बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज ममांनी मेघाची शाळा घेतली ती कोणत्या बेसिसवर?>> आर यू सिरिअस? टेल मी कि रेशमलापन शिव्या घातल्या चुकिची गोष्ट फॉलो केल्याने?

रेशमला संधी मिळताच तिने मेघावर आगपाखड केली पण स्वत:ची करणी कधी आ आणि रे बघतच नाहीत. मेघाने निदान माफीतरी मागितली, रेशमसारखे हू केअर्स लूक्स नाही दिले. मला वाटतं राजेशने नुकतच सांगितलं होतं मेघाला की तू बाहेर सगळ्यांना आवडतेस, त्याचाच परिणाम होता हा. रेआ स्वत: लगेच गेम सोडून देतात, दुस-यांच्या चुका काढत बसतात. सै आणि शराची साडी मस्त होती. शराच्या आजपर्यंतच्या सर्व साड्या मस्त होत्या. ती मोठी नाकातली शराने साडीवर घालायला हवी होती. मेघाला आजपर्यंत कधीच साडीमधे बघितलेले नाही. शरा आज केडी कोणाला म्हणत होती.

आज झापायला कोणी नव्हतं म्हणून मेघा. वरती रेशामला किती आवाज फुटला आज , बाई झेंडे तू पण लपवलेलेस ना. लग्गेच तोंडसुख घेतलं. बरं आणि अपोलोजि काय... आ रे ने कधी मागितली का आत्तापर्यंत ते चुकले तर कि ते कधी चुकलेच नाहीत ? मेघाने दहादा सॉरी म्हणून पण यांचा ऍटिट्यूड वाकडाच.
आस्तादला आत्ता वाटतंय ६०% काम झालेलं असता 'बिग बॉस ने सांगेपर्यंत , पण अंड्याच्या टास्कला पण हेच झालेलं ना, त्याचा फायदा त्याच्याच टीमला झाला. तेव्हा हे नाही सुचलं.
म मां वाटच बघत होते मेघा कधी चुकते आणि मी कधी झापतो, बरं एकटा नाही अस्स्तद रेशम आणि मी सगळे मिळून झापतो असं काहीतरी वाटलं.
आणि आज राजेश चक्क सुसह्य होता, आणि म मां चा ड्रेसही..

मेघाने टास्क सुरू झाल्यावर कपड्यात झेंडे लपवून चूक केली, फेअर नव्हती ती हे आधीच लिहिलेलं त्यामुळे मला म मां चुकले असं वाटलं नाही , स्मिताला पण योग्य बोलले. पण रेशम चुकली तर कधीच बोलत नाहीत, तेव्हाही बोलायला हवं.

रे ला काढा रे, टास्क खेळत नाही, किचनमध्ये काम करत नाही. फेऱ्या मारते, नाहीतर फुकते नाहीतर बाकड्यावर बसते.

Bb चं नेहेमी वरातीमागून घोडे असतात, टास्क सुरू झाल्यावर जे कोणी चुकत असेल, तेव्हा कधीच बोलत नाहीत. हे मी त्यांच्या पेजवर पण कितीदा तरी लिहिलं.

आता आधीच्या कमेंट्स वाचते.

अग मला पण आवडते मेघा आता बरेच दिवस.

बाय द वे जशी मेघा टीम आणि स्मिताची शाळा घेतली तशी नॉमिनेशन डिस्कशन केलं म्हणून आ रे टीमची शाळा कधी घेणार महेश सर तीही घ्यायला हवीय.

रेशमने आज वाहत्या गंगेत हात छान धुतले. तिला कधीच बोलत नाहीत ना म मां.

मांजरेकर ने फालतुपणाची हद्द केली, स्वतःच हसु करण्याची, पार्शल असायची परिसीमा गाठली.
इतकं कि रेशमच्या किंवा अस्तादच्या पी.आर कडून पैसे घेऊन होस्टींग करतोय असा सीन दिसत होता!
जर मेघानी झेंडे लपवणे चुकीची गोष्ट वाटली, जे तिनी स्वतःच लगेच मान्य केले तर अख्खा एपिसोड तेच तेच क्लिप दाखवून प्रुव्ह करायची काय गरज ? तिने मान्यच केलय !
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतो बिग बॉस तर मेघाने जे केले ते एकदम १०० % क्लेव्हर होते !
मग म्हणतात प्रिमायसिस मधे लपवले असते झेंडे तर चालल असतं , अरे मग कपड्यात लपवणे झाले कि व्हॅलिड!
बर जर इनव्हॅलिड होते तर रेशमनेही लपवले जीन्स मधे झेंडे, ते का नाही पॉईंट आउट केलं ?त्याची क्लिप का नाही दाखवली ?
ती व्हाइनर जुई खोटं बोलत होती मागे कि ब्लॉक्स फेकलेच नाहीत , तेंव्हा का नाही दूध का दूध पानी का पानी ?
रेशमने पैसे चोरलेले का नाही दाखवलं ?
ऋतुजाचा हात या लोकांमुळे मोडला ते का नाही दाखवलं ?
अस्ताद गुरुजीने त्याच्या कनफ्युज्ड तीर्थरुपांनी केलेली असंबध्द बडबड सिरियस्ली घेत एकच सूर लावलाय, मुलगी असल्याचा फायदा घेतात !
रडत होता नुसता कि मेघाच्या टाईट ट्रॅक्सच्या खिशातून /मुलीच्या कपड्यातून मी झेंडे नाही काढु शकत, अरे मग तुझ्या टिमची रेशम का नाही गेली मेघाच्या मागे ? ती तर बाई आहे ना ?
यांची टिम नुसतीच गिव्हप करून टाइमपास करत लोळत अस्स्ते बाकड्यावर !
आज किशोरने मस्त गप्प केले आस्तादला त्याने स्वतःचीच स्ट्रॅटेजी फॉलो न केल्याने, चोकर्स Proud
असो, मांजरेकर साहेब, डोन्ट मेक इट सो ऑब्व्हियस नाहीतर नेक्स्ट सिझनला तुम्हीच एलिमिनेट होणार, तुम्स्चीच हाकलपट्टी नक्की , जशी राजेशची झाली Happy
राजेशसे याद आया, आज जो आला तो वेगळाच माणुस होता , दिसायला आणि वागयला , लांबून अनिल कुंबळे आलाय वाट्लं !
हे अ‍ॅक्टींग होतं कि ते Proud
आज जे काही खोटे असो वा खरे असो, राजेश मेघाला २-३ दा स्ट्रॉगेस्ट म्हंटला आणि रेशमला वाकडी तोंडं करतेस म्हंट्ला, टॉप ३ मधे आस्तादच नाव नाही घेतल त्याची भडास दोघांनी मेघावर काढली Proud
उद्या फादर्स डे ची रडारड म्हणजे फॉरवर्ड करायची सोय.. किती रडतात हे लोक , आधी फॅमिलीज आल्या तेंव्हा डोळ्याचे नळ आता हे Uhoh

आस्ताद त्या दिवशी मोठा शहाणपणा करून इतरांना सांगत होता ना की आम्ही सगळं बोललो वगैरे मग आज कशाला आता ते खोटयाखोट्या फोनवरून रडायची नाटकं करतोय? सांगायचं नां आम्हांला बोलायला फोन वगैरे लागत नाहीत, नुसत्या वाईब्सनेच आम्हांला एकमेकांच्या मनातलं सगळं कळतं वगैरे वगैरे.......आगाऊ कुठचा. चेहेर्‍यावर सतत माजोरडे भाव घेऊन फिरत असतो.

कंटाळा यायला लागलाय आता खरंतर बघायचा. मला हे सगळं स्क्रिप्टेडच वाटतंय.

म.मां नी जशा आज लोकांना खोडकर गिफ्ट्स दिल्या तशी त्या मांजरेकरला ही गिफ्ट फ्रेम करून द्यायला हवी,
मेसेज एवढाच, रेशमच्याच भाषेत “ छी बकवास” Proud
39D46018-6E97-4DA6-9E24-9CC709196922.jpeg

राजेशसे याद आया, आज जो आला तो वेगळाच माणुस होता , दिसायला आणि वागयला >> हो एकदम स्वच्छ दिसत होता - भरपूर धुलाई झाली ना बाहेर आणि त्याच्या घरी! Rofl

राजेशसे याद आया, आज जो आला तो वेगळाच माणुस होता , दिसायला आणि वागयला >> हो एकदम स्वच्छ दिसत होता - भरपूर धुलाई झाली ना बाहेर आणि त्याच्या घरी! Rofl
<<
हजामत पण Biggrin

काय??!! कुठे,कसं कळलं? ट्विटर bb official page वर तर शर्मिष्ठाला सर्वात जास्त वोट्स मिळालेली दाखवलीयेत,मग स्मिता,सर्वात कमी भुषण.

शर्मिष्ठा होईलही एलिमिनेट आणि नक्की कोण झाले मला माहित नाही पण तो वर दिलेला व्हिडिओ असच एक प्रेडिक्शन आहे ना? तिथे असेच स्मिता आणि भूषण चे व्हिडिओ पण दिसले सजेशन्स मधे.

हे फक्त prediction आहे . Eviction prediction चे विडिओ बरेच येत असतात वीकएंड च्या आसपास या Youtube चॅनेल चे आणि इतर हि चॅनेल्स चे . पण भूषण चा फोटो पहिला एका FB ग्रुप वर मा मा बरोबर घराबाहेर गेल्यावर मा मा सोबत उभा राहून असतो बाहेर स्टुडिओ मध्ये ऑडियन्स समोर . ते खरं ठरो रे देवा !

दिपांजली आणि मामी तुमच्या पोस्ट्स खूप छान असतात . मी वाट बघत असते . सगळे च जण छान लिहीत आहेत .
social media तर पेटलं आहे फुल्ल , कालच्या एपिसोड नंतर !
खरोखर म मां च्या रेशम बद्दलच्या पार्शिअलीटी ची हद्द झाली काल .
काय तिचा डायलॉग "छी बकवास " . एव्हडी घृणा होती त्या २ शब्दांमध्ये , जणूकाही ही एकदम सत्यसावित्री आहे.
Very upsetting episode indeed !

भूषण मांजरेकर फोटो टाकलाय कोणीतरी मीन्स बाहेर भूषण मांजरेकरांबरोबर माईकवर बोलतोय.

स्मिता हवी घरात.

Pages