क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९४ ट्रिकी टारगेट आहे. खूप चांगली बॅटींग करावी लागेल इंडियाला. ६०-७० रन्स आणी एखादीच विकेट ही आदर्श स्थिती असेल दिवसाखेर भारतासाठी.

पीच वर ऊभे रहात टेस्ट सारखे खेळून ऊपयोग नाही हे कोहली आणि कुर्रन ने दाखवून दिले आहे.
रेग्यूलर वन डे गेम खेळत चाळीस-पन्नास ओवर्स मध्ये काम संपवून टाकावे. धवन, कार्तिक आणि पंड्याला त्यांचा नॅचरल वन-डे गेम खेळा म्हणावं.

एकच्या आसपास रनेरेट ठेवायला पुजारा नाहीये रे टीम मधे. अन बाकी टी२० वीरांना ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे.

विजय सोबत राहणेला पाठवा अन म्हणाव आजचा दिवस खेळून काढा

हाब

धवन अन पांडया तेच तर करत असतात नेहमी

सामना जिंकण्याची , तोही मालिकेतील पहिलाच, एवढी चांगली संधी इंग्लंडमध्ये तरी दुर्मिळ . कोहली आंणि कं. ही संधी दवडतील असं नाही वाटत . इंग्लंड पेस व फिरकी गोलंदाजांना किती अक्कलहुषारीने वापरतं, यावर सामना किती रंगतदार होईल हें ठरेल, असं वाटतंय.

विजय सोबत राहणेला पाठवा अन म्हणाव आजचा दिवस खेळून काढा >> खेळून का काढायचा आहे ? पटापट रन्स बनवून प्रेशर बिल्ड करून पीच वर ऊभे राहण्याचा टाईम कमी करावा की टार्गेट सेट असतांना. नव्यान्नव बॉल खेळून काढले म्हणून १०० व्या बॉलवर आऊट होणार नाही असे थोडीच आहे.

धवन अन पांडया तेच तर करत असतात नेहमी >> नाही, त्यांच्या डोक्यात टेस्टच्या धीरगंभीर वातावरणामुळे कनफ्यूज्ड मेंदू असतो आणि हातात वन-डे ची बॅट असते. Lol त्यांना प्रेशर आवडते ऊभे राहून खेळायला नाही. हे २०० रन वन-डे च्याच मेंटॅलिटीने काढले पाहिजेत त्याला म्हणतात ईंटेंट दाखवणे. कन्फ्यूज्ड स्टेट मध्ये बॅटीम्ग करून दीडशे मध्ये गेम आटपणार आपला. आत्ता सेहवाग हवा.. द्रविड लक्ष्मण नको.

सेहवाग क्लासी होता रे

धवन राहुल अन पांडया तू म्हणतोस तसे फुल कन्फूज्ड असतात
कि कौनसा बॉल खेले और कौनसा छोडे

मग ते विचार न करता सगळेच बॉल मारायचे या स्ट्रॅटेजी नी खेळतात अन विकेट फेकतात

पांड्याला duel personality आहे. जेंव्हा तो पांड्यासारखा खेळतो तेंव्हा त्याचे थिन्किन्ग नि stroke play clear असतो. योग्य बॉल सोडतो, नि त्याच्या strength ने खेळतो बॉलच्या मेरीटपेक्षा. उलट जेंव्हा त्याच्या तला पांड्या झोपतो नि पुजारा/विजय जागे होतात तेंव्हा तो काय करतो ते देवालाच माहित.

एक्झाक्टली असामी....हेचेच म्हणायचे होते.. थँक यू ..
धवनचीही तीच गत आहे..

पांड्या ने अफ्रिकेच्या पहिल्या टेस्ट मध्ये जे ९४-९५ मारले होते... तसा तो कायम खेळायला हवा... ईंटेंट क्लीअर हवा...मग शॉट्स बरोबर येतात.

सेहवाग क्लासी होता रे > क्लास बद्दल नाही रे ईंटेंट बद्दल बोलत होतो.. जो त्याला सदैव कायम ठेवता आला... आणि अ‍ॅवरेज (मे बी अबव अ‍ॅवरेज) स्किल असूनही ग्रेट टेस्ट बॅट्समन वातेल असे नंबर्स जमवता आले.

२ बाद २३
कोहिलीला पुन्हा लढावे लागणार!

आजारी असताना जर तो इतकी चांगली बॉलिंग करू शकत असेल, तर फिट असताना काय होईल?

राहूल परत गंडला. पहिले तिघही खरं तर परत गंडले. रहाणे काय करतो ते बघायचं.

टीम ठरवताना प्रचलीत निकष धाब्यावर बसवायचे व मग ' चला, आतां ह्याला बाहेर आणि त्याला आंत ', असं पुढच्या
प्रत्येक सामन्यात करत रहायचं, हे धोरण म्हणजे अकलेची दिवाळखोरीच !

टीम ठरवताना प्रचलीत निकष धाब्यावर बसवायचे व मग ' चला, आतां ह्याला बाहेर आणि त्याला आंत ', असं पुढच्या
प्रत्येक सामन्यात करत रहायचं, हे धोरण म्हणजे अकलेची दिवाळखोरीच >> T20 च्या फॉर्म्स वर टेस्ट टीम निवडणे ह्यापेक्षा अजून दिवाळखोरपणा काय असू शकेल ? Unless you have players of caliber of Gilchrist or Sehwag who can take away test mach by in couple of sessions, test matches are always won by winning session after session and that demands patience. So we decided to put in Dhawan and Rahul since they score faster. आधी रोहित होता आता ह्या दोघांवर खो खो खेळायचा. दोघांपैकी एकच कोणी तरी असू शकतो. पांड्या आहे ना अगदीच उचलाउचलीची वेळ आली तर, हे दोघे कशाला एकत्र हवेत ? देर आये दुरुस्त आये असे म्हणायची वेळ यावी हि आशा धरू या.

टीम निवडीतला धरसोडपणा परफॉर्मन्स साठी मारक ठरतो. एक दिशा ठरवून, त्याप्रमाणे टीम निवडून, टीम मधल्या प्रत्येकाचा रोल डिफाईन करून खेळले तर टीम स्थिरावून चांगलं खेळू शकते. गांगुली च्या कॅप्टन्सी खाली हा एक मोठा फॅक्टर होता.

अजुनही आपलं डोमेस्टीक क्रिकेट इतक्या उच्च प्रतीचं नाहीये की त्यातून आलेला खेळाडू, जर स्वतः असामान्य प्रतिभेचा नसेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लगेच चांगलं परफॉर्म करू शकतो. अशा वेळी, खेळाडूंना ठराविक रोल मधे स्थिरावायला वेळ देऊन त्यांच्याकडून परफॉर्मन्स ची अपेक्षा ठेवता येते.

रहाणे आता बाहेर गेला तर परत आत येणे त्याला महाकठीण.
१५० तरी करा! पुनः कोहलीवरच सगळी जबाबदारी कार्थिक नि पांड्या काय करतील कुणास ठाऊक.

बुधी कुंदरन , फारूख इंजिनिअर.....श्रीकांत.....सेहवाग असे अनेक प्रयोग सलामीच्या जागेसाठी पूर्वीही झाले आहेत पण ते चांगल्या ओपनरच्या अभावी ; त्यातले, श्रीकांत व सेहवाग हे
प्रयोग यशस्वीही ठरले. पण अपवादालाच नियम ठरवायचा अट्टाहास हास्यास्पद आहे व त्यामुळे तोंडघशी पडण्याची शक्यताच अधिक आहे . असो.
आज सामना रंगतदार व्हावा अशी अपेक्षा व आपण जिंकावा अशी आशा आहे !

शेवटी कुर्रन ला करू दिलेल्या धावा इंग्रजांना विजय मिळवून देण्यात महत्वाच्या ठरल्या! ७ बाद ८७ नंतर इंग्रजांनी ९३ धावा केल्या!

आपण मात्र ५३ नाही करू शकलो! ७ बाद नंतर!

अहो ती धावपट्टीच एकदम वाईट झाली. त्यामुळे चेंडू किती वळेल याचे सगळेच अंदाज चुकले. म्हणूनच सगळे लवकर बाद झाले. नाहीतर १९४ म्हणजे किस झाडकी पत्ती या थोर भारतीय फलंदाजांसाठी.
चौकशी व्हायला पाहिजे, की हे खेळपट्टी अशी कशी बदलली, इंग्लंडच्या लोकांनी काही बदमाशी तर केली नाही ना?

इंग्रजांचे अभिनंदन! बेस्ट ऑफ द टू जिंकले नसून वर्स्ट ऑफ द टू हरले! सॅम कुरन नामक लॉटरी लागली नसती तर त्यांचीही अवस्था वाईटच होती. टेस्ट क्रिकेटवर, त्याच्यात आवश्यक असलेल्या स्किल्सवर वनडे-T-20 चे किती आक्रमण झाले आहे ते ही परत दिसले.

Pages