजमध्ये खेळवून घ्यावे. जसे आता ४०व्या ओव्हरनंतर शर्मा/धवन/कोहली कोणीच नसेल तर रनरेट अ‍ॅक्सीलरेट कोण करणार हा प्रश्न आहे. रैना आणि धोनीवर अवलंबून राहता येत नसेल, तर फक्त पंड्यावर ताण नॉकआउट मॅचमध्ये पडता कामा नये. (आठवा - चँपियन्स ट्रॉफी फायनल.) पण असा विचार सिलेक्टर्सनी केलेला दिसत नाही, नाहीतर आत्ता पंतला इंग्लंडमध्ये खेळवण्याची चांगली संधी होती. ते बहुधा थोडा कार्तिक + थोडा रैना + थोडा धोनी + पंड्या ह्या कॉम्बोवर भरवसा ठेवून आहेत. पण ह्यांना प्रतिकूल परिस्थितीत गेम फिरवता येईल का, असा प्रश्न ह्या सिरीजनंतर उभा राहिला आहे. असे गेम फिरवणारे प्लेयर्स हवेत, जे युवराजने २०११ मध्ये केले होते.

चांगला अष्टपैलू खेळाडू हवा. पंड्या आखूड टप्प्याचे चेंडू खुप टाकतो. फलंदाजाला अंदाज आला की मग पंड्याची धुलाई होते. त्यात एखादे दोन बळी मिळतात देखील पण तोवर गणित बिघडते. हमखास धावा रोखणारा कंजूस गोलंदाज हवा.
४, ५, ६ ह्या क्रमांकाचे फलंदाज महत्वाचे रैनावर जास्त विश्वास ठेवणे धोकादायक. एकेरी धावा कोहली शिवाय कुणीही जमवायचे कष्ट घेत नाही! रोश सुरवातीला अनेक निर्धाव चेंडू खेळतो आणि मगलवकर बाद झाला की चाहत्यांचा रोष ओढवून घेतो. जमेला तश्या एक दोन धावा पळणे महत्वाचे.

@हाब >> अक्षर पटेलच म्हणायचं होतं मला, पण ते टायपो नी अक्षय झालं.

एक / दोन सिरीज मधे बरं खेळून डायरेक्ट वर्ल्डकप टीम मधे जागा मिळणं तसं कॉमन आहे आपल्याकडे (अमेय खुरासिया, दिनेश मोंगिया, स्टुअर्ट बिन्नी वगैरे) त्यामुळे कीपर बदलायला अन मिड्ल ऑर्डर मधे प्रयोग करायला स्कोप आहे. पण अ‍ॅक्चुअल कंडिशन्स मधे टेस्टिंग करायची संधी गेली हे मला म्हणायचं होतं
टेस्ट मधे पंत ला घेतलं हे बरंय, फक्त चान्स मिळाला पाहिजे, तो ही १-२ सिरीजपुरता नाही, तर जरा जास्ती.

दिनेश कार्तिक म्हणजे शुद्ध वेळेचा अपव्याय आहे. त्यातून फार काही साध्य होणार नाहिये. त्याच्या इतपत कीपिंग थोड्या ट्रेनिंग नंतर केदार पण करेल. बॅटिंग पण बरी आहे, ऑफस्पिन वापरून ब्रेकथ्रू द्यायची अ‍ॅबिलिटी आहे. पण खरंतर साहा, पार्थिव, नमन ओझा अन कार्तिक यांच्या पलिकडे बघूनच लाँग टर्म प्लॅनिंग करायला हवं.

नंबर ३-४ च्या जागेत थोडी स्टॅबिलिटी आणायला कदाचित कोहली ४ ला येऊ शकेल अन ३रा नंबर ऐय्यर / राहुल ला देता येईल.
धोनी ला खेळवायचंच असेल तर ५ ला खेळवणं बेस्ट असं मला वाटतं.

<< मला वाटते ते स्किलसेटची गरज आणि अनुभव ह्या दोघांना बॅलन्स करून पंतसारख्याला घेता येत असेल, तर घ्यावे. >> अनुभवाची उणीव असूनही, अपवाद करून , वर्ल्डकपसाठी मला पंतला संधी देण्याची चाल पसंत आहे; 'गेम फिरवण्या'ची कुवत असून, त्याला मोठ्या स्पर्धेतही खेळण्यासाठी लागणारा आत्मविश्वास व टेंपरॅमेंट असावं असं जाणवतं.

My world cup 11:
रोहीत शर्मा
शिखर धवन
कोहली
रहाणे
राहुल/रिषभ पंत
धोनी
हार्दिक पंड्या
भुवनेश्वर कुमार
चहल
कुलदीप
बुमराह

सहाव्या बॉलरचा जरा प्रॉब्लेम आहे पण तेव्हढ्यासाठी रैना किंवा केदार जाधवला घ्यावे असे पण वाटत नाही

रैनाने २०१५नंतर बॉलर म्हणून काही केल्याचे कुणाच्या ऐकिवात आहे का? की त्याचं बॉलर म्हणून कर्तृत्व गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं? Wink

त्याचं बॉलर म्हणून कर्तृत्व गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं >> Lol त्याने दोन वर्षे बॅटसमन म्हणून पण काही केलेले नाहिये रे. सहावा बॉलर म्हणून रैना काय किंवा जाधव काय, दोघेही भयंकर रिस्की आहेत जर विकेट्स आत्ता आहेत तशा असतील तर. दोघेही बॉलिंग मधे wishful thinking म्हणून येतात.

"त्याचं बॉलर म्हणून कर्तृत्व गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं" - Happy Happy

केदार जाधव हा बराचसा स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटियर आहे (असं मला वाटतं). जर वय आणी फिटनेस चा विचार केला, तर त्याच कॅटेगरीत कृणाल पंड्या हा बरा ऑप्शन आहे. अर्थात दोघंही तितकेसे सॉलिड नाही वाटत. रैना should not even be an option.

थिंक टँक ने अगदीच डिस्कार्ड केला नसेल, तर रहाणे चा पर्याय मला आवडेल. 'कॉन्फिडंट' रहाणे स्किलसेट (बॅटींग + फिल्डिंग) च्या बाबतीत, बाकी पर्यायांच्या तुलनेत खूपच सुपिरियर आहे.

<<<अर्जुन तेंडुलकर येउ शक्तो का आत अगदी बारावा का होइना ?>>>
हो.
पूर्वी अमरनाथ, मांजरेकर यांची मुले आलीच होती भारताच्या संघात. फारसा उपयोग झाल्याचे ऐकीवात नाही.
पण आता द्रवीड, गांगुली, कुंबळे, लक्ष्मण यांचीहि मुले आहेत का बघा. नुसत्या नावानेच प्रतिस्पर्धी संघ चळचळा कापेल!

थिंक टँक ने अगदीच डिस्कार्ड केला नसेल, तर रहाणे चा पर्याय मला आवडेल. 'कॉन्फिडंट' रहाणे स्किलसेट (बॅटींग + फिल्डिंग) च्या बाबतीत, 'कॉन्फिडंट' रहाणे स्किलसेट (बॅटींग + फिल्डिंग) च्या बाबतीत, बाकी पर्यायांच्या तुलनेत खूपच सुपिरियर आहे. > हे बरोबर आहे पण seriously ४-५ नंबर वर राहाणे एकदम unsuitable आहे. तीच गत सॅमससॅनि राहुल ची. राहुलला कसला मेंटल ब्लॉक आहे ते कळत नाही तीन च्या खाली खेळण्याबद्दल नि पहिले दोघे बॉल हार्ड असताना धमाल करतात नि स्लो होत जातात.

कदाचित रोहित, राहुल असे ओपन करून धवन ल नंबर चार वर आणून बघण्याचा प्रयोग करायला हवा होता. left handed असल्यामूळे रशिद ला टॅकल करता आले असते. पांडे नि कार्थिक ने निराशा केली राव. दोघेही एव्हढे talented असून मिळालेल्या फुटकळ संधींचा लाभ घेता आला नाही दोघांनाही.

धोनीच्या किपींग ला पर्याय नसल्यामूळे त्याला बॅटींग मधे पांड्याच्या खाली ठेवून त्याला हवे तसे खेळू द्यावे. शेवटी भुवी वगैरे बरोबर डाव सावरायची गरज पडली तर त्याच्यापेक्षा लायक माणूस नसावा.

चहल, यादव असे फिक्क्ष ठेवण्यापेक्षा त्यांच्याबरोबर जाडेजा आणून तिघांमधले दोन असे rotating couple ठेवले तर तोच तोच पण येणार नाही. बॅटसमन ना use to व्ह्यायची संधी कमी मिळेल. जाडेजा ODI मधे मधल्या overs भराभर संपवून मस्त टेम्पो ठेवतो.

. पंड्या आखूड टप्प्याचे चेंडू खुप टाकतो. फलंदाजाला अंदाज आला की मग पंड्याची धुलाई होते. >> हे खरय, मॉर्केल सारख्या ह्याच स्टाईल च्या बॉलरला जो लाखपटीने पांड्या पेक्षा सराईत होता, त्याला हे लक्षात यायला त्याच्या कारकिर्दीची संध्याकाळ उजाडायला लागली. (पांड्या नि मॉर्केल च्या दर्जाचा आहे असे मी दूरान्व्यायनेही सुचवत नाहिये) फक्त shOrt ball हे मुख्य बॉलिंग तंत्र दोघांचेही) .

A टीम मॅचेस मध्ये बहूतेक करून सेकंड टीअर, आऊट ऑफ फॉर्म, रिकवरिंग, ट्रायल वाले वगैरे प्लेअर्स असतात. पुन्हा मेन स्ट्रीम प्लेअर्स असतील तरी ते त्यांचा A-game खेळण्याएवढे सिरिअस असतातच असेही नाही. >> काही वर्षांपर्यंत हे बरेच अचूक होते पण मागच्या ३-४ वर्षाम्मधे विशेषतः द्रविड नि त्याआधी कुंअब्ले NCA मधे आल्यानंतर India A चा दर्जा अधिक वाढलाय. दौरे वाढलेत नि प्लेयर्स नीट ग्रूम व्हायचे प्रमाण वाढले आहे. दौरे नीट आयोजीत करून प्लेयर्स चे exposure पद्धतशीर पणे वाढवलेले आहे. अजून सुधारणेला वाव आहे का ? नक्कीच पण वाटते तेव्हढे टाकाऊ नाहिये. Tiered Contract आल्यामूळे प्लेयर्स अधिक serious झाले आहेत असेही वाटते.

कदाचित रोहित, राहुल असे ओपन करून धवन ल नंबर चार वर आणून बघण्याचा प्रयोग करायला हवा होता. left handed असल्यामूळे रशिद ला टॅकल करता आले असते. पांडे नि कार्थिक ने निराशा केली राव. दोघेही एव्हढे talented असून मिळालेल्या फुटकळ संधींचा लाभ घेता आला नाही दोघांनाही. >> धवन ला ड्रॉप करून राहूल ला ओपनिंग ला पाठवा आणि प्रॉपर ४ नं चा लेफ्टी प्लेअर घ्या पण धवन ला ४ वर खेळवू नका प्लीज... प्रयोग म्हणूनही नको.. स्पेशालिस्ट लाँग रेंज शार्प शूटरला दुनळी देऊन धावत दहा दहा मीटरवरचे सावज टिपायला पाठवू नका.

चहल, यादव असे फिक्क्ष ठेवण्यापेक्षा त्यांच्याबरोबर जाडेजा आणून तिघांमधले दोन असे rotating couple ठेवले तर तोच तोच पण येणार नाही. बॅटसमन ना use to व्ह्यायची संधी कमी मिळेल. जाडेजा ODI मधे मधल्या overs भराभर संपवून मस्त टेम्पो ठेवतो. >> हा प्रयोग मस्त असेल. जडेजा पीच त्याला सुटेबल अस्लयास पांड्यापेक्षा चांगला 'ऑन द मनी' ऑप्शन ठरू शकतो. पण ईंग्लिश कंडिशन मधले सॉफ्ट डॅम्प पीचेस त्याला किती सूट होतील हा प्रश्न आहे.

आपले A टीम चे प्लेअर्स सुधारले तरी त्यांना प्रॅक्टिस मिळण्यासाठी समोरच्या टीमने ही त्यांचे I-प्लेअर्स आपल्या A टीमच्या प्लेअरविरुद्ध ऊतरवायला हवे ना. ईंग्लंडने बर्‍यापैकी ऊतरवले होते हे खरे आहे.

पण ईंग्लिश कंडिशन मधले सॉफ्ट डॅम्प पीचेस त्याला किती सूट होतील हा प्रश्न आहे. >> गेल्या दोन वर्षांमधे इंग्लंड मधले पिचेस विशेषतः limited overs साठी वापरले जाणारे जाणिवपूर्वक बदलले आहेत. Explosive batting चा उपयोग करून घेण्यासाठी शक्यतोवर flat, dry, slow पिचेसवर भर दिला गेलाय. World Cup सारख्या मार्की event मधे तर नक्कीच sub continental pitches (read : भारताला धार्जिणी) ह्यात शंकाच नको.

read : भारताला धार्जिणी >>> त्या ड्राय पिचेसवर एखाद्या भलत्याच स्पिनरसमोर कोलॅप्स करायला भारतीय टीम सक्षम आहे.

त्या ड्राय पिचेसवर एखाद्या भलत्याच स्पिनरसमोर कोलॅप्स करायला भारतीय टीम सक्षम आहे. >> Happy बघ choice असा आहे कि ग्रीन्/बाऊन्सी/डँप पिचेस वर समोर आमीर्/स्टेन्/रबाडा/स्टार्क्/कमीन्स्/पॅटिन्सन्/वायली/गॅब्रियल्/बोल्ट्/साउदी/वॅगनर्/वोक्स वगैरे कि ड्राय पिचेस वर समोर सोधी/लॉयन्/हेराथ्/अदिल्/शामसी/महाराज्/नरेन वगैरे. Chose your poison Happy

"४-५ नंबर वर राहाणे एकदम unsuitable आहे." - ऑस्ट्रेलिया मधल्या वर्ल्डकप च्या वेळी रहाणे खाली खेळला होता चांगला. त्याच्याकडे स्किल्स नक्कीच आहेत, पण 'केमिकल लोचा' चा जास्त प्रॉब्लेम वाटतो. पाचव्या क्रमांकावर नाही, पण ३-४ मधे तो चांगली स्टॅबिलिटी देऊ शकतो. रहाणे च्या बाबतीत 'कॉन्फिडंट' विशेषण अत्यंत गरजेचं आहे.

जडेजा वन-डे च्या प्लॅन्स मधे कितपत आहे माहीत नाही. लिनिटेड स्किल्स असलेल्या प्लेयर्स चा हाच प्रॉब्लेम असतो. वय, फॉर्म वगैरे गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तो नदीम कसा आहे? डोमेस्टीक मधे तरी चांगला खेळलाय. How about Gowtham, Shreyas Gopal, Hirwani? हे सगळे लेफ्ट फिल्ड ऑप्शन्स आहेत, पण ग्रूम झाले तर मजा येईल.

धोनी च्या विकेटकिपींग ला पर्याय नाही हे शास्त्री ने कितीही ओरडून सांगितलं तरी मी - 'फडकुलीणबाईंचा पोपट सगळं सगळं बोलतो हे प्राण गेले तरी मानायला तयार नव्हतो' - च्याच चालीत नाकारतो. धोनी ची किपींग ओव्हर टाईम डेव्हलप झाली. आणी तो आता बॅटींग मधे जे बॅगेज कॅरी करतो, ते बघता नवीन विकेट किपर ची गरज आहे. नवीन म्हणजे कार्थिक, पटेल नाही - नवीन, तरूण विकेट कीपर - पंत, इशान किशन, अंकुश बेन्स, एस. (श्रीकर) भारत ई.

पांडे चं अपयश सलणारं आहे. कोहली बरोबर अंडर-१९ खेळलेला (ह्याचा पुढच्या वाक्याशी काही संबंध नाही, पण वाक्याची स्टार व्हॅल्यू वाढते), डोमेस्टीक च्या ग्राईंड्स मधून आलेला खेळाडू जर यशस्वी होत नसेल, तर काहीतरी गडबड आहे. कार्थिक तसाही खूप काळ खेळून स्वतःचं स्थान पक्कं करू शकला नाहीये. १० वर्षांपूर्वी कार्थिक टेस्ट ओपनर होता हे कितीजणांना आठवत असेल, कुणास ठाऊक?

मला असं नाही वाटत की घाऊक प्रमाणात बदलांची गरज आहे, पण मिडल ऑर्डर मधे नक्कीच २ तरी स्पॉट्स ओपन आहेत.

How about Gowtham, Shreyas Gopal, Hirwani? >> Gopal is promising but again do you want leggie with Chahal ? He is legbreak baller and not left arm orthodox. गोवथम १० overs वाला वाटत नाही, T20 साठी योग्य वाटतो. हिरवाणी कोण आहे ? तीन वेगवेगळ्या style चे हवे असतील तर एक तर left arm orthodox किंवा ऑफ स्पिनर हवा. (सुंदर ?)

पण 'केमिकल लोचा' चा जास्त प्रॉब्लेम वाटतो. > >असू शकेल पण तो त्यावर IPL मधेही मात करू शकला नाही हे भयंकर धोकादायक प्रकरण आहे.

ह्याचा पुढच्या वाक्याशी काही संबंध नाही, पण वाक्याची स्टार व्हॅल्यू वाढते>> असेही असू शकेल कि कोहली कुठल्या कुठे गेला नि आपण इथेच ह्या feeling चा परीणाम म्हणून over thinking होतेय ? talent आहे ह्यात अजिबात शंका नाही पण results येत नाहित.

कार्थिक टेस्ट ओपनर होता >> बनवलेला टेस्ट ओपनर होता, नयन मोंगिया, पार्थिव, ह्या पठडीतला.

"हिरवाणी कोण आहे ? " - नरेंद्र हिरवाणी चा मुलगा. वॉशिंग्टन सुंदर ला विसरलो होतो मी. तो इंज्युरीमुळे बाहेर आहे.

"असेही असू शकेल कि कोहली कुठल्या कुठे गेला नि आपण इथेच ह्या feeling चा परीणाम म्हणून over thinking होतेय" - कुणास ठाऊक? मी आपलं ते वाक्य असंच घातलं होतं.

"बनवलेला टेस्ट ओपनर होता, नयन मोंगिया, पार्थिव, ह्या पठडीतला." - बरोबर आहे तुझं. बर्यापैकी खेळलाय तो ओपनर म्हणून (३८ पैकी १४ इनिंग्ज). अर्थात तसे भारताचे बरेचसे टेस्ट ओपनर्स बनवलेलेच होते.

अर्थात तसे भारताचे बरेचसे टेस्ट ओपनर्स बनवलेलेच होते. >> आकाश चोप्रा, गंभीर हे शेवटचे खराखुरे ओपनर का ? सेहवाग सुद्धा ढकलून बनवलेला. राहुल आधी ओपन करत नसे. विजय नि धवनचे काय होते देव जाणे.

Pages