Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.
मग मुलीला शाळेत पाठवायचे कि नाही ? पाठवले तर परत आणायचे कसे या बद्दल आमची चर्चा चालू होती.
साहजिकच शाळा बंद का? कोण vans अडवते आहे वगैरे चौकशी मुलीने केली.
या आधी मराठा मोर्चा बद्दल तिने फोटो किंवा उडत्या बातम्या ऐकल्या होत्या ( शेजारच्या बिल्डिंग मधली अमुक तमुक मावशी मोर्च्याला एन्फिल्ड घेऊन गेली होती स्वरूपाच्या) पण त्यातले गांभीर्य तिला तेव्हा कळले नसेल
आज थेट तिच्या जगण्याशी संबंध आल्याने तिला जास्त शंका होत्या.
आरक्षण म्हणजे काय? कशासाठ? मुळात जात म्हणजे काय??हे विषय सकाळच्या घाईत सांगण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे संध्याकाळी नीट सांगेन म्हणून वेळ मारून नेली.
संध्याकाळ जवळ येत आहे, आणि तिला उत्तर देणे भाग आहे.
तुम्ही तुमच्या मुलांना "'जात" हि संकल्पना कशी सांगितलीत? किंवा सांगाल.? कि तुम्हाला कधी जाणीवपूर्वक सांगावी लागली नाही.
माझ्या केस मध्ये आम्ही घरात/ मित्र परिवारात कधीही जातीचा उल्लेख केलेला नसताना तिला तिची जात, पोट जातीसकट माहित होती , हा माझ्यासाठी धक्का होता. (वय वर्षे ८-९ )
तिला धर्म संकल्पना सांगताना विशेष त्रास झाला नाही, वेगळ्या देवाची पूजा करणारे लोक, इतपत स्पष्टीकरण तिला तेव्हा (वय वर्षे ५-6) पुरेसे होते. पण एकाच देवाला पुजणारे तरीही वेगळे लोक आणि त्यात मानली जाणारी उतरंड हे तिला कसे समजवावे?
काही टिप्स असतील तर नक्की सांगा
समाधी.... जेव्हा तुम्ही सो
समाधी.... जेव्हा तुम्ही सो कॉल्ड म्हणता तेव्हाच तुमच्या बौद्धिक कुवतीची झेप कळते.
मी विचार करतीये, आतंरजातीय
मी विचार करतीये, आतंरजातीय विवाह केलेल्या जोडप्याने त्यांच्या मुलांना नक्की कशी जात सांगावी ???
भरत
मला वाटत मागे तुम्हीच "अजात" ची माहिती देन्याचा एक धागा काढला होता.कागदोपत्री आपन अजात लावु शकतो का ??? त्या धाग्याची लिंक देता का ??
नानबा, तुम्ही पुण्यात वाढलात,
नानबा, तुम्ही पुण्यात वाढलात, शिकलात. माझाही जन्म पुण्यातलाच, पण लहानपण मात्र नासिक, जळगाव सारख्या उत्तर महाराष्ट्रा मध्ये गेले. तिथेच मी शिकले, नोकरी केली, परत लग्न करुन पुण्यात आले. शहर व गाव यातला फरक लक्षात घ्या. पुण्यात तुम्हाला ज्यांना उच्च वर्णीय मानले जाते , यात ब्राह्मण, सोनार, सिकेपी, मराठा हे लोक तर श्रीमंत अती श्रीमंत गुजराथी मारवाडी दिसुन येतील. पण उ. महाराष्ट्रात मी, चाळ ब्राह्मणांची पण शेजारी कॉलनी बौद्ध, नवबौद्धांची अशा वातावरणात वाढले. माझ्या मैत्रिणी पण अशाच अठरा पगड जातीतल्या. बौद्ध, सोनार, आगरी आणी शिंपी वगैरे. पण या बौद्ध कॉलनीत मी गेले की त्यांच्या वयस्कर लोकांमध्ये मला दिनवाणेपणा, एक अवघडलेपणा जाणवायचा. एक बामनाची पोर आपल्या लोकात येते, आपल्याला कुणी काही बोलणार तर नाही ना, असे भाव असायचे. मला लहानपणी हे कळले नाही, पण मोठे झाल्यावर जाणवल्यावर खूप वाईट वाटले. खरे सांगते की या लोकांमध्ये मी जेवढी मोकळी वावरले तेवढी कुठेच नाही.
यातली बरीचशी लोकं गावकुसाबाहेर रहातात, पडेल ते काम करतात आणी दारु वगैरे जवळ करुन जीवन जगतात. आरक्षणाचा पूर्ण फायदा यातल्या कोणालाच मिळालेला नाहीये. आपल्याला वाटते की यांनी तो फायदा उठवलाय, तसे नाहीये, ते आरक्षण शहरातल्या ST/ SC लोकांना मिळाले असेल, कारण शहरात जनजागृती असते, पण गावात-खेड्यात अजूनही तितकीशी ती नाहीये. यांचे जीवनमान पूर्ण सुधारलेले नाही.
प्रॉब्लेम हा आहे की काही लोक आरक्षणाने बीनधास्त होतात, आणी गैरसमजाला जास्त वाव देतात. माझ्याच बिल्डींग मध्ये वरच्या मजल्यावर एक नवबौद्ध कुटुंब होतं. आई वडील नोकरी करत होते, यांच्या दोन्ही मुली अतीशय हुशार व स्वभावाने चांगल्या. पण आई मात्र जाम खडुस. मराठा व ब्राह्मण वर्गावर तिचा जाम राग. त्यातुनच एक दिवस ती म्हणाली की माझ्या मुली हुशार आहेत, पण ३५ टक्के मिळाले तरी काय फरक पडणारे? नोकरी तर मिळेलच आम्हाला. तिच्या दुर्दैवाने आमच्या दोन्ही मराठा शेजार्यांनी ते ऐकले आणी ती दुसरी कडे रहायला गेल्यावर तिच्याशी कमीतकमी संपर्क ठेवला. हे असे ही उदाहरण आहे.
जात काही केल्या जात नाही, ना ती मनातुन जाते ना समाजातुन. एक करावे मुलांना कधी न कधी खरे कळणार असले तरी त्यांना माणुसकी म्हणजे काय हेच समजवावे. कारण जाती धर्मा वरुन एकमेकांशी भांडणारे , गरज पडल्यावर कसे मदतीला येतात हे ही पाहीले आहे. आधी घरातल्या लहान मुलांना समाजात, घरात, शेजारी वावरण्याचे एटीकेटस, मॅनर्स शिकवा, चार चांगल्या गोष्टी दाखवा.
नुसते सर्वधर्म सहभाव म्हणून शारुख्,अमीर, अक्षयचे सिनेमे दाखवण्यापेक्षा त्यांना वाचनाची गोडी लावा. कारण त्यातुन निदान त्यांना दुसरी बाजू पण कळेल.
रश्मि प्रतिसाद आवडला...
रश्मि प्रतिसाद आवडला... जातीची घाण प्रत्येक जातीतल्या लोकांमध्ये असते (सरसकट सगळ्याच नाही हां) पण प्रत्येक जातीत असे लोक असतात.
हेला, म्हणूनच म्हणले आहे की
हेला, म्हणूनच म्हणले आहे की पिण्डे पिण्डे मतिर्भिना कुण्डे कुण्डे नवं पयः;
जातौ जातौ नवाचारौ नवा वाणी मुखे मुखे
माणुस शिक्षीत होऊ शकतो, पण सुशिक्षीत लगेच होत नाही, वेळ लागतो. जोपर्यंत आपण आपल्या परीघातुन बाहेर पडत नाही, तोपर्यंत दुसरी बाजू, दुसरे मतप्रवाह कळत नाहीत. उगीच हा मराठा, हा ब्राह्मण, हा दलित या विचारांनी समाजात भेद मात्र सगळ्या प्रकारचे होतात.
समाधी.... जेव्हा तुम्ही सो
समाधी.... जेव्हा तुम्ही सो कॉल्ड म्हणता तेव्हाच तुमच्या बौद्धिक कुवतीची झेप कळते.
नवीन Submitted by हेला on 1 August, 2018 - 14:34 >>>>> आश्चर्य आहे हेला , या तुमच्या प्रतिसादावरुन तुमच्या सुद्धा बौद्धिक कुवतीची झेप कळते.
कसय ना, मला काही अशि माणसे भेटलीयेत, मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेय , त्यंना अगदी त्यांच्या गरजे नुसार त्यांची जात वापरताना पाहिलेय. आणी मुख्य म्हणजे ते स्वत: हे सगळे मान्यही करतात .
म्हणुन माझे असे मत झालेय , नाहितर का ऊगा एकाचा द्वेष करेन मी
समजा एखादी अशी व्यक्ती भेटली जी मला माझे हे मत बदलायला भाग पडावे अशी वागली, तर आनंदच आहे मला
मुलांना जात म्हणजे काय व
मुलांना जात म्हणजे काय व त्याची जात सांगून टाकावी. तु माळी, मराठा ,लिंगायत कोष्टी,मेहतर असे ज्याने त्याने ज्या त्याप्रमाणे सांगावे. उगाच जातीअंताची चळवळ व जातीविरहीत समाजाच्या गोष्टी करत बसू नये. असल्या गोष्टी विद्रोही संमेलनाच्या व्यासपिठावर शोभतात,लहान मुलांना थेट जात आणि व्यवसाय सांगून टाकावा.
बहि-यांच्या कानात पिपाणी
बहि-यांच्या कानात पिपाणी
@हेला - नाही रे, तिथे
@हेला - नाही रे, तिथे तुमच्या सारखे फुकटे होते ना त्यांच्या कानफाटत बसली न मारताच म्हणून शांतता पसरली ...
भुत्याभाउंचा हा प्रतिसाद
भुत्याभाउंचा हा प्रतिसाद प्रातिनिधिक आहे. त्यामुळे तो उडवला जाऊ नये.
रावसाहेबांना उडवले.... तसे
रावसाहेबांना उडवले.... तसे भुत्याभाऊ उडतील. नाही तर रावसाहेब बरोबर होते असे सिद्ध होईल. एकास शिक्षा त्याच गोष्टीसाठी दुसर्यास अभय असे संस्थळाचे धोरण नसावे अशी आपली माझी अपेक्षा आहे.
भुत्याभाऊ, असेच काल्पनिक
भुत्याभाऊ, असेच काल्पनिक कानफटात मारुन शांतता प्रस्थापित केल्याचा आनंद घेत राहा. आता येणार्या अनेक पिढ्यांना असाच शेखचिल्ली आनंद घेत राहण्याची तजवीज आपल्या मागच्या पिढ्यांनी करुन ठेवली आहे... तुम्ही बसा असेच चरफडत, आरक्षणवाले आरक्षण घेऊन पुढे जात राहतीलच. त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे, ते तो बजावत राहतील.
नको असल्यास सगळ्यांच्या जाती डिझॉल्व करा, ते तर करणार नाही, उगाच काल्पनिक कानफटीत मारल्याचा विद्वेषी कार्यक्रम मात्र जोरकस चालू आहे...
हेला, तुम्हाला विखारी
हेला, तुम्हाला विखारी प्रतिसाद द्यायची गरज का भासतीये ह्याची मला कल्पना नाही. पण मुद्दे मांडताना, सतत टाकून, टोचून लिहील्याने, मुद्दा पुढे न पोहोचता, फक्त त्या उद्वेगालाच प्रत्त्युत्तर दिलं जातय.
आता तुमच्या प्रतिसादाविषयी: "त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे" - नाही. हा घटनादत्त अधिकार आहे. घटनेने दिलेल्या अधिकारांचं रक्षण आणी अंमलबजावणी करणं हे न्यायसंस्था आणी सरकारचं कर्तव्य आहे.
जी खरच कामात पडते तीच खरी जात
जी खरच कामात पडते तीच खरी जात. बाकी सगळ्या फ़क्त नावाला आहेत.
मला फार अनुभव नाही ना माझा या
मला फार अनुभव नाही ना माझा या विषयावर अभ्यास आहे त्यामुळे कदाचित नाईव वाटेल. तसचं पोलिटीकली करेक्ट लिहीता येत नाही तरी कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.
कॉलेजमध्ये असताना माझी अशीच मते होती. आरक्षणामुळे लायकी नसलेल्या लोकांना संधी मिळते, लायकी असलेले लोक मागे राहतात, पुर्वजांनी केलेल्या चुकींची पापं आम्ही का फेडायची, माझ्या आठवणीत आणि पाहण्यात "त्या" लोकांना कोणी त्रास दिला नाही, हा सो कॉल्ड त्रास खरा आहे की कांगावा, पॉलिटीकल किंवा मिडीया स्टंट? आणि त्याची मॅग्निट्यूस खरचं किती. वगैरे वगैरे.
काही वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या मूळ गावी एका छोट्या खेड्यात गेले होते. मैत्रीणीबरोबर फिरत होते. तहान लागली, पाण्याची बाटली जवळ नव्हती म्हणून एका छोट्या घराचे दार वाजवले. घरात फक्त एक म्हातार्या वाकलेल्या आजी होत्या. आम्ही ओळख दिली पण त्यांनी काही आम्हाला घरात घेतले नाही. घरचे सगळे शेतावर गेले आहेत असे सांगितले. या छोट्याशा गावात - एका खोलीत चूल, खाट असणार्या घरात एवढी सावधगिरी याचे आम्हाला दोघींना आश्चर्य वाटले. त्यांना पाणी मागितले. त्यावर त्या कोपर्यातला माठ उचलुन बाहेर आणायला लागल्या. पण त्यांना काही ते जमेना. आम्हीच 'आहो आजी फक्त एक ग्लासभर पाणी द्या' असं सांगायला लागलो. मग त्यांनी ग्लास धुवून भरून उंबर्याबाहेर ठेवला.
आम्ही पाणी प्यालो. त्यांनी पेला तिथे बाजूला ठेवा म्हणून सांगितले. सवयीप्रमाणे पाया पडायला गेलो तर त्या घाईघाईने मागे झाल्या. "तुम्ही ...च्या मुली. तुम्ही कशा पाया पडता." कुठेही स्पर्श होणार नाही याची त्या काळजी घेत होत्या.
घरी आल्यावर तिच्या काकूंनी कुठे गेलात याची चौकशी केली. त्यांनी सांगितले की तो बौध्दवाडा आहे. आणि खास विचारले की तिथे कोणाच्या घरात तर गेला नाही ना. काही खाल्ले तर नाही ना.
माझ्या मैत्रीणीचे ते मूळ गाव असले तरी फारसा संबंध नसल्यामुळे तिलाही या गोष्टींची कल्पना नव्हती.
नंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून कळले की अजूनही जातपात हा भेद किती मानला जातो अगदी शाळेतसुद्धा मुले वेगवेगळी जेवतात. आणि हे चूक आहे असं कोणाला जाणवत नाही. ती त्यांची लाईफस्टाईल आहे, रोजचं जगणं आहे.
पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटूंबात वाढलेल्या आम्हा दोघींना आपण किती प्रीवीलेज्ड आणि बबलमध्ये आयुष्य जगतो याची पहिल्यांदा जाणीव झाली. त्या गावातल्या एका घरातील सदस्य म्हणून न जाता कदाचित टूरीस्ट म्हणून गेलो असतो तर याची डेप्थ कधीच कळली नसती. हे सगळं कळलं नसतं तर बरं इतका त्रास झाला नसता. आणि खरं सांगायचं तर असे स्वत:च्या मतांबद्दल लाज वाटणारे, आतून हालवून टाकणारे अनुभव पुन्हा घ्यायची इच्छा नाही.
त्यानंतर एकेक गोष्टी उलगडत गेल्या. आमच्या आजी-आजोबांच्या काळात कितीही गरिबी असली तरी पिढ्यानपिढ्या अशिक्षीत नाहीत. शिक्षणाला महत्व. पैसे नसल्यामुळे अगदी डॉक्टर इंजिनीअर नाही बनता आले तरी आई-बाबांच्या पिढीमध्ये कुठेतरी नोकरी करता येईल एवढे शिक्षण फक्त मुलगाच नाही तर मुलीलाही.
या बॅकग्राऊंडवर ज्या लोकांच्या घरी शिक्षण, शाळा आवश्यक नाही, अभ्यासाचे वातावरण नाही, सवय नाही, किंवा ज्यांचे आई वडील काहीच शिकलेले नाही, मुलांना प्रोत्साहन देतात, पण अभ्यास घेऊ शकत नाही, त्यांना थोड्या जास्त संधी मिळण्याबद्दल का तक्रार करावी.
गेल्या काही वर्षांत खूप लोक शिकायला लागल्यावर ओपन आणि रिझर्वेशन मधला मार्कांचा फरक कमी झाला आहे.
अगदी छोटे उदाहरण द्यायचे म्हणले तर बर्याच कामवाल्या बाईची मुलं-मुली शिकून नोकरी-धंदा करतात, आणि आईला आता तू हे काम करु नकोस म्हणून सांगतात. माझ्या महितीत एका कामवाल्या बाईंचा मुलगा डॉक्टर झाला आहे.
आणि वर इतरांनी म्हणल्याप्रमाणे सगळ्यांना शेवटी सारखाच अभ्यासक्रम आणि परिक्षा असतात, तसंच लायकी असणारे लोक लाथ मारतील तिथे पाणी काढतातच.
लोकांना संधी मिळाल्यामुळे खूप फायदा झाला हे सरळ सरळ दिसते आहे. गैरफायदा घेण्याबद्दल म्हणाल तर सगळीकडे ते असतेच. अगदी मित्राने उसने पैसे परत न करणे, प्रायव्हेट जॉबमध्ये लायक व्यक्तीला प्रमोट न करता आवडत्या माणसाला प्रमोट करणे, स्पेशालिस्ट स्किलसच्या लोकांनी फसवणे.
पण हा सगळा प्रवृत्तीचा एथिक्सचा भाग आहे. जनरलायझेशन करु नये.
माझ्या घरच्यांनी कोणाला त्रास दिला नाही, १००-२०० वर्षांपूर्वीचा अन्याय किती काळ उगाळणार अशा टाईपचे बोलणे किती फोल आहे हे कोणी सांगून खरचं कळणार नाही. इतरांचा त्रास आणि आरक्षणाची आवश्यकता कळण्यासाठी एम्पथी पाहिजे आणि जातीचा अभिमान / जाणीव नको .
कोणाच्याही कायद्याबाहेरच्या वागण्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही पण आपण पांढरपेशे लोक ज्याचा विचारही करु शकत नाही ते ज्या लोकांनी भोगलं आहे, आणि या जमान्यातही भोगत आहेत त्यांना कायद्याने, घटनेने दिलेल्या अधिकारांबद्दल निदान बोटे मोडू नये असे वाटते.
@हेला --> "त्यांचा तो
@हेला --> "त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे" या एका वाक्यात तुझी बौद्धिक पातळी कळली ... अरे तो जन्माने नाही तर घटनेने दिलेला अधिकार आहे.
>>Submitted by पीनी on 1
>>Submitted by पीनी on 1 August, 2018 - 11:34<<
मस्त पोस्ट. हाच समजुतदारपणा समाजातल्या सगळ्या स्तरांत भिनला तर २०-२५ वर्षांनंतर आरक्षणाची गरज कोणालाच लागणार नाहि...
वरदा, पीनी +.
वरदा, पीनी +.
आमच्यावेळी महाराष्ट्रात बोटावर मोजण्यासारखी सरकारी (स्वस्त) इंजिनियरिंग कॉलेजेस होती. खाजगी नुकतीच सुरु झालेली होती. एकदोन खाजगी मेडिकलही होती. खाजगी इंजिनियरिंग ची फी कनिष्ट मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेर होती. मेडिकल ची फी तर ऐकूनच बेशुद्ध झालो होतो.
ज्यांची अॅडमिशन थोडक्यात हुकली असे लोक आरक्षण वाल्यांवर खार खाऊन असत. आपल्यापेक्षा कमी मार्क असलेले "ते" इंजिनियरिंग ला गेले म्हणून संतापत. पण आपल्यापेक्शा कमी मार्क असलेले दुसरे "ते" बक्कळ पैसा मोजून इंजिनिअर /डॉक्टर होतात त्यांच्याबद्दल अजिबात विखार नसे..
फेफ भौ, फार मनाला नका लावून
फेफ भौ, फार मनाला नका लावून घेऊ. मी इथे जन्मसिद्ध म्हटले म्हणून काही राज्यघटना बदलून कायमस्वरुपी अमेन्डमेंट होणार नाहीये. जन्मसिद्ध म्हणजे जन्माधारित... जातीआधारित अधिकार... जात जन्मावर आधारित आहे ना? मग आरक्षणपण जन्मसिद्धच झाले की.
जाती डिझॉल्व करा सगळा आरक्षणाचा मामला रफादफा होऊन जाईल. पण ते तर कोण्णालाच सोडायचे नाहीये हे समाजात वावरतांना जाणवले आहेच. आम्हाला होणारा त्रास हा आरक्षणामुळेच आहे ही समजूत करुन दिली जाते तेव्हा कोणी कानउघाडणी करत नाही. आपल्या संधी ह्या आपल्यामुळेच डावलल्या गेल्यात दुसर्यामुळे नाही हे समजूनच घ्यायचे नाही.
नव्या शहरी पिढिला कॉलेजच्या अॅडमिशन आणि फी भरायच्या वेळीच जातीची जाणीव होते म्हणून सरसकट आरक्षणच चुकीचे आहे हा प्रचार सुरु आहे भारतात. त्याला अटकाव करायचा सोडून फुकटे कुबड्या कमी बुद्धिमत्ता दुसर्याची संधी हिरावून घेतात असले मानहानीकारक वक्तव्य इथे केल्या जात आहे त्यास मात्र 'शेंडीचा उल्लेख झाल्याने' चवताळलेले प्रत्युत्तर देत नाहीत का विरोध करत नाहीत. हे सत्य मज समोर दिसत आहेच.
Submitted by पीनी on 1 August
Submitted by पीनी on 1 August, 2018 - 21:04
--- पीनी, आपल्या प्रतिसादाबद्दल आणि विचारांबद्दल सलाम. एम्पथी सगळ्यात महत्त्वाची आहे. एम्पथी आपली जात, देश धर्म पोटजात भुगोल चालिरिती बघून बदलत तर नाही ना इतका प्रत्येकाने विचार केला तरी पुरे.
बाकी आरक्षण इथे हवंय तरी कुणाला? त्याची गरज आहे म्हणून ते आहे. ज्या दिवशी संपेल तेव्हा ते इर्रीलीवंट होत जाणार आहेच. जसे आज होत आहे. कोटा असून मागासवर्गीयांमध्येही चुरशीची लढाई आहे. आणि पन्नास टक्के इतके खुला वर्ग असून काहींना पोटदुखी आहे.. त्यांचे प्रश्न व समस्या वेगळ्या आहेत्,त्यावर उपायही वेगळे आहेत. पण त्या उपायांमध्ये जास्त कष्ट आहेत. दुसर्यांना फुकटे म्हणणे इज वेर्री इझी.
आरक्षण म्हणजे सवर्णांनी
आरक्षण म्हणजे सवर्णांनी दलितांसाठी केलेला त्याग, उपकार . त्याबद्दल आरक्षण घेणाऱ्यांनी क्ऋतज्ञ राहिलं पाहिजे, असं वाचून झालं काही महिन्यांपूर्वी. तेव्हा जरा धक्का बसलेला. आता मला अशा कोणत्याही पोस्टचं नवल वाटत नाही वा राग येत नाही.
एका समजुतदार पोस्टच्या गालिचाखाली या असल्या पोस्ट सारून दडवून टाकायला मी आतुर आहे.
वाह!..हा धागा आहे तर अजून....
वाह!..हा धागा आहे तर अजून.... बेफींच्या मागच्या पानावरील प्रतिसादाला +१
मी इंजिनिअरिंगला असताना
मी इंजिनिअरिंगला असताना मेकॅनिकल, केमिकल, वगैरे शाखेत एखाद दूसरीच मुलगी असे. नंतर कधीतरी भरभरून मुली दिसू लागल्या. तेव्हा कळलं की मुलींसाठी 30% आरक्षण सुरू केलय. अजूनही आहे का? इथे मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून दिलेल्या या आरक्षणाबद्दल मुलांना अशीच घृणा (?) वाटते का?
पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गीय
पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटूंबात वाढलेल्या आम्हा दोघींना आपण किती प्रीवीलेज्ड आणि बबलमध्ये आयुष्य जगतो याची पहिल्यांदा जाणीव झाली. त्या गावातल्या एका घरातील सदस्य म्हणून न जाता कदाचित टूरीस्ट म्हणून गेलो असतो तर याची डेप्थ कधीच कळली नसती. हे सगळं कळलं नसतं तर बरं इतका त्रास झाला नसता. आणि खरं सांगायचं तर असे स्वत:च्या मतांबद्दल लाज वाटणारे, आतून हालवून टाकणारे अनुभव पुन्हा घ्यायची इच्छा नाही.
<<
पीनी! येस्स!! यू मेड माय डे. मनःपूर्वक आभार!
तुमच्या संपूर्ण प्रतिसादापुढे इथल्या संभवित दीडशहाण्यांचे नेम धरून मारलेले उच्चजातीय बाण कसे अरमळून पडतात, ते धागा वाचणार्या कुणालाही सहज समजेल.
या भावना, हे अनुभव "शेयर" करणे, आजच्या खोटारड्या अल्टर्नेट रिअॅलिटीच्या सोशल मिडिया स्मिअरिंगमधे खरेच गरजेचे आहे.
जे तुम्ही केलेत.
त्याबद्दल, पुनः एकदा धन्यवाद!
"जन्मसिद्ध म्हणजे जन्माधारित.
"जन्मसिद्ध म्हणजे जन्माधारित... जातीआधारित अधिकार... जात जन्मावर आधारित आहे ना? मग आरक्षणपण जन्मसिद्धच झाले की." - मला ह्यावरून सहज 'बटाट्याच्या चाळीतलं', राघूनानांचं कन्येस पत्र आठवलं. 'टपाल > लपाट > पलाट > पआट > पओट > पोट > पोस्ट > पोस्त.
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
असो. चर्चा सुरळीत झाली, हे वाचून बरं वाटलं.
आअरारा - तुम्ही ज्या गोष्टी
आअरारा - तुम्ही ज्या गोष्टी च्या विरोधात इतक हिरिरीन, खालच्या पातळीला जाऊन बोलता आहात, ते तुम्ही स्वतःब द्दलच बोलता आहात हे लक्षात येतय का?
>>
@ नानबा,
माझ्या लेखनातील "खालच्या पातळीची" वाक्ये उर्धृत करा, अन्यथा, इथे जाहीर माफी मागा.
*
@ मा. वेबमास्तर, / मा. अॅडमिन.
कृपया विनाकारण व्यक्तिगत प्रतिसादातून चारित्र्यहननाचा प्रयत्न लक्षात घ्या, ही विनंती.
(अर्थात, तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रतिसादाखाली विकृत लिहिणारी दुसरी आयडी दिसली नसेल असे म्हणवत नाहीच, पण मी एकदा पाठी फिरणार्या आयडिस उत्तर दिल्याने आपण माझी मूळ आयडि बॅन केल्याचे आठवते आहे.
त्यामुळेच इथेही कार्यवाहीची अपेक्षा नाहीच.)
तरीही, फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हास उद्देशून इथेच लिहितो आहे. विपुत लिहित नाही.
धन्यवाद!
मला वाटले की आता फेफ यांना
मला वाटले की आता फेफ यांना किती विचार पडला असेल, हेलांनी माबोवर जन्मसिद्ध लिहिलंय.. प्रलय आलाय रं आता पुढच्या लाखो पिढ्यांसाठी.... इतकी काळजी मागच्या पिढ्यांतल्या जन्मसिद्ध अधिकारांबद्दलही असती तर आज ये दिन न देखने पडते....
---@सोनु जी... महिला, खेळाडू, माजी सैनिक, अपंग, प्रकल्पग्रस्त यासारखेही आरक्षण असते, त्यावरूनही समाजात दुफळी माजते, महिला आरक्षणमुळे स्त्री भ्रूणहत्या, स्त्रियांवर अत्याचार बलात्कार होतात,त्यामुळे आरक्षणावर फेर विचार व्हायलाच पाहिजे,
भुत्याभाउंचा हा प्रतिसाद
भुत्याभाउंचा हा प्रतिसाद प्रातिनिधिक आहे. त्यामुळे तो उडवला जाऊ नये.
Submitted by भरत. on 1 August, 2018 - 19:12
<<
याला व्हेंटिंग म्हणतात हो भरत. अगदी सहमत.
आता भरत यांचा प्रतिसाद विस्कटून सांगतो.
भुत्याभाऊ काय म्हणताहेत नक्की?
मुळात, मला ९० किलो गटात कुस्ती खेळायची आहे कारण मी ९८ किलो वजनाचा आहे, हे आधीपासून ठाउक आहे. पण मग त्या गटात सडकून माती खाऊन घरी येऊन "त्या ५० किलो-गट वाल्याला मी तर परवाच गल्लीत मारलं होतं तरी त्याला मेडल कसं भेटलं?" म्हणून भोकाड पसरल्यावर बापाने आपल्या लाडक्या दिव्याला सांगावे, की "बाळ, त्याला अजून ९० किलो होता आलं नाहिये ना? म्हणून गटाच्या कुबड्या वापरून मेडल मिळवावे लागते"
त्याच्या घरी मुळात खायलाच रेशनचे अन्न आहे, कुणी नावाजलेला उस्ताद शिकवत नाहिये, घरी तर कुस्तीचा गंधही नाहीये, अन तरीही आहे त्या वजनात, अनुभवात, मस्तीत कुस्ती खेळतोय, ही वस्तुस्थिती सोयिस्करपणे दडपली जाते आहे.
ही त्या भुत्याभाउंच्या प्रतिसादाची मूळ कथा आहे.
भुत्याभाऊंचं वाचणार्यांना भारी वाटेल, अन माझ्या बबडुवर कसा अन्याय झाला अशी शब्दरचना करून पब्लिकला येडी घालायची ट्याक्टिक लय जुनी आहे.
प्रातिनिधिक, लंगड्या घोड्यांचं समर्थन आहे. घोड्यांच्या रेसमधे जिंकता न आल्याबद्दल खेचर-गाढवांबद्दल आसूया बाळगणार्या बिलंदर लोकांचे ते अरण्यरूदन आहे!
तेव्हा, प्रतिसाद प्रातिनिधिक आहे. उडवू नयेच, याला अनुमोदन.
एस्टी मधे, "महिलांसाठी राखीव"
एस्टी मधे, "महिलांसाठी राखीव" अशा २ सीट असतात.
किंवा अपंगांसाठी "राखीव" अशाही २ सीट असतात.
आता,
एस्टीत जर ४ अपंग आले, तर त्यांनी त्या २ सीटसाठी काँपीट करायचे आहे.
महिलांनी त्या २ सीटसाठी.
बाकीच्या ४८ "ओपन" जागा महिला व अपंग यांना इतरांइतक्याच खुल्या आहेत. त्यांच्यात जोर असेल तर बळकावू शकतात.
आता, तिथे, त्या ४ जागांवर, महिला वा अपंग बसलेत म्हणून बोंब मारायचं कारण आहे का? स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीस विचारा.
(संपादन. "बॅकलॉग" चा अभ्यास केल्यावर, आहेत त्या ४ जागा रिकाम्या ठेवणे वा "योग्य महिला वा अपंग न मिळाल्याने" तिथे धडधाकट पुरुष बसविणे हे उद्योग केलेल्या किती आस्थापनांचा विदा हवा आहे? हे देखिल किरणूस विचारा. सांगेल तो.)
आता त्या २+२ रिझर्व सीटवर बसून माज करणार्या काही "ओपन"-वाल्यांबद्दलही विचार करा..
एवढे बोलून मी माझे दोन(शे) शब्द संपवतो.
अरे हो!
अरे हो!
ते "अॅडव्हान्स बुकिंग" वाले प्रिव्हिलेज्ड श्रीमंत राहिलेच. त्यांचं आधीच प्रायवेट कॉलेजात सीट बुक असतंय. महाराष्ट्रात नसेल तर कर्नाटकात असतंय, अन भारतात नसेल तर पोर्ग बीएस कराय्ला अम्रिकेत जातंय.
बीएस!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्यांनी रिझर्वेशन बद्दल बोंबा मारणे म्हणजे प्युअर बीएस. बरोबर ना?![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
Pages