बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Dj + 1

हा माणुस जमिनीवर कधी येईल असे वाटत नाही , तो त्याच्या काल्पनिक अति हुच्च अभिरूचिच्या बबलमधेच रहाणार नेहमी. 'बडा घर आणि पोकळ वासा' आहे आस्ताद म्हण्जे.

>>>> अगदी अगदी. बरोब्बर वर्णन केलंयस.

आज तो शर्मिष्ठाला कीचनमध्ये जे काही सांगत होता की " मी आता रागावर ताबा मिळवलाय, मी शांतच आहे, मी जर चिडलो तर ते फार वाईट असेल कारण शांत माणूस चिडला की ते फार वाईट असतं." ते ऐकून प्रचंड हसले. या अस्तादनं मूर्खांच्या नंदनवनात रेशमच्या घराशेजारीच स्वतःचं एक टोलेजंग घर बांधलंय.

बरं इतकं स्वतःबद्दल बोलून झाल्यावर तो कोणाला तरी स्वतःचं वर्णन " स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही असा माणूस" टाईप काहीतरी केलं.

एकीकडे मेघा, शर्मिष्ठा, सई नॉमिनेशला घाबरतात म्हणून टोमणे मारून हसत असतो. आणि याचं नॉमिनेशन झालं की स्वतः किती घाबरतो हे बघून मजा येते मला तर. आज पुष्करला पटवून देताना म्हणत होता की " नॉमिनेशनची भिती अशी नाही पण टेन्शन येतं ना रे"..... हसवून हसवून मारणार हा माणूस मला.

बरं मेघाला दरवेळी नॉमिनेट करून एक जागा अडवायची नाही. तिला बाहेर खूप सपोर्ट आहे हे हाच बोलला होता ना? Biggrin

कन्फ्युजनच्या बाबतीत अस्ताद स्मिताला जोरदार टशन देतोय.

बरं मेघाला दरवेळी नॉमिनेट करून एक जागा अडवायची नाही. तिला बाहेर खूप सपोर्ट आहे हे हाच बोलला होता ना? Biggrin>>>> तो त्याच्या हुच्च प्लॅनिंगचा भाग होता ज्यातली हवा मेघाने झेंडे लपवून काढून टाकली. Wink

स्वतःचं वर्णन " स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही असा माणूस" टाईप काहीतरी केलं.>
नॉमिनेशनची भिती अशी नाही पण टेन्शन येतं ना रे >. Lol मस्त करमणूक आहे खरंच!
नॉमिनेशन्स ची अ‍ॅक्टिविटी तर केली ना, फुगे फोडून. मग वोटिंग आणि एलिमिनेशन्स नाहीत का फक्त? का?

आज मेघानं काय सॉल्लिड मारलंय रेशमच्या थोबाडीत (हो, आम्ही अश्यावेळी थोबाडच बोलतो). रेशम ऑमलेट का कायतरी करत होती तेव्हा मेघा तिथे खुर्चीवर बसून राजेशनं तिला हाताला स्पर्श केला आणि मग तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा खूप वॉर्म्थ जाणवली वगैरे वर्णन करत होती. Rofl

रेशम राग आटोक्यात ठेवत आपण त्या गावचेच नाही असा चेहरा फुगवून काम करत होती.

एकदम नयनमनोहर का कायसंस म्हणतात तसा सीन होता तो. Lol

अजुन एक शक्यता, हर्षदानी जसा अचानक निरोप घेतला तसं नं.कि चं काँट्रॅक्ट संपलं असेल , तो तसाही जाणार असेल !

नॉमिनेशनस झाली ना. एलिमीनेशन नाही असा बोर्ड गेला का, मला दिसलं नाही काही.

आपल्या आवडत्या सदस्याला वोट करा असं पेजवर दिसतंय.

( बिगबॅास किंवा फुटबॅाल) रेकॅार्डिंग करून नंतर भसाभस फारवर्ड करून पाहिल्यास समोर बसायचा वेळ वाचतो.

आस्तादचा उकळणारा लाव्हा झाला होता आज ! माझ्यासारखा बॅल्न्स्,विचारी,परिपुर्ण व्यक्ती घरात असताना राजेश पासुन आरती पर्यत एकानेही मला फायनलच्या लिस्ट मधे टाकल नाही?? त्यामुळे त्याच्या कॉमेन्ट दर मिनिटाला आधिच्या कॉमेन्ट्ला कॉन्ट्र्डिक्ट करत होत्या "शान्त गदाधारी भिम! शान्त" हे तो स्वतःलाच सान्गत होता पण शान्त राहण काही त्याला जमतच नव्हत.
मेघा-सई ची आता नॉमिनेशनची भीड चेपुन ओव्हर कॉन्फिडन्स फेज आल्यासारखी वाटत होती विशेषत: मेघाची, साभाळुन हो ! ओव्हर कॉन्फिडन्सने माति झालेली अनेक उदाहरण आहेत.

आस्ताद कसल्या माजात फिरत असतो, लोकं येऊन एक्सप्लेनेशन देतात(का देतात ?) , तरी उपकार केल्यासारखा ऐकत असतो . स्वतः अपॉलॉजीची अपेक्षा करतो, त्याने कितीवेळा माफी मागितली आहे आत्तापर्यंत. या मुली तर १० वेळा सॉरी म्हणून गेल्यात, तरी तेच कि जरापण अपोलोजेटिक नाहीत म्हणे.
या वेळेस कदाचित आऊ नॉमिनेट होतील त्यांना काढू असा 'बिग बॉस चं गणित असावं. पुष्कर त्यांना नॉमिनेट करेल असं वाटून त्यालाही तो अधिकार दिला, पण झाला भलतंच . पुढच्या आठवड्यात २ जणांना बाहेर काढतील.
बिग बॉसला 'बिग बॉस संपूच नये असं वाटताना दिसतंय.

काल रेशमच्या हातात टाचणी आली आणि त्या मॅडनं स्वतःचाच फुगा फोडला. खरंतर तिला स्वतःलाच नॉमिनेट केलं असं घोषित करायला हवं होतं. बावळट कुठली! आणि वर मी नाही फोडला मी नाही फोडला असं लहान मुलासारखं सांगत बसलेली. अगदीच प्यँ वाटत होती ती.

काल रेशमच्या हातात टाचणी आली आणि त्या मॅडनं स्वतःचाच फुगा फोडला.
तिने नाही हो स्वतःचा फुगा फोडला. कदाचित चुकून टाचणी लागली असेल. पण तसे काही दिसले नाही. सई मात्र मुर्खासारखे मी नाही फोडला, मी तर लांबच उभी होते वगैरे वगैरे रडगाणे गात होती. रेशम तिला म्हणाली सुद्धा की मी किंवा कोणी तुझ्यावर आरोप करत नाही आहोत.

काल बिग बॉस संपताना मेसेज दाखवलेला कि, या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद आहेत.

कि माझ्याच टिव्ही वर दिसला फक्त Wink Uhoh

पण voting बंद आहे ना यावेळी. मग चौगुले पाहुणा म्हणून आला असेल. कारण तो काल कशात interest घेत नव्हता, कोणाला नॉमिनेट करत नव्हता.

No elimination असेल तर पुष्करला गुगली टाकली, पार पचका होणार त्याचा, तो आणि सई कित्ती खुश असतील, सई सेफ आणि रेशम nominate म्हणून, रविवारी पार दोघांचा पचका होणार.

चौगुले गेला आणि त्याला नॉमिनेशन करायला सांगितलं तर mostly पुष्करला करेल आणि सेफ आऊला करेल, start ला बोलला म्हणून. एक अंदाज.

ओके, नॉमिनेशन बद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी वाचायल्या मिळाल्या , मी कधी बिग बॉस या आधी पाहिलं नाही त्यामुळे खरं खोटं माहित नाही !
तर वाचलं असं कि व्होटींग लाइन्स बन्द असल्या तरी म्हणे वेगळ्या पध्दतीने एलिमिनेशन होऊ शकतं !
कधी कधी कुठल्यातरी मॉल मधे वगैरे इव्हेंट ठेऊन तिथे आलेल्या लोकांना व्होट्स द्यायला सांगतात फक्त काही तास आणि त्यावर लाइव्ह निर्णय !
त्याही पेक्षा डेंजर, घरताल्या लोकांना मतदान करायला सांगतात ( अशा वेळी किशोर सारखे अपक्ष कामी येतात .)
त्यामुळे ‘बी रेडी फॉर शॉकिंग एलिमिनेशन’ असा मुड येऊ शकतो बिग बॉसला.
आज पुष्किला डिसिजन चेंजिंग पॉवर दिली तेंव्हा नं.कि म्हंटला सुध्दा त्याला, आय हॅव नथिंग टु लुझ, पण तुम्हाला मात्र माझी गरज मोक्याच्या वेळी पडु शकते म्हणून !
पुष्किला कन्व्हिन्स करायला गेलेल्या लोकांत फक्त नं.कि एखाद्या मुरलेल्या राजकारणी माणसा सारखा बोलला !
पुष्किने फार ऑबव्हियस निर्णय दिला अर्थात,शर्मिष्ठाला लाइफ लाइनची जास्तं गरज होती सई पेक्षा.
मेघा मस्तं कुल आहे आणि चांगली ओळखून आहे पुष्किला, ती म्हंटली कि तू काही मला वाचवणार नाहीयेस मला माहितेय !
मेघाने आता सई आणि पुष्कि साठी सॅक्रिफाइजेस बन्द करावेत , वेळ आली कि ते दोघे नाही साथ देणार तिला.
आस्ताद अनॉयिंग आहेच पण मला सई आणि शर्मिष्ठाचा जास्तं राग येतोय, का सारख्या सॉरी म्हणतायेत ?
सई सडेतोड उत्तरं देण्यातली होती अत्ता पर्यन्त ! या लोकांनी इतके दिवस व्हॉयलेन्स केल तेंव्हा किती वेळा आले सॉरी म्हणायला ? आस्ताद तर यांच्या टिममधे राहून दुसर्यंसाठी खेळला, बॅक्स्टॅब केलं , त्याचे वाटाणे डोळे गरागरा फिरवत खेकसला, तेंव्हा कुठे म्हंटला सॉरी ?
असल्या लुजर माणसाला आता नॉमिनेशन मधे ययाला नको म्हणुन उगीच मर्जी राखतायेत !
जर अंडे टास्क मधे त्या कॉर्नर टेबल खाली अंडे लपवणे फेअर होते तर झेंड्याचा दांडा कपड्यांमधे पास करून रोवणेही फेअर !
आउ बाकी मस्तं सेफ आहेत काहीही टास्क्स न करता !

ओहह डीजे असं होऊ शकतं का voting, लिमिटेड पीपलमध्ये. मग सारखं प्रेक्षकहो तुम्ही ठरवणार असं का म्हणतात.

एनिवे interesting but dangerous, manage करू शकतात ना मॉल मध्ये.

एकीकडे मेघा, शर्मिष्ठा, सई नॉमिनेशला घाबरतात म्हणून टोमणे मारून हसत असतो. आणि याचं नॉमिनेशन झालं की स्वतः किती घाबरतो हे बघून मजा येते मला तर. आज पुष्करला पटवून देताना म्हणत होता की " नॉमिनेशनची भिती अशी नाही पण टेन्शन येतं ना रे"> गिरे तो भी टांग उपर .:) आस्ताद हुच्च अभिरुचीचे बेंचमार्क सेट करत सुटलाय नुसता .

या आठवड्यात किशोर चौघुले हुकुमशहाच्या खुर्चीत बसणार आहे. सर्व सदस्यांना त्याने दिलेल्या सर्व आज्ञा पाळाव्या लागतील. बिबॉ ११ मध्ये विगु होता बहुतेक हुकुमशहा.

आज पुष्करने केलेले नॉमीनेशन आवडले आणि पटले सुद्धा. केवळ भावनेच्या आहारी जाऊन शर्मिष्ठाला सेव्ह करण्यापेक्षा सर्व दिवस तिथे राहिलेल्या गृपमधल्या मेघा वा सईचा विचार करणे योग्यच वाटलं.
तसंच रेशमला नॉमीनेट करणं अर्थातच ऑबव्हीयस होतं.
मात्र सईनी रेशमला नॉ. करण्याऐवजी नंकि ला का केलं ते कळलं नाही. कॅप्टनला असा चान्स मिळणार आहे हे माहित होतं का? नसेल तर ती खूप मोठी रिस्क होती.
इथून पुढे प्रत्येक वेळी रेशम आणि स्मिता नॉमिनेट होणं गरजेचं आहे.
आस्तादला तशीही व्होट कमीच मिळतात. त्यामुळे आत्ता तरी त्याच्यापासून धोका नाही.

आस्तादचं खरं रूप अगदीच टर्न ऑफ करेल असं आहे खरंच. काल मेघा त्याला नॉमिनेट करत असताना तिचं इंग्लिश चुकलं म्हणून तिची टर उडवत होता आणि रेशमनेही चुकीचंच स्पेलिंग सांगितलं त्या भरात ते विसरला! नंतर मागे बेंचवर बसून स्मिताची अक्कल काढत होता. अरे तुझ्याच ग्रुपमधली आहे ना ती? उगाच ढुढ्ढाचार्याचा आव आणतो. मॅच्युरिटी कमीच आहे.
स्मिताला कंठ फुटतोय हे पाहून बरं वाटलं. शर्मिष्ठा का गंडलीये? उगाच लोकांनी तिच्या डोक्यात 'गुलाम' भरवलंय आणि ती डळमळीत झालीये अचानक.
आऊ आणि नंकि काल गप्पा मारत होते ते पाहून डोळे निवले! Lol स्मिताही त्यांना जॉईन झाली तर ही तिसरी आघाडी कमाल करेल! Wink पहिल्यापासून दोन गटातच खेळत आहेत, स्पर्धेत मजा येण्याकरता तिसरी आघाडी हवीच आहे आता.

ऋतुजा येऊ द्या हो.. ती करेल तिसरी आघाडी तयार. असंही मेजॉरिटीत खेळणे तिला आवडत नाही असे ती म्हणाली होती. आता, तिची कह्री परिक्षा असेल. अर्थात, हे सगळं, ती आली तर. तिला एकही मुलाखत देऊ दिली नाही, बिबॉने यावरून ती एयील असं नक्की वाटतंय.

आज नंदकिशोर डिक्टेटर बनणार आहे. डिक्टेटरच्या गेटअपमध्ये तो सेम इदी अमीन सारखा दिसतोय. त्यानं मेघाला स्टँडसारखं उभं राहून दोन हातांवर टी शर्ट वाळवायला लावल्याचं दाखवलं. आता स्मिताला बिकीनी घालून पोहायला नाही लावली म्हणजे मिळवलं.

मात्र सईनी रेशमला नॉ. करण्याऐवजी नंकि ला का केलं ते कळलं नाही. >>>>> एखादा वीक सदस्य जर आपल्याबरोबर नॉमिनेट झाला तर आपले वाचण्याचे चान्सेस वाढतात. हे सईनं मेघाला सांगितलं देखिल होतं.

Pages