बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेघा fans अजिबात काळजी करू नका, जितके मांजरेकर मेघाला बोलतील तितकी तिची लोकप्रियता वाढेल आणि म मां ची कमी होईल.

मेघाची लेेोकप्रियता वाढेल,पण ती जिंकायलाही हवी. प्रेक्षकांची वोट्स तोंडदेखली असतील,कोणाला तरी तिसर्लायाच जिंकवायचं,म्हणजे रे ला, हे आधीच ठरलं असेल तर लोकप्रियतेचा काय ऊपयोग?
नंतर फक्त म मांना सो मि वर धुणे एवढच करु शकतात लोक. डिसीजन तर आपल्या हातात नाही.
देवा, मेघा नाही तर सै किंवा स्मिता जिंकाव्यात.पण रे, आ नको रे बाबा.

या कार्यक्रमाबद्दल इथे सुरु असलेली चर्चा पाहून अंमळ गंमत वाटली.

कोणत्याही चॅनलवरचा कोणताही रिएलिटी शो हा स्क्रिप्टेड असतो, त्यातले सगळे वाद, भांडणं, अफेअर्स आणि इमोशनल ड्रामा फक्तं टीआरपी मिळवण्यासाठी रचलेला असतो, पहिल्या एपिसोडचं शूटींग सुरु होण्यापूर्वीच विजेता ठरलेला असतो आणि त्यात पब्लिक व्होट्सना शून्य किंमत असते हे स्वत: रिएलिटी शो चा संचालक राहिलेल्या अन्नू कपूरने बर्‍याच आधी सांगितलं होतं त्याची आठवण झाली.

@स्वीप : चुकीचे आहे. शो मधल्या पॉप्युलॅरिटीवर डिपेंड असते . आधीपासून ठरले तर कॉमन लोक कसे विनर असते ?

भुशण कडू गेला असेल तर लय बेस्ट झालं , याचा अर्थ अजुन तरी एलिमिनेशन्स पब्लिक च्या व्होटींग प्रमाणे चालु आहेत, अपवाद रेशम !
न्युज एकलव्य स्टुडीओज कडून आहे तर बहुदा खरीच असेल, त्यांच्या न्युज कधीच कन्फर्मेशन केल्याआधी येत नाहीत.

Pudhachya nomination task baddal dakhawal. tyat astad ne meghacha fuga immediate fodala aani ti mostly nominated asel..
Astad aani resham faar krur category aahet.. agadi pushki jinkala tari chalel pab he doghe nako pls..
Mamanchya pkshpaataabaddal tar kaay karaaw kay maahit.. pan tyaamule sat sunday che epi ashakya bore aani biased waatatat

हुश्श स्मिता वाचली, मी खुश.>> मीपन..
आता परत चर्चा होणार आस्ताद आणि रेशमच्या कि स्मिता अन शर्मिष्ठाची इतकी काय पॉप्युलॅरिटी आहे कि इतकी वर्ष इंडस्ट्री मधे काम केलेला आणि इतके फॅन्स असलेला भूषण गेला पण ह्या नाही..

आता परत चर्चा होणार आस्ताद आणि रेशमच्या कि स्मिता अन शर्मिष्ठाची इतकी काय पॉप्युलॅरिटी आहे कि इतकी वर्ष इंडस्ट्री मधे काम केलेला आणि इतके फॅन्स असलेला भूषण गेला पण ह्या नाही
《《
I think Sharmishtha is equally senior and I guess busier than Astad in terms of work . She's done more tv shows than him .

I think Sharmishtha is equally senior and I guess busier than Astad in terms of work . She's done more tv shows than him .>> अगं पण हुच्च अभिरुची का काय म्हणत्यात ते असते का नाय..

मला आनंद झाला तो स्लाइम बॉल भूषण गेला म्हणून. रेशम-आस्ताद अजूनही क्लूलेस असले तरी नवल नाही , का बॉ आपलेच लोक एलिमिनेट होतायत ?!! अशी उच्च चर्चा ऐकणे करमणुकीचे असेल.
शरा सेफ झाली बरे झाले.आता पुढची टर्न आऊ असेल का?
काल राजेश चांगला दिसत होता . ऑल क्लीन्ड अप. बोलत पण वेगळाच होता. अलिप्तपणे. मेघाची तारीफ केली अन रेशम ला वाकड्या तोंडावरून बोलला! रेशम चे तोंड बघण्यासारखे झाले होते. त्यावर नंतर ते लोक कमेन्ट करताना दाखवले का वूट वर?
आज थत्ते आणि आरती ? कशाला बोलावले त्यांना ? शिवाय ते फादर्स डे फोन कॉल्स . का? का??? आज फा. फॉ.करणार तो भाग.

विकेंड डावात... तेच तेच खेळ पुन्हा पुन्हा किंवा तेच ते प्रकार फ्रीझ रिलिझ रिपिट आजच्यासारखे

बिबॉ क्रिएटीव टीम कुछ नया सोचो Wink

भूषण आणि शर्मिष्ठा मध्ये अगदी थोड्या मतांनी शर्मिष्ठा राहिली असं म मां म्हणाले म्हणजे अगदी हे वाक्य नाही पण असं. पर्सनली मला वाटत होतं मे स fans भरभरून मतं देऊन शर्मिष्ठा मागे टाकेल स्मिताला.

सईने शिताफीने डाव खेळला तो तिच्यावर उलटला. तिला अगदी स्मिता नको होती. आज पण पुष्करने आणि मेघाने स्मिताचं नाव घेतलं, ती राहील पण सईने नाही. पुष्कर आणि सईने स्मिताला challenged केलेलं तू वाचतेस, किती votes मिळतात बघू, पचका झाला. स्मिताला highest votes होते.

कडु गेला, छान झालं . स्मिता डिसर्विंग आहे ती राहिली हे उत्तम !.
रेशम टीम आता अगदी छोटी झाली आहे , काय रुबाब करायचे काही आठवड्यांपूर्वी, झुंडशाही ने गुंडागर्दी .
नंदकिशोर कितपत त्यांना साथ देईल कालच्या एपिसोड वरून तरी वाटत नाही आहे .
आणि कडू स्मिताला आदल्या रात्री सांगून गेलाय कि आता स्वतःसाठी खेळ त्यामुळे ती सावध खेळेल .

आरती ने येऊन खूपच निगेटिव्ह वाईब्स दिले , त्याचे तिला पैसे मिळाले असं ऐकलं .
थत्ते किती खोटे आहेत ,कसे इंटरव्यू दिलेत बाहेर आल्यावर त्यांनी, इतका कसं काय खोटं वागू शकतात .
बाहेर गेलेल्यांना थोड्या वेळा साठी का होईना घरात जायची संधी देणं पटलं नाही .

आरती भूषणवर खार खाऊन आहे हे ती प्रत्येकवेळा दाखवून देते. जुईला का नाही आणलं आणि रूतुजाला. थत्ते आऊंच्या पाया का पडला, नौटंकी नुसती. थत्ते पुष्करला काय सांगत होते, शुद्ध विशुद्ध मैत्री वगैरे, त्याला फक्त जिंकायची पडलीए. आऊला काढा बाबा आता, फार बोर करते ती. तिला नाही काढायची तलवार तर पाठवा ना घरी, काय जबरदस्ती आहे. रेशम तोंड वाकडं नाही करत, सिगरेटमुळे ते तसं झालंय, नाहीतर त्रेचाळीसाव्या वर्षी चेहेरा एवढा खराब नाही होत. ममां आधी त्या काॅलरला म्हणाले की मला सगळे सारखे, मग भूषणला म्हणाले की मी तुझ्याबाबतीत पारशीयल होतो. स्मिता आणि मेघाचे काॅल मला आवडले. रेशमने वडिलांबद्दल जे आहे ते सांगितले, ऊगीचच गुडी गुडी न बोलता. सगळे रेशमला शेवटच्या तीनमध्ये का बघतात, कोणत्या बेसिसवर,की ममांची लाडकी आहे म्हणून.

हो आरतीला जर पढवून पाढवलं असेल तर ती रेशमबद्दल एवढं चांगलं का बोलली. दाल मे कुछ काला है. स्मिता काही फक्त बिकीनीवर अवलंबून नाही, आरतीने एवढं टाकून बोलायची गरज नव्हती. स्मिता विकांताच्या आधी पार्लर ऊघडते वाटते, मेघाचे केस कापले, काळेचे केस काळे केले. छान आहे ती सर्वच बाबतीत. ममांने आज तिला परत कन्फूज बोलायची गरज नव्हती. सई आणि आऊ फार ईमोशनली विचार करतात, स्मिता आवडत नाही आणि भूषण लाडका, म्हणून दोघी स्मिता जाईल असे बोलल्या. थत्ते किशोरशी काही बोललेच नाहीत, एक शब्दही नाही.

थत्ते पण स्मिताला घालवायला बसलेले, मी असतो तर ती गेली असती म्हणे. आज आरती, थत्ते दोघेही निगेटिव्ह बोलले स्मिताबाबत. थत्ते काहीतरी अलंकारीक भाषेत बोलले. आरतीने पार वाटचं लावली तिची.

म मां मात्र जरा बरं बोलले काल, स्मिता grp मध्ये असते पण दिसते की ती.

भूषण कडू माझा फार म्हणजे फार आवडता कलाकार आहे. शो सुरू झाला तेव्हा त्यानेच जिंकावे असे वाटायचे पण जसा जसा गेम पुढे गेला तसतसे त्याच्याबद्दलचे मत कलुषीत होत गेले. सुशांत, राजेश यांच्यासारख्या लोकांना पाठींबा दिल्याने त्याची प्रतिमा डागाळली. खरे तर तो खूप खूप चांगला ॲक्टर आहे. इथे मिळालेल्या प्रसिद्धीचा त्याला फायदा होवो, त्याची करीअर अधिक उंचावर जावो आणि त्याचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते सुटोत.
--------------------------------
अंजूताई, वाचली स्मिता. म्हटलेलं ना!

भुषण कडू गेला ते वाईट झाले. शर्मिष्ठा जावी असे वाटले होते. पण स्मिता वाचली त्यामुळे तितके काही वाईट वाटले नाही.

ममां भुषणला बाहेर आल्यावर म्हणाले की मी तुझ्या बाबत थोडा पार्शल होतो. मला पर्सनली तू रहावास असे वाटत होते त्यामागचे कारण एकदम पर्सनल आहे वगैरे वगैरे. म्हणजे याचा अर्थ ममांनीच भुषणला आर्थिक मदत केली असावी आणि त्याची वसूली करता यावी म्हणून भुषण जास्त थांबावा असे तर नाही ना? (गंमत म्हणून लिहीले आहे. ह.घ्या.)

भूषण गेला .. .बेस्ट!

बिग बॉसचे घर दिवसेंदिवस अधिकाधिक स्वच्छ होत आहे. आता त्या बाकड्यावर बसून चुकचुकणार्‍या दोन फुकाड्या पाली गेल्या की मग मजा येईल. त्यानंतर नंदकिशोर, आउ आणि पुष्की गेले पाहिजेत.

मेघा, स्मिता, सई आणि शर्मिष्ठा .. याच क्रमाने विजेते नंबर आलेले आवडतील.

फादर्स डे आणि आरती थत्ते व्हिजिट बोअर झालं , फादर्स डे मधे नन्दकिशोर आणि रेशमचा फोन कॉल जेन्युइन वाटला!
आजचा एपिसोड बर्यापैकी फॉरवर्ड करत पाहिला, काहीच हॅपनिंग नव्हतं .
भुषण गेला चांगलं झालं फक्त आउ त्याच्या आधी जायल्या हव्या होत्या, त्या नॉमिनेट होत नाहीत , झाल्या तरी सेफ होतात !

मेघा, स्मिता, सई आणि शर्मिष्ठा .. याच क्रमाने विजेते नंबर आलेले आवडतील.
<<<
+१११११
मलाही हेच आवडतील पण बहुदा पुष्करला चॅनल नाही काढणार , एक तरी पुरुष अस्स्णार टॉप ५ मधे !
शर्मिष्ठा ऐवजी पुष्की किंवा रेशमला ठेवणार बिग बॉस .

ममां बाहेर आल्यावर म्हणाले की मी तुझ्या बाबत थोडा पार्शल होतो. मला पर्सनली तू रहावास असे वाटत होते त्यामागचे कारण एकदम पर्सनल आहे वगैरे वगैरे. म्हणजे याचा अर्थ ममांनीच भुषणला आर्थिक मदत केली असावी आणि त्याची वसूली करता यावी म्हणून भुषण जास्त थांबावा असे तर नाही ना? (गंमत म्हणून लिहीले आहे. ह.घ्या.)

योगी९००......हेच खरे कारण आहे

ऋतुजा येणार आहे की नाही? ती आली तर मजा येईल. ती आणि नंदकिशोर स्वतंत्र राहतील आणि अपक्ष उमेदवारांना जशी सरकार स्थापना करताना मागणी येते तसं काहीसं होईल दर वेळी Proud
नंदकिशोरला आता आऊ एपिसोडवरून बोलणं बंद करावं. खूप ऐकवून झालंय त्याला ऑलरेडी. टाईम टु मूव्ह ऑन. झेंडा टास्क मस्त खेळला तो. आस्तादलाही सुनावलं आणि फोन कॉलही मस्त झाला त्याचा.

रच्याकने, रिअ‍ॅलिटी शोंचं स्ट्रिक्ट ऑडिट होतं. अन्नू कपूरचं स्टटमेन्ट कित्येक वर्षांपूर्वीचं असावं. आता विनर ऑलरेडी ठरवणं इम्पॉसिबल आहे, सग्गळं काही टीआरपीवर अवलंबून असतं. इक्वेशन्स दररोज बदलत असतात. ऑडिटर्स ऑफिसमध्ये तळ ठोकून असतात. व्होट्स, मिस्ड कॉल्सचं व्यवस्थित ऑडिट होतं. चॅनेल्स म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या आहेत आता. त्यांना कडक नियमावली लागू असते.

आपल्या आवडीचा स्पर्धक जिंकला नाही की सेंटिमेंटल होऊन चाहते असं म्हणतातच, पण त्यात तथ्य नाही. जो स्पर्धक जिंकतो त्याला प्रचंड सपोर्ट असतो, आणि तो व्होटिंगच्या माध्यमातून दिसतो. हे आणि हे एकच कारण असतं तो जिंकण्याचं. कदाचित तो व्होटिंग मिळवण्याकरता अनेक टॅक्टिक्स वापरत असेल, पण त्यात चॅनलचा संबंध नाही. आपल्या आवडत्या स्पर्धकाला कदाचित कमी स्पोर्ट मिळत असावा, म्हणून तो हरतो, इट्स दॅट सिंपल.

Pages